अर्चित अँड आर्या ! पार्ट 5

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची गोष्ट
सकाळ झाली. आर्याला आधी जाग आली. डोळे उघडताच तिला अर्चितचा चेहरा दिसला. त्याला पाहून तिच्याही मुखावर हास्य उमटले. तिने अर्चितच्या कपाळाला किस केले.

" भालू , उठ ना. " लडिवाळपणे आर्या अर्चितला उठवू लागली.

अर्चित उठला. त्याने मोठी जांभळी दिली. आळस दिला आणि नंतर आर्याला सकाळची घट्ट मिठी मारली.

" जान , चल आज एक कॉम्पिटीशन करू. आधी कोण ब्रश करते त्याची. " अर्चित जांभळी देत म्हणाला.

" ओह , अरे गर्ल्स हॉस्टेलमध्ये खूप जिंकल्या अश्या स्पर्धा. चल ये मैदानात. बघू कोणाच्यात किती दम आहे ते. " आर्या केस उडवत म्हणाली.

" तुमच्या हॉस्टेलमध्ये अश्या स्पर्धा व्हायच्या ? जगात इतके गेम्स आहेत पब्जी , फ्री फायर आणि तुम्ही मुली असले गेम्स खेळायचे ? " अर्चित म्हणाला.

" गप रे. चल मैदानात. " आर्या बाथरूमकडे गेली.

दोघे बाथरूमजवळच्या बेसिनकडे गेले.आरश्यासमोर हातात ब्रश घेऊन उभे राहिले.

" ए भालू , तू कमी पेस्ट लावलंय. भोळा नको समजू पुणेकरांना. " आर्या ओरडली.

"नाही नाही. तुम्हा पुणेकरांना भोळे कोण समजणार ? तुम्ही तर जगातले सर्वात हुशार लोक आहात. " अर्चित जास्त पेस्ट लावत म्हणाला.

" वन टू थ्री. " आर्या म्हणाली.

मग शर्यत सुरू झाली. आर्या खूप जोरात दात घासू लागली. दोन मिनिटात दात घासून तिने चूळ पण भरली. याउलट अर्चित आरामात सर्वकाही करत करत होता.

" मी जिंकले. " आर्या आनंदाने उड्या मारू लागली.

" आता माझ्यासाठी गरम गरम चहा बनव प्लिज. माझा अजिबात मूड नाही चहानाश्ता बनवण्याचा." अर्चित दात घासत म्हणाला.

" ओह , कपटी मुंबईकर. मी नाश्ता बनवावा म्हणून मला उल्लू बनवलं. " आर्या रागात म्हणली.

" अग जा ना. मला दात घासू दे. तुझ्यासारखा घाणेरडा नाही मी दोन मिनिटात दात घासणारा. मला स्वच्छता आवडते. " अर्चित म्हणाला.

" दुष्ट. " आर्या रडवेल्या सुरात अर्चितला लाथ मारत निघून गेली.

आर्याने गरम गरम उपीठ तयार केले. तिच्या हातचे उपीठ अर्चितला खूप आवडायचे. इकडे अर्चितमहाराज निवांतपणे आवरून नाश्ताची वाट बघत बसले.

" आर्या , लवकर घेऊन ये ग. खूप भूक लागलीय. पोटात श्रीदेवी माधुरी नृत्य करताय. " अर्चित म्हणाला.

" हो आले. आले टाकत आहे चहामध्ये. " आर्या किचनमधून ओरडली.

" आले. आले टाकत आहे. वाह ही मराठी भाषा किती ऑसम आहे. " अर्चित मनातल्या मनात म्हणाला.

थोड्या वेळाने आर्या नाश्ता आणि चहा घेऊन आली.

" माझ्या क्युट भालूसाठी क्युट नाश्ता आणि चहा. तुझे आवडीचे उपिठ केले आहे. काल माझी काळजी घेतलीस त्यासाठी थँक्स. " आर्या अर्चितला साईड हग देत म्हणाली.

" जान , अर्ज किया है तेरे इस उपिठ के लिए हाजीर मेरी जान. ये उपिठ ही मेरा आन बान और शान " अर्चित उपिठ खात म्हणाला.

" तुझ्यात अनु मलिक कुठून शिरला सकाळी सकाळी. चल आवर पटकन. प्रोपोज डेची सुट्टी नसते ऑफिसला. " आर्या चहाचा एक घोट घेत म्हणाली.

" खरच राव कपलसाठी एक आठवडा पब्लिक हॉलिडे पाहिजे. " अर्चित नाश्ता करत म्हणाला.

" आलाय मोठा कपलसाठी हॉलिडे मागणारा. आवर पटकन मी गिझर लावते. " आर्या तिच्या प्लेटमधला अर्धा उपमा अर्चितला देत म्हणाली.

मग दोघेही तयार होऊन त्यांच्या त्यांच्या ऑफिसला निघाले.

◆◆◆

ऑफिसमध्ये प्रवेश करताच प्युन अर्चितसमोर आला.

" सर , तुम्हाला बॉसने अर्जंट बोलावले आहे. " तो म्हणाला.

प्युनचा चेहरा उदास वाटत होता. ऑफिसमध्ये सर्वांचेच चेहरे पडलेले दिसत होते. अर्चितला काहीतरी नक्कीच बिनसले आहे असे जाणवले. तो गंभीर मुद्रा घेऊन बॉसच्या केबिनमध्ये गेला.

" मे आय कम इन सर ?" अर्चितने विचारले.

" प्लिज कम. " बॉस म्हणाला.

बॉस तणावाखाली दिसत होता.

" अर्चित , हाव्ह अ सीट. मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीवर बोलायचे होते. " बॉस म्हणाला.

" बोला सर. " अर्चित म्हणाला.

" माझ्या सावत्र भावाने मला फसवले. बँकेचे लोन कंपनीच्या नावाने काढून त्याने फ्रॉड केला आणि लंडनला पळाला. आता बँक माझ्यामागे लागली आहे. माझी इतकी मोठी रक्कम देण्याची कुवत नाही. म्हणून मी ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे असेट्स विकून मी शक्य तेवढी रक्कम बँकेला देईल. तेव्हा तू उद्यापासून कामाला नाही आले तरी चालेल. तुला आतापर्यंतची सॅलरी भेटून जाईल. " बॉस हताश होऊन म्हणाला.

" पण सर एका वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट झाले होते ना. प्लिज कंपनी बंद करू नका. मला प्लेसमेंटच्या अजूनही ऑफर होत्या पण हीच कंपनी निवडली मी कारण मला या कंपनीत काहीतरी मोठे करून दाखवायचे होते. " अर्चित घामाघूम होऊन म्हणाला.

" आय एम सॉरी अर्चित. परिस्थितीच अशी आली की कॉन्ट्रॅक्ट तोडावा लागतोय. भाऊ स्वतः तर पळाला पण मला आणि माझ्या कंपनीला दिवाळखोरीत सोडून गेला. मी पण माझ्या सासऱ्याकडे म्हणजे अमेरिकेत जाऊन काहीतरी बिजनेस करेल. मला माफ कर. " बॉस म्हणाला.

अर्चितवर संकटांचा डोंगर कोसळला. तो तसाच उतरलेला चेहरा घेऊन केबिनबाहेर आला.

◆◆◆

इकडे एका बाईकच्या शोरूममध्ये आर्या एका मॅनेजरशी बोलत होती.

" मॅडम , हे तुमचे इन्शुरन्सचे पेपर्स. ही रॉयल एनफिल्ड बुलेट तुम्ही स्वतःसाठी घेताय ?" मॅनेजरने विचारले.

मॅनेजरच्या प्रश्नामुळे आर्याला हसू आवरले नाही.

" माझ्या बॉयफ्रेंडला सप्राईज द्यायचे आहे. आज आमच्या रिलेशनशिपची ऍनिव्हर्सरी आहे. आज त्याने मला प्रोपोज केलं होतं. तो जरी नाटक करत असला तरी आता नक्किच काहीतरी सप्राईज प्लॅन करत असेल. " आर्या म्हणाली.

" तुमच्या बॉयफ्रेंडला ही बुलेट नक्कीच आवडेल. आमचा एक माणूस सोसायटीत ही बुलेट पोहोचवेल." मॅनेजर म्हणाला.

" थँक्स. चावीला ही किचैन लावा प्लिज. चला मी येते. " आर्या इतके म्हणून निघाली.

मॅनेजरला ते किचैन खूप आवडले. हार्ट शेपमध्ये एक फोटो अर्चितचा आणि दुसरा आर्याचा होता.

क्रमश...

( हांजी कीवे लगा तैनू ये पार्ट कमेंट करके जरूर दसियो और भी नये नये पार्ट पढने केलीये लाईक कमेंट शेअर और फॉलो करो. थँक्स. )




🎭 Series Post

View all