अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 4

This part is in continuation with earlier series.

भले संध्याने रवी आणि हंसाबाईना ती ठीक असल्याचं सांगितलं असलं तरी तिच्या एकूण भावमुद्रेवरून सर्वांचाच गोंधळ उडाला होता.. रवीला तर तिच्या शांतपणाचेच जास्त टेन्शन येऊ लागले होते..

-आई, मला वाटत की तुमचं बोलणं संध्याच्या जास्त जिव्हारी लागलं असावं, तुम्ही तिला या क्षणी असे नको बोलायला हवे होते असे मला वाटतंय..

रवी, अरे बाळा तिचा आवेग रोखणे खुप गरजेचं होतं नाहीतर आशिष वरच्या अडचणीने ती आधिच इतकी गांगरली आहे की काय योग्य आणि काय चूक हे सुध्दा तिला कळेनासं झालंय.. - हंसाबाई मात्र आपल्या मतावर ठाम होत्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर संयम होता.. 

रवी, ती बोलली आहे ना एक तास द्या म्हणून तर आपण एक तासाने बघू तिची मनस्थिती.. मी आणि आशा स्वयंपाकाचा बघतो तोपर्यंत तू आशु सोबत बस.. या सर्वाचा त्याच्या वर कोणताच परीणाम झाला नाही पाहिजे याची किमान तु आणि मी तरी काळजी घ्यायला हवी..

'ठीक आहे आई, तुम्ही म्हणाल तस..'- एवढं बोलून रवी आशुकडे गेला आणि हंसाबाई आणि आशा दोघी स्वयंपाकाला लागल्या..

स्वयंपाक सुरु करण्याआधी हंसाबाईनी कोणाला तरी फोन लावला आणि त्यांनी समोरील व्यक्तीला आज एक रात्र त्यांच्याकडे राहण्यासाठी बोलवलं होत आणि त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून समोरील व्यक्तीने देखिल येण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता..

इकडे झोपाळयावर झोके घेत संध्या पुर्णपणे तिच्या भूतकाळात शिरली होती..

आशिष साटम!! - संध्याच पाहिलं आणि आजपर्यंतच शेवटचं प्रेम.. भले नियतीने त्या दोघांना एकत्र केलं नसेल पण संध्या आजही आशिषवर जिवापाड प्रेम करत होती.. 

संध्या ही एका गर्भश्रीमंत घरण्यातली.. वडील अरविंद शिर्के ; एका नामांकित कंपनीत उच्च पदावर तर आई हंसा शिर्के भारतीय गुप्तहेर खात्यात महत्वाच्या पदावर.. संध्या दोघांची एकुलती एक मुलगी.. त्यामुळे साहजिकच लहानपणापासून तिचे भयंकर लाड केले गेले.. तिने एखादी गोष्ट मागण्याचा अवकाश की ती गोष्ट तात्काळ हजर.. त्यामुळेच कदाचित तिचा स्वभाव जास्त हट्टी आणि गर्विष्ठ होत चालला होता.. पण आपआपल्या कामाच्या व्यापात असलेल्या अरविंदराव आणि हंसाबाईना जाणवून सुद्धा लेकीसाठी वेळ काढणं अशक्य झालं होतं.. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून संध्याच्या स्वभावात कमालीचा चिडचिडेपणा आला होता..

अखेरीस हंसाबाईनीच निर्णय घेत संध्याला बारावीनंतरच्या वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचे ठरवले.. त्यांचा हेतू हाच होता की तिथे संध्याला अधिक लोकांची ओळख होईल , नवे मित्र मैत्रिणी होतील, मानवी स्वभावांचे विविध पैलू तिला पाहायला भेटतील आणि त्यातून तिच्या स्वभावमध्ये चांगले बदल घडतील.. अरविंदराव या निर्णयावर फारसे खुश नव्हते पण हंसाबाई आपल्या निर्णयांवर ठाम असल्यामुळे नाईलाजाने तयार झाले होते.. 

दोघांनी मिळून कसंबसं संध्याला पुण्याला जाण्यासाठी तयार केलं होतं. तिला आरामशीर राहता यावं म्हणून अरविंदरावांनी तिच्या कॉलेज जवळच एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता.. जेवण बनवण्यासाठी आणि घरातली काम करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पुणेकर मित्राच्या ओळखीतल्या साटम काकींना ठेवलं होत.. 

संध्या ही श्रीमंत आईबापाची अतीलाडाने बिघडलेली मुलगी आहे हे साटम काकींना त्यांच्या कामावरच्या पहिल्याच दिवशी जाणवलं होतं..  संध्याला तिच्या घरी संस्कार कमीच मिळाले आहेत हे तिच्या एकेरी संभाषणावरून त्यांना समजलं होतच पण तरीपण त्या संध्याशी मायेनेच वागायच्या.. तिला काय हवं नको याकडे त्या मनापासून लक्ष द्यायच्या.. संध्याने कितीही आरडाओरडा केला तरी साटम काकींनी कधीच तिला प्रत्युत्तर केलं नव्हतं.. उलट आधिच कनवाळू स्वभावाच्या अजून जास्त आपुलकीने तिचं सर्व करायच्या..या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे संध्याच वागणं आता हळूहळू बदलू लागलं होतं..आता साटम काकीचा संध्यालापण लळा लागू लागला होता.. कित्येकदा हंसाबाई आणि  अरविंदरावांचे बोलणे टाळणारी संध्या साटम काकींचे मात्र बऱ्यापैकी बोलणं ऐकू लागली होती.. आधीची एकेरी हाक आता आदरार्थी झाली होती.. संध्यामधला हा सकारत्मक बदल पाहून साटम काकी पण मनोमन खुश होत होत्या..

संध्याचा आक्रस्ताळेपणा कमी झाला असला तरी तिची श्रीमंतीची घमेंड तशीच होती.. कॉलेजमध्ये सुद्धा तिची मैत्री असाच तोलामोलाच्या मुलं-मुलींसोबत होती.. कॉलेजमध्ये बाकीच्या मुलांनी त्यांच्या ग्रुपचं नामकरण ब्रँडेड ग्रुप म्हणूनच केलं होतं..

येता जाता लोकांच्या कपड्यांवर लो स्टॅंडर्ड कपडे म्हणून कंमेंट मारायच्या आणि त्यांना चारचौघात गावठी म्हणून हाक मारायचं आणि त्यांची फजेती बघत हसणं हा या ब्रँडेड ग्रुपचा आवडता छंद होता.. संध्या पण यात मागे नव्हती; कित्येक वेळा तर अशा इन्सल्ट मध्ये संध्याच जास्त पुढाकार घ्यायची.. मुले सुरुवातीला शिक्षकांकडे तोंडी तक्रार करत पण बड्या घरची धेंड म्हणून कॉलेज प्रशासन पण गप्प बसण्यातच शहाणपण समजून होतं आणि त्यामुळेच हळूहळू मुलांनी पण ब्रँडेड ग्रुपच्या तक्रारी करणं सोडून दिलं होतं..

याच गोष्टीचा गैरफायदा घेत दिवसेंदिवस या ग्रुपचे उपद्रव वाढतच चालले होते.. आता तर या लोकांनी नवीन नवीन प्रकार चालू केलं होतं.. कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर शिकणारी मुल- मुली हेरून त्यांच्या गरिबीचा फायदा घ्यायचा आणि त्यांच्या कडून आपली वैयक्तिक काम करून घ्यायची असले धंदे चालू झाले होते.. आणि या सर्वांना ते आपले बटलर (नोकर) म्हणत.. कॉलेजमध्ये सर्वच जण त्यांच्या या वागण्याने त्रस्त झाले होते.. 

या वेळेस मात्र कोणीतरी कॉलेज प्रशासनाकडे पहिल्यांदाच लिखित तक्रार केली होती आणि तक्रारीचा मुख्य रोख होता तो कु. संध्या शिर्के वर.. तक्रारदाराने कॉलेज प्रशासनाने कारवाई न केल्यास पोलिसांत जाण्याची तयारी असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले होते आणि त्यामुळेच नाईलाजाने का होईना कॉलेज प्रशासनाने ब्रँडेड ग्रुपच्या सर्व सदस्यांना सक्त ताकीद दिली होती तर संध्याचं नाव विशेषतः नमूद असल्यामुळे तिच्या आई- वडिलांना याबाबत सूचना देत सतर्क करण्यात आले होते.. एकूण साऱ्या प्रकरणात संध्यालाच सर्वात जास्त ओरडा भेटला होता आणि घरातून आई-बाबांनी खडसावले ते वेगळेच.. 

पण या सर्वातून धढा घेत सुधरेल ती संध्या कसली.. तिने या सर्व गोष्टीचा सूड घ्यायचा ठरवला.. ज्या व्यक्तीने आपली कॉलेजला तक्रार केली त्या व्यक्तीला शोधून तिला जन्माची अद्दल घडवायची असा चंगच संध्याने बांधला होता.. 

बऱ्याच लोकांकडून शोध घेतल्यानंतर ब्रँडेड ग्रुपला तक्रारदार व्यक्तीच नाव कळलं होतं आणि ते नाव होतं ते त्यांची ज्युनिअर-कु. आशा साटम.. 

पण तिने आपलं नाव का घ्यावं याचा विचार करता करता तिला आठवलं की काही दिवसांपूर्वी तिला कळलं होतं की आशा एका गरीब कुटुंबातून असून ती स्कॉलरशिपच्या पैशांवरच आपले शिक्षण पूर्ण करत आहे. एवढंच नव्हे तर आशा वापरत असलेली पुस्तके सुद्धा ति शक्य तेवढी अगोदरच्या बॅचच्या सिनिअर मुलांना विंनती करून वापरते.. हे ऐकून संध्या खुश झाली होती कारण तिला वाटलं होतं की एवढया गरीब मुलीला तर मी चुटकीसरशी  आपली बटलर बनवेल..

असंच एकदा आशाला एकटं बघून संध्याने तिला कॉलेज लायब्ररीत गाठलं होतं.. 

-हे यु, पिंक ड्रेस गर्ल.. स्टॉप.. आय सेड स्टॉप..- संध्याने जवळपास एका हाताने ओढुनच थांबवलं होत.. कारण अस पण संपुर्ण कॉलेजमध्ये संध्या आणि तिचा ग्रुप कुप्रसिद्ध असल्यामुळे आशा शक्य तितके त्यांना टाळायची पण आज ती संध्याच्या तावडीत सापडली होती आणि संध्याने एका हातात ओढून थांबवल्याने आशा पळू पण शकत नव्हती..

"ताई, प्लीज जाऊ दे ना मला, माझं लेक्चर मिस होईल.. प्लीज"- आशा संध्याला विनवणी करतच होती..

'ओह गॉड, काय म्हणालीस तु मला? ताई? ताई म्हणालीस? किती ते टिपिकल लो क्लास रे तुम्ही..'- संध्या मुद्द्दाम जोरात हसत होती म्हणजे अजून चार जणांच्या नजरा त्यांच्यावर जातील.. 

'हे लिसन, हे मला असं ताई वगैरे काही बोलायच नाही हा आधीच सांगतेय.. कॉल मी माय लॉर्ड.. कळलं काय म्हणायचं ते? माय लॉर्ड म्हणायचं तु मला..' - संध्याने अजूनपन आशाचा हात तसाच पकडून ठेवला होता आणि तोच जोरात खेचून ती आशाला धमकी देत होती.. 

' एन यू आर नाऊ माय बटलर.. कळलं यू आर माय बटलर, मी सांगेन ती माझी सर्व काम चुपचाप करायची'..

"आणि मी तुझं नाही ऐकलं तर?"- आशाने पण यावेळेस संध्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं होतं..
" मी ना तुझी बटलर आहे आणि नाही मी तुला माय लॉर्ड म्हणणार.. आणि हो आहे मी लो क्लास पण माझा पण एक स्वाभिमान आहे; त्यामुळे तू दुसरं कोणाला तरी बघ आणि मला परत त्रास देशील तर मी तुझी तक्रार करेन"- एवढं बोलून आशाने  संध्याला जोरदार हिसका देत आपला हात तिच्याकडून सोडवून घेतला होता आणि ती आपल्या वर्गात गेली होती..

संध्याला पहिल्यांदाच कोणीतरी एवढं जोरदार प्रत्युत्तर केलं होतं आणि ते पण चारचौघात केल्यामुळे तिची तळपायाची आग मस्तकाला गेली होती पण संध्या काही करण्याचा आत आशा वर्गात शिरल्यामुळे संध्याला काही करता आलं नव्हतं..

मागचा प्रकार संध्याला आठवला तस तक्रारीमध्ये तिचं नाव विशेषतः नमूद केल्याची लिंक लागली होती.. 

या वेळेस या मुलीला मी सोडणार नाही, अशी पण तिची मागची उधारी बाकीच आहे आणि आता तर तिने हाईटच केली आहे.. हिच्यामुळे मला जितका ओरडा खावा लागला आहे तो सर्व मी हिला नाय सूद समेत परत दिला तर नावाची संध्या नाही..- संध्या आता आशाच्या नावाने शिव्या घालत होती..

 शेवटी संध्याने आशाला धडा शिकवण्यासाठी तिच्या ग्रुप बरोबर मिळून एक प्लॅन बनवला  आणि त्यानुसार ते आशाला पुर्ण कॉलेजसमोर बेइज्जत करतील जेणेकरून आशाला कायमस्वरूपी आपली भीती राहील आणि ती आपली माफी मागेल..

पण संध्याला हे माहीत नव्हतं की तिचा हा एक प्लॅन तिचं संपुर्ण जीवन पुर्णपणे बदलून टाकणार आहे.. तिच्या जीवनातली सारी वादळ ती या एका प्लॅनमुळे ओढवुन घेणार होती..

क्रमशः

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all