अर्धांगिनी भाग १

This is the story of Malti

अर्धांगिनी

मालती  एका शिक्षकाची मुलगी.  तिच्या वडिलांनी एकाच गावात  20 वर्षे शिक्षकांची नोकरी केली होती . लोक त्यांना आदराने " अण्णा " म्हणत असत . अण्णांना दोन मुले . एक मुलगा आणि एक मुलगी . मुलग्याला शिकायला त्यांनी नुकतेच शहरात पाठवले होते आणि त्यांच्या पगारात काट कसर करत त्यांनी दोन्ही मुलांना शिकवले . दोघेही मुले अगदी नक्षत्र होते . अभ्यासात हुशार , दिसायला  पण सुरेख . आता  मालती चे डीएड केले आणि अण्णांच्याच शाळेत ती नोकरी करत होती .

मालती दिसायला सुरेख, स्वभावाने सरस,  दोन जाड्या वेण्या घालायची . नाकी डोळी  नीटस होती .

अण्णांनी गावातल्या गावातच मुलीचे लग्न ठरवले होते . त्यांच्याच गावातला पण शहरात नोकरीला असणाऱ्या  मुलाबरोबर लग्न  ठरवले होते . अण्णांची वेगळीच गडबड चालू होती . मालतीचे लग्न लावून द्यायचे होते अख्या गावाला जेवण घालायचे आणि मुलीला सर्व दागिने द्यायचे या शिवाय मुलाला चेन आणि अंगठी द्यायची होती . मुलग्याला चांगली नोकरी असली कि मुलाचे भाव वाढतात .

मालती ला कोणी विचारलेच नव्हते कि मुलगा तुला पसंत  आहे का ? मालती ने लहान पणी त्याला बघितले  होते  . नंतर तो मुलगा म्हणजे रमेश आधी शिक्षणाला नंतर नोकरीला बाहेर गेला .

 मालती ला जसे अण्णांनी विचारले नाही तसेच रमेश च्या वडिलांनी पण रमेश ला विचारले नाही कि हि मुलगी तुला पसंत आहे का  . तरीही लग्न मात्र ठरले होते आणि दोघांनीही मान्य केले होते .

अण्णा आपल्या परीने जे होईल ते करत होते . पण हा लग्नचा खर्च म्हणजे खूपच डोईजड होणार होता . अण्णांनी त्यांच्या  पी एफ मधून काढला   , गावातल्या सोनाराला थोडा ऍडव्हान्स दिला आणि दागिन्यांची ऑर्डर दिली .

रमेश सध्या शहरात एका मित्रा  बरोबर रहात होता .  त्याच्या मित्राचे नाव चंद्र शेखर होते . रमेश आणि चंदू ची चांगलीच मैत्री झाली होती . लग्ना  नंतर चंदू हि खोली  सोडून दुसरीकडे शिफ्ट होणार होता. रमेश आणि चंदूने मिळून लग्नाची  खरेदी केली .. एकंदरीत रमेश या लग्नासाठी खुश होता . एक काळ असा होता कि लग्नाच्या बाबतीतले सगळे निर्णय हे आई वडीलच घ्यायचे तोच  हा  काळ होता .

बोल बोलता लग्न दोन दिवसांवर आले . अण्णांनी दारात मांडव घातला . लग्न अंगणातच लावून देणार होते . अण्णांचा वाडा  तसा  मोठा होता .आजू बाजूला मोठा परिसर . त्यात आंबा , चिकू , पेरू , पपई ची झाडे होती . तिकडेच एक मस्त विहीर होती . त्याच विहिरीचे पाणी घरात वापरत असत.

एका बाजूला जेवण करायला आचाऱ्याला जागा दिली . त्याला थोडे पैसे दिले . मालती पण खुश होती मालतीला कधीच इतक्या साड्या  घेतल्या नव्हत्या . अण्णांनी तिला बनारसी  शालू घेतला होता .

रमेश चंदू ला पण गावाला घेऊन आला आणि चंदू पण हक्काने मित्राच्या लग्नासाठी आला .

आदल्या दिवशी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा बेत होता . आज रात्री त्यांच्या साखरपुडा होता . साखरपुडा झाल्यावर सर्वांना जेवण होते म्हणून आचाऱ्याने चूल पेटवली त्याचा एक मस्त वास येत होता . मालतीच्या भावाची , अण्णांची एक वेगळीच गडबड चालली होती.

मालतीच्या आई ला मुलगी सासरी जाणार त्याचे दुःख होते पण लग्न गावातल्या गावात आहे म्हणून खुश होती . घरात  पाहुण्याची वर्दळ होती .

अण्णा मात्र जरा टेन्शन मध्ये होते . सगळ्यांना वाटले कि घरात लग्न  असले कि थोडे फार टेन्शन असतेच . तरी त्यांचा मुलगा त्यांना सांगत असे .. "अण्णा जरा सावकश. थोडे आरामात करा ."

संध्याकाळचे ५ वाजले . बाहेर लाऊड स्पीकर वर गाणी लागली . अख्या गावात मालती आणि रमेश च्या लग्नाची चर्चा सुरु होती . ज्याला त्याला लग्नाला जायची गडबड होती . मालतीची एक मैत्रीण तिने तिच्या हातावर छान  मेहंदी काढली होती . मालती ला हिरवा चुडा भरला होता . हळू हळू मालतीला नवरीचे रूप येत होते .

आज साखरपुडा होता . ठरल्या प्रमाणे आज मुलाला चेन आणि अंगठी अण्णांनी द्यायची होती आणि मुलीच्या गळ्यात सोन्याचा हार असे ठरले होते .

थोड्याच वेळात मुलाकडचे लोक आले . त्यांना सर्वांना आरतीने ओवाळून घरात घेतले . त्यांचे पाय धुवून त्यांना बसवले . नवरा आणि व्याही मंडळींसाठी  साठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या . आणि बाकीचे लोक खाली सतरंज्या टाकल्या होत्या तिकडे बसले .

मालतीला तिच्या मैत्रिणींनी छान तयार केले . त्यांच्याच बागेतील अबोलीच्या फुलांचा  गजरा तिने घातला होता .

येता जाता  कोणीतरी तिची मैत्रीण रमेश ला बाहेरून बघून यायचे आणि मालतीला चिडवायचे " रमेश शहरात जाऊन एकदम टीप टॉप झालाय . एकदम भारी दिसतोय "

"मालती नशीब काढलेस ग बाई " आणि सगळ्या हसायच्या . मालती पण आरशात बघून लाजत होती .

मालतीची आई " ए पोरींनो एकेरी नाव घेऊ नका आता जावई बापूंचे . कोणी ऐकले तर ?"

मालतीची मैत्रीण " ए ऐका , उद्या आपण रमेश चे बूट लपवायचे काय ? रमेश बरोबर कोणीतरी त्याचा मित्र पण आलाय .. अग तो पण दिसायला छान आहे "

मालतीची आई " ए पोरींनो ,उगाच वात्रट पणा करू नका .. काही बूट बिट लपवायचे नाहीत .. चला बाहेर जावा .. चिवडा लाडू खाऊन घ्या . मी मालती ला दागिने घालून घेते . कोणी तरी एकीने थांबा तिच्या जवळ . कारण  मला भरपूर कामे आहेत "

तशा सगळ्या जणी बाहेर निघाल्या आणि मालतीची एक मैत्रीण  थांबली तिच्या जवळ तीला मदत करायला .

इतक्यात भटजी आले . त्यांनी साखरपुड्याची तयारी केली . अण्णा त्यांच्या जवळच बसले होते . एक एक वस्तू ते मागत आणि अण्णा त्यांना ती देत असत .

वर आणि वधु ला बोलवा असा भटजीं चा सांगावा आला आणि रमेश आणि मालती ला एकत्र पाटावर बसवले आणि भटजी एक एक  विधी करत होते .

शेवटी मुलाला आणि मुलीला एकमेकांना अंगठी घालायला सांगितली .

अण्णांनी त्यांच्या  खिशातून एक अंगठी काढली आणि मालती ला दिली . मुलाकडच्यांनी पण एक अंगठी काढली आणि रमेश कडे दिली . दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि भटजींनी बोलले  साखरपुडा संपन्न झाला . आई वडिलांचा आशीर्वाद घ्या . दोघांनी दोघांच्या आई वडिलांना जोडीने वाकून नमस्कार केला .

रमेश च्या वडिलांनी मुलीला आशीर्वाद देताना तिच्या गळ्यात सोन्याचा हार आहे हे पडताळून पहिले .

अण्णांनी सांगतले कि मुलाला चेन उद्या घालतो . त्या सोनाराने अजून तयार केली नाही . आज रात्री तो चेन मला देणार आहे .

रमेश च्या वडिलांना  जरा रागच आला होता . ठरल्या प्रमाणे तुम्ही करायला पाहिजे होते असे ते म्हणालेच.

अण्णांनी हि वेळ कशी बशी मारून नेली .

तेवढ्यात जेवणाच्या पंगती बसल्या . नवरदेव आणि व्याही याची जेवणाची वेगळी जागा करून त्यांना जेवण वाढले . जेवण साधेच होते पण चविष्ट होते . सर्वजण भरपेट जेवले . रमेश आणि चंदू मात्र कायम बरोबर होते . चंदू कोणाशी बोलत नव्हता पण निरीक्षण मात्र चांगलेच चालू होते . लग्न छान एन्जॉय करत होता .

सगळ्याची जेवणे झाले तसा मंडप हळू हळू रिकामा होत गेला .

मग घरातले लोक जेवायला बसले . मालती मात्र घरातच जेवली .    मुलाकडचे पण घरी गेले . आता उद्या सकाळी ११ वाजता चा लग्नाचा मुहूर्त होता . सकाळी पाच वाजल्या पासून घरात गडबड असणार होती . त्यामुळे अण्णांनी सर्वांना लवकर झोपायला सांगितले .

सकाळी उठणे , उष्टी हळद आणि मग लग्न हे सगळे सकाळी ११ वाजायच्या आत होणार होते . मुलीकडचे पाहुणे बाहेर अंगणात मांडवात झोपले . सकाळी ४ वाजल्यापासून चूल पेटवली होती . चहा , नाश्ता , गरम पाणी एक मागून एक चालूच होते .

बायका एक एक प्रोग्रॅम उरकत होते . मालतीला आधी उठण्याची अंघोळ  घातली . मग नवऱ्याची उष्टी हळद आली  . मालतीला रमेश च्या नावाची हळद पण लागली . आता तिला लग्ना साठी तयार करत होते . साधारण १० वाजे पर्यंत मुलाकडचे मंडपात आले . पुन्हा काल  सारखे त्यांना ओवाळून आणि पाय धुवून आत घेतले .

भटजी त्यांचे काम करत होते . अण्णा मात्र सोनाराकडे जाऊन बसले होते ते अजून आले नव्हते .

रमेश  चे वडील मालतीच्या भावाला सारखे विचारत होते "अण्णा कुठे आहेत ? "

तो बिचारा सांगे " हो येतात "

इकडे मालती बनारसी शालू घालून तयार . आता लग्न घटिका एकदम जवळ आली होती .

तेवढ्यात अण्णा आले .अण्णांनी तिला सोन्याचे कानातले  घालायला दिले .

आणि रमेश च्या वडिलांना बोलावले आणि सांगितले

अण्णा " मी मुलीला कानातले , गळ्यातले घालत आहे आणि हि चेन तुमच्या मुलासाठी . आता राहिल्या मुलीच्या पाटल्या त्या मात्र मला जमल्या नाहीत .त्या मी तिला दिवाळ सणाला देईन आणि त्याच बरोबर जावयांना पण एक अंगठी दिवाळीला देईन ."

रमेश च्या बाबांचा काल पासूनच मूड  गेला होता . लग्नातला दागिना दिवाळीत देणार म्हणजे दिवाळीतला दागिना जो ऍडिशनल मिळणार होता तो गेला . त्यांनी साफ नकार दिला .

"तुम्ही काहीही करा आणि जे ठरले ते करा मला जास्त बोलायला लावू नका "

अण्णा " अहो , असे काय करता ? तुम्ही मला ओळखत नाही का ? मला जेवढे शक्य आहे  ते सगळे मी करतोय आणि करण्याचं प्रयन्त केलाय . आता फक्त ठरलेल्या पैकी एक दागिना कमी पडतोय . तेवढे जरा अड्जस्ट करा , मी द्यायला कुठे नाही म्हणतोय "

रमेश चे वडील " नाही .. मी लग्न आताच्या आता मोडतो . तुम्ही आमची फसवणूक केली आहेत "

अण्णा "   मान्य आहे ठरलेल्या पैकी हे एक दागिना  मला शक्य नाही झालाय  . पण फसवणूक हा शब्द तुम्ही चुकीचा वापरताय . "

रमेश चे वडील " हि फसवणूक नाही तर काय ?"

आणि दोघांमध्ये वादावादि सुरु झाली .

अण्णा पण नाराज झाले . एवढे मी करतोय ते कमीच झालेय , आणि मी देणार तर आहेच ना एकदम सगळे कसे जमणार . थोडा वेळ मागून घेतोय तर सरळ सरळ माझ्यावर आरोप करत आहेत हे त्यांना सहन झाले नाही .

अण्णांच्या डोक्यावरचा फेटा त्यांनी काढून टाकला . रमेश चे वडील हटून बसले . ठरल्या प्रमाणे दागिने द्या नाहीतर लग्न मोडलेच समजा .

त्यावर काही तोडगा निघेना .

लाऊड सुपेकर चा आवाज बंद झाला .

भटजी आणि सरपंच पण रमेश च्या वडिलांना म्हणाले " अहो , मुलगी बघा .. सोन्या सारखी पोर आहे . तिच्या आयुष्याचा  विचार करा जरा . शिवय  मुलगी नोकरी वाली आहे . तिचा पगार का तुम्ही माहेरी देणार आहेत . चला , बघू मुहूताची वेळ जायच्या आत लग्न लावू .

रमेश चे वडील " माझा मुलगा पण शिकलेला आहे . दिसायला हि राजबिंडा आहे . आम्ही का माघार घ्यायची ते तुम्ही सांगा "

काही केल्या रमेश चे वडील ऐकायला तयार  नाहीत .

रमेश पण वडिलांपुढे काही बोलेना . तो हि गप्प बसला . चंदू हे सगळे पाहत होता . चंदू ने रमेश ला सांगितले

" अरे तू बोल काहीतरी . दागिना काय आज आहे उद्या नाही . लग्न करायला काही हरकत नाही ."

रमेश " आता  वडिलांच्या पुढे तोंड उघडणे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखे आहे . आणि जे ठरले ते त्यांनी करायला नको का ?हि फसवणूकच आहे "

चंदू " नाही रे .. अरे फसवणूक असती तर त्या माणसाने खोटा  दागिने घातला असता . त्यांच्या बोलण्यावरून असेच दिसतंय त्यांनी खूप प्रयन्त केलाय. "

रमेश " जाऊ दे आपण कशाला उगाच मोठ्या माणसात बोलायचे "

चंदू ला हे रमेश चे वागणे अजिबात पटले नाही . पण तो हि काय करणार होता . गप्प बसला .

कोणीतरी आतमध्ये जाऊन मालती ला सांगितले असे असे झालेय .

मालती रडायलाच लागली . आपल्या वडिलांवर हि वेळ माझ्यामुळे आलीय हे तिला सहनच झाले नाही . तिच्या डोक्यात काय आले काय माहित . घातलेले सर्व दागिने तिने काढले आणि मागच्या दाराने घरातून बाहेर पडली आणि विहिरीच्या दिशेने धावत सुटली . आणि कोणाला काही कळायच्या आत मालतीने विहिरीत उडी मारली .

🎭 Series Post

View all