अर्धांगिनी भाग ११
क्रमश: भाग १०
मालतीने सांगितलेल्या गोड बातमीने दोघांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती . मालतीची मालू कधी झाली ते दोघांनाही कळले नाही .
चंदू " मालू , आता मात्र तुझी काळजी घ्यायला पाहिजे . तू खालून अजिबात पाणी आणायचे नाहीस . मी पहिल्या सारखा पाणी भरत जाईन . शिवाय तुझ्या खाण्याकडे पण लक्ष देऊ . तू आता तुझ्या तब्बेतीकडे दुर्लक्ष केलेले मला अजिबात चालणार नाही . "
चंदू ला काय करू आणि काय करू नको असे झाले होते . पहिल्यांदा बाबा होणार असताना पुरुषाला पण जवाबदारीची जाणीव होऊ लागते .
मालती चे काय बाई सांगू मातृत्वाची चाहूल प्रत्येक स्त्री ला सुखावह असते . आपल्या आत एक गर्भ वाढत आहे ह्याचे फिलिंग काही वेगळेचं असते. या सुखा पुढे जगातील सगळी संपत्ती जरी ओतली ना तरी ती कमी पडेल असे त्याचे मोल आहे .
आता प्रश्न तोच मालतीने नोकरी ला जावे का नाही जावे? या सगळ्या सद्य परिस्थितीत कोणीही हेच सांगेल कि मालती तू आता नोकरी सोड आणि होणाऱ्या बाळासाठी स्वतःकडे लक्ष दे .
पण चंदू च विचार वेगळे होते . पैशांपेक्षा मालतीला मुलांना शिकवायला किती आवडते हे त्याने स्वतः च्या डोळ्याने पहिले होते . ती जेव्हा पासून शाळेत जायला लागली होती तेव्हा पासून ती खूप खुश असायची , खूप बोलायची , इतकी बोलायची कि चंदू हू...हू.. करायचा आणि ती नॉन स्टॉप बोलायची . त्यामुळे चंदू ला हे नक्कीच माहित होते कि जर मी हिला नोकरी सोड म्हणालो तर हि एक शब्द तोंडातून न काढता लगेच हो म्हणेल पण मनातून ती कुठेतरी नाराज असेल .
चंदू ने ठरवून टाकले कि आता अर्धी कामे मी करणार . लग्न आधी मी एकटा होतो तेव्हा मी ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवून खायचो तर मग मी आता पण जेवण सुद्धा बनवू शकतो .
मालती " त्याची काही एक गरज नाहीये . जगात माझ्या सारख्या असंख्य बायका आहेत कि ज्या नोकरी करतात . त्या नाही घर सांभाळून मुले सांभाळून सगळे करतात "
चंदू " हो पण "
मालती " आपण बिन काही नाही . पण उद्याच डॉक्टरांकडे जाऊ ते सांगतील मी घरी बसायला पाहिजे का ते ? तशी गरज असेल तर आपण विचार करू "
मालती ला मनात अण्णांचे वाक्य आठवले " घरात बाळाच्या येण्याने नवरा बायकोचे नाते घट्ट होते आज तसेच काहीसे वाटतं होते ."
दुसऱ्या दिवशी दोघे डॉक्टरांकडे जाऊन आले . डॉक्टरांनी पण सांगितले सगळे नॉर्मल आहे . काही काळजी करण्याचे कारण नाही . थोड्या गोळ्या लिहीन दिल्या . नोकरी केली तरी चालेल ..... अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या . चंदू कान देऊन सगळे ऐकत होता .
फायनली दोघांचे ठरले कि गरोदर पणात सुद्धा मालती शाळेत नोकरीला जाईल .
चंदू ला जमेल त्या पेक्षा जास्त तो मालतीची मदत करत होता. तिची काळजी घेत होता .
मालतीने अण्णांना पत्राने कळवले कि अण्णा तुम्ही आजोबा होणार आहेत "
चंदू खालून पाणी भरायचा, तिच्या हातात कोणतीही जड वस्तू द्यायचा नाही .एखाद्या आई ने आपल्या गरोदर मुलीला सांभाळावे तसा चंदू मालतीला सांभाळत होता .
एक पत्नी कशी असावी तर
कार्येषु मन्त्री करणेषु दासी,भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।
धर्मानुकूला क्षमया धरित्री ,भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा ॥
कार्य प्रसंग असेल तेव्हा मंत्री , गृहकार्य असेल तेव्हा दासी ,भोजन वाढताना माता ,रात्री रंभा म्हणजे अप्सरा , धर्मा चे कार्य असेल तेव्हा बाधा न आणणारी आणि क्षमाशील असे सहा गुण असणारी पत्नी मिळणे दुर्लभ असते . माझा सांगायचं मुद्दा हा आहे कि एका स्त्री कडून अनेक अपेक्षा असतात . वरील श्लोका मध्ये पत्नीने पती बरोबर कोणत्या वेळेला कसे वागावे हे सांगितले आहे . काहीजण म्हणतात पत्नी काही काळाची स्त्री असते आणि अनंत काळाची माता असते .मालती तर गृहकृत्य होतीच .
चंदू तर बिचारा अनाथ होता . त्याच्या वर कोणी हि संस्कार केले नव्हते .हे संस्कार त्याच्या कडे उपजत आले होते . तो मालतीचा नवरा तर होताच पण कधी वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचा , कधी आई सारखे प्रेम करायचा .त्याने तिला कधी कशाची कमी पडू नाही दिली . तिला माहेरची आठवण तर यायची पण माहेरी जायचंय म्हणून तिला कधी गरज नाही पडली .
बोल बोलता मालतीला सातवा महिना लागला . मालकीण बाई पण खूप चांगली होती . कधी काही गरज पडली तर मदतीला लगेच धावून यायची .
तिनेच चंदू ला सुचवले कि आता सातव्या महिन्यात तिचे ओटी भरण करा.
झाले चंदू लगेच ठरवून टाकले . त्याने अण्णांना पत्र लिहिले
"मालतीचा सातवा महिना लागला आहे तरी तुम्ही दोघं उभयतांनी मालतीच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाला यावे आणि तिला आशीर्वाद द्यावे "
अण्णांना मालतीची संसारात चाललेली प्रगती ची पत्रे येत असत . अण्णांनी लगेच सुट्टी टाकली आणि त्यांच्या पत्नीला घेऊन ते शहरात यायला निघाले .
मालतीला च्या आई ने तिला छान हिरवी साडी घेतली चंदू ला एक पोशाख घेतला . ओटी चे सामान घेतले . तिच्या आवडीचे रव्याचे लाडू आणि खाऱ्या शंकरपाळ्या करून घेतल्या .
अण्णांनी ठरवून टाकले होते पोरींचे पाहिले बाळंतपण आहे तर तर तिला आता ओटी भरण झाले कि तिला गावी आणायचे .
अण्णा आणि पार्वती बाई (मालतीची आई ) दोघे मोठया हौशीने गावात सगळ्यांना सांगत सुटले आम्ही मालतीच्या ओटी भरणाला जातोय . येतील तिला घेऊनच येऊ .. वगैरे वगैरे .
आज मालती शाळेतून घरी आली बघते तर अण्णा आणि आई दोघे खाली मालकीण बाईकडे चहा पित बसले होते. दोघांना बघून मात्र मालती ने मोठा टाहो फोडला .. आई .. आई करत मालती लहान मुली सारखी आई च्या कुशीत शिरली . पोर कितीही मोठे झाले तरी आई ती आई च आणि आईची कुशी ती मायेची उब .
मालकीण बाईने मालतीला पण चहा दिला .
मग मालती त्यांना घरी तिच्या घरी घेऊन आली .
पार्वती बाई पोरीचा संसार बघून धन्य झाल्या . "तशी खोली लहान आहे पण मालती खूप छान घर ठेवलेस हो ."
मालती " अग आई दोघांना कितीशी जागा लागतेय अशी ?"
पार्वती बाई " हो ग बाळा .. तुम्ही दोघे खुश आहेत ना हे जास्त महत्वाचे . तुमची मालकीण बाई पण चांगली आहे .सोबत चांगली आहे "
थोड्याच वेळेत चंदू घरी आला .
चंदू खुश होऊन " अरे वाह .. कधी आले तुम्ही ? बरं झाले तुम्ही आलात "
अण्णा'" हे काय ४ वाजत आलो "
चंदू " खाली थांबायला लागले का मग कारण मालतीला घरी येई पर्यंत साडे पाच होतात "
अण्णा " हो .. तुमच्या मालकीण बाईकडे थांबलो होतो . त्यांनी चहा पण केला आमच्या साठी "
चंदू समोर पार्वती बाई पण जरा शांतच होत्या अजून त्यांचे दोघांची तशी फारशी ओळख नव्हती आणि लग्ना नंतर फार बोलणे पण झाले नव्हते .
मालतीने चंदू आल्यावर सर्वांना परत चहा केला . सगळ्यांनी बसून चहा घेतला .
अण्णा " मी काय म्हंणतो जावई बापू , कधी करायचेय ओटी भरण म्हणजे तशी तयारी करायला "
चंदू " उद्या आपण आधी काय काय करायचंय त्याची तयारी करु आज शुक्रवार आहे तर रविवारी संध्याकाळी करू . "
अण्णा " ठीक आहे "
अण्णा " मग आता इथेच बाजारात जाऊन आपण तयारी करू . काय काय आणायचेय ते आणू .पाच फळे , फुलांची वाडी ची ऑर्डर घ्यायचीय बाकी आम्ही सगळे घेऊन आलोय "
चंदू " ठीक आहे .. मला पण अजून काय काय करायचेय ते सांगा . आता तुम्ही आलात तर माझे टेन्शन गेले . "
मालती आणि पार्वतीबाई आज घरातच राहिल्या . त्यांनी जेवणाचे बघायचे ठेवले .
मालतीच्या आजू बाजूला पण थोड्या फार बायका ओळखीच्या झाल्या होत्या . त्यांना आमंत्रण दिले . मालकीण बाई होतीच आणि चंदू च्या ऑफिस मधल्या एक दोन फॅमिली आणि मालतीच्या शाळेतील जवळ राहणाऱ्या दोन तीन बाई अशी सगळ्यांना आमंत्रण गेली . येणाऱ्या लोकांना चिवडा लाडू चा मेनू ठरला . चंदू ने घरात थोडे डेकोरेशन केले .
मालतीला खूप सारे गजरे आणि येणाऱ्या प्रत्येक सवाशिणीला गजरा ऑर्डर दिला .
अशा प्रकारे मालतीचा ओटी भरणाचा कार्यक्रम रविवारी दणक्यात पार पडला .
त्याच बरोबर हातात वाडी घेऊन चंद्रावर , धनुष्य बाण घेऊन असे फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो पण काढले
अण्णा " मालती आता उद्या आपण गावी जाऊ . तुझ्या सामानाची बांध बांध कर "
मालती " अण्णा, आता नको , मी अजून कामावर जाणार आहे . मी नवव्या महिन्या पर्यंत काम केले तर पुढे मला सुट्टी बरीच मिळेल नाहीतर लगेच बाळ एक महिन्याचं होते नाहीतर कामावर हजर व्हावे लागेलं "
चंदू ला मालतीने जाऊ नये असेच वाटतं होते पण तिला आता इकडे ठवावे का नाही यावर तो विचार करत होता . कारण डिलिव्हरी च्या वेळी तिची आई बरोबर असेल तर केव्हाही चांगले .
काय करावे ते कोणालाच कळेना . मालती म्हणते त्या मध्ये पण तथ्य होते आताच रजा टाकून काय करायचे . जमतेय तेवढे दिवस काम करायचे . शरीराची हालचाल पण होते . आता गावात तर अण्णा सर्वांना सांगून आले होते कि मालतीला घेऊन येणार आहे .
मालती तर जायला तयार नव्हती . पार्वती बाईंना पण आश्यर्य वाटले कि हिला गरोदर पणात सुद्धा इकडे कोणीही नसताना हि जास्त बरे वाटतंय .
अण्णा म्हणाले "अग तसे नाही ग , तिला तिच्या नोकरीची पण काळजी आहे ना म्हणून ती इकडे रहायचे म्हणतेय "
शेवटी चंदू म्हणला "आपण असे करू तुम्ही थोडे दिवसांकरता मालतीला घेऊन जावा . मी मागून वीक एन्ड ला तिला घ्यायला येतो . म्हणजे मालतीला पण थोडे माहेरी राहता येईल . तिच्या गावातील मैत्रिणींना पण भेटता येईल शिवाय जास्त रजा पण नाही घ्यायला लागणार . मग आपण तिची डिलिव्हरी इकडेच करू .. हा इकडचा ड़ॉक्टर चांगला आहे. तेव्हा मात्र तुम्ही दोघे मदतीला या . तिला नववा महिना लागला कि या . बघ कसा वाटतोय प्लॅन ."
अण्णांना "थोडा पटला . प्रॉब्लेम हा आहे कि इकडे डिलिव्हरी चे आपल्याला जमेल का ? "
चंदू "हो .. त्याची काही काळजी करू नका ..इथला हा बेस्ट डॉक्टर आहे .काय ग मालू ? तुला काय वाटते ?"
मालती "ठीक आहे पण त्या पेक्षा अजून एक गोष्ट करू शकतो आपण उद्याच सगळे इथून जाऊ तुम्ही पण चला आमच्या बरोबर आणि मग दोघे परत येऊ . तुम्ही तरी इथे एकटे थांबून काय करणार ? "
मालती ला चंदू ला सोडून एक आठवडा सुद्धा जाऊ नये असेच वाटे .
अण्णा आणि पार्वती बाई एकमेकांकडे बघून हसायला लागले .
पार्वती बाई "जावई बापू आता चला तुम्ही पण . तुमच्या शिवाय काही येणार नाही आमची लेक.
मालती "आई , असे नाही ग ."
चंदू ठीक आहे "उद्या मी सकाळी आधी मालतीच्या शाळेत जाऊन रजेचा अर्ज देऊन येतो नंतर तसाच माझ्या ऑफिस ला जाऊन रजेचा अर्ज देऊन यतो . मग उद्या दुपारी १२ च्या गाडी ने आपण सगळे गावाला जाऊ "
दुसऱ्या दिवशी सकाळी सातव्या महिन्याची गरोदर मालू आणि हे तिघे दुपारच्या बस ने गावाला निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा