संसार ४ अंतिम

मालतीने स्वतः च्या परीवारावर उभारलेला हात वरच्या वर उपचार टाकला होता. तिलाही तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी दार खुले झाले.

“जाउन सांगा त्या अश्रूंना

नको आता दुःखाचा बहाणा.

“अस कोणतरी मला बघायला आल होत, तेव्हा म्हटल होत?” मालती.

माधव ने डोळे उघडले तसा त्याला मालती दिसली होती. तिच्या मागे बाकी घरातले.

“आता कोण दुख देत आहे?” मालती. माधव फक्त खाली मान घालून बघत राहीला.

“सांगा न आता, हेच सरप्राईज देणार होते परवा मला माझ्या वाढदिवसासाठी??”

मालती ने माधव ची कॉलर पकडली.

“माझ जाऊ द्या, तो माणूस बघा, ज्याने आपल्या खांद्यावर तुम्हाला खेळवल, त्यांच खांद्यावरून तुमची तिरडी नेताना त्यांना काय वाटेल याचा विचार केला तुम्ही??”

“एकदा बोलुन तर बघायच न, अशा टोकाचा निर्णय??” सुशिलाबाई रडत बोलत होत्या. महादेवरावांनाही शॉक बसला होता. प्रीती ही घाबरली होती.

“मग काय करणार होतो मी?? कधी इकडचा रूपया तिकडे केला नाही, प्रामाणिकपणे काम केल, त्याच्या बदल्यात काय भेटल तर हे असे आरोप?? तु अशी बोलतेस, तु तरी काय केल?? दुस-या कोणासोबत तरी गेलीच होतीस न होटेल ला?”

“नाही सहन झाल, हाच उपाय भेटला?” माधव रागात बोलत होता.

“कोणाला भेटली, काय बोलतोय तु माधव, भानावर आहेस का??” महादेवरावांचा राग अनावर झाला.

“नको माझ्यासाठी पण निदान तु तुझ्या आई वडिलांसाठी तरी चौकशी समितीपुढे हजर हो” मालती.

“हे तु मला सांगायची गरज नाही, मी बघेल काय करायच आहे ते” माधव रागात मालती ला बोलला. त्याने मालती ला एका माणसासोबत हॉटेलमध्ये जेवण करताना पाहील होत. आणि ते मालती ने त्याच्यापासून लपवुन ठेवल्यामुळे त्याला मालतीचा राग आला होता.

“तुला तुझ्या आई वडीलांची शप्पथ आहे” मालती.

“अरे चालवल काय, कोणी सांगेल का?? कोणत हॉटेल, कोणती समीती?? सुशिलाबाई

“आई तुमचा विश्वास आहे न माझ्यावर??” मालती

“हो ग आहे, पण?” सुशिलाबाई

“मग विश्वास ठेवा उद्यापर्यंत सगळी उत्तर भेटतील” मालती पंख्याला बांधलेली दोरी सोडुन निघुन जाते.

“सो मिस्टर माधव तुम्हाला अजुन काही सांगायच आहे, ह्या दिलेल्या स्टेटमेंट शिवाय?” समीती प्रमुख

“नाही, मी काहीही गैरव्यवहार केला नाही, ते माझ खातच नाही” माधव.

“ठीक आहे, जो समीती निर्णय घेईल तो तुम्हाला कळवल जाईल” समीती प्रमुख.

माधव कॉलेजच्या मंदीरात जाउन प्रार्थना करत बसला होता. त्याच्या खांद्यावर एक हात आला.

माधव ने चमकून राहील तर मालती होती.

“तु इथे??” माधव “हो जिथे तु तिथे मी” मालती.

“तुला अजुनही मस्करी सुचते??” माधव रागात बोलतो.

“सो मिस्टर तुमच अकाउंट क्लीन डिक्लेअर केल आहे.” समीती प्रमुख.

“व्हॅाट ?? कस काय??” माधव

“तुमची बायको सांगेल तुम्हाला, एन्जोय युर डे” समीती प्रमुख

मालतीकडे थम्सअप करत तो समीती प्रमुख निघुन गेला. माधव मालतीकडे वळतो, तोच त्याच्या समोर मालतीकडे पेढ्यांचा बॉक्स धरते.

“कॉंग्रॅज्युलेशन मिस्टर माधव” मालती हसत माधव ला पेढा भरवते.

“सांगशील??” माधव गोंधळुन

“एक मिनीट” मालती.

देसाईंना पोलीस घेउन जाताना तिला दिसले.

“तुम्हाला मी आधीच वॉर्निंग दिली होती, माझ्या परिवाराच्या मागे लागु नका, तरी तुम्ही तीच चुक केलीत?? मालती देसाईंना बोलत असते.

“हा माझा संसार आहे, याला वाचविण्यासाठी मी माझी तत्व पण मोडेल. न्यायालयात जि शिक्षा देईल ती होईलच पण त्या आधी तुमची शिक्षा म्हणून तुमच्या २ नंबरच्या धंद्याचे जे अकाउंट आहे न ते रिकाम झाल समजा, पोलिसांसमोर बोलतेय जे करायच ते करा.” दुस-या मिनीटाला देसाईंना पैसे डेबीट झाल्याचे मेसेज येउ लागले. तसा त्यांना घाम फुटायला लागला.

पोलिसांनीही मालतीशी हस्तांदोलन करत देसाईंना घेऊन गेले.

माधव आता रागात मालतीकडे बघतो.

“चला घरी सांगते” मालती एक गाडीकडे जाते. माधव ला त्या गाडीत बसायला सांगते. माधव बघतो तर तोच मुलगा असतो ज्याच्या सोबत मालती ला पाहील असत, त्याला अजुन एक शॉक बसतो. ते सर्व घरी पोहोचतात. माधव त्या मुलांबद्दल काही बोलणार तोच माधव ची आई त्या मुलाला हसत आ बोलावते.

“ये रे समीर, आज जेवण करूनच जा” सुशिलाबाई.

“अरे काय चाललय सांगाल मला?” माधव आता जवळपास ओरडत बोलत होता.

“तुम्हाला अडकवण्यासाठी पहीले प्रीती ला ब्लॅकमेल करण्यात आले होते, ते मालती ने पकडले” समीर

“काय??” सगळे ओरडले

“हो, मालती ने तीचा मोबाइल हॅक करून तीच लोकेशन स्वत जवळ घेतल होत. तिच्यामुळे आज प्रीती सुरळीत आहे” समीर

सगळे प्रीती कडे पहातात, ती मानेने हो बोलते. तशी सुशिलाबाई नी तीला मिठीत घेतल.

“आता प्रीती हातात नाही आली म्हणून ऑनलाईन चे काही व्यवहार हॅकर्सकडून लपविण्यासाठी आले जे माधव च्या खात्याला दिसले.” समीर बोलत राहीला. “मालती ने ते हॅक तर तोडल होत पण त्या हॅकर पर्यंत पोहोचत नव्हती, मग ती माझ्याकडे आली आणि आम्ही त्या हॅकर्स ला पकडले.”

“पण ही आणि हॅकिंग??” माधव

“तुझी बायको काय करते तुला माहीत नाही??” समीर

“हा ते कॉम्प्युटर प्रोग्रामर आहे” माधव

“फक्त प्रोग्रामर नाही प्रोफेशनल हॅकर पण आहे ती, हॅकींग च्या जगात कॉम क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे ती” समीर

“तरीच त्या दिवशी २ मिनीटात त्या राहुलच्या त्या खात्यावरचे पैसे गायब झाले” प्रीती ला आता आठवल होत.

“हॅकिंग फक्त पोलीसांच्या सायबर सेल ला मदत म्हणून करते, बाकी तिने कधीच स्वतः साठी ते वापरल नाही” समीर

“तरीच पोलिसांसमोर बोलली, उडवले पैसे तुझे काय करायच आहे ते कर” माधव मालतीकडे बघत. “तु माझ्यासाठी तुझ तत्व मोडलस??”

“हा मग, माझ्या माणसांना त्रास देणा-यांना मी थोडी तशीच सोडेल” मालती

“म्हणजे आमचे सरप्राईज वाले मेसेज पण वाचले?” प्रीती

मालती ने डोळे मिचकावले.

“काय ग तु,” प्रीती लटक्या रागात.

सगळ काही ठिक झाल म्हणून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

“एक मिनीट, पण हा कोण आहे??” माधव ने समीर कडे बघत विचारल.

“ओळखल नाहीस??” समीर

“तुमच्या लग्नात तुला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवत तुझे बुट चोरणारा मालतीचा मावसभाऊ” महादेवराव.

माधव ला आठवल त्याचा सारखा मोबाइल वाजत होता, ब्लॅन्क कॉल ने. आता सगळे हसायला लागले.

मालतीचा वाढदिवस आला. तिच्यासाठी सरप्राईज प्लान करताना मालतीनेच तिच्या परिवाराला गिफ्ट दिल होत, सुरक्षिततेच.

“डोळे बंद कर” माधव मालती ला बोलला. तसे तीने डोळे बंद केले. माधवने सायबर सेलच्या पदवीकासाठीचे फॉर्म तिच्या हातात ठेवले. मालती ने डोळे उघडून पाहिले, आता ती शॉक झाली होती.

“प्रीतीच्या लग्नाचा खर्च म्हणून तु आम्हाला काही बोलली नाहीस, आमच्यासाठी स्वतःच स्वप्न तु बाजुला सारलस. आपला संसार तु वाचवला, तुझ स्वप्न आता मी पूर्ण करणार. फी च टेन्शन नको घेउन, फक्त अभ्यास कर आणि सायबर सेल मध्ये जाउन देशाची सेवा कर.”

मालती ने सर्वांकडे पाहीले, सगळ्यांना होकारार्थी मान हलवली. तशी तिने माधव ला मिठी मारली.

“ऐक न वहिनी तुमचा रोमान्स बेड मध्ये करा न, नाहीतर आई सगळ्यांना परत किचन मध्ये पाठवेल” प्रीतीने वातावरण हलक होण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांना छेडल.

तसे दोघही बाजुला होतात. आणि प्रीतीलाही माधव मिळत घेतो. सर्व परत हसायला लागतात.

समाप्त…


🎭 Series Post

View all