Oct 30, 2020
स्पर्धा

अर्धांगिनी भाग ४

Read Later
अर्धांगिनी भाग ४

 

अर्धांगिनी भाग ४

 

क्रमश : भाग ३

 

दोघांनी आपले मन मोकळे केले . थोडा वेळ शांत बसून झाल्यावर चंदू बाहेर निघाला

 

चंदू " तुला गोड  शिरा करता येतो का ?"

 

मालती " हो.. "

 

चंदू " मी आलोच जरा बाहेरून "

 

 चंदू बाजारात गेला . मालती आपली घरातील  कामे करत बसली . थोड्या वेळाने चंदू  दोन तीन पिशव्या  घेऊन आला . येताना त्याने भाजी , वाणी सामान , आणि एक साडी आणि एक गजरा घेऊन आला . मोगऱ्याच्या गजऱ्या  चा वास त्याने घरात  येताच आला होता . साडीची आणि गजर्याची पिशवी बाजूला ठेऊन त्याने बाकीचे सामान मालतीला दिले .

 चंदू " त्यात शिऱ्या चे  सामान आहे . तू आज  गोड शिरा बनव .

 

मालतीने मन हलवून होकार दिला . तसेही तिने वरण भात केला होताच . आणि तिने शिरा बनवायला घेतला .

 

चंदू तिथेच होता .नाही म्हटले तरी लक्ष जातेच .ती कसे बनवतेय  ते त्याला दिसत होते .  मालतीचा जसा शिरा

बनवून झाला तसा चंदू ने तिला बोलावले बसायला . थोडा वेळ बस .. मग आपण जेवू आता काय लगेच भूक नाही .

 

मालती न हात धुतले आणि बेड च्या जवळ खाली बसली . तेवढ्यात चंदू ने साडीची पिशवी काढली आणि तिला दिली .

 

चंदू  " हि घे  .. बघ तुला आवडते का ?"

 

मालती " हे काय ?

 

चंदू "बघ तर .. आत मध्ये आहे एक वस्तू "

 

मालती ने पिशवी ओपन केली बघते तर आत मध्ये एक सुंदर साडी होती "

 

मालती  "  अरे वाह .. साडी .. छान आहे " आणि बोल बोलता तिने नवीन साडी देवा समोर ठेवली

 

चंदू " ती साडी तू आता नेस .. आपण बाहेर जाऊन येऊ "

 

मालती " आता? जेवण कधी जेवणार ?"

 

चंदू " अग जेवू ग.. बाहेरून जाऊन आल्यावर जेवू "

 

मालती काय बोलणार .. " ठीक आहे "

 

चंदू बाहेर गेला. मालतीने तिचे साधारण मॅच होणारे ब्लाउज घालून ती साडी नेसली . .साडी च्या पिशवीत एक गजरा पण तिला दिसला . तिने तोही घातला . तोपर्यंत चंदू आला . मालती त्या साडीत खूप सुंदर दिसत होती अजून हातावरची मेहंदी होतीच , नवीन लग्नाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यात तिचे छान केस आणि त्यात तिने घातलेला गजरा . एकदम मनमोहक, सिम्पल , ब्युटीफुल दिसत होती . त्याकाळी बायकांना एक वेगळेच तेज असल्याचे . ना लाली ना लिपस्टिक साधी पावडर सुद्धा लावायच्या नाहीत .क्रीम वगैरे तर सोडाच . तशीच मालती पण आज नॅचरली सुंदर दिसत होती .

चंदू तयारच होता . दोघेही घराला कुलूप लावून  बाहेर पडले . चंदू पुढे आणि मालती त्याच्या मागे चालायची . आजू बाजू च्या लोकांला लगेच कळत होते कि नवीन जोडपे आहे ते .

 

चंदू ने मालतीला एका जवळच्या देवळात आणले . मालतीने दर्शनाला जाताना पूजेचे ताट घेतले . दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले . मनापासून देवाला नमस्कार केला आणि बाहेर येऊन बसले .

 

चंदू " हे इकडे गेले कि बाजारपेठ येते . त्या साइडला गेले कि आपल्या घराचा रास्ता .. आणि इकडून लेफ्ट घेतला कि मग माझे ऑफिस येते . "

 

मालती  फक्त मान हलवून उत्तर द्यायची .

 

थोडा वेळ बसले आणि मग दोघेही बाहेर निघाले . देवळाच्या बाहेर बरीच दुकाने होती . चंदू ने मालतीला विचारले " तुला काही घ्यायचे य का ? इकडे तुमचे बायकांचे टिकल्या, पिना बिना सगळे मिळेल तुला . "

 

मालतीने मान नकारार्थी हलऊन उत्तर दिले .

 

दोघे चालत चालत पुन्हा घरी आले . मालतीने बघितले कि खाली राहणारी मालकीण बाई आणि तिचा नवरा  त्यांच्या खोलीत वरती आलेले होते . दोघे जसे मंदिरातून आले तसे मालकीण बाईने दारात तांदुळाने भरलेला कलश  भरून ठेवला. आणि आरतीचे ताट पुढे आणले . दोघांना तिने औक्षण केले आणि मग तिला कलश ओलांडून आत यायला सांगितले .

 

मालतीला  हे करताना मनातून आनंद होत होता . लग्न झाल्यानंतर नवीन नवरी ला मापटे  ओलांडून घरात घेतात .. चंदू ने मालकीण बाईला आणि तिच्या नवऱ्याला सांगून हा विधी त्यांच्या कडून करून घेतला .

दोघांनी  नवीन नवरा नवरी सारखे  जोडीने गृहप्रवेश केला. घरातील मोठ्यांना म्हणून मालक मालकिणीला जोडीने वाकून नमस्कार केला . मग दोघांनी घरातील देवांना नमस्कार केला.

चंदू ने मालक आणि मालकिणी ला बसायला सांगितले .

 

मालतीने शिऱ्या च्या  डिश भरल्या .आणि दोघांना दिल्या . चंदू ला पण दिली ..

 

मालकीण बाई "काय नाव आहे ग तुझे ?

 

मालती " मालती "

 

मालकीण बाई " घरात कंटाळा आला तर खाली येत जा गप्पा मारायला . "

 

मालतीने  मान  हलवून उत्तर दिले .

 

चंदू ने दोघांचे शतश: आभार मानले . मग थोड्याच वेळात दोघे  त्यांच्या घरी निघून गेले .

 

पाहुणे गेल्यावर चंदू आणि मालती जेवायला बसले .

 

आज मालतीला खूप आनंद झाला होता . ती दाखवत नव्हती पण चेहऱ्यावर  एक चमक दिसत होती .आनंदाचे क्षण हे असेच वेचायचे असतात . दिवस येतात आणि जातात पण त्या दिवसाचे सोने करणे हे आपल्याच हातात असते  .

 

चंदू " अजून दोन दिवस माझी सुट्टी आहे . उद्या सकाळी घरात काय सामान हवे ते आपण आणायला जाऊ. कारण एकदा ऑफिस सुरु झाले कि मग  जाता  येणार नाही . तू घरात बघून तुला काय काय आणायचं त्याची एक यादी बनवून ठेव "

 

मालतीने  " हो .. पुन्हा मान हलवून उत्तर दिले "

 

अजूनही मालती चंदू शी  मोकळी बोलत नव्हती

 

तिचे सुद्धा बरोबर होते . चंदू चा नक्की स्वभाव कसा आहे ? त्याला काय आवडते ? त्याला काय आवडत नाही ? यांचा काहीच अंदाज नव्हता . पूर्वीच्या स्त्रियां साठी काळच कठीण होता . जास्त बोलली तर बडबडी , कमी बोलली तर अबोल . मोठयाने हसायचे नाही मुख्य म्हणजे पती म्हणजे परमेश्वर तो सांगेल ती पूर्व दिशा . त्याच्या शब्दा  बाहेर जायचे  नाही.

 

मालतीला अजून अंदाज येत नव्हता नक्की चंदू कसा आहे . त्याचा स्वभाव मिश्किल आहे कि एकदम कडक आहे . त्यामुळे सध्या तरी ती जास्त ना बोलता ती मानेनंच उत्तर देत होती .

जेवण झाल्यावर चंदू मुद्दामून विषय काढून बोलू लागला .

 

चंदू " मग कसे वाटतंय इकडे "

 

मालती "  चांगलं आहे "

 

चंदू " गावा  पेक्षा जरा लोकांची जास्त वर्दळ असते . कसा वेळ जाईल ते तुला कळणार पण नाही "

 

मालती " हमम.. "

 

चंदू " थोडे दिवस जाऊ दे मग आपण तुला जर नोकरी करायची असेल तर आपण त्या साठी प्रयत्न करू "

 

मालती पटकन  "  हो चालेल .. "

 

चंदू च्या लक्षात आले कि हिला इकडे पण नोकरी करायची आहे ते .

 

चंदू " तुला शहरात नोकरीला जायला जमेल का पण ?"

 

मालती " मी प्रयत्न करेन"

 

चंदू " ठीक आहे . थोडे  दिवस इकडे रूळलीस कि मग आपण तुझ्या साठी शाळेत नोकरी बघू .म्हणजे तू नोकरी करायची कि नाही हा पूर्णतः तुझा निर्णय असेल .नसेल करायचा तर नाही केलास तरी चालेल .

 

मालती " अण्णांनी मला डी एड केले ते घरी बसायला का ? मी नक्कीच नोकरी करेन  "

 

ह्या वेळेला मालतीचा आवाज ठणठणीत बाहेर पडला .

 

चंदू " तुझा भाऊ कोणत्या शहरात आहे शिकायला ?"

 

मालती " तो  इकडे इकडे असतो "

 

चंदू " अरे वाह .. मग आपण एखाद्या वारी त्याला भेटायला जाऊ शकतो .. इकडून तसे फार लांब नाही .. बस ने २ तासात पोहचू शकतो "

 

मालती " हो का .. मग आपण नक्की जाऊ "

 

चंदू " अण्णांची अजून सर्विस किती राहिलीय "

 

मालती " अजून ८ एक वर्षे तरी असतील .. "

 

चंदू " बाकी तुमचे घर खूप छान आहे .. आजू बाजूला बरीच झाडे आहेत .. "

 

मालती " तुम्ही तरी खूप काही बघितलेच नाही . आमच्या बागेत ला चिकू  आणि पपई खूप गोड आहे .

 

चंदू ने हळू हळू मालतीला बोलके केले . गावातली लोक , अण्णा , शाळा , बाग  अश्या अनेक विषयावर त्या दिवशी मालती बोलली . आणि मग बोल बोलता त्यांच्यातला ऑकवर्ड नेस कमी होऊ लागला .

दुसऱ्या दिवशी मालतीने संसारातील लागणाऱ्या छोट्या मोठ्या  वस्तू आणल्या . हळू हळू रिकामे घर सामानाने भरू लागले. देवांसाठी देव्हारा आला . कप सेट आला . सामानासाठी डबे आणले . खोलीला घरपण येऊ लागले . घरा  बाहेर एक छोटी तुळस आली .

 

दुसऱ्या दिवशी सकाळी चंदू ला ऑफिस ला जायचे होते . चंदू ला मालतीने डबा  करून दिला .

 

चंदू " तसे काही घाबरायचे कारण नाही . कारण वरती कोण येत नाही . खाली मालकीण बाई पण आहेच . मी जाताना सांगून ठेवतो , तू ला काही वाटले तर तू त्यांना हाक मार "

 

मालती  हो .. चालेल .. तुम्ही संध्याकाळी लवकर या .. रात्र नका होऊन देऊ "

 

चंदू " हो .. तरी पण मला यायला ६ वाजतील "

मालती " ठीक आहे "

चंदू चे लग्न झालेय हे अजून ऑफिस मध्ये कोणालाच माहित नव्हते .