अर्धांगिनी भाग ५
क्रमश: भाग ४
आज चंदू मोठ्या ऐटीत ऑफिस ला निघाला . कारण चंदू ला आज पहिल्यांदा कोणीतरी डबा करून दिला होता . चंदू ची आज घरी कोणीतरी वाट बघणारे होते. मालतीच्या च्या येण्याने चंदू च्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले होते . प्रत्येक माणसाला आपलं असे कोणीतरी असावं असच वाटत असते. चंदू तर बिचारा अनाथ होता . लहानपणा पासून तो या प्रेमाला मुकलेला . आत्ता पर्यंत अत्यंत भकास आयुष्य तो जगाला होता . मालतीच्या येण्याने त्याच्या भकास आयुष्याला एक नवीन पालवी फुटत होती .मनातून त्याला काय करू आणि काय करू नको असे झाले होते . आता त्याच्या आयुष्याचे एकच आणि एकच ध्येय होते , जे जे काही जमेल तेवढे सुख मालती च्या ओंजळीत टाकायचे होते .
मालती हळू हळू तिच्या आयुष्यात झालेली ट्रॅजेडी विसरत चालली होती . जी भीती तिला पहिल्या दिवशी वाटत होती ती भीती आता तिला वाटत नव्हती . आपल्या आयुष्याचं गणित बहुदा चुकलं असे जे वाटत होते ते आता हळू हळू बरोबर होत होते. असलेल्या छोट्या रूम ला तिने एक छोटे खानी छान घर बनवले होते . दारात तुळस बहरायला लागली होती .
चंदू ऑफिस मध्ये गेला तर रमेश तिकडे आधीच आला होता . चंदू आणि रमेश आधी पासूनचे सख्खे मित्र होते . आणि आज त्यांच्या दोघांच्या आयुष्यात असे काही घडले कि दोघांना एक मेकांकडे बघायला ऑकवर्ड वाटू लागले होते . आज चंदू ने मोठ्या ऐटीत डबा टेबलावर ठेवला . बाकीच्या मित्रांना तो सांगू लागला अरे मित्रांनो माझे लग्न झाले . मित्रांना आपले लग्न झाले हे सांगताना त्याचा उर स्वाभिमानाने भरून आला होता .
तोच रमेश खजील होत होता .
शेवटी लंच टाईम मध्ये रमेश चंदू ला भेटायला आला
रमेश " काय चंदू मग झाले का सेट तुम्ही ?"
चंदू त्याच्याशी बोलायला तयार नव्हता .
रमेश " अरे , लग्न तर तुझे आत्ता झाले, आपली मैत्री आधीपासून आहे . जे झाले त्यात माझी काही चूक नाहीये . माझ्या वडिलांनीच ते लग्न ठरवले होते आणि माझ्या वडिलांनीच ते लग्न मोडले . मला त्यामध्ये बोलायचं काहीच अधिकार नव्हता .एक मित्र म्हणून तू तरी मला समजून घे "
चंदू तरी पण काहीच बोलेना
रमेश " अरे तुला काय कळणार एक वडिलांची काय दहशत असते घरात ते . त्यांचे सर्व ऐकावेच लागते . अख्या गावा समोर त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिम्मत माझ्यात खरोखरच नाहीये . "
रमेश " पण चंदू तू मात्र आलेल्या संधी चा चांगला उपयोग करून घेतलास . तुला एक क्षणभर सुद्धा असे वाटले नाही कि आपल्या मित्राची बायको हि आपली वाहिनी असते . तू तिच्याशी लग्न करायला तयार कसा झालास "?
चंदू " रमेश , तू आणि मी आता न बोललेलेच बरे . जे झाले ते झाले . मी काही मुद्दामून केलेलं नाही . मालतीने तिचे लग्न मोडले म्हणून विहिरीत उडी मारली हे तुला आठवत नाहीये का ?
मालतीचे वडील तुझ्या वडिलांसमोर हात पाय जोडत होते हे आठवत नाहीये का ? आणि ते कुठे तुम्हला आम्ही दागिने देत नाहीये असे म्हणत होते . ते देणारच होते . लग्न मोडायची भाषा काढून तुझे वडील त्यांच्यावर दबाव आणत होते. सगळ्या समोर नाही पण वडिलांना एक बाजूला घेऊन तू सांगू शकला असतास . पण तू हे केले नाहीस . शेवटी तू लग्न करणार होतास . तुझे स्वतःचे असे काहीतरी मत असायला पाहिजे होते . काहीतरी तोडगा काढण्या च्या दृष्टीने तरी बोलायचे होते .
रमेश " चंदू , हा चांगुल पणाचा भाव मला नको दाखवू . मला तर वाटतंय मुलीला बघितल्यावरच तुझे डोळे फिरले होते . सारखा मला म्हणत होतास " छान आहे रे मुलगी "
चंदू " शट अप रमेश "
रमेश " सत्य बोलले कि माणसाला वाईटच वाटते . तू हे चांगले नाही केलेस . "
चंदू " मी बरोबर केल . एका मुलीच्या बापाला मनस्तापाला वाचवलंय . एका मुलीचा स्त्री म्हणून सन्मान केलाय . आणि तू जा रे .. आता झाले गेले विसरून जा .. कोणीतरी बड्या बापाची मुलगी बघा आणि करा .. माझ्या संसारात आता लक्ष घालू नकोस "
रमेश तरतरा तिथून निघून गेला .
रोज उठून या रमेश चे तोंड बघायला लागणार या विचाराने चंदू नाराज झाला . जेवण झाल्या झाल्या चंदू बॉस ला भेटायला गेला . बॉस कडून काही डिपार्टमेंट चेंज मिळते का विचारून आला . म्हणजे at लिस्ट समोर समोर एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करण्या पेक्षा डिपार्टमेंट बदलले तर सम्पर्क तरी कमी होईल .
रमेश जेवढी होईल तेवढी चंदू ची बदनामी करण्याचा प्रयन्त करत होता . तो त्याच्या हि शोबाने ऑफिस मधल्या लोकांना सांगत सुटला .
चंदू ने सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले .
मालती संध्याकाळी घरातले सगळे काम आवरून जेवण तयार करून . छान साडी घालून चंदू ची वाट बघत बसली .
चंदू ला पण आज घरी जायची घाई होती . घरी आपली कोणी वाट बघत असेल तर घरी जाण्यात पण एक वेगळाच आनंद असतो . प्रत्येक पुरुषाला संध्याकाळ झाली कि कधी एकदा घरी जातोय असे होते कारण त्याला माहितेय त्याची बायको आणि मुलं घरी वाट बघत आहेत . आणि त्यांच्या जवाबदारीने पुरुष मन लावून काम पण करतात . म्हणून तर पूर्वी पासून म्हणतात पोरग वाया जायच्या आधी त्याचे लग्न लावून द्या . जवाबदाऱ्या पडल्या कि वाया जात नाहीत .
साडे पाच वाजता चंदू बरोबर ऑफिस मधून निघाला .. तो रोज चालतच जायचा यायचा . जाता जाता त्याने मालती साठी एक गजरा घेतला . मालतीला गजरा घालायला आवडतो हे त्याला कळले होते . घरी आला . मालती छान आवरूनच बसली होती . चंदू आल्यावर त्याला पाणी प्यायला दिले . त्याची बॅग घेतली आणि जागेवर ठेवली . एक स्वच्छ टॉवेल काढून ठेवला . आणि तो फ्रेश होई पर्यंत चहा टाकला . चंदू फ्रेश झाला आणि दोघांनी बसून मस्त चहा प्यायला .
चंदू " म कसा गेला आजचा दिवस ? कंटाळीस का एकटी घरी ?"
मालती " नाही , मी कामचं करत होते .. .४ वाजल्या नंतर तुमची वाट बघत बसले ."
चंदू " झोपायचे मग जरा वेळ "
मालती " डबा नाही आणला का ?"
तेव्हा चंदू च्या लक्षात आले कि तो डबा ऑफिस मधेच विसरलाय .
चंदू " अरे ... राहिला ऑफिस मध्ये .त्याच काय आहे आज पर्यंत कधी डबा नेलाच नव्हता ना .. अजून त्याची सवय नाही झाली .. तू एक काम कर .. पण बाहेर एक राऊंड मारून येऊ येता येता डबा घेऊन येउ ."
ऑफिस तसे जवळच होते .. जाऊन येऊन एक तास लागला असता . पण आता घरी तरी बसून काय करणार ?
मालती " मी तयार आहे .. तुम्ही थोडा आराम करा मग जाऊ "
चंदू " नको निघू लगेच .. नाहीतर तो वॉचमन निघून गेला तर डबा आता मिळायचा नाही "
आणि दोघे घाई घाईत निघाले . जाता जाता चंदू ने आणलेला गजरा मालतीला दिला . गजरा दिसला कि मालती एकदम लहान मुली सारखी खुश होण्याची . तीने तो पटकन केसात घातला आणि निघाली
दोघे ऑफिस च्या दिशेने चालत होते .. ऑफिस च्या जवळ च्या टपरी वर रमेश चहा आणि सिगारेट ओढत बसला होता . त्याने त्या दोघांना पहिले .
चंदू ऑफिस मध्ये गेला आणि डबा खाली घेऊन आला . मालतीला सांगू लागला . या बिल्डिंग च्या दुसऱ्या फ्लोअर वर माझी जागा आहे . आणि दोघे परत घरी निघाले .
तर रमेश मुद्दामून " मालती , मालती .. अ शी हाक मारू लागला "
चंदू असताना तो मुद्दामून मालती ला हाक मारू लागला . जसे कि चंदू तर आता आला , मी मालतीचा लहान पणा पासूनच मित्र आहे , गाववाला आहे .
मालती ला कळे ना इकडे आपल्याला कोण नावेने हाक मारतय म्हणून दोघांनी मागे वळून पहिले तर रमेश .
रमेश ला बघितल्यावर मालती घाबरली आणि तिने पटकन चंदू चा हात पकडला . चंदू ला तिच्या स्पर्शातच लगेच कळले कि हि घाबरली आहे तिचे हात थरथर कापत होते .
मालती " चला आपण घरी जाऊ .."आणि बोलता बोलता ती चंदू च्या मागे गेली .
रमेश निर्लज्जा सारखा" मालती , कसे वाटतंय शहरात ?रूळलीस का इकडे ? तुला काही गरज पडली तर मला केव्हाही सांग . मी इकडेच राहतो . तसा मी तुझा गाव वाला आहे . हो किनई चंदू "
चंदू " हो नक्की . तू नुसता गाव वाला नाहीस तर मालतीला तिच्या भावा सारखा आहेस .. भाऊ म्हणून नक्कीच तिला काही कमी पडले तर येईल " आणि मालतीचा हात पकडून भराभरा चालायला लागला . "
मालती " पूर्ण रस्त्यावर रडत रडतच घरी आली "
चंदू " अग तू कशाला रडतेस ? तू त्याला अजिबात घाबरू नकोस . त्याला झाला सगळं प्रकार सहन होत नाहीये म्हणून तो त्रास देतोय "
मालती काहीच बोलत नव्हती .. झाल्या प्रकारचा तिने धसका घेतला . घरात आल्यावर तीच कशात लक्ष लागे ना . कसबसं जेवण वाढले आणि जेवण उरकली .
ती चंदू शी पण काहीच बोलत नव्हती. तिला भीती वाटू लागली हा उद्या नक्कीच घरापर्यंत येईल . माझ्या बद्दल काही बाही चंदू ला सांगेल . लहान पणी कधी काळी ते एकत्र खेळले पण होते . पण रमेश त्याच गोष्टी चढवून सांगेल मग चंदू ला काय वाटेल ..या अशा अनेक विचारांनी मालती घाबरून गेली .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा