अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 52

This part is in continuation with earlier series.

अशाच एका क्षणी तिला आशा मार्फत कळलं होतं की आशिष आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी; शरयूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती..

                         -------------- 

संध्याच्या डोळ्यांसमोर तिच्या भूतकाळाच्या आठवणी तरळल्या होत्या.. नात्यांची गुंतागुंत आता तिला असह्य झाली होती... 

'आपण शरयुला वचन दिलं होतं; की तिने आशिषशी नीट वागण्याच्या बदल्यात; आशिषच्या आयुष्यातून निघून जायचं.. तिने नंतर आशिषला त्रास दिलाच नाही.. म्हणजे.. म्हणजे तिने तिचं प्रॉमिस पाळलं.. आणि मी?? मी कुठे पाळलं माझं प्रॉमिस?? का नाही पाळलं? पण..पण आशु म्हणायचा की शरयू त्याच्यावर नात पाळायची जबरदस्ती करते म्हणून.. मग.. मग तिने तरी कुठे पाळलं तिच वचन??'- संध्याच्या मनात द्वंद चालू होतं..

'पण.. पण शरयूचं ठीक.. काकांचं काय?? माधव काकांनी माझ्या एका शब्दावर; आशिषला विनयभंगाच्या केस मधून सोडवलं होतं.. त्यांनी.. त्यांनी त्याबद्दल शरयू साठी आशु मागितला होता.. मी..मी दिला??  नाही... मी कृतघ्न ठरली म्हणायची.. देव.. देव, त्याचीच शिक्षा देत नसेल ना?? बट मी तर फक्त आशुशी फ्रेंडशीपच ठेवली होती; मी कुठे त्याच्या संसारात ढवळाढवळ केली?? शरयू.. शरयू त्याला नाही जिंकू शकली त्यात माझा काय दोष?? '- संध्या मनातल्या मनात; स्वतःच स्वतः वर आरोप करत; स्वतःच त्यांचं स्पष्टीकरण देत होती..

तिच्या मनात भयानक गोंधळ उडाला होता.. ती अधिकाधिक विचारांत शिरलीच होती की पुन्हा दरवाज्यावर बेल वाजली होती.. असेल कोणी तरी असे वाटून ती नेमकी उठली नव्हती..

'संध्या, आशिष आला..'- रवीने आवाज दिला तशी ती तंद्रीतून बाहेर आली.... तिला स्वतःला काही कळण्याच्या आतच ती बाहेर हॉलमध्ये पोहचली होती.. 

मनाने खचलेल्या आशिषचा निस्तेज चेहरा पाहून तीसुद्धा दुःखी झाली... तिने त्याच आवेगात सर्वांसमोर त्याला मिठी मारली.... तिला तस करताना पाहून; रवीच्या डोळयातून पाणी आलं.... नकळत त्याने डोळे फुसले तरी हंसाबाईनां नेमकं ते कळलं तसं त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटत त्याला सावरलं..

संध्याला मिठीतून दूर करत; आशिष हॉलमध्ये निराश बसला होता.. 

'दादा, संध्याताईने तुला सावध केलं होतं ना रे? तरीही शर्वरी ताईला कमी लेखण्याची चूक कशी केलीस?? आता बघ ना, केवढ्याला पडलं आपल्याला सर्व..आई-बाबांना या वयात असं..'- आशा आशिषसमोर जाऊन रडू लागली..तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.. तिच रडणं कमी होईना तशी आशिषने खिन्नपणे हसून तिच्या डोक्यावर टपली मारली...

'वेडाबाई; मी आहे ना अजून.. मी सहजासहजी हार मारणार नाही ग.. आता लढायचंच आहे तर नक्कीच लढेन..'- आशिषने लढाईचा निर्धार स्पष्ट केला..

'जोपर्यंत संध्या आणि आशिष चे प्रेम जिवंत आहे; तोपर्यंत ही लढाई चालूच राहील..  याचा अंत नाहीच.. याचा अंत एकच; माझं आणि संध्याच वेगळं होणं...'- आशिष खाली मान घालून बोलू लागला तसा सर्वांना आश्चर्याचा जबर झटका बसला होता..

'अगदी बरोबर आशु.. आपलं एकत्र येणे नियतीला मान्य नाहीच.. आपण एकत्र असलो म्हणजे काही ना काही संकट ठरलेलीच..'- संध्यानेदेखिल त्याची री ओढली तसा बाकीच्यांना तो दुहेरी झटका ठरला..

'तु जगू शकशील माझ्याशिवाय??'- आशिषने भरल्या डोळ्यांनी संध्याकडे पाहत प्रश्न केला..

'तु??'- त्याच्या प्रश्नावर उत्तर म्हणून संध्याने नकारार्थी मान हलवत त्याला प्रतिप्रश्न केला ..

'माहीत नाही.. पण शरयू जगली तर सांगू शकत नाही...'- आशिषने उत्तर दिलं तसं संध्या सोडून बाकी सगळ्यांना फक्त वेड लागायचं बाकी होतं..

'हो ते पण आहे.. जा तिच्या कानात जाऊन सांग... ती तुझ्यासाठी नक्कीच परत येईल..'- संध्यानेपण उदास हसत आशिषला म्हटलं तसा तो ही तसाच हसला..

'आशिष, संध्या?? काय चालू आहे तुमचं नेमकं?? अरे वेड लागेल अशाने आम्हांला'- हंसाबाईनी मध्येच हस्तक्षेप केला..

'काकू.. सॉरी त्यासाठी.. आमचं ते आपलं असंच.. दुर्भागी लोकं आम्ही.. असेच काहीतरी बरळत राहतो.. इग्नोर करा.. आमच्या नशिबासारखं.. रवी काय केस आहे रे आमची??'- हंसाबाईना उत्तर देता देता आशिषने विषय बदलला..

'तुला हे तर कळलंच असेल की तुझ्यावर शरयुला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे.. शरयूने तस स्वतःच्या डायरीत नमूद केलं आहे.. तुझे शेजारी; निकम; त्यांची तुझ्याविरोधात साक्ष आहे..'- रवीने सर्व परिस्थिती कथन केली तसा आशिष हसू लागला तसे सर्व चाट पडले...

'बापरे, खरंच भारी आहे ही शर्वरी... कसं जमवलं हिने बुवा..'- आशिष हसता हसता बोलला..

'आशु.. हॅव यु गॉन मॅड?? तुला याही सिच्युएशनमध्ये हसायला येतंय??'- संध्याने काळजीत त्याला विचारलं..

'अरे.. आय एम ओके ग.. काकू मी तुम्हांला एक रिक्वेस्ट केली होती?'- आशिष अचानक हंसाबाईकडे वळला..

'हो.. सुधाकर येतच असेल एवढ्यात..'- हंसाबाईनीं उत्तर दिलं तसा बाकीच्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसू लागला..

'मम्मा? कोण सुधाकर? मला कळेल का काही??'- संध्याला राहवलं नाही तस तिने विचारलं..

परत एकदा दरवाज्याची बेल वाजली.. संध्याने दरवाजा उघडला..

'मामा?? तु?? '- संध्याला रात्री दहाला मामाला दरवाज्यात पाहून  आश्चर्य वाटलं होतं..

'हंसा, ही कार्टी मला आत घेत नाही बघ..'- त्यांनी आवाज दिला तशी संध्या ओशाळली, तिने कान पकडत त्यांची माफी मागितली..

'अरे बेटा, मस्करी केली ग.. कशी आहे माझी लेक?'- मामाने आत येत तिची चौकशी केली..

'सुधाकर, ये लवकर बस.. तुझी लेक तेव्हाच बोलेल जेव्हा तु काही तरी चमत्कार करशील..'- हंसाबाई म्हणाल्या..

'म्हणजे?? तु म्हणत होतीस ते सुधाकर म्हणजे ? '- संध्या चाट पडली होती..

'हो.. हाच सुधाकर.. माझा भाऊ.. तुझा मामा.. आमच्या डिपार्टमेंटचे बहिर्जी..'- हंसाबाईनी सुधाकर रावांची सर्वांना ओळख करून दिली..

'ताई, अग मी सुधाकरच बरा ग.. बहिर्जी बाबांच्या नखांचीसुद्धा सर नाही आपल्या कोणाला..'- सुधाकर हसत म्हणाले..

'बरं बाबा.. हा आशिष.. हा कोण ते तुला माहीतच आहे.. आता तुला याची मदत करायची आहे; तुझ्या या लेकीसाठी..'- हंसाबाईने विषय पुढे केला होता..

'बरे ताई.. बोल आशु.. काय मदत करू तुझी??'- सुधाकर मामांनी डोळे मिचकावत सुरुवात केली..त्यांनी आशु म्हणून संभोधन करताच आशिषला हसू आलं होतं..

'अरे हसलास तु?? मला वाटलं शरयुला रागावतोस तसा मलापण  ओरडशील.. काय? '- मामांची मस्करी चालूच होती..

'मामा, अहो तुमची पॉवर मला नका दाखवू ना.. मला काकींनी तुमची महती आधीच सांगितली आहे..'- आशिषने त्यांच्यासमोर हात जोडले होते..

'बरं बाबा ठीक आहे.. सांग काय मदत करू मी तुझी??'- मामांनी गंभीरपणे विचारलं..

'मामा, हा रवी.. माझा वकील.. मला याच्यावर विश्वास आहेच पण तरीही मला शर्वरीला या केसमध्ये बिल्कुल डोकं वर काढून दयायचे नाही आहे.. म्हणून तुमची मदत हवी आहे..
क्रमांक एक- शर्वरीकडे शरयूची डायरी कुठून आली?? , क्रमांक दोन- निकमांशी आमची काहीच दुष्मनी नाही; मग त्यांनी माझ्या विरोधात अशी चुकीची साक्ष का द्यावी?? आणि आता सर्वात महत्वाचं-माधव देशपांडे; माझे गुरू, शरयूचे वडील.. फोन उचलत नाहीत आणि त्यांच्या घरीसुद्धा नाही आहेत... '- आशिष थांबला..

'काय??'- संध्या आणि हंसाबाई एकत्रच ओरडल्या होत्या..

'हो.. ते ना घरी आहेत किंवा त्यांचा फोन चालू आहे.. मला शर्वरीचा संशय येतोय.. तिनेच त्यांना गायब केलं असणार.. '- त्याने म्हटलं तशा दोघीही चाट पडल्या..

'आशिषराव, ताई मज्जा येणार बुवा परत एकदा.. काय डोकं लावलं आहे त्या व्यक्तीने.. ठीक आहे; एवढीपण आव्हानं दिसत नाहीत मला यांत.. तरीदेखील माझ्या लेकीसाठी मी मैदानात उतरायला तयार आहे.. रवी साहेब, तुम्ही जरा कोर्टाची तारीख एक आठवडा पुढचीच येईल असं बघा काहीतरी.. मला खूप ठिकाणी एकाच वेळी पाळत ठेवावी लागणार आहे..'- सुधाकरमामा म्हणाले

'सुधा, अरे मला तुझी सवय माहीत आहे.. तुला असंही एकाच वेळी दहा ठिकाण नजरेसमोर ठेवायला मज्जा येतेच की..'- हंसाबाई हसत म्हणाल्या..

'मग काय.. बॉण्ड.. जेम्स बॉण्ड म्हणत्यात आपल्याला..'- मामांनी फिल्मी ऍक्शन करत डायलॉग फेकला तसे सर्वांना हसू आलं होतं...

'चल ताई, येतो मी.. आशिष माझ्यासोबत चल.. मला तुझं, तुझ्या बायकोच घर दाखव लगेचच..'- मामांनी बायकोच घर म्हणताच आशिषचा चेहरा पडला..

'बरं मामा, चला..'- आशिष..

दोघेही सर्वांचा निरोप घेऊन निघाले होते.. आशासुद्धा तिच्या घरी परतली होती.. आता घरात संध्या, रवी, हंसाबाई आणि छोटा आशिष उरले होते.. छोटा झोपला असल्याने हॉलमध्ये फक्त  तिघेच राहिले होते.. संध्या उठून बेडरूमकडे निघाली तसा रवीसुद्धा तिच्या मागून निघाला होता..

'संध्या, आशिषचं काय ठरवलं आहेस?? म्हणजे आपल्या मुलाबद्दल बोलतोय..'- रवीने म्हटलं..

'तो तुझ्याकडेच असेल रवी.. डोन्ट वरी..'- संध्या कुठल्याशा अल्बमवरून हात फिरवत उभी होती..

'ओह, एवढ्या लवकर ऍग्री करशील असं वाटलं नव्हतं.. मला वाटलं आता मुलाला मिळवण्यासाठीपण तरसावा लागतं की काय??'- रवी हसत हसत म्हणाला..

'फाईट?? मी असेन तर ना.. आय मीन इन्टरेस्टेड असेल तर असं म्हणायचं होत मला..'- संध्याची नजर अजूनही अल्बमवरून हटली नाही तसा रवी कुतूहलाने पुढे गेला आणि त्याने अल्बमवर नजर टाकली तशी संध्या त्याच्याकडे बघून हसली..

'अरे, आपल्या तिघांचे फोटो आहेत.. तु, मी आणि आपला लेक.. आपण फिरायला जायचो ना तेव्हाचे.. किती खुश दिसतंय माझं पिल्लू.. गोंडस.. '- संध्या मायेने त्याच्या फोटोवरून हात फिरवत होती..

'ए रवी, मी खरच भयंकर वाईट बाई आहे ना रे?? बघ ना; माझं पाहिलं प्रेम मी कधीच विसरले नाही, त्यामुळे ना कोणाची बायको होऊ शकली आणि ना कोणाची आई.. देव माफ करेल का रे मला?? काय म्हणतोस??'- संध्या हसत जरी असली तरी ती आतून तितकीच दुःखी होती..

'हे आर यु ओके?? कालपर्यंत आशिष साटम माझं प्रेम होतं आणि असेल अशा गोष्टी करणारी संध्या आज??'- रवी गोंधळला..

'सोड ना रे.. आय एम रियली सॉरी.. मी खूप हर्ट केलं तुला.. आशिषला कधीच सांगू नकोस की त्याची मम्मा होती म्हणून.. सांग त्याच्या लहानपणीच गेली म्हणून..'- संध्याची नजर छताकडे खिळली होती तर डोळयांत पाणी आलं..

'ये बाई, काय बोलतेस अशी?? आणि..आणि काय मनात आहे तुझ्या?? वर काय बघतेस नेमकं?'- तिला वर छताकडे बघताना पाहून रवी घाबरला..

'ये पागल, मी काय सुसाईड वगैरे करणार नाहीये.. आणि त्या शरयू सारखंपण काही करण्याचा माझा विचार नाही.. '- संध्याने हसून त्याच्या हातावर चापटी मारली..

'संध्या, आय.. आय स्टील लव्ह यु..'- न राहवून रवीच्या तोंडून बाहेर पडलं..

'माहीत आहे रे मला.. नाहीतर मी एवढा त्रास देऊनसुद्धा माझ्या मदतीला असा उभा राहिला नसतास आणि ते पण आशुच्या केससाठी..'- संध्याने त्याच्या खांद्यावर थोपटत म्हटलं..

'रवी आज इथेच थांब ना.. एवढ्या रात्री कुठे जाशील..'- संध्याने त्याला काळजीने म्हटलं..

'हो, मी इथे बाहेर हॉलमध्ये झोपतो... तु इथे याच्यासोबत झोप..'- रवीने बेडवर झोपलेल्या लेकाचा किस घेत तिला म्हटलं..

'ठीक.. तु म्हणशील तसं..'- संध्या बोलली...

रवीला आज संध्याचा नूर वेगळाच वाटला होता.. तो बेडरूमच्या बाहेर पडताना सारखा सारखा मागे वळून पाहत होता.. संध्या आशिषच्या बाजूला झोपून त्याला मायेने थोपटत होती..

'आई, मुलीवर लक्ष ठेवा तुमच्या.. मला तिची लक्षण काही चांगली दिसत नाहीत.. मला.. मला खूप भीती वाटते..'- रवी मनातून घाबरलाच होता..

'अरे मग तु तिला असं एकटीने का सोडून आलास.. तु..'- हंसाबाई पुढे काही म्हणायच्या आतच रवी मागे फिरून परत संध्याच्या बेडरूममध्ये शिरला होता..

संध्याला जागं पाहून त्याची चिंता अजून वाढली..

'तु..तु झोपली नाहीस?? मी..मी इथेच झोपणार..'- रवी कसेबसे शब्द जुळवत म्हणाला..

'झोप ना.. कोणी अडवलं आहे मग??' - संध्याने त्याला हसत म्हटलं तसा तो जास्तच गोंधळला..

'तुला.. तुला काही प्रॉब्लेम नाही?? मला वाटलं... '- रवीने बोलण्याचा प्रयत्न केला तस संध्याने त्याला हात दाखवून गप्प केलं..

'नको रे एवढा विचार करूस.. झोप तिथे कोचवर..'- संध्या बोलली..

'ओके.. गुड नाईट..'- रवी..

'गुड नाईट डिअर..'- संध्या..

                               --##--

दोन आठवड्यानंतर; आशिषच्या केसची सुनावणी होती.. आशिष आणि त्याच कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात होतं.. रवी वकिलीचा कोट घालून तयार होता.. पहिल्या सुनावणीवेळी आशा, संध्या आणि हंसाबाई सुद्धा हजर होत्या.. सर्वांना प्रतिवादी शर्वरीची आणि तिच्या वकिलांची प्रतीक्षा होती.. 

कोर्टाच्या कामकाजाच्या वेळेआधी काही मिनिटं आधी शर्वरी हजर झाली होती.. तिच्या मागचे वकील पाहून; आशिष आणि हंसबाई सोडल्या तर सगळेच आश्चर्यचकित झाले होते.. माधवराव आपला कोट सांभाळत कोर्टात हजर झाले होते..

त्यांनी कोर्टात हजर होत, आशिषकडे पाहिलं होतं.. आशिषने हसून त्यांचं अभिवादन केलं होतं; परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून माशी हलली नव्हती..

प्रतिस्पर्धी म्हणून माधवरावांना पाहून; रवीला आधीच घाम फुटला होता.. केसची सगळी भिस्त आता; सुधाकर मामांच्या किमयेवर होती.. रवीच्या चेहऱ्यावर त्याचा हरवलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसला तस आशिषने त्याला जवळ बोलवत त्याला कानात काहीतरी सांगितलं होतं..

क्रमशः

3


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all