अपशकुनी भाग 3

Aaji maran Paoli hoti. Pn was udhav hya samasya kutlya natya.

अपशकुनी     (भाग ३)

        घटस्फोट झाल्याने खचलेल्या वसुधाला डॉक्टरांनी समजवल्यांनन्तर वसुधा थोडी सावरते. तिला कळत की रडत बसण्यात काही अर्थ नाही. आता पुढे........


वसुधा - होना, बरोबर आहे तुमचं. माझा नवरा तिकडे दुसरा संसार मांडून बसला असेल आणि मी इकडे त्याच्या नावाने रडत बसलीय. मीच माझं आयुष्य बरबाद करतेय.

डॉक्टर - Exactly. आता तू तुझी काळजी घेणार आहेस. आणि मला आधीची वसुधा हवी आहे जी लग्नाअगोदर अवखळ हसत होती. फुलपाखरासारखी बागडत होती. आता तू बरी होणार आहेस. आपण पुन्हा भेटू तेव्हा तू आधीची वसुधा दिसायला हवीस. 

वसुधा - येस डॉक्टर. आय विल इम्पृव मायसेल्फ.

डॉक्टर - दट्स लाईक गुड गर्ल. ह्या गोळ्या मी लिहून देते.कशा घ्यायच्या तेपण लिहून देते.  नेक्स्ट टाइमसाठी बेस्ट लक आणि स्वतःला जास्तीत जास्त गुंतवून ठेव. ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या कर म्हणजे तुझा आनंद द्विगुणित होणार. जिथे मन रमेल ते कर.

शक्य असल्यास जॉब शोध. तुला तर आरामात जॉब मिळेल. त्यामुळे तुझं मन नवीन गोष्टीत गुंतून राहील. 
सो माय डिअर वसुधा यु हॅव टू मूव्ह ऑन. 

वसुधा - हो हो. आता मला फ्रेश झाल्यासारखं वाटत आहे. थँक्स अ लॉट. काही वाटलं तर मी फोन करेल.

डॉक्टर - अर्थातच हो. Take care baby. Bye.

वसुधा - बाय.

वसुधा बाहेर पडते. आता तिला खूप बर वाटत असत. 

वसुधा. अगदी साधी सरळ मुलगी. दिसायला साधारण   पण सुस्वभावी. एमकॉम केलेली.  कामात हुशार, आईची गुणी बाहुली. वडील नाहीत तिला. ती जेव्हा आईच्या गर्भात होती तेव्हा तिच्या वडिलांना दारूचे व्यसन जडले होते.

               जेव्हा वसुधाचा जन्म झाला तेव्हा दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे व तोल सांभाळता न आल्याने अपघात झाला व ते मरण पावले.  पण या सगळ्यात वसुधाच्या आजीने पोराच्या मरणाच बिल वसुधाच्या नावाने फाडल. म्हणाली " ही कार्टी आली नि माझ्या पोराला खाऊन बसली. अपशकुनी जन्माला आली." 

             झालं. इथून वसुधाला अपशकुणीचा शिक्का बसला. व तिच्या आजीने त्याचा प्रचारही खूप केला.
जवळ जवळ सर्व नातेवाईकांना सांगितलं की वसुधा अपशकुनी आहे. वसुधाची आई शालू तीच काहीच चालेना. पदरात दोन पोरी, नवरा मेला अशात जाणार कुठे म्हणून सर्व सहन करत बसली.वरून आजीला पेंशन मिळत होती. तोच एक आधार.  निदान मोठ्या मुलीला तरी आजी जीव लावत असे म्हणून गप्प बसली. 

          वसुधाची आजी जिवंत असेपर्यंत तिचा अपशकुनी म्हणून खूप उद्धार झाला. वसू दहावीत असताना तिची आजी मेली. तेव्हा कुठे तिचा प्रचार थांबला. पण वसुधाच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. आजी जिवंत होती तेंव्हापर्यंत तिच्या पेंशन वर घर चालायचं. आता शालूला प्रश्न पडला की काय करावं? मोठी मुलगी नलिनी अठरा वर्षाची झालेली. तिच्या लग्नाची काळजी तिला  खात होती. आणि वसुधाच्या शिक्षणाचं कस होणार?  असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. 

             शालुची मोठी मुलगी नलिनी उर्फ नलू आजीच्या लाडात वाढलेली. नलिनी ने कधीच दुःख पाहिलं नाही. नेहमी तिला पैशांचा आजीकडून पुरवठा होत असल्यामुळे ती जास्तच घमंडी झाली होती. तीसुद्धा वसुधाला अपशकुनी समजत होती. एकंदरीत ती आजीची झेरॉक्स कॉपी होती. शालू नेहमी समजावून सांगायची की वसुधा बरोबर नीट वागत जा, राहत जा. पण नलिनी ऐकेल तर नवल.         

             आजी मरण पावली होती. आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता. शालुने खूप विनंत्या केल्या तेव्हा तिला तिच्या चुलत दिराच्या ऑफिस मध्ये शिपाई कामासाठी नोकरी मिळाली. पण त्यातही तिला खूप संघर्ष करावा लागला. हा संघर्ष ती कुणालाच बोलून दाखवत नव्हती, पण का कुणास ठाऊक हे सर्व  वसुधाला समजत होत. ती आईला समजून घ्यायची. तिला हरप्रकारे मदत करायची. त्याउलट नलिनी मात्र ह्या दोघींच्या विश्वापलिकडे होती. तीच खानपिन झोपण आणि मजा करणं हे लक्ष्य होत.


पुढे काय होत ते बघूया पुढच्या भागात.....
कथा आवडल्यास फॉल्लोव करायला विसरू नका.
               

🎭 Series Post

View all