अर्चित अँड आर्या ! पार्ट 4

.
" आआ छी " आर्याने मोठी शिंक दिली.

अर्चित हातात हिरव्या काढ्याने भरलेला कप घेऊन आला.

" आर यु ओके जान ?" अर्चितने विचारले.

" नो भालू. थंडीने हड्डीपसली एक केली आहे. " आर्या रुमालाने ओले नाक पुसत म्हणाली.

सर्दीमुळे गोरीपान आर्याचे नाक गुलाबी झाले होते. अर्चितला तर ते पाणीपुरीसारखे वाटत होते.

" हा काढा पी. माझी मम्मी मला बनवून द्यायची. " अर्चित कप पुढे करत म्हणाला.

" नको. प्लिज नको. खूप कडू असेल. " आर्या म्हणाली.

" थोडे सहन कर पिल्लू. औषध जितके कडू तितके प्रभावी. " अर्चित म्हणाला.

आर्या काही ऐकेना. मग अर्चितने तिचे नाक पकडून तोंडाजवळ कप धरला आणि जबरदस्ती तो काढा पिऊ घातला.

" किती कडू होता यार. " आर्या कसेमुसे तोंड करत ओरडली.

" आताच गोड करून देतो. " अर्चित आर्याच्या गालावर दोनचार किस म्हणाला.

" भालू , गळा पण खरखर करतोय. " आर्या बारीक स्वरात म्हणाली.

" बर. थांब. " अर्चित म्हणाला.

अर्चितने स्वतःच्या मांडीवर आर्याचे डोके टेकवले आणि तो झंडू बामने आर्याचा गळा चोळू लागला. आर्या विचित्र आवाज काढू लागली.

" ए जान , असले आवाज नको ना काढू. मला हसू येतंय. " अर्चित म्हणाला.

" माझ्या स्वरपेटीतून स्वर निघतोय. " आर्या म्हणाली.

" मग बंद कर ना ती पेटी. " अर्चित म्हणाला.

" तू चोळण्यावर फोकस कर रे. मस्त चोळतोय."आर्या म्हणाली.

गळा चोळून झाल्यावर अर्चितने वाफेची पाणी गरम केले. आर्याने वाफ घेतली. त्यानंतर तिला झोप लागली. तिला पांखरून घालून अर्चित हॉलमध्ये आला. मोबाईल उघडला. " रोज डे " असल्यामुळे स्क्रोल करताना त्याच पोस्ट दिसत होत्या. अर्चितने सोफ्याखालून एक कार्ड काढले. कार्डवर एक सुंदर कविता आणि एक सुंदर सुकलेले गुलाब पण चिकटवलेले होते. अर्चित भूतकाळाच्या आठवणीत रमला. कॉलेजमध्ये रोज डे होता. अर्चितला भरपूर मुलींनी रोज दिले होते. अर्चितला त्याचे काहीच अप्रूप नव्हते. त्याच्या नजरा फक्त आर्याला शोधत होत्या. कधी एकदा आर्या भेटेल आणि तिला आपण गुलाब देऊ असे त्याला झाले होते. शेवटी आर्याची एक मैत्रीण भेटली. तिच्याकडून कळले की आर्या अभ्यास करत बसली आहे. अर्चित आर्याच्या हॉस्टेलला गेला. वॉचमनची नजर चुकवत आर्याच्या खोलीत शिरला. दार लावले. पाच मिनिटे तर दारावर टेकून आर्याला अभ्यास करताना बघतच बसला. ती अभ्यासात इतकी मग्न होती की कुणी आला आहे तेही कळले नाही.

" आर्या " अर्चितने हाक दिली.

पुरुषी आवाज ऐकून ती घाबरली. तिने वळून पाहिले तर काळा टीशर्ट घातलेला उत्तम देहयष्टी असलेला अर्चित उभा होता.

" तू ? " ती घाबरून उभी राहिली.

" चिल्ल. रोज डे आहे आणि तू अशी अभ्यास करत बसलीय हॉस्टेलमध्ये. " तो बेडवर आडवा होत म्हणाला.

" अरे कुणीतरी बघितले तर प्रॉब्लेम होईल. " ती घाबरत म्हणाली.

तेवढ्यात कुणीतरी दार आपटले.

" आता कस होणार ?" ती भीतीने थरथरू लागली.

तो उभा राहिला. तिच्या जवळ गेला. तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर स्वतःचे हात ठेवले.

" शु. काही बोलू नको. फक्त तुला रोज द्यायला आलोय. " असे बोलून त्याने खिश्यातून एक गुलाबी रोज काढला आणि आर्याला दिला. आर्याला घाम फुटला होता. अर्चित लगेच खिडकीतून पाईपच्या सहाय्याने कसाबसा खाली गेला.

अर्चितच्या मुखावर आनंदाची लकेर उमटली. तो स्वतःशीच म्हणाला की हाच तो गुलाब आमच्या प्रेमाची पहिली आठवण म्हणून आर्याने आणि मी जपून ठेवला होता. आयुष्यात पहिल्यांदा आर्याला कुणीतरी गुलाब दिला होता आणि मी कुणाला तरी दिला होता.

" अरे यार , आठवणीत इतका रमलोय की आर्यासाठी जेवायला बनवायला विसरूनच गेलो. " अर्चित स्वतःशीच म्हणला.

तो किचनमध्ये गेला. मॅगी बनवायला घेतली. आर्याच्या गळ्याला बरे वाटेल आणि तिला आवडते म्हणून त्याने मॅगी बनवायला घेतली. गॅस चालू केला. कढईत तेल टाकले. त्यात मिरे टाकले. त्यांना तडका बसताच त्यात मॅगी नूडल्स , पाणी , हळद , मिरचु , मीठ , बारीक चिरलेले टोमॅटो , कोथिंबीरपण टाकले. दहा मिनिटांनी गरम गरम मॅगी तयार झाली. एका डीशमध्ये ती सर्व्ह करून तो बेडरूममध्ये गेला.
आर्याला उठवले.

" भालू , आज एकाच डीशमध्ये खाऊ. तू मला आणि मी तुला भरवेल. " आर्या लडिवाळपणे म्हणली.

" नको जान. आधी तू खाऊन घे पाहू. " अर्चित आई मुलाची जशी काळजी घेते तसे वागत होता.

" नाही. चल पहिला घास मी भरवते. " आर्या म्हणाली.

दोघेही एकमेकांना प्रेमाने घास भरवू लागले.

" आज माझ्यामुळे सुट्टी घ्यावी लागली ना. रोजडे असूनही तुला रोमँटिक होता आले नाही. माझ्या सर्दीने सर्वकाही स्पॉइल केले ना. " आर्या म्हणाली.

" बागेतले गुलाब तर कोमेजून जातात पण तू माझ्या जीवनातले गुलाब आहेस. तुला मी कोमेजू कस देईल जान ?" अर्चित म्हणाला.

" काल ते ग्रेटिंग बनवत होतास ते आण. कविता पण ऐकव. " आर्या म्हणाली.

" रात्री बघितले म्हणजे. असो. थांब. " अर्चित म्हणाला.

अर्चितने कार्ड आणले आणि आर्याला दिले.

" खूप सुंदर कार्ड आहे. हा जुना गुलाब तर माझ्या खूप जवळचा आहे. " आर्या म्हणाली.

" आपल्या जवळचा आहे. कारण प्रेमाची पहिली निशाणी आहे. " अर्चित म्हणाला.

" मी किती लकी आहे रे इतका केंअरिंग बॉयफ्रेंड भेटला. " आर्या म्हणाली.

" मी किती अनलकी आहे की इतकी शेंबडी गर्लफ्रेंड भेटली. " अर्चित म्हणाला.

आर्याने त्याला हलकेसे मारले.

" कविता वाचून दाखव ना. " आर्या म्हणाली.

" माझ्याशी भांडणारी सतत रुसणारी
गुलाब माझी मला आनंदी ठेवणारी
अबोला तिचा किती तो जीवघेणा
तिच्यासमोर माझे काहीच चालेना

माझे प्राण ती माझी अर्धांगिनी
मोहून घेणारी प्रिये मनमोहिनी
स्वप्नातली परी सत्यात गवसलेली
लाखात एक साथी ती निवडलेली

रागाच्या कुलुपाची चावी ठेवणारी
मनाची कोडी सहजच सोडवणारी
अबोल त्या हृदयभावना जाणणारी
माझे जग माझे सर्वकाही असणारी

प्रेमाचा गंध आयुष्यात उधळूनी
माझ्या प्रीतीच्या रंगात त्या रंगुनी
स्वामिनी माझी जीवनाची मनाची
माझी गुलाब आयुष्याच्या बागाची !

~ अर्चित ✍️ "

" खूप सुंदर कविता. " आर्या म्हणाली.

" मी अस ऐकलय की बॉयफ्रेंडला हग केले , किस केले तर सर्दी जाते. आजच हगडे आणि किसडे साजरा करू. " अर्चित आर्याला जवळ घेत म्हणाला.

आर्या पण त्याच्या घट्ट मिठीत शिरली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले.

समाप्त

( हांजी कीवी लगा तैनू ये पार्ट कमेंट करके जरूर दसियो और भी नये नये पार्ट पढने केलीये लाईक कमेंट शेअर और फॉलो करो. थँक्स. )



🎭 Series Post

View all