Login

अर्धांगिनी भाग ९

In this part malti goes for the interview and the she gets that job

अर्धांगिनी भाग ९

क्रमश : भाग ८

चंदू ने मालतीची काळजी घेतली म्हणून इन्फेकशन न होता तिचा हात लवकर  बरा झाला .

चंदू ने मालतीचा नोकरीचा अर्ज जवळच्या दोन तीन शाळेमध्ये नेऊन दिला . इंटरव्यूह साठी तिची तयारी करून घेतली . तिला प्रश्न उत्तरे विचारायचा . आणि प्रॉपर उत्तर  कसे द्यावे हे पण सांगितले कारण शहरात खूप कॉम्पिटिशन होती एका पोस्ट साठी ५० तरी अर्ज यायचे त्यामधले एका ला सिलेक्ट करायचे म्हणजे कॉम्पिटिशन खूप होती .

 एक  दिवस मालतीला च्या नावाने इंटरव्यूह साठी पत्र आले .

मालती छान साडी घालून अभ्यास करून इंटरव्यूह साठी निघाली . चंदू बरोबर होताच . तो स्वतः तिच्या बरोबर गेला . "घाबरू नकोस .बिनधास्त उत्तर द्यायची " असे तो तिला सांगत होता .

तसा  मालतीचा हा पहिलाच इंटरव्यूह  होता कारण गावाला अण्णा असल्याने तिला इंटरव्यूह देण्याची गरज पडली नाही . इकडची  गोष्ट वेगळी होती . तिला कोणी ओळखणारे नव्हते . हातात एक फाईल घेऊन मालती इंटरव्यूह ला गेली .

मालतीचे फर्स्ट इम्प्रेशन तरी खूप छान होते . तिचे मार्कशीट , एक्सपेरिअन्स लेटर पाहिले  . एक दोन प्रश्न विचारल्यावर मालतीला मुलांच्या वर्गात नेण्यात आले आणि फळ्यावर एक कठीण गणित लिहिलेले होते . हे गणित तुम्ही आधी सोडवा आणि मग मुलांना सोपे करून शिकवा  असे सांगण्यात आले.

वर्गात मुले बसली होती आणि वर्गात शेवटी मागे ३ परीक्षक बसले होते .  त्याच वर्गाच्या बाहेर चंदू एका बाकावर बसला होता .

मालती  ने ते गणित पटापट सोडवले .आणि मग स्टेप बाय स्टेप मुलांना शिकवले . हे कसे आले , हे कसे आले असे विचारत विचारत मुलांना पण ते गणित सोडवताना मज्जा आली .

परीक्षकांनीं तिला सांगितले “अजून बऱ्याच जणांचे इंटरव्यूह बाकी आहेत तर आम्ही जे काही असेल ते तुम्हाला पत्रा  द्वारे कळवू . “

मग मालती आणि चंदू घरी  निघाले  .

चंदू " अण्णा म्हणतात ते खरं आहे .. तू एक चांगली शिक्षिका आहेस . मला खात्री आहे तुला हि नोकरी मिळेलच "

मालती " हो का .. नक्की का ? इकडे इंटरव्यूह त्या मानाने कठीण होता . त्यांनी मला इतिहास , भूगोल , सगळ्यातले प्रश्न विचारले . तुम्ही माझी छान तयारी करून घेतली होती. सगळ्यातला अभ्यास  करून गेलो ते बरे झाले . "

चंदू " हो मी त्यांना तशी चौकशी करून आलो होतो काय तयारी करायची ते विचारून आलो होतो  "

चंदू " आज तशीही  माझी  रजा आहे तर आपल्या कडे रिकामा वेळ आहे कारण आत्ताच १२ वाजलेत . घरी जाऊन तरी काय करणार त्यापेक्षा सिनेमा बघायला जायचे का ? "

मालती " तुम्ही म्हणाल तसे . पण आधी काहीतरी खाऊ या ?"

चंदू " असे करू माझ्या ओळखीचे एक उडपी चे हॉटेल आहे त्यांच्याकडे उडीद वडा सांभार खूप छान असते . आपण तिकडे जाऊन खाऊ .मग सिनेमा ला जाऊ"

मालती " चालेल"

मग चंदू आणि मालती दोघे पहिल्यांदाच हॉटेल मध्ये गेले . मालतीला हे सगळे फारच नवीन होते . चंदू मात्र मोठ्या थाटात हॉटेल मध्ये आला . मागे एकदा तो त्याच्या मिंत्रां बरोबर आला होता या हॉटेल मध्ये नाहीतर तो तरी कशाला येतोय अडी  अडचणीला वडा पाव ची गाडी च पोट भरत असे .

दोघे जिकडे पंख्याची हवा लागेल अशा ठिकाणी बसले . त्याकाळी असे सरार्स बायका हॉटेल मध्ये जायच्या  नाहीत. त्यामुळे मालतीला थोडे अवघडल्या सारखे झाले होते . त्यात ती पहिल्यांदाच हॉटेल मध्ये आली होती . सगळेच नवीन होते .

चंदू ने मेनू कार्ड मध्ये बघून दोघांना उडीद वडा संभार ऑर्डर केले .

थोड्याच वेळात वेटर त्यांच्या दोघांच्या डिश घेऊन आला .

चंदू काटेरी चमच्याने खायला सुरुवात केली मालती ला  त्या काटेरी चमच्याचे करायचे काय तेच कळत नव्हते . एक दोनदा चंदू ची  कॉपी करण्याचा प्रयन्त केला तिने पण  काही जमेना .

शेवटी चंदू ने तिला " तू हाताने खाल्लेस तरी चालेल " असे सांगितले

मालती आपल्या सध्या चमच्यानं खाल्ले .

मालती " छान आहे हो .. चविष्ट आहे "

चंदू " मी म्हटले होते ना .. कि इथले खाणे चांगले असते "

मालती "खरंच  छान आहे ."

दोघांनी उदित वडा संभार संपवल्यावर दोघात एक चहा मागवला आणि निघाले बाहेर .

तिकडून चालत चालत सिनेमा गृह च्या इथे आले . तिकडे पण तसेच बायका जरा कमीच असायच्या . आणि आता सारखे मल्टिप्लेक्स तेव्हा नव्हते . तेव्हा एका स्क्रीन वर एकच सिनेमा लागायचा . त्या दरम्यान "संगम " सिनेमा चांगलाच चालला होता . चंदू ने जाऊन दोन टिकेट्स काढून आणली आणि आता आतमध्ये सोडायची वाट बघत होते .

मालतीच्या गावात असे सिनेमा गृह पण नव्हते तिने एवढ्या मोठया  पडद्यावर सिनेमा कधीच पहिला नव्हता . आज ती ला सगळ्याच गोष्टी नवीन पहायला मिळत होत्या . चंदू पण तसे फारसे सिनेमा बघत नसे कारण तेव्हा सिनेमा बघणे , हॉटेल मध्ये खाणे या सगळ्यात जेवढे पैसे एका वेळेला जायचे तेवढ्या पैशात एखाद्या चा  महिन्या चा घर खर्च निघेल .

त्यामुळे फुकटची चैन करण्या पेक्षा त्या मार्गाला न गेलेल च बरे .

आज चंदू च मात्र वेगळाच  मूड  होता . मालतीला शहरात अजून काय काय मजा असते ते दाखवत होता .

थोड्याच वेळात लोकांनी सिनेमा गृहाच्या दाराजवळ गर्दी केली . त्यांचे तिकीट बघून एक माणूस  आत मध्ये सोडत होता . गर्दी कमी झाल्यावर दोघे आत मधे गेले आणि मग आपल्या सीट वर जाऊन बसले . लगेचच ट्रेलर सुरु झाले . पुढे येणाऱया सिनेमाचे ट्रेलर लागले . मालती अवाकच झाली . बापरे केवढे मोठे चित्र दिसते ना .. आणि सिनेमा सुरु झाला . मालती लहान मुली सारखी मधेच हसत होती , मधेच लाजत होती , मधेच घाबरत  होती , आणि शेवटी रडत पण होती .

चंदू " अग रडतेस काय ? "

मालती " आता रडायला येतंय तर काय  करू ?" रडता रडता  मधेच हसायला  लागली .

अशा प्रकारे सिनेमा संपल्यावर दोघे बाहेर आले . बाहेर आल्यावर चंदू ने तिला विचारले

चंदू " कसे वाटले असा मोठ्या पडद्यावर सिनेमा बघायला "

मालती " कसले भारी वाटतं  होते . मी असा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच पहिले . "

नवीन लग्न झाले ना तेव्हा चंदू पुढे आणि मालती मागे  चालायची . आता दोघे बरोबर चालू लागले होते . घरी जाता जाता चंदू ने मालतीला गजरा घेतला . मग दोघे आनंदात  घरी आले .

मालतीने  फ्रेश होऊन जेवण बनवले  दोघे जेवले .

रात्री पुन्हा चंदू बेड वर झोपला आणि मालती नेहमी प्रमाणे खाली झोपली . नंतर चंदू खाली कधी आला त्यालाच माहित नाही आणि  त्या दिवशी दोघांचा पण संगम झाला .

साधारण पंधरा एक दिवसांनी मालतीला पत्र आले कि तिचे ह्या नोकरी साठी सिलेक्शन झालं आहे आणि येत्या महिन्याच्या १ तारखेला रुजू व्हावे .

मालती खूप खुश झाली . पहिल्याच इंटरव्यूह मधून तिचे सीलेक्शन होऊन लगेच नोकरी  मिळाली होती .

चंदू खुश झाला . दोघे आता एकत्र स्वप्न बघायला लागली होते . " आपण एक आपलं असे स्वतःचे घर बांधू , तुम्हाला ऑफिस जायला एक छोटीसी  गाडी घेऊ. मग आल्यावर दोघे त्याच गाडीवर बसून छान फिरायला जाऊ "

चंदू " हो पण आता घरातले आणि शाळेचे दोन्ही तुला मॅनेज करावे लागेल . तसा मी आहेच मदतीला ."

मालती " हो .. मी सकाळी अजून थोडी लवकर उठेन . आणि काय दोघांचे तर असते ."

चंदू " आपण असे करू तू आता वेगळा नाश्ता करत नको जाऊस , चहा चपाती च नाश्ता करायचा आणि त्याच चपात्या डब्यात न्यायच्या दोघांनी "

मालती " शिवाय चटणी , लोणची करून ठेवते . मध्ये कधी भाजी झाली नाही तर त्या बरोबर खाता  येईल . "

दोघांचे प्लॅनिंग सुरु झाले

चंदू " तुला शाळेवर जायला रोज साठी साड्या  घ्यायचेत का ?

मालती " नको सध्या आधी आहेत त्या नसेन .. "

चंदू "ठीक आहे .मग स्वयंपाक घरात काही पाहिजे का ते बघ ?"

मालती " हो .. ते अजून एखादा स्टोव्ह असता ना तर थोडी मदत झाली असती . एकाच स्टोव्ह वर सगळेच तर थोडा वेळ जातो . "

चंदू " ठीक आहे मग आपण एक दोन दिवसात बाजारात गेलो कि आणू .

अशा प्रकारे मालती आणि चंदू ने मालतीच्या नोकरी  ची तयारी पूर्ण केली . मालतीने अण्णांना पत्र लिहीले आणि

कळवले कि मला नोकरी मिळालीय .

चंदू ला पण आपल्या बायको चा आदर तर होताच पण आता लगेच नोकरी मिळाल्याने गर्व वाटू लागला . तो मोठया अभिमानाने सर्वांना सांगायचं कि " ती डी एड आहे . तिला आता नोकरी पण लागलीय "

नाही नाही  म्हणता चंदू ने बायको साठी एक लाडाने शिफॉन ची साडी आणलीच .

मालती " अहो कशाला आणलीत .. अजून लग्नातल्या खूप साड्या आहेत . असू दे ग तुला नोकरी लागल्याचे कौतुक करण्या साठी आणली . "

चंदू  चे एक होते  साडी आणल्या आणल्या तो मालतीला ती लगेच नेसायला  लावायचा. 

बोल बोलता  मालतीचा नवीन नोकरी ला जाण्याचा दिवस उजाडला .

मालती त्या दिवशी सकाळी लवकर उठली . चहा नाश्ता , दोघांचे डबे बनवले आणि चंदू ने आणलेली नवीन साडी नेसून तयार . चंदू ने तिच्या केसात गजरा घातला . मालती देवाच्या पाय पडली आणि लगेच ती चंदू च्या पण पाया  पडली .

चंदू " अग , पाया  कशाला पडतेस “त्याने तिला दोन्ही हाताने वर उचलले

मालती " आज मला नोकरी ला जायला फक्त  तुमच्या सपोर्ट मुळे जायला मिळतंय . तुम्हाला कसे धन्यवाद देऊ तेच कळत नाहीये "

चंदू " आपल्या माणसाचे कुणी आभार मानते का ? तू तुझ्या अण्णांनी तुला शिकवले तर त्यांचे असे आभार म्हणतेस का ? अग आभार देवाचे मानायचे . आपण फक्त त्याची कट्पुतळी आहोत . तो जशी आज्ञा देतो तसे वागायचे ".

मालती चे भरून आलेले डोळे त्याने पुसले आणि  पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडायला गेला . ते पत्र दाखवून जेव्हा तीला रुजू करूनच  मग तो ऑफिस ला गेला .

🎭 Series Post

View all