Oct 21, 2020
स्पर्धा

अर्धांगिनी भाग १८

Read Later
अर्धांगिनी भाग १८

 

अर्धांगिनी भाग १८

 

क्रमश : भाग १७

 

 

बिचारा चंदू आपल्या बायकोचे आपल्या विषयी चे विचार ऐकून मनातून खूप दुःखी झाला .  काहीहि न बोलता घरा बाहेर पडला .

 

मालती च्या  लक्षात आले कि चंदू जरा नाराज झालाय ते . पण तिच्या बाजूने विचार केला ना तर एक काळ असा होता कि बायकोला मूल न होणे , किंवा मुलीचं झाल्या तर याचे सगळे खापर तिच्यावर टाकले जायचे.  नवऱ्याने बायकोला सोडून दुसरं लग्न केले असे प्रकार चालूच होते . आज हि गोष्ट आपल्याल्या अतिशयोक्ती वाटेल पण अशाही संकटातून बाईला जावे लागत होते . म्हुणुन तर म्हणायचे कि पहिला मुलगा झाला कि मग चं मुलगी चं आयुष्य सेट झाले . एकतर तसे नाहीतर एका मागून एक सहा काय आणि सात काय मुलगा होई पर्यंत नंबर लावायचे .

 

मालती ला  या सगळ्याची भीती वाटणे रास्तच होते कारण नुकतेच ती विशाखा नावाच्या एका शाळेतील बाईच्या आयुष्यात ओढवलेला हा प्रसंग ती पाहत होती . आणि ती विशाखा कोणत्या संकटांना तोंड देत आहे हे डोळ्याने बघत होती .

 

पुढच्याला ठेच लागली कि मागच्याने शहाणे व्हावे असे म्हणतात ते काही खोटे नाही .

 

चंदू च आजच्या भाषेत बोलायचे तर हार्ट फेल केला होता मालतीने .

 

चंदू राग- रागातच एकटा घरातून बाहेर पडला तो २ तास झाले तरी घरी आलाच नाही .

 

मालती जेवण करून चंदू ची वाट बघत बसली . धनु जेवली बाबा ची आठवण काढून रडून रडून झोपली . अत्त्यांनी पण शेवटी जेवून घेतले .

 

रुक्मिणी आत्या " जावई बापू कुणीकडे गेलेत ? खूप उशीर केला त्यांनी ?"

 

मालती " नाही .. काही बोलले नाहीत .. कदाचित काही काम निघाले असेल "

 

रुक्मिणी आत्या " हो पण किती १० वाजले रात्रीचे अजून कसे आले नाहीत "

 

मालती ला पण आता  काळजी वाटू लागली होती . सारखी बाहेर वाकून बघायची आले का ? आले का ?

 

शेवटी चंदू १०. ३० वाजता घरी आला .

 

मालती " अहो , काय हे किती उशीर ?"

चंदू काही बोलेना ..

 

मालती " हात धुवा ..  जेवायला वाढते "

 

चंदू  ने हात पाय धुतले आणि जेवायला बसला .

 

मालती " काही काम होते का ?"

 

चंदू " काही बोले ना ."

 

रुक्मिणी आत्यांना कळले कि काही तरी बिनसलंय

 

आत्या " जावई बापू तुम्ही  बरे आहात ना .. "

 

चंदू " हो आत्या .. तुम्ही जेवल्या का ?"

 

आत्या " हो .. मी जेवले पण मालती थांबलीय हो .. तुमच्या साठी "

 

चंदू काहीच बोलत नाही ..

 

मालती राग- रागाने भांडी आपटायला लागली. मालती " मी थांबले त्याचे काहीच नाही .. मी एवढे मगाच पासून बोलते तर मला उत्तर देत नाहीत आणि आत्यांचा भारी पुळका  ह्यांना .

 

चंदू जेव ला आणि धनु च्या डोक्यावरन हात फिर वून आणि झोपून गेला.

 

मालती नंतर एकटीच जेवली , भांडी कुंडी आवरून रागारागातच झोपली.

 

मालती दुसऱ्या दिवशी उठुन डबा  क रून , नाश्ता क रून आणि तिचे तिचे आवरून शाळेत गेली . चंदू पण  कामावर निघून गे ला  दोघे हि एकमेकांशी बोलत नाहीत .

संध्याकाळी मालती घरी आली तसे चहा पाणी झाल्यावर  रुक्मिणी आत्यांनी मालतीला विचारले

 

रुक्मिणी आत्या " काय ग .. काय झालय काय ? तुम्ही दोघे बोलत नाहीयेत एकमेंकांशी "

 

मालती " नाही ग आत्या असे काहीच नाही "

 

आत्याची आपली नेहमीची टेप सरु

 

आत्या " मला मेलीला काय करायचंय  म्हणा . मी कशाला तुमच्या दोघात पडू "

 

आत्या प्रतेय्क वेळेला "मला मेलीला " असे बोलूनच वाक्य बोलायच्या . त्या का ळी नवरा गेलेल्या स्त्री ला कोण कुत्रा विचारत नसे . तिला जगण्याचाच मुळात हक्क नसे तर तिला काय वाटते हे कोण विचारतो . त्यामुळे जेव्हा त्याचे स्वतःचे असे कोणतेही म्हणणे त्यांना जर सांगायचे असले कि आधी स्वतःला दोष द्यायचा आणि मग बोलायचे हि सवय .

 

मालती " अग , आत्या आता तू कशाला असे बोलतेस . तुला का कधी आम्ही दोघांनी वेगळे समजले?"

 

आत्या "  जावई तुझ्याशी बोलत नाहीयेत कालपासून ? तू काही बोललीस का त्यांना ?"

 

मालती " हो .. त्यांना मी म्हंटले कि मला दुसरे बाळ नकोय म्हणून ते चिडलेत "

 

तेवढ्यात चंदू घरात आला

 

चंदू " आत्या , ती खोटे बोलतेय तुमच्याशी ? तिला माहितेय मी का बोलत नाहीये ते "

 

आत्या " काही असो , पण मालती तूच काहीतरी त्यांना बोलली असणार .. जावई तसे नाहीत हो .. मला  कळतात माणसे "

 

चंदू " नशीब .. कोणीतरी मला ओळखलं म्हणायचे "

 

मालती आपली तिच्या स्टाईल ने नाक मुरडून चंदू ला पाणी देऊन चहा टाकायला गेली

 

आत्या " जावई बापू , तुम्ही जास्त अबोला धरू नका बरं .. ती लहान आहे अजून .. तिला काय कळत नाही "

 

चंदू " लहान कसली .. आता शिक्षिका आहे .. सगळ्यांना शिकवते कि शाळेत .

 

आत्या " हो .. पण ते पुस्तकातले शिकवते .. आयुष्यातला धडे मोठे झाल्या शिवाय कळत नाहीत . "

 

चंदू " फार मोठे बोललात तुम्ही .”

 

चंदू फ्रेश झाला .. मालतीने  त्याला चहा दिला .. धनु खाली मालकीण बाईकडे खेळायला गेली होती . रोज चहा पियुन झाला कि चंदू मालतीला बॅग मधून तिच्या  साठी आणलेला गजरा देत असे . आज त्याने मुद्दामून गजरा पण नाही दिला .

 

मालती " बरं बाबा .. मी माझी चूक मान्य करते .. करा तुम्हाला काय हवे ते .. "

 

चंदू " पण चूक काय हे तरी कळलंय का तुला ?"

 

मालती " तेच मी म्हटले  मला दुसरे बाळ नको अजून दुसरे काय ? ते सुद्धा तुम्ही विचारलेत  म्हणून मी बोलले . "

 

चंदू " तो मुद्दा नाहीच आहे मुळात ..

 

ह्या दोघांचे बोलणे सुरु झाले तसे आत्या म्हणाल्या “ मी खाली जाऊन धनु ला बघते ..” आणि खाली गेल्या .

 

मालती " मग काय मुद्दा आहे तुमचा ? एकदा काय ते नीट सांगा तरी .. असे लहान मुला  सारखे फुगून बसल्यावर कसे होईल ."

 

चंदू " तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेस का ? "

 

मालती " का ? काल बसलेच होते कि तुमचे ऐकायला .

 

चंदू " नाही म्हटले त्या शाळेतल्या विशाखा का कोण त्या बाई त्याच्या घरी अजून काय काय झालंय ते सांगितले नाही का त्यांनी आज तुला ? म्हणजे त्याच्या घरी झाले ते आपल्या घरी पण तेच होईल नाही का ? "

 

मालती " अहो .. काय बोलताय तुम्ही ? मी असे कधी म्हणाले ?"

 

चंदू "  हो तूच म्हणालीस ना त्या विशाखा बाईला तिच्या नवऱ्याने सोडले तसे तुम्ही मला सोडून द्याल "

 

मालती " मी असे कुठे म्हणाले ?"

 

चंदू " आठव ? काय बोललीस ते ?

 

मालती " मी म्हणाले कि जर दोन मुली झाल्या तर असे होऊ शकते आणि असे झालय ते मी डोळ्यांनी पाहतेय "

 

चंदू " मग तेच तर ना .. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये .. मी तुला आणि धनु ला सोडेन असे तुला वाटलेच कसे ?"

 

मालती  गप्प.. नकळत आपण त्यांना दुखावलंय हे तिच्या लक्षात आले .

 

चंदू " तू मला म्हणाली असतीस ना .. कि उगाच जास्तीचा संसार वाढविण्या पेक्षा आपण आहे त्या  मुलीला सांभाळू तरी मी काही बोललो नसतो .. पण तू जे कारण मला सांगितलेस ना त्याचा त्रास मला होतोय . म्हणे.. विशाखा च्या नवऱ्याने  सोडले तिला . तो तिला सोडेन नाहीतर धरेल मला काय करायचंय . पण तू त्याच्याशी माझी तुलना केलीस हे मला अजिबात आवडलेले नाही .. "

 

तुला काय  माहित मी लहानाचा मोठा कसा झालोय .. जेव्हा सगळ्याचे आई बाबा भाऊ बहीण  होते  ना तेव्हा मी एकटा होतो .. ना कधी कोणी ओरडले , ना कधी कोणी लाड केले . मला माणसांची  किंमत नाहीये का ? मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून देईन का ?  पुन्हा अनाथ होईन का ?

 

आज एकटे पणाची सल काय असते ना ते तुला कधीच कळणार नाही आणि देव करो अशी कोणाच्या वाट्याला येऊ पण नये .

 आज माझा अपघात झाला कोण आले तुझ्या मदतीला धावून .. लहान आहे पण तुझा भाऊ  आलाच ना.. उद्या आपल्या पश्चात धनु ला पण एक भावंडे असले पाहिजे मग ते मुलगा असो किंवा मुलगी . हाच माझा मुद्दा होता .. तर तुझे आपले काहीतरीच.

 कधीच लोकांच्या सुखाशी , दुःखाशी आपली तुलना  करू नये . प्रत्येकाचे कर्म आणि त्याचे भोग हे वेगवेगळे असतात .

 

मालतीने  चंदू च्या दुखऱ्या नसेवरच पाय दिला होता .

असे होते कधी कधी माणूस करायला जातो एक आणि होते एक ..

मालतीला फक्त त्याला हेच सांगायचे होते कि आपल्याला दुसरी पण मुलगी होऊ शकते आणि हे सत्य स्वीकारायची तयारी चंदू ची आहे कि नाही . 

 

 

थोडा वेळ कोणीच कुणाशी बोलले नाही .

 चंदू जरा शांत झाल्यावर

मालती " मी काय म्हणते .. माझं चुकलेच .. मी त्या विशाखा बाईं चा विषयच  काढायलाच नको होता . माझे म्हणणे हेच होते कि आपल्याला दुसरी पण मुलगी होऊ शकते त्यामुळे आपल्या  दोघांची  त्याची पण मनातून तयारी असलेली बरी नाहीतर जवाबदाऱ्या वाढवण्यापेक्षा देवाने आपाल्याला एक जवाबदारी दिलीय ती पूर्ण करू . पण आता मला तुमच दुसरं म्हणणं पटलंय कि आपल्या पश्चात धनु ला कोणीतरी असले पाहिजे . "

चंदू " आता कशी बोललीस .. "

मालती " आता मी माझी चूक कबुल केलीय आणि परत असे कधीच होणार नाही .. आणि तिने कान धरले

चंदू "कान  काय धरतेस मी काय तुझ्या शाळेतला शिक्षक आहे का तुझा ?"

मालती " काय हो.. आता सोडा ना राग .. आणि मला माझा गजरा द्या .. "

चंदू " मी नाही आणलाय आज "

मालती " उगाच खोटे  बोलू नका .. असे होणारच नाही .. मला खात्री आहे तुम्ही गजरा आणलाय "

चंदू " अशीच खात्री नेहमीच राहायला हवी .. "आणि चंदू ने बॅग मधून गजरा काढला आणि मालतीच्या केसात माळला .

तेवढ्यात आत्या धनु ला घेऊन वरती आल्या .

धनु पण धावत धावत चंदू कडे गेली ... बाबा. .. बाबा.. आणि चंदू ने तिला उचलून घेतले .

मालतीने  तिच्याच गजऱ्यातले एक फुल काढले आणि धनुच्या छोट्याशा केसात माळले ..  दोघांनी धनुचा पापा घेतला .

मालतीच्या केसातला गजरा बघून आत्यांना पण कळले कि रुसवा पळालेला आहे . घर पुन्हा आनंदाने भरले.