अर्धांगिनी भाग ६

In this part Ramesh visits Chandus house

अर्धांगिनी भाग ६

क्रमश: भाग ६

जेवणे झाल्यावर चंदू बेड वर झोपला . आणि नेहमी प्रमाणे मालती खाली झोपली .

चंदू " काय ग , बरी आहेस ना ?"

मालती " मला खूप भीती  वाटतेय तो मला अशा हाका  मारूच कसा शकतो . तेही तुम्ही बरोबर असताना .. त्याच्या मनात काहीतरी  चालू आहे .. मी सांगते बघा  तो एवढ्यावर गप्प बसणार नाही . तुम्हाला सांगते " आम्ही मोठे झाल्यावर गावात सुद्धा कधी बोललो नाहीये .पण हा असे दाखवतोय कि तो आणि मी अशा रोज बोलत होतो ."

चंदू उठला तिच्या शेजारी जाऊन बसला .. त्याच्या लक्षात आले कि आता मालतीला आधाराची गरज आहे . ती खूप घाबरली आहे .

चंदू " हो .. मला माहितेय तू काही काळजी करू नकोस . मी उद्याच त्याला चांगल्या भाषेत दरडावून सांगतो म्हणजे परत  तो आपल्या  वाटेत येणार नाही "

मालतीने  चे अंग थंड पडले होते .  थरथर कापत होते . चंदू तिला समजावत होता " अग  आपण कोणाचं वाईट केले नाहीये हे तुला हि माहितेय आणि मला हि माहितेय . लग्नाच्या बोहल्यावर चढून सुद्धा त्याचे लग्न झाले नाही ते त्याला सहन होत नाहीये . तेव्हा वडिलांसमोर तोंड उघडायची हिम्मत नव्हती आणि आता तो दोघांना एकत्र बघितल्यावर  त्रास होतोय  .तरी पण तू काळजी करू नकोस .. "

मालती चे  ज्या परिस्थिती मध्ये चंदू चे लग्न झाले ते काही नॉर्मल नव्हते . एक प्रकारे ती कोणत्याही कारणाने वडिलांकडे तिचे दुखणे घेऊन जाऊ शकत नाही . त्यामुळे आता चंदू शिवाय ती पण एकटीच आहे . आणि दोघे हळू हळू एकमेकांत साथीदार शोधत आहेत तर  हा रमेश मालती शी बोलायचं प्रयत्न करून चंदू च्या मनात मालती विषयी मन कलुषित करायचे बघतोय . मालतीला भीती वाटते कि जर चंदू च्य मनात तिच्या विषयी काही बाही जाऊन बसले तर जो आधार आह तो हि जाईल . स्वतःच्या चारित्र्यावर कारण नसताना शिंतोडे उडाले तर मात्र तिचे जगणे मुश्किल होणार होते . मालतीच्या मनात जी भीती होती त्यात थोडी फार तथ्य होते

तरी पण दुसऱ्या दिवशी  तिने चंदू साठी चहा नाश्ता , डबा दिला .

चंदू " आता अराम कर .. रात्रभर जागीच होतीस "

मालती " हमम .."

चंदू ने जाताना सांगितले " तू काहीही काळजी करू नकोस . आज त्याचा किस्सा च संपवून टाकतो . त्याला जर कडक भाषेत समजावतो "

मालती " हमम..

चंदू ऑफिस निघाला . जात जात तो मनात विचार करू लागला . रमेश नाही म्हटलं तरी त्याचा एके कालच मित्र होताच. त्याचंही कायमचे वैर  होण्या पेक्षा त्याला बसवून आरामात त्याच्याशी  बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व करावा .

चंदू ने त्याचा अटीट्युड बदलला .

चंदू  ऑफिसात मध्ये काम करत असताना अचानक रमेश आला

रमेश " चंदू , सॉरी यार .. काल मी असे वागायला नको होते . अरे तुम्हला दोघांना खुश बघून माझे मन जळू लागले . सॉरी यार माझे चुकलेच .. आता मी  तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही  . फक्त मला एकदा मालतीची माफी मागायचीय .. तिच्या बाबतीत मी जरा जास्तच चुकलो  . "

चंदू " ठीक आहे यार .. चल जास्त  मनावर घेऊ नकोस आणि माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये . मी तिला समजावून सांगेन . "

रमेश " ठीक आहे .. तू म्हणतोस तर तसे तर तसे . पण एकदा चहाला म्हणून बोलावं.. तेव्हा मी समोर समोर माफी मागेंन  म्हणजे  माझ्या जीवाला शांती मिळेल .

चंदू " ठीक आहे .. मी सांगेन तुला ."

रमेश " ठीक आहे "

दुपारी दोघे एकत्र जेवले . रमेश "वाह .. जेवण छान बनवले .. हाताला चव आहे .. "

चंदू आपला रिलेशन खराब नको होयला म्हणून काही बोले ना . तो एक दिवस गेला .

रोज येताना चंदू मालती साठी गजरा  आणायचा आणि आल्यावर दोघे कुणीकडे तरी राऊंड मारून यायचे मग जेवायचे .. त्यांचे रुटीन सेट होत होते .

एक मालतीचा मूड  चांगला आहे हे बघून चंदू ने  मालतीला विचारले

चंदू "ऑफिस मधले सर्व जण वाहिनि ला भेटवा असे म्हणतात , मी त्यांना चहा साठी म्हणून बोलावू का ? तुला काय वाटते ?

मालती " हो चालेल कि .. कधी बोलावणार आहात ?"

चंदू " या शनिवारी बोलावू .. पण नुसता चहा म्हणायचं असत .. आपल्याला काहीतरी अजून खाणे करावे लागेल ."

मालती " हो ..  तुम्हीच सांगा काय बनवू ते "

चंदू " बटाटे वडे जमतील का तुला ?"

मालती " हो जमतील कि ?

चंदू " तुला सोबत म्हणून मालकीण बाईला पण त्या दिवशी बोलावू "

मालती " हो चालेल"

आणि अशा पद्धतीने चंदू ने ठरवले कि शनिवारी त्याच्या दोन चार मित्रांना घरी चहा पाण्याला बोलावेल आणि  सोबत रमेश ला पण बोलावेल . पण रमेश ला बोलावणार आहे हे त्याने मालतीला सांगितले नाही .

बोल बोलता शनिवार आला

चंदू ने बटाटे वड्याचे सामान आणून दिले . द्यायला पेपर डिश आणि चहाला कप आणले . मालतीने  घर आवरले आणि कामाला  लागली . एकच स्टोव्ह होता त्यामुळे जरा लवकरच कामाला  लागली . बटाटयाची भाजी झाल्यावर गोळे करून ठेवले बेसन पीठ भिजवून ठेवले आणि चहा पण  ठेवला .

मग स्वतः पण त्यातल्या त्यात बारी साडी नेसून बसली . चंदू ने आज पण तिला गजरा आणला . तो तिने घातला आणि चंदू पण त या र होऊन पाहुण्याची वाट बघू लागला .

दोन मित्र आधी आले .  मित्रांनी पण येताना त्यांचे नवीन लग्न झाले म्हणून काही काही गिफ्ट आणले .

चंदू ने त्यांना बसायला सांगितले . मालतीला बाहेर बोलावून ओळख करून दिली . मालती दोन खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली आणि हात जोडून नमस्कार केला आणि आत गेली . तिने चंदू ला सांगून मध्ये पडदा बसवून घेतला होता म्हणजे कोणी बेड वर बसले तर डायरेक्ट किचन मधले दिसणार नाही .  मालकीण बाई तिच्या मदतीला आल्याचं होत्या . पाहुणे आले म्हटल्यावर त्यांनी तेल गरम करायला घेतले आणि वडे तळायला  सुरुवात केली .

चंदू आणि त्याचे मित्र ऑफिस मधल्या गप्पा मारत  बसले होते . पुन्हा अजून दोन मित्र आले त्यांना पण चंदू ने पाणी दिले आणि बसायला दिले . पुन्हा मालतीला बाहेर बोलवून तिची ओळख करून दिली . त्याचे मित्र पण नमस्कार वाहिनी असे म्हणायचे .

मालती पुन्हा आत मध्ये गेली . मालतीने पाहुण्यांना द्यायला डिश भरल्या आणि चंदू ला एकेकेला द्यायला सांगितल्या .

तेवढ्यात रमेश आला .

चंदू ने अजून एक डिश भर असे सांगितले . मालतीने अजून एक  डिश भरून बाहेर दिली . चंदू स्वतः आग्रह करून करून वाढत होता . सर्व मित्रांनी आणि रमेश ने बटाटे वड्यावर ताव मारला .जसे सर्वांचे  खाऊन झाले . मालतीने चहात दूध टाकले आणि सर्वांना गरम गरम चहा पण दिला .

रमेश ने पण गिफ्ट आणली होती . पण त्याने मुद्दामून दिली नाही . तो मालती पडद्या बाहेर यायची वाट बघत होता . बाकीचे मित्र जे आधी आले होते ते सगळे निघाले .

चला मग चंदू शेट , अभिनंदन .. .. आणि आजचा बेत पण मस्त होता . आणि निघून गेले .

रमेश मात्र अजून बसला होता . पण चंदू ने आवाज दिल्या शिवाय मालती पडद्या बाहेर यायचीच नाही . चंदू ने मालतीला मुद्दामून आवाज दिला नाही . बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या रमेश  काही निघायचे नाव घेई ना . आवाज वरून मालतीला आत मध्ये अंदाज आला होताच कि रमेश आलाय .. त्यामुळे ती पण बाहेर येत नव्हती .

जसे बाकीचे पाहुणे मंडळी गेली तश्या मालकीण बाई पण म्हणाल्या " मी जाते आता .. हे आले कि मग आपण सगळे एकत्र खाऊ आणि त्या पण खाली निघून गेल्या .

रमेश ने शेवटी डायरेक्ट बाहेरून च मालतीला हाक मारायला सुरुवात केली .

रमेश " मालती .. वडे छान झालेत ग . चव आहे हाताला तुझ्या "

आतून काही रिप्लाय नाही .

रमेश " मनीष .. ( म्हणजे मालतीचा भाऊ) " कुठे असतो ग .. त्याला पण इकडेच बोलावून घ्या आता नोकरीला म्हणजे  बरं पडेल . "

शेवटी चंदू आता मध्ये आला . तू एकदा त्याला भेटतेस का ? त्याला तुझी माफी मागायचीय असे तो म्हणत होता . "

मालती मानेनंच "नको .. त्याला पाठवा आधी इथून "

पण चंदू ला पण आहे विषय आज संपवायचा होता . तू एक मिनिट बाहेर ये म्हणजे एकदाची कटकट संपून जाईल . आणि चंदू ने तिला बाहेर आणलीच

मालती दोन खांदयावर पदर घेऊन बाहेर आली .

रमेश " काय मालती ? आता मला ओळख पण दाखवत नाहीस का ? "

मालती , मालती मुद्दामून रमेश एकेरी नावाने तिला संबोधत होता . मालतीला हे अजिबात  आवडत नव्हते . चंदू ला पण आवडतच नव्हतेच पण तिचा गाव वाला होता आणि त्याचा मित्र होता म्हणून गप्पा बसत होता .

एक दोनदा मालतीने खाली मान घालून  ऐकून घेतले. मग त्याने गिफ्ट आणले ते चंदू च्या हातात दिले . चंदू ला  हातात घेतल्या कळले कि यात काहीतरी कापड आहे . त्याने मुददमून बाहेर काढले त्यात साडी होती .

चंदू जरा भडकालाच " हे काय .. साडी .. अशी साई गिफ्ट आणतात का ?"

रमेश " अरे .. माझी गाव वाली आहे .. म्हणून भारीतली साडी आणलीय .... हा रंग शोभून दिसेल तिला "

चंदू काही बोलायच्या आत मालती अशी भडकली

मालती ने ते गिफ्ट पुन्हा पिशवीत भरले आणि त्याच्या अंगावर फेकून दिले .

मालती " चालायला लाग .. उठ चल इथून ? पुन्हा जर माझ्या दारात आलास तर कुत्र्याला चपलेने मारतात ना तशी मारिन . मला तू कमी समजू नकोस .. अण्णांनी मला तुझ्या सारख्यांशी  कसे वागायचे ते चांगलंच शिकवलंय . आणि एक एकेरी हाक मारायची हिम्मत कशी झाली तुझी ? इथून पुढे माझे नाव जरी तुझ्या तोंडात घेतलेस ना तुझी काही खैर नाही .

तुला काय वाटले ? तुझ्या बापाने लग्न मोडले म्हणजे आम्ही सगळे हरून जाऊ . अरे देवाने च मला वाचवले तुझ्या सारख्या भिकारड्या माणसाची बायको नाही झाले त्या बद्दल मी देवाची कायम ऋणी राहीन . खबरदार .. माझ्या नावाने ह्यांना ऑफिस मध्ये सुद्धा त्रास झाला ना तर सरपंचांना पत्र लिहून तुझी नाटकं जर सांगितली ना तर  गावात तुझी आणि तुझ्या आई वडिलांची गाढवा वरून धिंड नाय काढली ना तर बघ .. सांगून ठेवते .. चल निघ हो बाहेर .. "

त्याच्या समोरच चंदू कडे बघून

" पुन्हा जर हा माणूस घरात आला तर गाठ माझ्याशी आहे . "

मालतीच्या अंगात रण चंडिका घुसली होती . ती एवढी भडकली होती कि त्याला मारायचे च ठेवले होते तिने .

जसा रमेश बाहेर निघून गेला तशी रागारागात बेड वर जाऊन बसली .

चंदू ने तिला आतून पाणी दिले प्यायला . रागाने तिचे डोळे लालेलाल झाले होते .

चंदू " शांत .. हो .. किती चिडलीस ?"

मालती " चिडू नाहीतर काय करू ? त्याचा फालतू पणा उगाच सहन करताय तुम्ही पण तो तुमच्या समोर मला नावाने हाक मारतोय आणि तुम्ही पण गप्प बसलात मला अजिबात आवडले नाही . "

चंदू ने बोल बोलता दार लावले आणि मालती ला त्याच्या मिठीत घेतले आणि तिला म्हणाला

चंदू " आज मला तुझा अभिमान वाटतोय ."

मालती पण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली .  चंदू तिची पाठ थोपटून तिला शांत करत होता .

चंदू " अग बांडगुळा सारखा चिकटला होता मला पण मित्र असल्या मुले तोडता येत नव्हते . पण साडी आणल्यावर मी पण चिडलोच होतो .पण मी काही बोलायच्या आत तूच बोललीस ते बर झाले. सारखा माझी गाव वाली म्हणत होता ."

🎭 Series Post

View all