आरंभ..

रान पिवळा केशरी गर्भ उसवत नेलाय कुणीतरी .. त्याच्या मृण्मयी खुणा अजूनही शोधतीय ...रानोवनांत ,एक स्वच्छ निरभ्र आभाळ ....समाधानाचं की सुखाचं..?


आरंभाचा कोणता ऋतु असावा ..?
सारंच अबोध ,सारंच अनाकलनिय
मग माझी मी रहाते कुठे ..?
स्वच्छ कोरडं आकाश इतकंच मागणं
ऋजुतेतले गंधाळलेले सोहळे...
रान पिवळा केशरी गर्भ
उसवत नेलाय कुणीतरी .. त्याच्या मृण्मयी खुणा अजूनही शोधतीय ...
रानोवनांत ,एक स्वच्छ निरभ्र आभाळ ....
समाधानाचं की सुखाचं..?
ओरखडे भूतकाळाचे
बेछूट होतांना ,
निग्रहाचे एकेक कील्ले लढवले
पराभवाचं शल्य कधीच नव्हतं
लढले,लढीन ही आत्म बाधाही नव्हती
सत्शीलतेचा कोवळा कोंब अजूनही रुजतोच आहे..
धुमारे फुटतीलही काळांचे गर्भ भेदून
गूढतेच्या वर्माची असेल खरीच जोखीम
आकांक्षांची तोरणं पापण्यांवर
बांधिन..
©लीना राजीव.#आरंभ

आरंभाचा कोणता ऋतु असावा ..?
सारंच अबोध ,सारंच अनाकलनिय
मग माझी मी रहाते कुठे ..?
स्वच्छ कोरडं आकाश इतकंच मागणं
ऋजुतेतले गंधाळलेले सोहळे...
रान पिवळा केशरी गर्भ
उसवत नेलाय कुणीतरी .. त्याच्या मृण्मयी खुणा अजूनही शोधतीय ...
रानोवनांत ,एक स्वच्छ निरभ्र आभाळ ....
समाधानाचं की सुखाचं..?
ओरखडे भूतकाळाचे
बेछूट होतांना ,
निग्रहाचे एकेक कील्ले लढवले
पराभवाचं शल्य कधीच नव्हतं
लढले,लढीन ही आत्म बाधाही नव्हती
सत्शीलतेचा कोवळा कोंब अजूनही रुजतोच आहे..
धुमारे फुटतीलही काळांचे गर्भ भेदून
गूढतेच्या वर्माची असेल खरीच जोखीम
आकांक्षांची तोरणं पापण्यांवर
बांधिन..
©लीना राजीव.