अपूर्वा देशपांडे : बालमनाला सुसंस्कारक्षम करणाऱ्या लेखिका

ईरा : लेखणीचे कृपाछत्र


? अपूर्वा देशपांडे : बालमनाला सुसंस्कारक्षम करणाऱ्या लेखिका

आपल्या वैविध्यपूर्ण प्रतिभेने व चतुर कलागुणाने बालईरा व्यासपिठाला वेगळा लुक देणा-या अपूर्वाजी म्हणजे प्रेरणादायक लेखिका आहेत.मुलांना योग्य संस्काराने घडवता येते.मुलांचे कलागुण ओळखून त्यांना प्रेरणा देणे गरजेचे असते.मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा , त्यांची बुद्धी अधिक चौकस व्हावी , वेगळेवेगळे विषयांचे त्यांना ज्ञान व्हावे , नविन गोष्टी शिकायला मिळाव्या व सुसंस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी अशा दूरदृष्टीय उद्देशाने संजना मॕडम यांंनी " बाल ईरा" या व्यासपिठाची निर्मिती केली त्याची जबाबदारी अपूर्वाजी यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली आहे.वेगळेवेगळे उपक्रम घेवून बालमनाला प्रेरणा देण्याचे काम त्या करत आहेत.अनेक प्रतिभावंत लेखक लेखिका या व्यासपिठाला मार्गदर्शन करत आहेत.ईरा व्यासपिठ जोमाने वेग घेत असताना बालईरा व्यासपिठानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.ईराच्या दिवाळी अंकात बालईराचे साहित्यांने खूप प्रभावित केले. त्यामुळे बालईरा व्यासपिठाचे भविष्य उज्वल आहे. बालईराच्या व अपूर्वाजी यांच्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा त्यांचे हे कार्य असेच वृद्धीगंत व्हावे व सुजाण नागरिक तयार व्हावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ...!!

???????

       ©नामदेवपाटील