सरकारकडुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी,संरक्षणासाठी बनवण्यात आलेल्या कठोर कायदा व सुव्यवस्थेचा काही महिला,तरुणींकडुन गैरवापर केला जातो आहे का? त्याचा काही महिलांकडुन गैरफायदा घेतला जातो आहे का?

सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कठोर कायदा अणि सुव्यवस्थांचा काही महिला तसेच तरु??

   सरकारकडुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी, संरक्षणासाठी बनवण्यात आलेल्या कठोर कायदा व सुव्यवस्थेचा काही महिलांकडुन गैरवापर केला जातो आहे का? त्याचा काही महिलांकडुन गैरफायदा घेतला जातो आहे का? 

आज जागोजागी असे म्हटले जाते की महिला सबलीकरण काळाची गरज आहे.आजची महिला प्रबळ झाली पाहिजे.आपल्यावर होणारया अन्यायाविरुदध लढण्यासाठी ती सक्षम झाली पाहिजे.अन्यायाविरुदध तिने आवाज उठवला पाहिजे.कारण जागोजागी महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार हे अजुनही दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.महिलांपासुन ते अल्पवयीन मुलींवर सुदधा आता बलात्कार होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
   म्हणुन भारत सरकारने याविरूदध आवाज उठवण्यासाठी याला आळा घालण्यासाठी कडक कायदे केले आहेत.जेणेकरुन कोणत्याही स्त्रीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.अणि ही खुप चांगली गोष्ट आहे की आज महिलांवर होणारया अन्यायाविरुदध सरकारने एवढे कडक कायदे केले आहेत की कोणी पुरुष कोणा महिलेकडे,मुलीकडे वाकडया नजरेने पाहायला पण चारदा विचार करेल.तसेच शाळेत,महाविद्यालयात शिकणारया मुलींना तसेच घरगृहिणींना कोणी त्रास देऊ नये म्हणुन आज त्यांच्या रक्षणासाठी जागोजागी महिला पथक योजण्यात आले आहेत.जेणेकरुन त्यांना कोणी त्रास देऊ शकणार नाही.अणि ही फारच कौतुकास्पद गोष्ट आहे.
   पण कोणत्याही नाण्याला दोन बाजु असतात पहिली बाजु तर आपण समजुन घेतली पण आता दुसरी बाजु सुदधा समजुन घेणे फार गरजेचे आहे.कारण टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही.महिलांवर अन्याय अत्याचार होतात हे आपण सर्वजण जाणतो.अणि हे आपल्याला ऐकु पण येते पण कुठेतरी आज पुरुषांवरही अन्याय होतो आहे याची दखल आपण घेतो आहे का?हा प्रश्न आज मला आपणा सर्वासमोर मांडायचा आहे.
   पुरुषांवर अन्याय हा विषय ऐकुणच खुप जणांना हसु पण येईल.अणि ते म्हणतील सुदधा की पुरुषांवर कुठला अन्याय होतो?.उलट पुरुषच स्त्रियांवर अन्याय,अत्याचार करतात.म्हणुन त्यांना चांगली अददल घडवायला हवी.
हो हे मी मान्य करतो की आपणास असे दिसुन येते की 100 टक्केपैकी 70 टक्के पुरुष हे स्त्रियांवर अन्याय,अत्याचार करतात.पण मग उरलेल्या 30 टक्के पुरुषांचे काय? मी कोणताही विचार तसेच प्रश्न मांडताना जोपर्यत त्यावर पुर्ण माहिती मिळवुन,सामाजिक संशोधन करुन योग्य त्या निष्कर्षावर पोहचत नाही तो पर्यत मी कोणताही प्रश्न मांडत नाही.
  म्हणुन मी पुर्ण दाव्याने अणि खात्रीने सांगु शकतो की आज जरी 100 टक्केपैकी 70 टक्के पुरुषांकडुन स्त्रियांवर अन्याय केला जातो आहे तरी कुठेतरी 30 टक्के पुरुषांवर स्त्रियांकडुन,तसेच मुलींकडुन अन्याय केला जातो आहे.पण कुठेतरी महिलांना कायदयाने पुरुषांपेक्षा जास्त सवलती दिल्या असल्याने पुरुषांचा आवाज दाबला जातो.तसेच स्त्रियांवर आपल्याला त्या थोडया जरी रडल्या त्यांनी अश्रु डोळयातुन काढले तर आपल्याला त्यांच्यावर दया येते अणि वाटते की नाही त्या स्त्रीची काही चुक नाही.म्हणुन पुरुषाचीच चुक आहे असे आपण गृहित धरतो.अणि त्याला शासनाकडुन,समाजाकडुन शिक्षा केली जाते.त्या कारणाने ज्या पुरुषांवर अन्याय होतो ते त्याविरुदध आवाज उठवण्याचा प्रयत्नही करत नाही.कुठेतरी ते कायदयापुढे हतबल होऊन जातात.कारण इथे आपल्या समाजात स्त्रियांची बाजु मांडायला खुप स्त्रीवादी लेखक,लेखिका आहेत पण पुरुषांची बाजु मांडणारा एकही पुरुषवादी लेखक आज आपणास दिसुन येत नाही.ही खुप मोठी व्यथा आहे.
  आज प्रत्येक ठिकाणी पुरुषांनाच समाजात दोषी ठरवले जाते.चुकीचे मानले जाते.पण स्त्रीपण कुठे चुकते का? हा विचारच कोणी करत नाही.कारण इथे पुरुषांची बाजु खंबीरपणे मांडायला कोणाची हिंमत होत नाही.कारण महिला आरक्षणापुढे आपले काही चालणार नाही.स्त्रियांना कायदयात पुरुषांपेक्षा जास्त सवलती आहेत.आपले कोण ऐकुण घेणार आहे असा समज पुरुषवर्गाचा झाला आहे.त्याकारणाने ज्या पुरुषांवर महिलांकडुन अन्याय होतात ते त्याविरुदध आवाज उठवायला त्यांच्याविरुदध लढा देण्याला घाबरतात ही आत्ताची सत्यपरिस्थिती आहे.
 अणि याचाच गैरफायदा स्त्रियांकडुनही काही ठिकाणी घेतला जातो आहे.जसे की समजा एखादया पुरुषाचे स्त्रीशी काही वैयक्तिक भांडण वादविवाद झाले तर त्याचा वचपा काढण्यासाठी बहुतेक स्त्रीया वेळप्रसंगी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडुन घेतात.अणि आरडाओरड करुन त्या पुरुषाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असे सांगुन मोकळे होतात.सर्वच स्त्रिया असे करतात मी असे अजिबात म्हणत नाही.पण काही स्त्रिया महिलांवर होणारया अन्याय अत्याचाराविरूदध जो कायदा करण्यात आला आहे त्याचा असा गैरफायदा घेता आहे.हे मला सामाजिक निरीक्षणातुन निर्दशनास आले आहे.
 म्हणुन काही पुरुषवर्ग स्त्रियांची चुक असेल तरी त्यांच्याशी वाद घालत नाही.कारण ते घाबरतात की त्या स्त्रीने आपल्यावर काही नको तो आळ घेतला तर आपली समाजात बदनामी होईल या भीतीने काही पुरुष त्यांची चुक नसेल तरी माघार घेऊन घेतात.स्त्रियांशी जास्त वादविवाद करत नाही.अणि त्यातच त्या स्त्रीने पोलिसात तक्रार केली तर त्या निरपराध पुरुषालाच पोलिसांकडुन मार दिला जातो.कारण सर्व बाबतीत पुरुषच दोषी असतो असा चुकीचा समज आपल्या समाजव्यवस्थेचा आज झालेला आहे.पुरुषांची बाजु ऐकुण घ्यायला कोणी तयारच होत नाही.म्हणुन 70 टक्के अपराधी पुरुषांमुळे 30 टक्के निरपराध पुरुष हे विनाकारण शिक्षा भोगतात.कारण एक कांदा सडेल निघाला की त्याच्याबरोबरचे सगळे कांदे सडेलच असतात.असा समज आपल्या समाजव्यवस्थेचा आज झालेला आहे.काही पुरूष चुकुन वागले म्हणजे बाकीचेही तसेच असतील असा समज समाजव्यवस्थेच्या अणि खासकरुन स्त्रीयांच्या मनात पुरुषांच्या बाबतीत निर्माण झाला आहे.
  अणि हे प्रकार बहुतेक पुरुषांच्या बाबतीत आत्तापर्यत घडून चुकले आहे तसेच अजुनही घडत आहे हे मी माझ्या सामाजिक निरीक्षणातुन जे आत्तापर्यत लक्षात आले त्यातुन खात्रीशीरपणे सांगु शकतो.
 त्याचबरोबर असे अनेक प्रकार समाजात आज घडुन येतात आहे जसे की वैवाहिक जीवणात एखादया स्त्रीचे सासु सासरयाशी नवरयाशी काही वादविवाद झाले तर त्यांना अददल घडविण्यासाठी ती स्वताला शारीरीक इजा पोहचवुन घेते व घरगुती हिंसेची केस टाकुन सर्व सासरच्या लोकांना तुरुंगात डांबते.व महिलांविरोधी कायदे सक्त असल्यामुळे निरपराध असुनही त्या तिच्या सासरच्या लोकांना काहीच करता येत नाही.कारण ते कायदयापुढे हतबल असतात.असेही प्रकार आज जागोजागी आपल्याला पाहायला मिळता आहे.पण कायदा संपुर्णपणे स्त्रियांच्या बाजुने असल्याकारणाने त्या निरपराध पुरुषांना त्यात काहीच करता येत नाही.
   महिला आरक्षणाला तसेच सरकारने पुरुषांपेक्षा महिलांना कायदयात ज्या जास्त सुविधा दिल्या आहेत.त्याला माझा अजिबात विरोध नाही.पण महिला आरक्षणाचा कुठेतरी काही स्त्रिया,तरुण मुली जो गैरवापर करता आहे तसेच गैरफायदा घेता आहे.माझा त्या गैरवापराला,गैरफायदयाला पुर्णपणे विरोध आहे.महिलांना आज त्यांच्या सुरक्षेसाठी जे आज सरकारने कायदे केले आहेत त्याचा त्या जो कुठेतरी गैरवापर करता आहे.माझा त्याला विरोध आहे.म्हणुन हा प्रश्न आज मी इथे व्यासपीठावर मांडत आहे.
  माझे हे वक्तव्य पाहुन भरपुर स्त्रियांना माझा रागही येईल की स्त्रियांवर असा गंभीर आरोप करण्याची हिंमत करणारा हा कोण आहे?भरपुर स्त्रिया माझ्या ह्या व्यासपीठावरील लिहिण्यावर सुदधा आक्षेप घेतील.जेव्हा त्या माझा हा लेख त्या वाचतील तेव्हा.पण माझ्या डोळयांना जे दिसते.जे मला मनापासुन जाणवते.तेच सत्य मी नेहमी मांडत असतो.अणि आत्तापर्यत मांडतही आलो आहे.मग ते पुरुषांच्या बाबतीत असो किंवा स्त्रियांच्या बाबतीत असो.
   मला फक्त एवढाच प्रश्न ह्या व्यासपीठावर मांडायचा आहे की महिलांना सक्षम अणि प्रबळ बनवण्यासाठी देण्यात आलेले महिला संरक्षण,आरक्षण पुरुषांवर अन्यायकारक ठरते आहे का?महिला सबलीकरणाच्या नावाखाली पुरुषांना दुर्बल बनवले जाते आहे का?महिला आरक्षणाचा कुठेतरी गैरवापर केला जातो आहे का?अणि जर गैरवापर केला जातो आहे तर मग हा गैरवापर टाळण्यासाठी त्याच्यावर योग्य तो तोडगा काढणे अत्यावश्यक आहे का? त्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे?खरच कुठेतरी महिला आरक्षणाचा गैरवापर केला जातो आहे का?यावर संशोधनही होणे फार गरजेचे आहे.महिलांच्या संरक्षणासाठी त्यांना देण्यात आलेल्या महिला आरक्षणाचा तसेच महिलांसाठी बनवलेल्या कठोर कायदयाचा काही महिलांकडून गैरफायदा घेतला जातो आहे का?गैरवापर केला जातो आहे का?याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे आहे.
  जेणेकरुन कोणाही निरपराधावर विनाकारण कोणताही अन्याय होणार नाही.जनहितासाठी,आपल्या समाजातील स्त्रीयांच्या हितासाठी बनवलेल्या कायदयाचा गैरवापर होणार नाही.निदान तो व्यक्ती पुरुष आहे त्यामुळे तर नाहीच नाही.एवढेच मला सांगायचे होते.
  काही चुकले असेल तर क्षमा असावी पण जे सत्य आहे अणि माझ्या डोळयांना जे दिसते,डोळयांसमोर घडताना जे दिसते तेच मी रोखठोकपणे बोलत असतो.कारण नसताना खोटेपणा अणि विनाकारण मोठेपणा करणे,कोणावर विनाकारण आरोप घेणे हे मला अजिबात आवडत नाही.अणि पटतही नाही.जे मला दिसते तेच मी सांगत असतो.अणि तेच मत मी खंबीरपणे,ठामपणे,निपक्षपातीपणे मांडतही असतो.तरी काही चुकले असेल तर क्षमा असावी.

                        युवा आंबेडकरवादी लेखक,समीक्षक:
                                योगेश वंदना पोपट सोनवणे