Login

अर्धांगिनी भाग १७

In this part chnadu and malti discuss about their second child

अर्धांगिनी भाग १७

क्रमश : भाग १६

आज चंदू च्या एका हाताचे प्लास्टर काढले . डॉक्टरांनी त्याला आज बऱ्याच दिवसांनी हात वर  खाली , मागे पुढे असा हलवून बघितला . दुखतोय का विचारले . मग फिझिओ थेरपी वाले आले त्यांनी त्याच्या कडून हाताचा व्यायाम करून घेतला . आणि असा व्यायाम रोज दोनदा करायला सांगितला .असेच थोड्या दिवसांनी दुसऱ्या हाताचा पण प्लास्टर काढला .

मग पुन्हा एक्सरे काढले आणि चेक करण्यात आले कि आतील तुटलेले पार्टस जोडले गेले आहेत का नाहीत ते .

तरी पण सध्या हातावर जास्त जोर द्यायचा नाही . जास्त जड उचलायचं नाही . अश्या सूचना डॉक्टरांनी  दिल्या आणि मग डिस्चार्ज दिला . पण महिना  भराने  पुन्हा एकदा चेक अप ला या असेही सांगतले आणि गोळ्या लिहू न दिल्या .

दवाखान्यातील बिलिंग, रिपोर्ट्स वगैरे सर्व मनीष ने बघून घेतले . आणि त्यांच्या कंपनीच्या माणसाला कळवले .

मनीष ची या वेळी खूप मदत झाली होती . तो हि काहीही कुरकुर न करता एक महिना मालती बरोबर तिकडे थांबला ते बरे झाले . शिवाय त्याच्या मित्राच्या ओळखीने  राहायला घर मिळाले त्यामुळे सगळेच करता आले . रुक्मिणी आत्या पण मालती च्या मागे खम्बिर पणे  उभ्या  राहिल्या .

झाले इकडे मनीष च्या  मित्राच्या फॅमिलीचे मन भरून  धन्यवाद मानून सर्व जण पुन्हा त्यांच्या शहरी आले . मालती आणि मनीष चंदू ला सांभाळून घरी घेऊन आले .

पुढे २ /४ दिवस मनीष थांबला आणि त्याच्या

 होस्टेल वर निघून गेला .

तरी मालती  त्याला सांगितले " पुढल्या महिन्यात पण ये असेच एकदा चेक अप  ला जाऊ  . तू बरोबर  होतास म्हणून हे सगळे मला शक्य झाले" .

मालती ची थोडी काळजी कमी होत होती . नाही म्हंटले तरी मालती ने १ महिना त्याची खूप सेवा केली होती . दोन्ही हातांनी  काहीच करता येत नाही म्हणजे प्रतेय्क कामासाठी  दुसऱ्यावर अवलंबून होता चंदू . काही कामं करून घेताना खुद्द चंदू ला पण लाज वाटायची जरी मालती त्याची हक्कची बायको होती तरी . काय करणार पण ती वेळच अशी होती .

धनश्री  खूप खुश होती . स्वतःच्या घरी आलेले तिला कळले होते . आणि लगेच मालकीण बाईकडे खेळायला जाऊन बसली .

चंदू ला अजून पुढील दोन महिने आराम  करा म्हणून रजा दिली होती . त्यामुळे सध्या तो घरीच असायचा . मालती ला मात्र शाळेला जावे लागत होते . तिने मग थोडे दिवस दुपारची शाळा घेतली . मग सकाळी चंदू चे सगळे आवरायला तिला वेळ मिळायचा . तो जेवून झोपला कि हि शाळेत जायची . धनु च काय ती आत्यांकडे छान रमायची . त्या  तिला चिऊ काऊ चो गोष्ट सांगत भरवायचा , गाणी गायच्या असे चालू असायचे .

एक दिवस आत्या धनश्री ला घेऊन खाली मालकीण बाई कडे बसल्या होत्या . मालती नुकतीच शाळेतून आली होती . मालती चंदू च्या हाताला थोडा मसाज करत होती  . चंदू ला खरं तर त्याच्या बायकोशी बोलायला पण एकांत मिळत नव्हता . त्यात चंदू आजा री असल्या मुळे  घरातील आणि बाहेरची कामे पण मालती वर आली होती .

चंदू "अग , किती काम करशील ? राहू दे मी मसाज करू शकतो माझा माझा आता .. "

तरी पण मालती चे हात चालूच होते .

चंदू " मालती , किती धर्याने तू हे सगळे झेपवलंस . मनीष होताच तुझ्या मदतीला पण तू न थकता , न घाबरता यातून मला बाहेर काढलेस . "

मालती " नाही हो .. खूप घाबरले होते .. जेव्हा तुम्हाला पहिल्यादा तशा अवस्थेत पहिले ना  तेव्हा खूप घाबरले होते ."

चंदू " हो . मला ते तुझ्या डोळ्यात दिसलेच होते . काय कसा काय पडलो मला कळले चं नाही . "

मालती " नशीब माझे कि हातावर च भागलं .. देवाचे उपकारच झाले माझ्यावर . "

चंदू " तू किती केलेस माझ्या साठी . मला तुझे कसे धन्यवाद मानू तेच कळत नाहीये . "

मालती " अहो .. काही पण काय बोलता .. हीच परीक्षा केलीत का माझी ? बायकोचे कोणी असे आभार मानते का ?

चंदू " नाही ग . आभार नाही .. पण काय बोलू ते कळतच नाहीये आणि चंदू च्या डोळ्यात पाणी आले "

मालती पण उठली त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या खांदयावर डोकं ठेवून शांत बसली . " ती वेळच तशी होती म्हणायचे आणि सोडून द्यायचे . "

चंदू " हो .. ते हि आहेच "

वेळ कधी कशी येईल कोणाचं सांगू शकत नाही . ती येते आणि काहीतरी शिकवून मात्र नक्कीच जाते. एक स्त्री म्हणून मालती कडे बघितले तर पुण्या  सारख्या मोठ्या शहरात जाऊन तिकडे एक खोली घेऊन तिकडेच राहून महिना भर साठी संसार लावायचा , समान आणायचे , जेवण बनवायचे , शिवाय रस्ते माहित नाहीत . चालत वेळ प्रसंगी बस ने जायचे . नवरा ऍडमिट ,लहान मूल  बरोबर आहे ते वेगळेच .  

मनीष नाही म्हंटलं तरी तिच्या पेक्षा ४ वर्षांनी लहान होता . .दिसतो त्या पेक्षा खूप कठीण प्रसंग होता तो . मालती मोठ्या धीराने त्या प्रसंगाला सामोरे गेली होती .

इकडे आल्यावर चंदू च्या ऑफस मधले लोक बघायला यायचे , कधी कोणी मालतीच्या  शाळेतले बघायला यायचे असे चालूच होते आणि बोलता बोलता चंदू ची चा एक महिन्या नंतर चा चेक अप पण झाला . तरीही जास्त हातावर लोड न देता हळू हळू काम करू शकता असे डॉक्टरांनी सांगितले . इकडे ह्याच्या  रजा संपल्या आणि तो पुन्हा कामाला पण जाऊ लागला .

हळू हळू त्यांचे घरातले रुटीन पुन्हा नॉर्मल झाले . चंदू चा अपघात झाला होता ह्याचा विसर पडू लागला .

फरक हाच पडला होता कि चंदू आणि मालती दोघांचे नाते अजून घट्ट झाले होते . चंदू ला प्रेमाच्या पलीकडे जाऊन प्रेम झाले होते मालती वर . आणि ते त्याच्या डोळ्यात दिसायचे .  जे प्रेम ते साता  जन्माचे  असते ना  ते त्याला आता मालती वर झाले होते .

आता त्याच्या लग्नाला फक्त तीन साडे तीन वर्षच झाली होती . आनंदात तर माणूस आनंदी असतोच पण दुःखात साथ देणे हे महत्वाचे . समोरच्याचे दुःख त्याने न सांगता कळले पाहिजे इतके  अंर्तमनात  पोहचता आले पाहिजे .

राधेने गरम दूध प्यायल्यामुळे  तिला तर भाजलेच होते पण श्री कृष्णाला पण त्याचे चट्टे उठले होते . असे त्यांचे पवित्र प्रेम होते . तसेच हे दोघे एकमेकांच्या पवित्र प्रेमात होते . अश्या  प्रेमात फक्त द्यायचे असते मला काय मिळणार आहे हा प्रश्नच उरत नाही .

रुक्मिणी आत्या त्यांच्या संसार उघड्या डोळ्यांनी पहात होत्या . दोघे कसे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात हे त्यांना दिसत होते .

रुक्मिणी आत्या " आता धनश्री  २ वर्षांची झालीय  तर एखादा बाळ कृष्ण येऊ दे घरात .. मला  मेली ला असे वाटतं हो .. झालेल्या गोष्टीचे सारखे चिंतन केल्यामुळे घरात दुःखी वातावरण राहते त्यापेक्षा  एक पाऊल पुढे टाकत राहायचे .

चंदू च्या पण  मनात तेच होते .

मालती काही दुसऱ्या बाळाचे मनावर घेई ना . हा विषय निघाला कि तिच्या चेहऱ्यावर आलेले दडपण चंदू पासून लपले नाही . कदाचित चंदू चा असा अपघात झाल्यामुळे ती घाबरली होती का काय तिच्या नक्की मनात काय चालू होते काय माहित . पण दुसऱ्या बाळाचे नाव काढले कि हि ची मनस्थिती बिथरयाची .

चंदू ने एक दोनदा विचारायचा  प्रयत्न केला पण ती काही धड उत्तर देई ना . मग चंदू ला पण असे वाटायला  लागले " नको असेल तिला तर तसे तसे "

तरी पण चंदू ने तिला एकदा विचारायचे च ठरवलेच . काही वेळा गोष्टी न सांगता कळतात आणि काहीवेळा इतके स्पष्ट बोलावे लागते त्यावेळी इशारे बिशारे काही कळत नाहीत . तेव्हा बोलावेच लागते .

चंदू " मालती . मला काय वाटतंय रुक्मिणी आत्या म्हणतात ते बरोबर आहे . आता आपण दुसऱ्या बाळाचा विचार करायला काही हरकत नाही . तुला काय वाटते ?"

मालती च्या चेहऱ्यावर आलेली भीती चंदू पासून लपली नाही

चंदू " मी तुला दडपणात टाकायला हा प्रश्न नाही विचारत  आहे . मला फक्त नक्की तुझे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायचेय "

मालती " नको... आता धनश्री आहे ना ..तिचेच सर्व व्यवस्थित झाले म्हणजे झाले "

चंदू " हो .. ते तर आहेच पण तुला वाटतंय  का आपले  दुसरे बाळ आल्यावर  धनश्री कडे दुर्लक्ष होईल  "

मालती " नाही .. तसे नाही .. "

चंदू " मग तेच म्हणतोय नक्की कशाची भीती वाटतंय तुला ?"

मालती आधी बोलायलाच तयार नव्हती पण आज चंदू काही तिला बोलल्या शिवाय गप्प बसणार नाही हे तिच्या लक्षात आले .

मालती " रुक्मिणी आत्या म्हणाल्या बाळकृष्ण आणा . म्हणजे काय माहितेय त्यांना मुलगा हवाय "

चंदू " हो .. मग त्यात गैर काय आहे "

मालती " आणि आपल्याला पुन्हा मुलगी झाली तर "मालतीच्या तोंडून पटकन हे वाक्य गेलेच

चंदू " म्हणजे "?

मालती " अहो , आता आपण चान्स घेणार तो फक्त मुलगा व्हावा म्हणूनच घेणार . आणि जर आपल्याला मुलगी झाली तर सगळे नावे ठेवणार , मागून तुम्हाला हसणार , मला टोमणे मारणार आणि त्यातून वैताग आला कि तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून देणार .. हे सगळे होण्या पेक्षा मला दुसरे बाळ नकोच आहे "

चंदू " तुला असे वाटते कि मी तुला , धनु ला सोडून देईन ?"

मालती " तुम्ही तसे नाही पण कान  भरवणारे काय कमी आहेत का ? आमच्या  शाळेतल्या विशाखा बाईंना त्यांना दोन मुली झाल्या म्हणून नवऱ्याने सोडून दिले . आणि त्यांनी तर आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलेले . तरीही त्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिलय . बिचार्या दोन मुलींना घेऊन एकट्या राहतात "

चंदू ला काय बोलावे हे कळे च ना ..इकडे याच्या मनात मालती विषयी आतोनात प्रेम आहे आणि मालती त्याच्या विषयी मनात काय विचार करतेय हे ऐकून तो शांतच झाला .

मालती " मला तुम्ही कृपया चुकीचे नका समजू .. याचा अर्थ असा नाही कि माझा तुमच्यावर विश्वास नाहीये . "