Login

अर्धांगिनी  भाग १०

In this Malti tells chandu that she is pregnent

अर्धांगिनी  भाग १०

क्रमश: भाग ९

मालती चा पहिला दिवस तिची जॉइनिंग प्रोसिजर  करण्यातच गेला . शाळेतील मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षिकांशी ओळख करण्यात गेला . दुपार नंतर तिला एक वर्ग दिला आणि मग शिकवायला सांगितले . मालती आज बऱ्याच दिवसांनी  शिकवणार होती . मालती खूप हौसलेली . वर्गात मुलांना पहिल्यांदा त्यांची नावे सांगायला लावली . तुमचा आवडीचा विषय कोणता असा त्यांच्याशी संवाद साधू लागली . मग कोणाला गाणे येते का ? कोणाला गोष्ट सांगता येते का ? असे त्यांच्याशी संवाद  साधता साधता ती मुलांना शिकवू लागली .

आज तिचा पहिला दिवस असल्याने मुलांशी तिचे चांगले बॉण्डिंग होणे गरजेचे होते . मुले पण हो बाई , नाही बाई असे मोठ्याने म्हणत . मुख्याध्यापिका मध्ये मध्ये बाहेरून राऊंड मारत  होत्या . मालती ला वर्ग कंट्रोल होतोय का नाही ते बघत होत्या .

अशा पद्धतीने आज मालतीचा  पहिला दिवस पार पडला .

शाळा सुटली . मालती पण शाळेतून बाहेर पडली . शाळा तशी घरापासून लांब नव्हती तरी पण चालत २० मिनिटे तरी अंतर होतेच . आज पहिलाच दिवस म्हणून ती थेट घरी आली . थोडा आराम  केला आणि  रात्रीच्या जेवणाला लागली . चंदू ला यायला अजून एक तास होता . तो पर्यंत तिने जेवण बनवून ठेवले . आणि मग छान बाहेर जाण्यास तयार होऊन बसली .

थोड्याच वेळात चंदू आला .

चंदू "  कसा गेला पहिला दिवस ?"

मालती च्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होते कि ती किती आनंदात आहे .

मालती " खूप छान . मुलांशी गप्पा मारता मारता त्यांना शिकवायला मला आज खूप मज्जा आली . आज बऱ्याच दिवसांनी मी हे माझे आवडीचे काम केले . "

चंदू " बाकीचा स्टाफ कसा आहे ? कोणी काही बोलले का ?"

मालती " हो .. बाकीचा स्टाफ पण छान आहे . मुख्याध्यापक बाईंनी खूप मदत केली . रजिस्टर कसे लिहायचे . कुठे ठेवायचे , कधी रिपोर्ट द्यायचा वगैरे सगळे सांगितले आणि दाखवले आणि मग दुपार नंतर त्यांनी मला वर्गात शिकवायला पाठवले ."

चंदू " चला म्हणजे पहिला दिवस तर खूप छान गेला "

मालती " हो ..आणि एक ते अण्णांना पत्र लिहुन लग्नाचा दाख ला मागवून घ्यायला लागणार आहे कारण माझ्या मार्कशीट वर आधीचे नाव आहे ना "

चंदू " हो का ? ठीक आहे मग उद्याच्या उद्याच त्यांना एक पत्र टाकतो .  कधी पर्यंत द्यायचंय काही बोलले का ?"

मालती  " ३ महिन्यात जमा करा असे म्हणालेत . मी सांगितले त्यांना ते गावी आहे तर थोडा वेळ लागेल "

बोल बोलता चंदू ला मालती पाणी देत होती , त्याची बॅग जागेवर ठेवत होती , तो फ्रेश होत होता लगेच मालती त्याला टॉवेल देत होती .

लगेच तिने दोघांना चहा टाकला . दोघांनी बसून चहा घेतला .

चंदू " मग आज दमली असशील तर आज आपण अराम करू . बाहेर फिरायला नाही गेलो तरी चालेल "

मालती " नको , आज तर जाऊया ,मी एकदम तयार आहे आणि जेवण पण तयार आहे . आज मला त्या देवळात जायचंय आज माझा पहिला दिवस होता म्हणून"

चंदू " ठीक आहे .. "

चंदू ने थोडा वेळ आराम केला आणि दोघे मंदिरात गेले . मालतीने देवाला नारळ दिला . देवाचे मनोमन आभार मानले . . थोडा वेळ दोघे देवळातील आवारात बसले . कधी कधी असे मंदिरात जाऊन बसले कि मन प्रसन्न होते. छान  वाटते . तिथल्या हवेतच एक वेगळी शक्ती जाणवते . काहीतरी करण्याची उर्मी मिळते . ताकद मिळते .

 मग दोघे घरी आले . आज मालती बोलायची थांबतच नव्हती . एक झाले कि एक असे अनेक विषय ती आज चंदू ला सांगत होती . दोघं नवरा बायको मध्ये खूप छान बाँडिंग तयार होत होत . एक मेकांचे सुख दुःखाचे सोबती ते मनापासून बनले होते . एकमेकांच्या सवयी एकमेकांना माहित झाल्या होत्या . एक मेकांची आवड निवड माहित झाली होती आणि मुख्य म्हणजे दोघे एकमेकांना आंनदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायचे .

तुझ्या आनंदात माझा आनंद हि एक मनाची वेगळीच स्टेज असते .  हि स्टेज आली कि आपोआप  समर्पणाची भावना निर्माण होते आणि एकदा का समर्पणाची भावना निर्माण झाली कि दोन आत्मे एक शरीर होऊन जातात .

चंदू आणि मालती याच्या नात्या ची सुरुवात हि अगदीच वेगळी झाली होती . दोघे एकमेकांना अपरिचित होते. दोघांनाही ह्या नात्याची सुरुवात कशी आणि कुठून करावी हे कळत नव्हते . नुसते सामाजिक बंधनात ते हि परिस्थितीमुळे बांधले गेले होते . चंदू ला तिला फक्त  एक माणुस म्हणून  आधार द्यायचा होता .  मालतीने पण एखाद्या वेलीने एखाद्या मोठया झाडाचा आधार घ्यावा तसा  त्याचा आधार घेतला होता .  नंतर तीच वेल  त्या झाडाच्या आधाराने वरच्या टोका पर्यंत वाढत जाते आणि त्या झाडाला व्यापून टाकते आणि ते झाड आणि वेल एकरूप होऊन जातात .अगदी तसेच मालती आणि चंदू चे झाले होते . आता चंदू च्या जीवनाला मालतीने व्यापून टाकले होते . दोघे तनाने आणि मनाने एकरूप झाले होते .

हल्ली कोणी ते लोक गेले कि मागून बोलत नसे . पूर्वी ज्या लोकांना त्यांच्या लग्न बद्दल कळले होते ते लोक ह्यांना बघून खुसरपुसुर करायचे .

मालतीला बोल बोलता नोकरी करून एक महिना झाला . त्यांचे छान रुटीन सुरु झालेलं . कधी फिरायला जायचे . कधी नाही जायचे . पण दोघांनीही आपल्या नोकऱ्या छान सांभाळल्या .

मालतीला आज तिचा पहिला पगार मिळाला . गावी असताना अण्णांचं तिचा पगार घेऊन यायचे . आज मालतीला  स्वतःच्या  हातात पगार मिळाला . महिनाभर काम केल्यावर हातात पगार मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो.

मालती ने घरी आल्या आल्या पगाराचे पाकीट पाकीट देवा समोर ठेवले .  चंदू आल्यावर सगळे पाकीट चंदू च्या हातात दिले .

चंदू " अरे माझ्याकडे कशाला देतेस . हे तुझे पैसे आहेत . तू तुझ्याकडे ठेव."

मालती " मी माझ्याकडे ठेवून काय करणार ?गावी पण अण्णा त्यांच्याकडेच ठेवायचे. तर तुम्ही पण तुमच्याकडे ठेवा . "

चंदू " आपण असे करू तुझ्या नावाचे बँकेत खाते काढू आणि मग तुझा सगळा  पगार त्या मध्ये टाकत जाऊ . म्हणजे कधी अडी अडचणीला लागले तर काढता येईल . सध्या घरखर्च माझ्या पगारात भागत आहेच ना "

मालती " हो चालेल "

अशा प्रकारे एक एक पैसा साठवून मालती आणि चंदू  संसार करू लागले . हौस , मौज पण करायचे पण उधळायचे नाहीत .

गेले दोन तीन  दिवस मालतीला जरा  थकवा वाटू लागला होता . तिला वाटले कि शरीराला अजून सवय नाही एवढ्या कामाची म्हणून असेल कारण  गावी घरातले बघायला तिची आई होती . कधी तरीच मालती एखादी भाजी करायची . आता नाही म्ह्टले तरी घरातले काम आणि शाळेत पण ५ तास उभे राहूनच शिकवायला लागायचे .

पण थकवा येण्याचे काही वेगळेच कारण होते . मालतीला दिवस गेले होते . मालतीला हे कळले होते पण आता चंदू ला सांगायचे कसे हा मोठा प्र्श्न तिच्या पुढे होता . तिला विचार करूनच इतकी लाज वाटत होती . अशा वेळी घरात कोणी बाई असली कि बरे पडते . पण ह्यांचे तसे नव्हते . मालती ने  काहीही न बोलता चालतंय तोपर्यंत चालू द्या असा विचार करून तिने चंदू ला यातील काहीच कल्पना दिली नाही .

रोजच्या रुटीन मध्ये काहीही बदल नसल्यामुळे चंदू च्या ध्यानी मनी  पण नव्हते .

मालती ला हळू हळू उलट्या होऊ लागल्या .. अन्न जाईना . एक दिवस शाळेत तर तिला चक्कर आली . तिने कसे बसे स्वतःला सांभाळले .

आज तीने चंदू ला सांगायचे ठरवले . 

चंदू नेहमी प्रमाणे ऑफिस मधून आला . मालतीने चहा टाकला .

मालती " आज आपण बाहेर नको जाऊया फिरायला "

चंदू " का ग ?"

मालती " मला जरा थकल्या सारखे वाटतेय "

चंदू "का ? ग ? बरी आहेस ना ? " दोन दिवस तू जेवत पण नाहीयेस नीट  काल तर जेवल्यावर उलटी पण झाली होती ना ?"

मालती " हो ते पित्ता मुळे आली असेल असे मला वाटले "

चंदू " असं करू आपण दवाखान्यात जाऊन येऊ "

मालती " नको दवाखान्यात नको . जरा अराम केला कि वाटेल बरे "

चंदू " नको कसे .. वेळच्या वेळी दवाखान्यात गेलेले बरे .. ते काही नाही तू तयार  हो आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ . पित्त त पित्त पण काही औषध देतील .”

मालती " अहो , मला जरा वेगळेच वाटत आहे ."

चंदू " वेगळे काय ?”

मालतीला मरणाची लाज वाटत होती . काय सांगावे , कसे सांगावे ते कळत नव्हते .

चंदू " अग  बोल कि .. काय होतंय नक्की तुला "

मालतीने  तिच्या दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकला ..

चंदू ला वाटले कि हि रडते कि काय पण खरं तर ती लाजत होती ..

चंदू " अग , घाबरू नकोस . काय होतंय .. सांग मला "आणि चंदू ने तिचे दोन्ही हात त्याच्या हाताने खाली ओढले  

मालती " मला खूप लाज वाटतेय . कसे सांगू "

चंदू " लाज काय वाटायची त्यात .. असा कसला आजरा आहे कि सांगायला लाज वाटतेय "

नवरा कितीही हुशार असला किंवा मनकवडा असला तरी त्याला हि गोष्ट कधीच पटकन कळत नाही .

मालती " अहो , तुम्ही बाबा होणार आहात " आणि मालती पटकन वळली आणि पुन्हा तिने तिचा चेहरा झाकला . "

चंदू " काय ? काय बोलतेस काय ?

आणि तिला काय कळायच्या आता त्याने मालतीला उचलून घेतली ..

चंदू " मालू .. मालू .. आज मला तू जगातले सगळ्यात मोठे गिफ्ट दिले आहेस .. बोल बोलता चंदू च्या डोळ्यातून आनंदाश्रू पडू लागले . माझ्या सारख्या अनाथाला आज पोर होणार आहे .. मी कधीच कुणाचा मुलगा नव्हतो , कोणाचा भाऊ नव्हतो पण आता तुझ्या मुळे  मालू फक्त तुझ्या मुळे मी बाबा बनणार आहे "

🎭 Series Post

View all