Jan 26, 2022
नारीवादी

अरे संसार संसार

Read Later
अरे संसार संसार

अमित आज दिवसभर ऑफिसमध्ये चिडचिड करत होता. संध्याकाळी टी ब्रेक मधे राकेश त्याचा खास दोस्त त्याला कँटिग मधे घेऊन आला.
"काय यार अम्या, काय चालू आहे सकाळपासून..." - राकेश
"काही नाही यार, बायको ने डोकं फिरवलं आहे, हे का नाही सांगितलं, ते का नाही सांगितलं..."  अमित वैतागत बोलला.
"अरे आमच्याकडे पण सेम असतं. जाऊ दे या बायका डोकं खाण्यासाठीच असतात" म्हणत राकेश ने अमितला टाळी दिली.
"एसक्युझ मी, राकेश तू असा विचार करतोस??" त्याच्या सोबतच एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राकेशची बायको रेश्माच्या कानावर त्यांची बोलणी पडताच ती त्यांच्या सोबत येऊन बसत बोलली.
"अम्म नाही ग.... मी तर असच..." राकेश गडबडत बोलला.
"हो का.. पण काय आहे ना तुम्हा पुरुषांना बायको म्हणजे कटकटच वाटते. पण ती का बोलते ते समजत नाही. अरे संसार एका रथा ची दोन चाकं आहेत म्हणून दोघांची साथ, विचार, समर्पण, निर्णय महत्वाचे असतात. एक चाकं पुढे जाऊ शकत नाही अथवा त्याने तसा प्रयत्न केला तर रथ च उलटा पडेल. त्यामुळेच अमित जर विशाखा (अमित ची बायको) असा विचार करत असेल की तू तिला विचारात घेऊन निर्णय घ्यावा तर काय चूक आहे. अरे तुझी आयुष्याची जोडदार आहे ना ती, तिला ही मत आहे, स्वप्न आहे आणि जर तू एकटाच सर्व निर्णय घेऊ पाहत असशील तर तिला वाईट तर वाटणारच ना."
"हमम रेश्मा मी तर असा विचारच केला नव्हता. थॅन्क्स हा." - अमित
 


 


अमितला तर रेश्मा च म्हणणं पटलं. तुम्हाला??
 

 

©निमिषा मांजरेकर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Nimisha Manjrekar

Service

वाचाल तर वाचाल