अर्धांगिनी भाग ७

In this part anna visits maltis home

अर्धांगिनी भाग ७

क्रमश: भाग ६

जेव्हा एक स्त्री स्वतः साठी उभी रहाते ना तेव्हा तिला कोणी अडवू शकत नाही . मालती जरी गावात लहानाची मोठी झाली असली तरी ती डी एड पर्यंत शिकली होती . शिवाय तिच्या घरात तिचे वडील स्वतः  शिक्षक होते त्यामुळे संस्कार आणि नीतिमूल्य कशी जपावी हे अण्णांनी नक्कीच तिला शिकवले होते . अन्याय सहन करायचा नाही किंवा अन्याय कोणावर करायचा नाही या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत .

चंदू चे म्हणाल तर चंदू आणि रमेश मित्र होते .त्यात मालती रमेश ची बायको होणार होती ह्या सगळ्या आधी घडलेल्या प्रकारामुळे चंदू वर रमेश ला पटकन तोडता  येत नव्हते . कारण हे सत्यच होते कि तो रमेश च्या लग्नाला म्हणून गावात गेला होता . काही वेळेला अशी परिस्थिती येते कि आपण उगाचच अन्याय सहन करत असतो . परिस्थिती पुढे हतबल होतो तसेच काहीसे चंदू चे झाले होते .

असो पण आपल्या रणरागिणीने हा प्रॉब्लेम सॉल्व केला होता . झाल्या प्रकारात एक गोष्ट चांगली झाली ती अशी कि मालती आणि चंदू  मनाने जवळ आले .

त्यांच्या तील उपरे पण नाहीसा झाला . एक वेगळेच बॉण्डिंग तयार झाले . चंदू ला मालती हि माझी आहे ह्याची जाणीव झाली . मालती माझ्या बरोबर सुखी आहे कि नाही . मालतीला नवरा म्हणून मी पसंत आहे कि नाही असे जे प्रश्न पडायचे ते गायब झाले . म्हणून तर चंदू ने तिला न विचारता तिला  मिठीत घेतले .हि त्याची कृती एकदम natural होती .त्यासाठी त्याला विचार करावे लागले नाही किंवा विचार करून केलेले नव्हते .

त्यांच्या संसाराचा प्रवास हळू हळू सुरुवात ट्रॅक वर येत होता . आता पर्यंत लग्न नावाच्या सामाजिक बंधनात ते दोघे अडकले होते पण अजून एकमेकांच्या मनाचे राजा राणी बनले नव्हते . त्या दृष्टीने दोघांची वाटचाल सुरु झाली होती हे नक्कीच .

चंदू च्या खान्द्यावर डोके ठेवल्यावर मालती चा राग कुठच्या कुठे पळाला . मग  चंदू मालक आणि मालकिणीला जेवायला बोलवायला गेला . मालतीने पुन्हा घरातल्यांसाठी गरम वडे तळले .

चौघे जण मस्त गप्पा मारत आरामात जेवले . सर्व जण मालतीच्या वड्यांची तारीफ करत होते .

दिवसां मागून दिवस जाऊ लागले . मालती त्या शहरात मध्ये छान रुळू लागली . कधी भाजी कधी सामान आणायला एकटी  जाऊ लागली . चंदू ला तिच्या वर कॉन्फिडन्स आला होता कि ती एकटीने शहरात वावरू शकेल .

पुढे एक दोन महिन्यांनी असे कळले कि रमेश ने त्या कंपनीतला जॉब सोडला . आणि त्या शहराला कायमचा सोडून गेला .त्यामुळे त्यांच्या संसारावरील सावट  कायमचे दूर झाले होते .

बोल बोलता त्यांच्या लग्नाला ३ महिने झाले . त्यांचे रुटीन सुरु झाले . मालती नवऱ्याची सेवा मनापासून करत होती . रोज त्याचे ऑफिस कपडे काढून ठेव , स्वच्छ रुमाल दे, पाकीट दे , डबा  दे . चंदू पण रोज न चुकता तिच्यासाठी गजरा आणायचा .चंदू नुसता गजरा आणत  नाही तर तो स्वतः तिच्या केसात घालतो. 

एक दिवस असाच चंदू सकाळी ऑफिस ला गेलेला आणि मालती खालून प्यायचे पाणी भरत होती . आणि अचानक अण्णा पत्ता विचारत विचारत आले.

दारात अण्णांना बघून मालती च्या डोळ्यातून अश्रू च आले . आल्या आल्या अण्णांच्या पाया  पडली त्यांना बसायला दिले .

अण्णा " अरे वाह .. छान आहे घर . अण्णांचे बारीक लक्ष होते सगळीकडे . दारात तुळस , तुळशी भोवती काढलेली छोटीसी रांगोळी , घरातला देव्हारा  "बघून खुश झाले . एवढ्या छोट्याश्या खोलीतला त्यांचा राजा राणीचा संसार बघून अण्णा खुश झाले .

अण्णा " कशी आहे ग पोरी .. "

मालती " अण्णा मी खूप खुश आहे . आमचं खूप छान चाललंय . चंदू खूप चांगले आहेत . "

अण्णा " वाह ... वाह .. तुला खुश पाहून धन्य झालो.

मालती " तुम्हला इकडचा  पत्ता कसा मिळाला ?"

अण्णा " अग , जावई बापूंचे पत्रं आले होते . तुमची खुशाली कळवली . त्यात त्यांनी इकडचा  पत्ता पण कळवला  होता . "

मालती " अगो बाई , हो का मला बोलले नाहीत तुंम्हाला पत्र लिहलेले ."

अण्णा " हो ना... मला म्हणाले मुलीला भेटायला या . तिला तुमची आठवण येते ."

मालती " हो .. मी रोज तुमची आठवण काढते .. अण्णा .. आई कशी आहे ?"

अण्णा " हो .. बरी  आहे पण हल्ली तुम्ही दोघे नसता मग आम्ही म्हतारा म्हातारी काय करणार . असतो आपले आहे त्यात आनंदी ."

अण्णा " जावई बापूंनी खरं तर त्या वेळी तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतल्याने खरच खूप चांगले झाले . देवा सारखेच धावून आले मदतीला . त्यांचे मानावे  तेवढे उपकार कमीच ."

मालती " अण्णा .. हे त्यांना तुम्ही बोलून परके करू नका . तुम्ही त्यांना तुमच्या मनात स्थान दिलेत तर ते जास्त खुश होतील "

अण्णा " फार मोठे बोललिस  पोरी .. हे बोलून बोलून त्यांना आपण  परके करतो . कारण उपकार हे परक्याचे मानतात  आपल्या माणसाचे नाही "

मालती ने  लगेच स्टोव्ह वर गरम भात  लावला . पोळी भाजी तिची तयार  होतीच. तोपर्यंत अण्णा फ्रेश झाले . मालती  ने अण्णा आले म्हणून पुढच्या पुढे पानावर वाढायला गोडाचा शिरा केला . मालतीने अण्णांना जेवायला वाढले .

अण्णा सकाळचे निघाले होते .त्यांना भूक पण लागली होती . पोटभरून जेवले . मालती ला संसार करताना पाहून अण्णा खुश झाले . पानात वाढायला शिरा केलेला बघून त्यांना तिच्यात अन्नपूर्णा दिसली .

प्रत्येक बापाला आपली मुलगी संसारात रमलीय आणि सासरी छान नांदतेय हे पाहून कृतकृत्य झाल्या सारखे वाटते.

अण्णांचे जेवण झाल्यावर मालती पण जेवली . तोपर्यंत अण्णा बेड वर आडवे पडले ते पाच मिनिटात घोरायला लागले . मालती ने पण थोडा आराम केला आणि मग संध्याकाळच्या जेवणाला लागली . अण्णा आपले लांबून बघत होते , मालती एवढ्या छोट्या जागेत कशी सगळे करतेय . त्यांना कौतुक याचे वाटत होते कि कुठलीही तक्रार नव्हती . जे आहे ते तिने जसे च्या तसे अक्सेप्ट केले होते .

थोड्याच वेळात चंदू ऑफिस मधून आला . अण्णांना पाहून त्याला खूप आनंद झाला .

चंदू " नमस्कार ! कधी आलात , कसा झाला प्रवास ."

 बोल बोलता चंदू फ्रेश होत होता . मालती त्याला टॉवेल देत होती . मग पाणी दिले आणि मग लगेच चहा टाकला .

अण्णांचे बारीक लक्ष होते . ते दोघे कसे नांदत आहेत हे बघत होते .

मग तिघांनी बसून चहा घेतला .

चंदू " मालती , तुझं आवरलं असेल तर तिघे एक राऊंड मारून येऊ . अण्णांना ऑफिस दाखवतो "

मालती " हो मी तयार आहे ..फक्त साडी नसते चांगली  "

मालती ने पडद्या आड साडी नेसली . चंदू ने तिला आणलेला गजरा दिला . आज मालतीला लाज वाटली तिने तो गजरा आपल्याच हाताने घातला . आणि तिघे घर बाहेर पडले . अण्णांना चंदू च ऑफिस दाखवले येताना मंदिरात गेले .

चंदू " मालती तू आणि अण्णा पुढे घरी जा . मी आलोच माझे एक काम आहे ते करून "

मालती अण्णांना घेऊन घरी आली  आणि जेवण गरम करू लागली . अण्णा  फ्रेश होऊन वाट बघत बसले .

अण्णा " छान हो ऑफिस जावई बापूंचे . तसे फार काही लांब नाही . "

मालती " हो .. "

चंदू ने दुकानात जाऊन अण्णांसाठी सदरा धोतर आणि टोपी आणली . सासू बाईन साठी एक साडी घेतली आणि घरी आला .

चंदू घरी आल्यावर सगळे जेवायला बसले . आनंदात गप्पा मारत तिघे  जेवले .

चंदू " आता आला आहेत तर रहा आठवडा भर "

अण्णा " राहिलो असतो पण मला  दोन च दिवसांची सुट्टी आहे . शिवाय जाता जाता  मनीष ला भेटायचे .त्याला पण दिवाळी शिवाय भेटता येत नाही."

चंदू " तुम्ही राहिले असतात तर आपण अजून कुणीकडे तरी फिरायला गेलो असतो . तसे इकडे बघायला खूप आहे "

अण्णा " आता पुढच्या वेळी येईन . मी उद्या सकाळी ११ च्या गाडीने मनीष कडे जाईन तिकडे त्याला भेटेन आणि रात्री घरी जाईन . तशा आमच्या सौ पण एकट्याच आहेत गावाकडे . "

चंदू " ठीक आहे . "

जेवण झाल्यावर मालती भांडी आवरत होती तर अण्णा नि त्यांची बॅग उघडली आणि त्यातून एक वस्तू काढली

अण्णा " मालती इकडे ये ग जरा .. " मालती आली .

अण्णांनी मालती साठी  सोन्याच्या बांगड्या आणल्या आणि चंदू साठी एक सोन्याची चेन आणली होती चंदू च्या हातात देत होते .

चंदू " अण्णा , कृपा करून मला यातले काहीही देऊ नका . हा तुमच्या मुलीला जर बांगड्या हव्या असतील तर तिने वडिलांचा आशीर्वाद म्हणून घेतल्या तर तिचे ती ठरवेल . पण मला यातील काहीच नकोय . मी लग्नात पण घेतले नाही आणि आता पण घेणार नाही .

अण्णा " जावई बापू , अहो हा तुमचा अधिकार आहे .यात काही गैर नाही . "

चंदू " मला अधिकाराने तुम्ही प्रेम दया पण हे सोने नाणे असले काहीही नको . "

अण्णा " मी आता आणलाय तर हा एक दागिना घ्या यांनतर मी काहीही देणार नाही "

चंदू " अहो अण्णा , तुम्ही आधीच एक सोन्याचे नाणे मला दिले आहेत ..मला काहीही नको आणि मला कसलीही अपेक्षा पण नाही . "

चंदू काही ऐकायला तयार   नाही .

मालती " अहो , घ्याना .. अण्णांना बरे वाटेल .."

चंदू "मालती मग माझ्यात आणि बाकी कुणात काय फरक . मला असला व्यवहार आवडत नाही "

मालती " अहो , तुम्ही मागून जर अण्णांनी दिले असते तर हा व्यवहार होईल . पण त्यांनी तुम्ही न मागता तुम्हाला प्रेमाने काही आणले असेल तर ते त्यांचे तुमच्यावरचे प्रेम आहे "

चंदू " मला तू म्हणतेस ते पटत नाहीये ."

अण्णा " बरं , मी काय म्हंतो ते ऐकता का जरा .. मुलीला दागिने द्यायचे असतात हि जग रहाटणीच आहे . आणि जावयाला निदान  अंगठी आणि चेन हा त्याचा मानचं आहे . तुम्ही लग्नाच्या वेळी म्हटला कि काहीही दागिने घालू नका . त्यावेळी मी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो . मुलीचे लग्न होतंय का   मोडतय . जमलं तर अशा अनोळखी व्यतीच्या हातात आपल्या मुलीला सोपवायची कि ज्याच्या बाबतीत काहीच माहित नाहीये . हा निर्णय माझ्या साठी कठीण होता . पण त्या वेळी तुम्ही लग्नासाठी पुढाकार घेतला  नसतात तर आज मला तोंड दाखवायला जागा राहिली नसती . माझ्या मुलीला कितीही नाही म्हटले तर भरल्या मांडवातून परत आल्यामुळे तिचे जगणे  मुश्किल झाले असते .

देवाने तुमच्या रूपात देवदूतच पाठवला . आणि आज मी माझ्या डोळ्याने पहिले माझी मुलगी तुमच्या बरोबर खूप खुश आहे . सुखी आहे तर हे पाहून माझा जीव धन्य झालाय . आता लवकरच एक गोड  बातमी द्या .. नातवंडांना अंगा  खांद्यावर खेळवायचे माझे वय झालेय आता . काय .. मालती

मालती ला इतकी लाज वाटली .. ती पटकन पडद्या आड गेली .. आणि मनात म्हणू लागली " हे अण्णा पण ना .."

तर जावई बापू हि चेन तुम्ही घेतलीत तर मला आनंद होईल माझा आशीर्वाद म्हणून घ्या .

चंदू ला अण्णांच्या पुढे काही बोलताच आले नाही . त्याने ती चेन घेतली आणि गळ्यात घातली .

लगेचच चंदू ने पण त्याने आणलेले कपडे दिले .

अण्णा " जावई बापू , याची काही गरज नव्हती "

चंदू घ्या हो आज मला आई बाबा असते तर त्यांनाही मी घेतलेच असते .  चंदू ने आणि मालतीने अण्णांना वाकून नमस्कार केला .

अण्णा " अष्टपुत्र सौभाग्यवती भव : " असा आशीर्वाद दिला .

🎭 Series Post

View all