अर्चित अँड आर्या ! पार्ट 3

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्याची प्रेमकथा
सकाळचे दहा वाजले होते. गरम गरम पोह्याचा वास सर्वत्र घुमत होता. आर्याने मस्तपैकी पोहे बनवून डिशमध्ये सर्व्ह केले. खोबरे किसून पोह्याला अजून सजवले. अर्चित पण मस्तपैकी तयार झाला होता. दोघे पोहे खाण्यासाठी बसले. पिवळे पोहे आणि त्यावर पांढऱ्या किसलेल्या खोबऱ्याची चढवलेली झालर पाहून अर्चितच्या तोंडाला पाणी सुटले. तो लगेच त्यावर तुटून पडला.

" मस्त झाले आहेत पोहे जान. " अर्चित पोहे खात म्हणाला.

" थँक्स भालू. नेक्स्ट टाईम टोमॅटोपण चिरून टाकत जाईल. आज वेळ नव्हता म्हणून चिरता आले नाही." आर्या म्हणाली.

" हो. चिरलेले टोमॅटो वरून टाकले की खूप टेस्टी लागतात पोहे. मी कितीदा तर खाल्ले आहेत. इथे दिल्लीत टोमॅटो , शेंगदाणे वरूनच टाकतात. महाराष्ट्रात तसे नसते. " अर्चित म्हणाला.

" हो. आणि ऐक. आजच्या दिवस बाहेरचे खाऊन घे. उद्यापासून मी टिफिन बनवत जाईल. " आर्या म्हणाली.

" कोई नि जान. " अर्चित म्हणाला.

नाश्ता संपल्यावर दोघे ऑफिसकडे निघाले. पण खाली जाताच आर्याने डोक्यावर हात मारला.

" काय झाले जान ?" अर्चितने विचारले.

" अरे माझ्या अनाथआश्रमातल्या एका मुलीचे दिल्लीच्या एका यूपीएससी क्लासेसमध्ये ऍडमिशन झाले आहे. तिचा डीडी सबमिट करायचा आहे. आज लास्ट डेट आहे. जवळच आहे क्लासेस. " आर्या म्हणाली.

" चल मग पटकन. डीडी सबमिट करून ऑफिसला जाऊ. आणि काय ग मी असे ऐकले होते की पुणेकर फार वक्तशीर असतात मग आज काय झाले ?" अर्चित आर्याची खेचत म्हणाला.

" हो. आम्ही असतोच वक्तशीर. पण मुंबईकर सोबत असल्यामुळे कधीकधी नजर लागते आम्हाला. " ती पण पुणेरी तोऱ्यात म्हणाली.

अर्चित हसला. दोघेही क्लासेसमध्ये गेले. डीडी सबमिट केला. खूप मोठी बिल्डिंग होती. उशीर झाला होता म्हणून अर्चित लिफ्टच्या दिशेने वळला पण आर्याने त्याचा हात धरला.

" भालू , पायऱ्यांनीच जाऊ ना. " आर्या निरागस चेहरा करत म्हणाली.

" पण जान लेट झाले आहे खुप. " अर्चित म्हणाला.

" मला लिफ्टचा फोबिया आहे. " आर्या म्हणाली.

अर्चितने तिच्या हातावर हात ठेवला.

" मी आहे ना. घाबरू नको. " अर्चित म्हणाला.

आर्याने अर्चितचा हात धरून लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्ट सुरू झाली तेव्हा आर्याला घाम फुटला. घाबरून तिने अर्चितला कडकडून मिठी मारली. दुर्दैवाने लिफ्ट पण अर्ध्या वाटेतच बंद पडली. अर्चितने लगेच इमर्जन्सी बटन दाबले.

" भालू मला खुप भीती वाटत आहे. लहानपणी अनाथाश्रममध्ये असताना एकदा कुणीतरी सर्व मुलींना किडनॅप केले होते. ट्रकमध्ये कोंडवले होते. आम्ही खूप ओरडलो. खूप रडलो. पण कुणीच दार उघडले नाही. खूप अंधार होता सर्वत्र. तेव्हापासून बंद जागेची भीती वाटते. " आर्या रडत म्हणाली.

" ओय जान , इकडे बघ माझ्या डोळ्यांकडे. " अर्चित त्याचे दोन्ही उबदार हात आर्याच्या गालावर ठेवत म्हणाला.

" माझा श्वास कोंडतोय. " आर्या म्हणाली.

" जान , मोठा श्वास घे. माझ्या डोळ्यात बघ. मी कायम असेल तुझ्यासोबत. कुणीच तुला माझ्यापासून वेगळे नाही करू शकत. आय लव्ह यु." अर्चित म्हणाला.

अर्चितने त्याचे ओठ आर्यांच्या थरथरणाऱ्या ओठांवर ठेवले. मग तिला घट्ट मिठीत घेतले. ती पण डोळे मिटून विश्वासाने अर्चितच्या मिठीत विसावली. थोड्या वेळाने काही टेक्निशियनने येऊन लिफ्ट उघडली. दोघे आपापल्या ऑफिसकडे निघाली. दोघे मेट्रोमध्ये चढले. आर्या काहीच बोलत नव्हती.

" ओय जान , अजूनही भीती वाटत आहे का ?" अर्चितने विचारले.

" नाही. पण तुला उगाच त्रास दिला असे वाटत आहे." आर्या हळू आवाजात म्हणाली.

" वेडी आहेस का ? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्या कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. " अर्चित स्माईल करत म्हणाला.

" हम्म. " आर्या हळू आवाजात म्हणाली.

राजीव गांधी मेट्रो स्टेशन आले. दोघेही बाहेर पडले.

" जान , आपण भीतीचा सामना करतो तेव्हाच ती भीती कमी होते. नाहीतर भीती विष बनून जीवन संपवते अथवा आपल्याला कमजोर बनवते. तू आजपासून मुद्दाम लिफ्ट वापरत जा. कधीही भीती वाटली तर असे समज मी तुझ्या जवळ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी असेल. इतकेच लक्षात ठेव की तुझा भालू कायम तुझ्या सोबत आहे." अर्चित आर्याला मिठी मारत म्हणाला.

आधीच उशीर झाल्यामुळे दोघांनाही ऑफिसमध्ये शब्दांचा मार पडला. तसेच इतके दिवस सुट्टी घेतल्यामुळे कामाचा भारपण पडला. पूर्ण दिवस कामात गेला. आर्यापण खूप थकली होती. तिच्या पायात त्राण उरले नव्हते. तिने लिफ्ट उघडली. मनात अर्चितचे शब्द घुमत होते. लिफ्ट सुरू होताच ती थरथरू लागली. तिला घाम फुटला. पण तिने मोबाईचे वॉलपेपर उघडले. त्यावर अर्चितचा फोटो होता. अर्चितच्या फोटोकडे पाहून ती मोठमोठे श्वास घेऊ लागली. लिफ्ट उघडली. ती बाहेर पडली स्वतःसोबत नवीन आत्मविश्वास घेऊन जो अर्चितने तिला दिला होता. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद उमटला. आज पहिल्यांदा तिने स्वतःहून एकटीने लिफ्टमधून प्रवास केला होता. आर्या घरी गेली. बेल वाजवली. अर्चित आधीच तिथे पोहोचला होता. फ्रेश होऊन त्याने लाल टीशर्ट घातला होता. त्याने दार काढले. तिने लगेचच प्रेमाने त्याला घट्ट मिठी मारली आणि दारावरच त्याच्या गालावर किस केले.

" ओय जान , लोक बघतील. " अर्चित हसत म्हणाला.

ती भानावर आली आणि पटकन आत येऊन दार लावले.

" भालू , आज माहिती मी स्वतःहून लिफ्टने आले. " आर्या म्हणाली.

" तुझा फोबिया ?" अर्चितने विचारले.

" आता जिचा इतका हँडसम डॅशिंग केंअरिंग बॉयफ्रेंड असेल तिला कसला फोबिया असेल. " आर्या म्हणाली.

" बर पटकन फ्रेश हो. मी खिचडी लावतो. आणि माझ्या जानसाठी तिची आवडती कडी पण करतो. " तो प्रेमाने म्हणाला.

आर्या फ्रेश व्हायला गेली. दोघांनी पोटभर जेवण केले. दिवसभर काम करून थकले असल्यामुळे लगेच बेडवर पडले. आर्या मात्र प्रेमाने अर्चितच्या मिठीत घुसली.

" आज माझी जान भलत्याच रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. " अर्चित म्हणाला.

" माझा लिफ्टचा फोबिया दूर झाला पण मला एक नवीनच फोबिया जडलाय. " आर्या म्हणाली.

" कोणता ?" अर्चितने विचारले.

" तुला गमावण्याचा. आज तू जे म्हणला ना कायम सोबत राहणार म्हणून खूप छान वाटले रे. भालू आय लव्ह यु. जगातली सर्वात बेस्ट फीलिंग असते जेव्हा कुणितरी आपल्यावर प्रेम करते. जेव्हा कुणीतरी म्हणते की मी कायम तुझ्यासोबत राहणार. लहानपणापासून कुणी भेटलेच नाही प्रेम करणारे पण आता असे वाटत आहे की देवाने प्रेमाची उणीव भरून काढण्यासाठी तुला माझ्याकडे पाठवले आहे. असेच रहा माझ्यासोबत कायम. " आर्या म्हणाली.

" मेरी जान !" अर्चितने आर्याला अजून जवळ केले आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले.

क्रमश...

🎭 Series Post

View all