अर्धांगिनी भाग १२

in this part malati and chandu come across ramesh father

अर्धांगिनी भाग १२

क्रमश: भाग ११

अण्णांचा ऊर मुलगी आणि जावयाला घेऊन जाताना भरून आला होता . चंदू प्रवासात पण बायकोची तर घेतच होता पण सासू सासऱ्यांची पण चांगलीच काळजी घेत होता .

दोन तासाच्या प्रवासा नंतर  सर्व जण गावाला पोहचले . मालतीला गावाला आल्यावर जणू उड्या मारावे असेच   वाटत होते . असे होणारच ना . माहेरची ओढ कुणाला नसते . मालती  अख्खा  गाव डोळ्यात भरून घेत होती . गाडीतून उरातल्या वर अण्णांचे ओळखीचे लोक भेटत होते . " राम राम अण्णा , " काय म्हणता अण्णा " अशी हाक मारून लोक पुढे जात . कोणी कोणी मालती ला पण विचारायचे " कशी आहेस बाय ?"

सगळ्यांशी बोल्त चालत सर्व जण घरी आले . अण्णांच्या मागच्या   घरात अण्णांची लांबची बहीण राहायची . ती लगेच पुढे आली " मालती वरून भाकरीचा तुकडा ओवाळून तिला घरात घेतले .

चंदू ला  सासू सासरे तर चांगलेच परिचयाचे झाले होते पण हे घर नवीन होते . तो आपला बाहेर एक मोठा झोपाळा लावला होता त्यावर बसून राहिला . मालती मात्र घरात लगेच रुळली . शेवटी तिचेच घर ते . लगेच हातपाय धुवून चंदू ला प्यायला पाणी घेऊन आली . अण्णांना पण पाणी दिले . पार्वती बाईंनी चूल पेटवली आणि गरम पाण्यासाठी बंब लावला . इकडे सर्वांना चहा टाकला .

पाणी जसे गरम झाले एकेकाने मस्त आंघोळ केली आणि मग चहा प्यायला .

चंदू " मालतीला आपला खुणे ने विचारायचा " काय . बरी आहेस ना " जास्त काम नको करू.  पटापट काही उचलू नकोस. " हे सगळे तो खुणेने बोलत होता आणि तिला ते पण कळत पण होते .

मालतीचा गावी आल्यावर जरा उत्साह द्विगुणित झाला होता ते चंदू ला लगेच कळत होते .

तेवढ्यात सरपंचांना कळले कि अण्णा मालतीला आणि जावयाला घेऊन आलेत तर ते लगेच त्यांना भेटायला आले

चंदू बाहेरच एकटा बसला  होता  आणि अण्णा आता मध्ये त्यांचे काही बाही काम करत होते .

सरपंच " येऊ का अण्णा ?"

चंदू ने त्यांना लगेच ओळखले . चंदू त्यांच्या पाया  पडला. तेवढ्यात अण्णा बाहेर आलेच

अण्णा " नमस्कार !"

सरपंच " पाहुण्यांना घेऊन आलात ते बरे झाले ? पाहुण्यांचा पाहुणचार झाला नव्हता त्यावेळी "

अण्णा " हो .. आता म्हणून घेऊनच आलो "

(काही ठिकाणी जावयाला पाहुणे असे संबोधतात )

सरपंच " आता आलेच आहेत तर मी काय म्हणतो आपण यांचा सत्कारच करू गावात "

अण्णा " चालेल कि "

सरपंच " बाकी आमची लेक कशी आहे ? रुळली का आता ती तिकडे ? गावातले जीवन आणि शहरातले जीवन थोडा फार फ़रक पडायचाच "

चंदू " हो , छान रुळली आहे . तिला आता तिकडे नोकरी पण लागलीय . घरचं आणि नोकरीचे उत्तम सांभाळते . शिवाय माझे पण डबा , जेवण करते "

सरपंच " मी तुम्हाला म्हटले होते नाही का ? कि मालती सारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही "

अण्णा " दोघे जोडास जोड आहेत . ह्यांच्या सारखा जावई पण मला शोधून सापडला नसता . मालतीची खूप काळजी घेतात . "

तेवढ्यात मालती चहा घेऊन आली सगळ्यांना .

मालती ला सरपंच म्हणजे तिच्या अण्णांसारखेच . तिने चहा दिला आणि त्यांना नमस्कार करायला वाकली तोच लगेच

चंदू " अग , आता वाकू  नकोस. तुझ्या ऐवजी चा नमस्कार मी त्यांना करतो . "

सरपंच आणि अण्णा हसायला लागले .   

सरपंच " बरोबर सांगत आहेत ग ते .. तू आता तुझी जास्त काळजी घे ..

चहा  घेऊन सरपंच निघून गेले .

पार्वती बाईंनी मस्त चुली वरचा भात  आणि डाळ वांग केले आणि  चौघांनी त्यावर ताव मारला  आणि झोपून गेले

सकाळी उठल्यावर अण्णा शाळेत गेले . चंदू आणि मालती जरा आज आरामातच उठले , आरामात नाश्ता एरव्ही त्यांची पण रोजची घाई असते .

नाश्ता आणि अंघोळ झाल्यावर मालती म्हणाली " चला तुम्हाला  आमचा गाव दाखवते "

चंदू " ठीक आहे " आणि दोघे आई ला सांगून घर बाहेर पडले .

मालतीने चंदू ला तिच्या शाळेत नेले . तिकडेच अण्णा पण होते . अण्णांनी मुख्याध्यापकांना भेटले . मग थोड्या वेळाने दोघे असेच मंदिर , बाग , तलाव असे सगळी ठिकाणे मालतीने  दाखवली .

मालतीला मधेच चालताना दम  लागायचा  मग बसायचे कुठेतरी . आणि दुपार पर्यंत आले घरी .

घरी पार्वती बाईंनी आज चंदू साठी खास पूरण  पोळीचा मेनू केला होता . चंदू चे चांगलेच लाड चालू होते . मालती मुळे  चंदू ला सगळी नाती मिळाली होती . आई , अण्णा , यांचे प्रेम कसे असते ते कळत होते .

आज मालती शी लग्न नसते झाले असते तर नक्कीच कुठल्या  तरी अनाथ मुलीशीच  झाले असते . त्यात काही वाईट नाही तिला पण बिचारीला जन्माचा साथीदार मिळाला असता पण तिला हि कोणी नाही आणि त्याला हि कोणी नाही असेच झाले असते ना .

दोघांनी दुपारी थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा ४ वाजता घरातून बाहेर पडले " आता आपण खालच्या आळी च्या दिशेने जाऊ "

चंदू " तू नेशील तिकडे येतो "

मालती चालता चालता एकेक सांगत होती ." इथे माझी मैत्रीण मंगल राहायची . तिचे पण लग्न झाले आता घरी नसेल . पुढे सवि राहते . असे मालती तिच्या विश्वात चंदू ला आणत होती .

चालता चालता  मालतीला अचानक घाम फुटला आणि ती घाबरून गेली . गावात असल्याने तिला चंदू चा हात पण पकडता येत नव्हता

चंदू चे  तिच्याकडे लक्ष नव्हते . तो इकडे तिकडे बघत  चालत होता .

समोरून तिला रमेश चे वडील चालत येताना दिसले  त्यांना बघून मालती घाबरली . तिने रमेश ची चम्पी केली होती हे तर त्यांना आता नक्कीच कळले असेल . ते आता आपल्याला काय बोलतील या भीतीने तिला   घाम फुटला . आता दोन दिवसां करता आलेय माहेरी तर उगाच तमाशा नको.

तेवढ्यात रमेश चे वडील एकदम जवळच आले त्यांच्याशी बोलायला

रमेश चे बाबा " काय पोरी कशी आहेस ? बरी आहेस ना ?"

मालती काहीच उत्तर देई ना . इनफॅक्ट तिच्या तोंडून काही उत्तर निघेच ना

चंदू ला पण काय बोलावे त्यांच्याशी काय कळे ना . त्यांच्या दृष्टीने चंदू रमेश चा मित्र होता . ते नक्की आपल्या बद्दल काय विचार करत आहेत हे दोघांनाही माहित नाही आणि वर ते इतके नॉर्मल बोलत होते कि जसे कि काय झालेच नाही .

रमेश चे बाबा " काय चंदू  शेट . सासरी बायकोला सोडायला आला त कि काय ?"

चंदू " बघू आता मालती काय म्हणेल तसे ? सध्या तरी ती माहेरी आलीय दोन दिवस "

रमेश चे बाबा " या मग संध्यकाळी चहा ला .. गप्पा मारू .. का विसरलात वाट आमच्या घरची आणि रमेश ला पण "

चंदू " नाही .. विसरतोय कशाला ? येईन मी चहा प्यायला .. "

मालती मात्र शांत , स्तब्ध , उभी राहिली काही बोललीच नाही

दोन चार खोचक वाक्य बोलून रमेश चे बाबा पुढे निघून गेले

मालती " चला , आपण घरी जाऊ ?"

चंदू " का ? तू मला खालच्या आळीत नेणार होतीस ना ?"

मालती " पण जाऊ आता घरी .. नको वाटतंय मला . थोडे दमल्या  सारखे होतंय "

चंदू " ठीक आहे . थोडी घाबरलीस ना त्यांना .. किती घाम आलाय बघ "

मालती " जाऊदे , माझा मूडच गेला त्यांना बघितल्यावर "

चंदू " जाऊ दे .. आपण जाऊ घरी "

इकडे अण्णांची वेगळीच गडबड चालली होती . अख्या गावा  समोर चंदू चा सत्कार करायचा कार्यक्रम ठरवत होते . त्यासाठी अण्णांची आणि सरपंचांनी आणि अजून काही लोकांची  मीटिंग होती .

घरी आल्या आल्या अण्णांना मालतीने रमेश च्या वडील भेटलेले ते सांगितले . ते काय काय म्हणत होते ते सांगितले आणि बोलता बोलता तिचा गळा  दाटून   आला होता .

अण्णा " जाऊ दे , तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ . अग त्या दिवस पासून कोण कुत्रं विचारत नाही त्यांना गावात . मुलाचे पण वाईट झाले तुला तर माहीतच असेल "

मालती " वाईट झाले ? काय वाईट झाले ?"

चंदू " मालती .. मला जरा पाणी आणतेस का ?"

मालती पाणी आणायला आत मध्ये गेली .

चंदू ने अण्णांना खुणे ने सांगितले हा विषय नको

मालती पाणी घेऊन आली

मालती " हा अण्णा बोला काय बोलत होता तुम्ही ? काय झाले त्यांच्या मुलाचे "

अण्णा " तेच ग ते लग्न मोडले ना मंडपात . बाकी काही नाही "

मालती " हमम.. कर्मच वाईट तर काय ? तुम्हाला माहित नाही आम्हाला तो तिकडे शहरात पण खूप त्रास देत होता . अशी त्याची चंपी केली होती ना मी "

अण्णा " होय का ? "

चंदू " मालती , कशाला विषय वाढवतेस , मी सांगितलंय अण्णांना ते . तू आता हा  विषय थांबव. "

मालती ला खरं  तर खूप बोलायचे होते पण चंदू ने थांब म्हटलं म्हणून ती थांबली

रमेश च नक्की काय झाले ते चंदू ला पण माहित नव्हते . चंदू आणि रमेश दोघे त्या दिवसा  नंतर एक मेकांनशी बोललेच नव्हते .दोन महिन्यांनी त्याला अचानक कळले होते कि त्याने हि कंपनी सोडलीय . त्या नंतर काही कॉन्टॅक्ट च नव्हता .

मालती आत मध्ये गेल्यावर चंदू ने अण्णांना बाहेर विचारले " काय झाले रमेश चे "

अण्णा " अहो तो काय तर म्हणे ऑफिस मध्ये दारूपियुन जायचा. ऑफिस ला सारखा कुठे तरी खाली फिरत बसायचा . मग काय तर त्याला नोकरी  वरून काढून टाकले .   मिळालेले पैसे घेऊन गावी आला . तर रोज दारू पियुन कुठेतरी लोळत बसायचा . त्याच्या वडिलांचा सगळा रुबाब आणि माज दोन्ही उतरला . आणि एक दिवस  त्याने मुद्दामून गावातल्या मंदिरात गरिबातल्या गरीब म्हणजे मुलीशी लग्न करून आला. मग काय बापाने हाकलून लावलन  घरातून.

बापाला म्हणतो कसा " माझ्या आयुष्याचे मातेरे तुम्ही केलत"

चंदू " अरे बापरे , मला यातलं काहीच माहित नाही "

अण्णा " थोडक्यात  काय ते पोरग हातचं गेले? एव्हडा चांगला हुशार मुलगा आता कुठे तरी छोटी मोठी कामं करतो आणि मिळालेले  पैसे दारूत उडवतो "

🎭 Series Post

View all