अर्धांगिनी भाग १३

In this part chandu tries ramesh to be get out from the dark and start new beginning

अर्धांगिनी भाग १३

क्रमश : १२

चंदू " अरेरे.. खूप वाईट झाले ? त्याने असे  नको होते करायला ? "

रमेश ची कर्म कहाणी ऐकून चंदू ला खूप वाईट वाटले .

चंदू " अण्णा , आपण   रमेश ला भेटायला जाऊया का जाऊया का ?"

अण्णा " कशाला ? अहो त्याचा काही भरवसा नाही . शिव्या घालतो कोणाला पण . कोण जात  नाही त्याच्या जवळ "

चंदू " अण्णा , तुम्ही तर शिक्षक आहात लोकांना चांगली दिशा दाखवणे तुमचे काम आहे .  त्याचे चुकले हे जरी सत्य असले तरी त्याची त्याला शिक्षा नक्कीच झालीय . त्याला गर्तेतुन  बाहेर काढले पाहिजे .

अण्णा " तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे . बघा तुम्हाला   वाटत असेल तर जाऊ भेटायला "

चंदू " अजून एक अण्णा , ह्यातले काही मालतीला आत्ता तरी नको सांगायला . . "

अण्णा " ठीक आहे "

अण्णांना  पण चंदू चे आश्यर्य वाटले एवढे होऊन सुद्धा त्याला रमेश च्या बाबतीत  कणव होता . त्याने असे नको रहायला .  त्याचे चांगले व्हावे असेच वाटत होते .

दुस ऱ्या दिवशी सकाळी चंदू आणि अण्णा रमेश ला भेटायला गेले .

खालच्या आळीत कुठेतरी रमेश एका झोपडी वजा खोलीत राहत होता . बाहेरच बसला होता .. या दोघांना येताना पाहून उठून आत मध्ये गेला .

अण्णा आणि चंदू त्याच्या  घरापर्यंत पोहचले .

बाहेरच अण्णा " रमेश .. ए रमेश .. बाहेर ये तुला भेटायला आम्ही आलोय "

आतून त्याची बायको बाहेर आली . " नाहीयेत ते घरी .. कामावर गेलेत "

अण्णा " रमेश .. अरे बाहेर ये .. मी पाहिलंय तुला "?

शेवटी रमेश बाहेर आला

चंदू ला रमेश ची अवस्था बघवत नव्हती . एकेकाळी हँडसम दिसणारा , मोठया रुबाबत राहणा रा रमेश आता फाटक्या , कळकटलेल्या बनियन वर बाहेर आला . दाढी , केस  वाढलेले , डोळे आत गेलेले . मनातून निराश हरलेला, झाल्या प्रकरणाचा त्रास त्याला स्वस्थ बसून देत नव्हता . तो मरण येत नाही म्हणून जगत होता ..

चंदू च्या डोळ्यातून पाणी आले त्याला असे बघून  चंदू ने त्याला  मिठी मारली .

चंदू " काय रे हे .. काय अवतार करून घेतलास ? असे कसा होतास आणि काय झालास ?"

रमेश पुतळ्या सारखा ढिम्म उभा होता .

चंदू  चे मित्र प्रेम बघून अण्णांचे पण डोळे पाणावले .

अण्णा " रमेश , मी काय म्हणतो . झाले गेले विसरून जाऊन आता आहे तिथून नव्याने सुरुवात कर . अरे एकदाच आयुष्य मिळते त्याचं  असे मातेरे करू नकोस .

चंदू " तू आधी तुझ्या मनात जे जे किल्मिष आहे ना ते काढून टाक. बाकीची दुनिया पुढे चाललीय तू का थाबलास ?"

अण्णा " अरे , मान्य आहे तुझ्या वडिलांचा एक निर्णय तुझ्या बाबतीत  चुकला . पण त्याची आता त्यांना किती शिक्षा देणार आहेस आणि स्वतःला पण देणार आहेस "

चंदू " अरे , माझ्या आणि मालतीच्या मनात किंवा अण्णांच्या  मनात तुझ्या बद्दल काहीच नाराजी नाही . मालती आता तिच्या मार्गी लागलीय . झाले ते झाले आता आपण त्याच्या साठी रडतं बसून काय उपयोग .

रमेश ची बायको तेवढ्यात बाहेर चहा घेऊन आली . अण्णा मला नको म्हणाले पण चंदू ने तो हक्काने पिला .

रमेश काही बोलत नव्हता सुन्न झाला होता .

चंदू " अरे बोल ना काही तरी .. मध्यंतरी मालतीने तुला घरातून बाहेर काढले कारण तू तसा  वागलासच होतास . पर स्त्री आदर हे पुरुषाचे आद्य कर्तव्य असते हे तू विसरलास . आता मी  तुझ्या बायकोला  साडी घेऊन आलो आणि म्हटले कि हि साडी तिच्या अंगावर छान दिसेल तर कसे वाटेल . तुझी हि बायको मला हाकलून लावेल , बघायचंय तुला ."

रमेश उठला आणि चंदू च्या पाया पडला .. माझे तेव्हा चुकलेच . मी असा कसा वागलो हेच मला कळत नाहीये .

रमेश " तुला मालती बरोबर सुखात संसार करताना मला मनातून सहनच  होत नव्हते .एके काळी  मालतीला मी मनोमन पत्नी मानली होती आणि केवळ माझ्या बापा च्या हट्टामुळे माझे लग्न मोडले . माझी सगळी स्वप्न एका क्षणात विस्कटली .आणि मी काही करू नाही शकलो .हे दुःख मला पचवताच आले नाही  त्यातून तुझा द्वेष केला , मालती वर हक्क दाखवायचा प्रयत्न केला आणि कुत्र्यासारखा लाचार होऊन आलो तुझ्या दारातून .

माझ्या बापानेच माझा घात  केला . मग दारू सिगारेटी फुकट बसायचे दिवस भर मग काढले कामावरून . मला तेच पाहिजे होते , मला माझ्या बापाला दाखवून द्यायचे होते  कि कशी त्याने  माझ्या आयुष्याचे मातेरे केले  हे त्यांना दिवस रात्र दाखवून द्यायचे होते ,आणि त्याची इज्जत जे ते मिरवायचे ना ती घालवायची होती म्हणून या पोरीशी मी मुद्दामून लग्न केले . "

अण्णा " अरे पण आता लग्न केले आहेस ना तर ते निभावून दाखव "

चंदू " अजाणता तू एका मुलीच्या आयुष्याचे कल्याण केले आहेस . ह्या  गोष्टी चा  मला अभिमान आहे . पण तिला सर्व सुख देशील तर त्याचा फायदा ना . "

अण्णा " दारू केव्हाही वाईटच . तिच्या आहारी जाणे म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकल्या सारखीच आहे . "

चंदू " अजूनही वेळ गेली नाही . तूला चांगली नोकरी मिळेल . अरे झाले ते झाले वाईटाला पूर्णविराम दे आणि आज पासून नवीन आयुष्य जगायला  सुरुवात कर .

रमेश ने चंदू ला कडकडीत मिठी मारली . गेल्या ८ महिन्यात त्याच्याशी कोणी इतक्या आत्मीयतेने बोलले पण नव्हते . खुद्द त्याचे आई वडील पण पाठ फिरवून मोकळे झाले होते.

चंदू " चल तुझे केस आणि दाढी करून येऊ "

रमेश च्या  मनाला थोडी उभारी आली .तो आतमध्ये जाऊन पटकन कपडे घालून बाहेर आला .

अण्णा " जावई बापू , तुमच्या मित्र मित्रांचे चालू द्या मी जरा शाळेत जाऊन येतो "

चंदू " ठीक आहे . "

चंदू ने रमेश ला सलून मध्ये नेले . त्याचे केस , दाढी काढून त्याला माणसात आणले . 

उद्या आपण इकडेच कुणीकडे तरी तुझ्या साठी नोकरी मिळतेय का  ते बघू ?अरे आणि ती जागा पहिली सोड . कुणीकडे तरी चांगले घर भाड्याने घे . तिथून  नवीन सुरुवात कर . रमेश आणि चंदू एक मंदिरात च्या कट्टयावर त्या दिवशी बराच वेळ  गप्पा मारत बसले .

चंदू ने त्याला हाडतूड न करता  आपलेसे केल्यामूळे रमेश ला पण थोडा आधार वाटला . आपण पण काहीतरी  चांगले करू शकतो किंवा अजूनही आपल्या आयुष्यात काही तरी चांगले  घडू शकते अशी आशा  वाटू लागली .

बोलता बोलता चंदू ला एवढे तर नक्कीच कळले होते होते कि तो झाल्या सगळ्या प्रकरणाचा दोष त्याच्या वडिलांना देत होता . पण प्रत्यक्षात त्यांची तर चूक होतीच , माणूस म्हणून रमेश ची पण चूक होती , त्याने मुलगा म्हणून काहीतरी जवाबदार घेऊन हे लग्न मोडणार नाही  याकडे तेव्हा बघायला पाहिजे होते . याउलट चंदू ने त्याला सांगितल्यावर सुद्धा तो असेच म्हणत होता कि सांगितलेले दागिने देत नाहीयेत म्हणजे ते फसवणूकच करत आहेत .

स्वतः बद्दलचा गर्व त्याला एक पाऊल ल पुढे टाकायला मागे खेचत होता . त्याच्या वडिलांना पण आपल्या  मुलाचा जास्तच गर्व होता शेवटी काय झाले . म्हणून म्हणतात माणसाने असताना माजू  नये आणि नसताना लाजू नये . 

तरी पण चंदू ने आता त्याची गाडी पुन्हा रुळावर आणून च सोडायची ठरवली .

रमेश ला एकदम टकाटक  बघून त्याचो बायको खुश झाली . ती लगेच पुढे आली आणि चंदू ला म्हणाली

"दादा तुमचे खूप उपकार झाले . देव तुमचे भले करो "

चंदू ला आज एक बहीण मिळाली होती . एका बहिणीचे आशीर्वाद मिळाले  होते .

थोड्या वेळाने रमेश ला त्याच्या घरी सोडून तो त्याच्या घरी निघाला . एक दोनदा गावात फिरल्याने आता त्याला अंदाजे घराचा  रस्ता माहित झालेला  होता

घरी आल्यावर मालती सारखी विचारत होती "एकटे कुणीकडे फिरत होतात ?"

चंदू "काही नाही ग .. जरा दाढी करून आलो "

पुढे दोन दिवसात रमेश ने एक नोकरी मिळवली . चांगल्या वस्तीत एक घर भाड्याने घेतले . थोडे  फार पैसे होतेच त्याच्याकडे .

चंदू पण त्याला रोज गावात आहे तर भेटत होता. चंदू ने रमेश  ला सांगितले अण्णांना मी विचारलेय  त्याच्या शाळेत एका क्लार्क ची नोकरी आहे . तुझ्या बायकोला इंटरव्यूह ला पाठवून बघ .. मिळाली तर मिळाली नोकरी . अण्णांच्या छत्र छायेखाली तिला काही धोखा नाही .

रमेश ला पण पटले . त्याची बायको गरीब होती पण दहावी पर्यंत शिकलेली होती . बोल बोलता रमेश च्या बायकोला पण क्लार्क ची नोकरी मिळाली . सध्या पगार कमी आहे पण अगदीच काही न करत राहण्या  पेक्षा स्वतःच्या पायावर उभी राहील आणि संसाराला पण उपयोगी होईल .

झाले या दोघांना गावात येऊन ५ दिवस झाले . आता दोन दिवसात जायचा दिवस येणार होता .

अण्णा आणि सरपंच यांनी उद्याच चंदू चा अख्ख्या गाव समोर सत्कार करायचे ठरवले .

शाळेच्या एका हॉल मध्ये गावातील लोकांना आमंत्रणे  गेली . चंदू अण्णांना "नाही , नको असेच म्हणत होता पण अण्णा म्हणाले ते सरपंच ऐकणार नाहीत आता . असुदे हो गावकऱ्यांचे प्रेम आहे तुमच्यावर "

शेवटी चंदू चे काय चालणार ?

मालती खूप खुश होती . आपल्या नवऱ्याचा सत्कार करणार आहेत हि गोष्ट तिला आवडली होती आणि नवऱ्या बद्दलचा आदर आणि प्रेम दोन्ही वाढत होते .

चंदू ला  याची जाणीव नव्हती कि रमेश ला एक दिशा देऊन त्याने खरोखर मोठया माणसाचे काम केलेय . तरी पण अजून एक गोष्ट चंदू च्या डोक्यातून जात नव्हतीच कि एका  गावात  राहून  दोघे बाप  लेका मध्ये अशी दुश्मनी असणे चांगले नाही . कसे असते ना ज्याला  बाप आहे त्याला त्याची किंमत नसते .

चंदू अचानक घरातून बाहेर पडला आणि गेला तो थेट रमेश च्या घरी गेला . रमेश चे बाबा जरा ऐटितच बोलत  होते म्हणतात ना” सूंभ जळाला  तरी त्याचा पीळ जात नाही तसेच .

चंदू ने त्यांना समजावून सांगितले असे तोडून रक्ताची नाती तुटतात का ? तुमच्या कडून एक चूक झालीय हे मोठ्या मनाने मान्य करा आणि मुलाला आणि सुनेला घरात घ्या . तुमच्या छायेत तो अजून सुखावेल . थोडा तो चुकलाय थोडे तुम्ही चुकलाय ".

 रमेश चे बाबा "चंदू शेठ , तुम्ही आता जास्तच घरातल्या गोष्टीत शिरताय . तुम्ही मला शिकवू नका . मला काय करायचे ते मी बघून घेईन . "

चंदू "बरोबर आहे तुमचे , तुमच्या बाप लेकाच्या प्रेमात मी कशाला पडू नाही का ? "

आणि शांतपणे घरी निघून  आला .

🎭 Series Post

View all