Login

अर्धांगिनी भाग १५

In this part malti become mother and chandu become father

अर्धांगिनी भाग १५

क्रमश : भाग १४

रात्री चंदू ने झोपायच्या आधी रमेश ची सगळी कर्म कहाणी मालतीला सांगतली . मग त्याने त्याच्या साठी काय काय केले . आणि तो कसा बदलला . त्याचे वडिलांना जाऊन पण हा भेटला होता हे सगळे त्याने मालतीला सांगितले .

मालती त्याला म्हणाली तुम्ही जे केलेत  मोठे ते कोणचं करू शकत नाही.  उगाच नाही सरपंचांनी तुमचा  सत्कार केला .

मालती " काय बोलू तुम्हला ? रमेश सारख्या माणसा बरोबर सुद्धा तुम्ही असे वागू कसे शकता . तुमच्या सारखे तुम्हीच आणि आज मला अभिमान आहे कि तुम्ही माझे पती आहात . गेल्या जन्मांत मी नक्कीच काहीतरी पुण्याचे काम केले असणार म्हणून मला तुम्ही  नवरा  म्हणून  मिळालात  "

चंदू " असे काही नसतं ग . मालू हे मी सगळे माझ्या साठी केलय"

मालती " म्हणजे "

चंदू " माझ्या बायकोचा खोल मनात दुसरा कोणीतरी जर विचार करत असेल तर मला चालेल का ?"

मालती " मला तर काही कळले नाही"

चंदू " अग , तुझ्या लक्षात येत नाहीये . रमेश असा  एकदम बिथरला का होता ? त्याने तुला मनोमन पत्नी  मानली होती . कारण तुमचे लग्न ठरले होते तेव्हा तर त्याला तू माहीतच होतीस ना . जरी  बोलला नाही तरी कुठे तरी मनात माणूस स्वप्न बघतच असतो .पण केवळ त्याच्या वडिलांच्या चुकीं मुळे लग्न मोडले आणि तिकडेच लगेच आपले लग्न झाले . हे जरी सत्य असले तरी तो असा बावचळल्या सारखा वागत होता कारण त्याला आता तू त्याची नाहीस हे सहन होत  नव्हते. म्हणून तो तिकडे असताना तुला साडी वगैर घेऊन आला  . जेव्हा तू त्याला ओरडलीस तेव्हा तो मनातून पूर्णतः खचला आणि सगळा  दोष बापावर टाकून मोकळा झाला . मग तुला विसरायला म्हणून दारू .सिग्रेटी ओढयच्या त्यातुन सुद्धा तो तुला विसरू शकत नव्हता म्हणून त्याने त्या मुलीशी लग्न  केले .

आता त्याने त्याच्या बायकोला स्वीकारलंय तेव्हा माझ्या जीवाला शांती मिळालीय .

मालती " माझ्या मुळे तुम्हाला किती त्रास होतोय ना "

चंदू " त्रास नाही ग .. आता तू फक्त माझी आहेस हा विश्वास आणि तुझ्या वर कोणीतरी कुठेतरी मनात सुद्धा हक्क नको सांगायला यासाठी मी हे केले. "

 ऐकता ऐकता  मालती ने  हक्काने चंदू च्या खांद्याची उशी करून त्यावर झोपली.

दुसऱ्या दिवशी चंदू , मालती आणि रुक्मिणी आत्या तिघे  शहरात  जायला निघाले .

मालती मात्र यावेळी मनसोक्त माहेरी राहिली . पार्वती बाईंनी गरोदर पोरीचे  भरभरून लाड केले .

रुक्मिणी आत्या अण्णांची लांबची  बहीण . ऐन तारुण्यात नवरा गेला . ना सासरकडच्यांनी जबावदारी घेतली ना माहेरच्यांनी . शेवटी अण्णा तिला त्यांच्याकडे घेऊन आले . बिचारीला मूल  ना बाळ. सुरुवातीला अण्णांच्या च घरी राहायची मग दादाच्या संसारात आपली सावली नको म्हणून मागच्या घरात राहायला जी गेली ती तिकडेच राहिली . तिच्या पुरते ती अन्न शिजवते आणि खाते . बाकी सगळे बघायला अण्णा  होतेच

वयाने काही फ़ार म्हातारी नव्हती त्यामुळे आता मालती ला त्यांची चांगलीच मदत होणार होती . तशी रुक्मिणी आत्या  फारशा कुणाशी बोलत  नाहीत पण मालती वर त्यांचा खास जीव होता . मालती लहान पणा  पासून आत्या आत्या करत त्यांच्या पुढे मागे नाचायची त्यांच्या डोळ्या समोर लहानाची मोठी झालेली पोर त्यामुळे त्या तिच्या साठी शहरात जायला पण निघाल्या .

चंदू ला मनोमन बरं वाटत होते . उगाच आपल्या मुळे  काही तरी चुकायला नको अश्या  वेळी कोणी तरी बाई माणूस बरोबर असलेलं  बरे .

आई अण्णांचा निरोप घेऊन हे तिघे शहरात आले .

चंदू ने मालकीण बाई ला सांगून त्यांची अजून एक खोली या खोलीला जोडलेली होती त्याला आतून एक दार पण होते ते दार उघडले ना तर ऍडिशनल एक खोली वापरायला मिळेल . त्याचे काय असेल ते भाडे घ्या पण असे सांगून ती पण खोली वापरायला घेतली . त्यामुळे अगदीच जो जागेच प्रश्न होता तो आता नव्हता . उद्या बाळ आल्यावर हे लागणारच होते .

मालती ला चालताना आता आता खालची जमीन दिसायची नाही तरी पण बिचारी मुद्दामून शाळे पर्यंत चालत जायची . येताना दमल्या सारखे वाटले तर  रिक्षा करायची मग . पण रोज रिक्षा तेव्हा परवडणारी नव्हती .

रुक्मिणी आजी रोज दोघांना  छान डबा  करून द्यायच्या . आल्यावर जेवण तयार असायचे  . त्यामुळे मालतीला जरा आराम मिळायचा .

मालतीला बोलबोलता ९ वा महिना लागला . तिने शाळेत सांगून टाकले जेवढे दिवस भरता  येतील तेवढे मी भरेन आणि मग सुट्टी वर जाईन

एक दिवस सकाळी रुक्मिणी आत्या  मालतीला म्हणाल्या

 मालू " आज जाऊ नकोस नोकरीला आज पौर्णिमा आहे . "

पूर्वीच्या बायकांचे काय ते शास्त्र पण त्यांच्या अंदाज बरोबर निघाला . मालू ला प्रसव पीडा सुरु झाल्या . चंदू ने लगेचच तिला डॉक्टरांकडे नेले आणि अर्ध्याच तासात चंदू शेट च्या हातात त्यांनी एक गोंडस परी आणून दिली . थरथरणाऱ्या  हातात चंदू ने आपल्या स्वतःच्या मुलीला हातात घेतले. एक टक तिच्याकडे बघत बसला .

चंदू च्या आनंदाला सीमा नव्हती . किती तो आनंद . त्याला हाच आनंद शेअर करायला पण त्याच म्हणून हक्कच असे कोण नव्हतं मालती सोडली तर .

त्याने नर्स ला विचारले मालती कशी आहे . ती म्हणाली हो बऱ्या आहेत एक अर्ध्या तासात बाहेर येतील. नाही म्हणायला रुक्मिणी आत्या होत्याच बरोबर  रुक्मिणी  आत्यांनी चंदू च्या डोक्यावरून मायेने हात फिरवला .

" छान आहे हो तुमचे लेकरू "आणि मग बाळाच्या डोक्यावरन हात फिरवला .

थोड्याच वेळात मालती ला पण बाहेर आणली . चंदू बाळाला घेऊन मालती जवळ गेला .

चंदू " मालू .. तू आई आणि मी बाबा झालो ... मालू बघ ना आपले बाळ .. मालू .. मालू आपल्याला मुलगी झालीय ... "

बोल बोलता चंदू चा आवाज आनंदाने कापरा होत होता आणि डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते . चंदू ने मालती च्या जवळ बाळाला ठेवले . मालती च्या डोक्यावरून हात फिरवला .

चंदू " तू कशी आहेस ? फार त्रास नाही ना झाला "

चंदू ला एवढे आंनदी मालतीने पण कधीच बघितले नव्हते . त्याला इतका आनंदी बघून मालतीच्या पण डोळे पाणावले

मालू " तुम्ही खुश आहे ना .. "

चंदू " हो मग नक्कीच ..

मालू " नाही म्हटलं मुलगी झालीय.. "

चंदू " अग , काय वेडी आहेस का ? मी असा विचार कारेन असे वाटलेच कसे तुला "

मालू " अहो , तुम्ही नाहीयेत हो तसे हे मला चांगलेच माहितेय . पण बाहेर कुणाला सांगा मला पहिली मुलगी झाली कि लगेच कशी नाक मुरडतील बघा ."

चंदू " ते जाऊ दे तू आता आराम कर जरा वेळ "

मालू " हो .. "

चंदू " आणि हो .. मुलगा काय होईल नंतर .. होय ना "

मालू " इश्श .. काय हे .. हि वेळ आहे का हे बोलायची "

चंदू " नाही ग तुझं शंका दूर केली "

आणि दोघे हसायला लागले ..

चंदू ने अण्णांना पत्र लिहून कळवले "अण्णा तुम्ही आजोबा झालात . आपल्या घरी  लक्ष्मी आली "

चंदू ने रुक्मिणी आत्यांना मोठया हौसेने नऊवारी साडी घेतली .रुक्मिणी आत्यांना पण स्वतःचे असे कोणीच नव्हते चंदू मध्ये त्यांना मुलगा दिसला . पुढे त्या मरे पर्यंत चंदू आणि मालती कडेच राहिल्या .

त्या म्हणायच्या  कश्या " माझ्या मेलीचे काय मोठे काम अडलय गावात मी इकडे राहिले तर मालू ला मदत होईल . आणि खरच मालती ला  नंतर नोकरी ला जाताना सुद्धा पुन्हा बाळाला कुठे ठेवू हा प्रश्न होताच तो रुक्मिणी आत्यांनी सोडवून टाकला

अण्णा आणि पार्वती बाई नातीला बघायला आल्या . अण्णा एकदम खुश झाले . अण्णा येताना पाळणा घेऊन आले . पार्वती बाई पण खुश झाल्या .. पहिल्यांदा आजी आजोबा होण्याचा आनंद काही निराळाच.

अश्या  पद्धतीने चंदू च्या घरात पाळणा हलायला लागला . थोडे दिवस अण्णा आणि पार्वती बाई राहिल्या , रुक्मिणी आत्या पण होत्याच . बाळाचे नुसते लाड  होत होते . तिकडून मामा पण आला . मामाच्या मांडीवर  बसून बाळाचे कान  टोचले बारसे झाले . बाळाचे नाव धनश्री ठेवले .

म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी अगदी तसेच चंदू चे दिवस पण पालटले . चंदू चे ऑफिस मध्ये प्रमोशन झाले , पगार वाढ झाले . मालती शाळेत परमनंट झाली . धनश्री च्या जन्म नंतर चांगले सहा महिने मालती घरीच होती म्हणजे रजेवर होती मग जशी ती सहा महिन्याची झाली तशी मग ती शाळेला रुजू होणार होती . सहा महिने झाल्यावर बाळाला वरचे दूध सुरुवात करून मालती रुक्मिणी आजी कडे बाळाला सोपवून कामाला जाऊ लागली .

आता त्या बाळाला बघतात ना तर मग ती जेवण डबा पुन्हा पूर्वी सारखे करू लागली .

रुख्मिणी आत्याने धनश्री ला आजी च्या मायेने वाढवायची .

चंदू चे घर कसे भरले .. त्याला आता आई सारखी रुक्मिणी आत्या होती . बायको होती , आणि त्याची स्वतःची मुलगी धनश्री होती .

चंदू ने त्याच शहरात एका ठिकाणी २ गुंठे जागा घेतली . हळू हळू बांधू  मग नंतर . सध्या पैसे आहेत तर जागा घेऊन ठेवतो कधी ना कधी तरी डोक्यावर स्वतःचे असे छप्पर असावे अशा विचाराने भाड्याच्या घरात किती दिवस राहणार ?

मालती चा पण पगार तसा च्या तसा बाजूला ठेवत होते त्यामुळे गरज पडलीच तर थोडी फार सेविंग होत होती . दोघे सचोटीने संसार करत होते . मालती पण शाळे मध्ये छान सेट होत गेली .

रविवार आला कि सगळे रुक्मिणी आत्या   सकट बागेत जायचे . तिकडे धनश्री ला खेळावयाचे . मालती स्वतः तर गजरा घालायाचीच  पण आता धनश्री ला पण रोज एखादे फुल डोक्यात लावायचे . चंदू तर ऑफिस मधून आला ना कि धनश्री ला घेऊन बसायचा . तिच्याशी गप्पा मारायचा , तिला फिरायला घेऊन जायचा , चिऊ काऊ दाखवत भरवायचा .

पगार झाला कि चंदू दर महिन्याला तिला ५ /६ फ्रॉक , घेऊन यायचा . मालती कधी कधी ओरडायची अहो आधीचे अजून खराब झाले नाहीत तर कशाला नवीन आणलेत असे म्हणायची

चंदू " असू दे ग .. फर काही महाग नाहीयेत ..थोडे फार आवडीने मुली साठी खर्च केले तर कुठे बिघडतेय. "

धनश्री बोलायला लागली तर बा... बा... बा.. करू लागली तर याला इतका आनंद झाला . मालू हि बघ मला बाबा.. बाबा म्हणतेय ..  मग मालती सांगायची तिला आई म्हण आई .. तर ती म्हणायची बा... बा... बा...मम.... म्म्म... "

खर तर त्याला गिगलिंग असे म्हणतात बाळ असे आवाज काढत असते आपल्याला असे वाटते कि ते आपल्याशी बोलतय किंवा आपल्याला हाक मारतय .  त्याला आपण त्याच्याही बोलतोय हे कळते एवढे नक्कीच  .

मग तिचे रांगणे , बोलणे , चालणे अश्या सर्व लीला तिघांनी मनसोक्त बघितल्या .

बोल बोलता धनश्री २ वर्षांची  झाली .

🎭 Series Post

View all