Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 49

This part is in continuation with earlier series.

आशिष काय समजायचं ते समजून गेला होता..शरयूने शेवटी सुड  उगावलाच होता.. कसंबसं आई-वडिलांना सावरून तो पोलिसांच्या गाडीत बसला होता..

 एक वकील आज स्वतः एक आरोपी झाला होता..

                              --------
'आशिष.. आशिष..'- सकाळी सकाळी शरयूच्याच हाकेने आशिषचे डोळे खाडकन उघडले होते.. डोळे चोळत तो उठला तोच त्याला शरयूच्या कडेवर रडत असलेली अश्विनी दिसली होती..

'ओह स्वप्न होतं तर... ओ गॉड.. थँक्स अलॉट.. थँक्स अलॉट..'- आशिष मनोमन देवाचे आभार मानत असला तरी आतून घाबरलाच होता.. खरंच शरयूने असं काही केलं तर..

'ओ मिस्टर?? कुठे हरवलात?? बायकोची नाही तर किमान लेकीची तरी फिकीर करशील की नाही?? इतका वेळ बाबा बाबा म्हणून रडतेय, ऐकू येत नाही की तिला पण माझ्यासारखं वाऱ्यावर सोडलं आहेस??'- शरयूचे टोमणे काही कमी झाले नव्हते..

'गप्प बस ग बाई.. सकाळ सकाळीच डोकं नको खाऊस.. आन तिला इकडे.. आले माझा बच्चा.. का लडते तु??'- आशिषने उठून लेकीला घेतलं तशी ती आनंदाने हसू लागली होती..

'बापाला पण मी नको आणि पोरीला पण मी नको.. अवघडच आहे माझं बिचारीच..'- शरयूने लेकीकडे बघत म्हटलं तस आशिषला हसू आलं..

'हसा, हसा आमच्या लाचारीवर हसा..'- शरयू गाल फुगवत म्हणाली..

'तु आज छान दिसतेयस शरयू..'- नुकतीच आंघोळ करून आलेल्या शरयुकडे पाहत आशिषने तिला दाद दिली होती..

'काययय?? तु.. तु माझी तारीफ केलीस?? माझी तारीफ??'- त्याच्या तोंडून स्तुती ऐकून तिचे डोळे विस्फारले होते..

'का?? काल तुझी चोरी पकडली म्हणून?? मलमपट्टी लावतोस??'- शरयुला संशय आला तसा तिने तो व्यक्तपण केला..

'बघ त्या बाबतीत मी माझं कालच क्लिअर केलंय.. मला काहीही फरक पडत नाही.. बट मला आज तुझ अस रूप आवडलं म्हणून मी म्हटलं.. बाकी तुझ्या थिंकिंगवर माझं काहीच नियंत्रण नाही सो...'- आशिषने लगेच स्पष्टीकरण मांडलं होतं..

'का असं वागतोस रे तु माझ्यासोबत?? जर वाईटच वागणार असशील तर वाईटच वाग ना रे.. '- तोंड पाडून शरयू बेडरूमबाहेर पडली होती..

'विचित्रच आहे ही.. शिव्या घातल्या तरी प्रॉब्लेम आणि चांगलं म्हटलं तरी प्रॉब्लेम..'- आशिष मनाशीच बोलला आणि लेकीबरोबर खेळण्यात गुंतला होता...

काही वेळाने अश्विनीला आईकडे सोपवून तो आंघोळीला गेला होता.. बाहेर येताच त्याच्या नाकात शिऱ्याचा वास शिरला होता..

'व्वा बाबा, आज आईचा मूड चांगला आहे वाटतं.. आज दाबून शिरा खाणार मी..'- आपल्या आवडीच्या नाश्त्याच्या वासाने आशिष खुश झाला होता..

बाबा त्याला काही सांगणार तितक्यातच साटम काकी अश्विनीला बाहेरून फिरवून घरी परतल्या होत्या.. आईला आत येताना बघून आशिष चक्रावला होता..

'मग शिरा??'- त्याने प्रश्नार्थक चेहरा करत वडिलांना विचारलं तसा त्यांनी डोळ्यांनी त्याला इशारा केला.. समोरून शरयू शिऱ्याच्या प्लेट्स घेऊन येत होती...

'आई, द्या तिला माझ्याकडे.. तुम्ही शिरा खाऊन तुमच्या गोळ्या खाऊन घ्या.. आणि बाबा, ही तुमची प्लेट आहे.. डायबेटीस स्पेशल..'- लेकीला घेऊन शरयू किचनमध्ये परतली होती.. 

सारेचजण तिच्या अशा बदलण्याने चाट पडले होते..

'आशिष, अरे ठीक आहे ना रे ही?? हीने तर आजच्या दिवसाची सुरुवात आदळआपटीने करायला हवी होती.. पण ही तर?? मला तर भीती वाटतेय ओ..'- शरयूच्या दशहतीने साटम काकींनी आपली भीती व्यक्त केली तशी साटम काकांनीसुद्धा त्यांच्या बोलण्याला मान डोलवली होती..

'जे चाललं आहे तसेच चालू द्या... आपण फारतर सावधगिरी बाळगू शकतो..'- आशिषने बोलता बोलता प्लेटमधला शिरा फस्त केला होता.. प्लेट उचलून तो किचनमध्ये वळला होता की त्याच्या कानावर शरयूची वाक्य पडली होती..

'खा न बेटा.. तु अस केलंस तर तुला ताकद कशी येणार?? पुढे मम्मा तुझ्यासोबत नसली मग? मग कोण तुला मस्का मारेल एवढा?? चल..चल... खा पटपट.. पप्पासारखी मोठी वकील बनायचं आहे ना?? चल शहाणी माझी ती बच्चू..'- शरयू अश्विनीला शिरा भरवत होती..

'अरे यार.. ही बया तर माझ्या समजण्यापालिकडे आहे..'- तिच बोलणं ऐकून आशिष नव्याने गोंधळला होता..

'शरयू.. थँक्स फॉर शिरा.. छान झाला होता..'- आशिषने शरयुला म्हटलं तशी तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती...

'तुला आवडला पण तुझ्या लेकीला काही आवडलेला दिसत नाही..बघ कशी नाटकं करतेय ती..'- शरयूने लेकीचा गाल ओढत तिची लाडीक तक्रार केली..

'सोना, मम्माला त्रास नाही द्यायचा असा.. चल पटकन संपवून टाक बरं..'- आशिषने तिच्या केसातून हात फिरवताच तिने हसून शिरा खाण्यासाठी तोंड उघडलं..

'शीट.. काय पोरगी आहे.. इतका वेळ मी माथाफोडी केली तेव्हा नखरे करत होती.. अगदी बापावर गेली आहे.. आम्ही कितीही केलं तरी आम्ही वाईटच.. तूच भरवत बस आता हिला..'- शरयू रागाने प्लेट ठेवून निघाली तस आशिषने तिला अडवलं आणि त्याला शरयूच्या रागाचे हसू आलं..

'तुला हसायला काय झालं??'- शरयू चांगलीच वैतागली होती..

'एकतर आज इतकी गोड दिसतेस.. नाष्टा पण गोड बनवलास.. मग आता मध्येच तिखट का होतेस?? चिल ना यार.. लहान आहे ग ती.. एरव्ही तुझ्यासोबतच असते ना ती.. काय शरयू तु पण ना..'- आशिषने हसून तिला समजावलं तस तिलापण स्वतःच हसू आलं..

'अरे मी थोडी तापट आहे ना रे.. आपली माणसं अशी स्वतःला माझ्यापासून दूर करायला लागली तर वाईट वाटतं रे.. चिडचिड होते मग माझी..तु असापण माझ्याजवळ कधी आलाच नाहीस.. आई-बाबा पण माझ्याशी इतके मोकळे नाहीत..ऍग्री की त्याला मीच जबाबदार आहे.. पण तरीही.. हिला सोडलं तर मला आपलं म्हणणारे कोणीच नाही ना रे.. म्हणून..'- शरयूच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

'शरयू, संध्या माझं एकमेव प्रेम आहे...त्यामुळे तिची जागा तुला भेटणं अशक्य आहे.. पण..'- आशिष बोलता बोलता थांबला होता..

'पण माझ्या लाईफमध्ये फ्रेंड कमीच आहेत ग.. तु.. तु माझी फ्रेंड होशील??'- आशिषने तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता..

'चालेल.. नाही धावेल.. कमीतकमी त्या निमित्ताने तरी मला तुझ्यासोबत राहता, बोलता येईल..चालेल..चालेल..'- शरयू आत्यंतिक आनंदाने आशिषला मिठी मारायला पुढे गेली होती पण जागीच थांबली होती.. शेवटी आशिषनेच हसून तिच्यासमोर हात पसरत तिला आपल्या मिठीत घेतलं होतं..

'थँक्स आशिष.. धिस मिन्स अलॉट टु मी.. मी..मी आज खूप खुश आहे रे.. खूप..खूप... म्हणजे खूप खुश..'- शरयुला अजूनही विश्वास बसत नव्हता..

बाहेरून साटम काका-काकी कपाळावर हात मारून बसले होते.. या नव्या घडामोडी त्यांच्या डोक्यावरून जात होत्या..शेवटी त्यांनी सर्व निर्णय कालचक्रावर सोडला होता..

बाहेर येऊन आशिषने आज रात्री आपण सर्वजण डिनर साठी बाहेर जाणार असल्याचे जाहीर केले होते... साटम काका-काकींनी यावर फक्त मान हलवून होकार दिला होता..

ऑफिसला पोहचताच आशिषने संध्याला फोन करून; तिला शरयूमधल्या स्वभावबदलाची कल्पना दिली होती.. त्यावर तिनेही त्याबद्दल आनंद व्यक्त करत ; आशिषने तिच्याशी मैत्री करण्याच्या निर्णयाचं समर्थन केले होते..

शरयूने देखिल माधवरावांना फोन करत त्यांना सध्या शांत राहण्यासाठी विनवले होते.. तिच्यामते तिने आशिषवर अधिकच जबरदस्ती करणे चुकीचे होते.. तिचा नवा निर्णय ऐकून माधवररावपण पलीकडे चाट पडले होते.. 

शरयूच्या वागण्यातला बदल आता सर्वांनाच जाणवू लागला होता.. ती घरात सर्वांशी पुन्हा प्रेमळ वागू लागली होती.. यावेळेस मात्र तिला कोणाकडूनही कोणत्याच परताव्याची अपेक्षा नव्हती.. आशिष आणि तिच्यात छान मैत्रीचं नातं बहरला होतं.. एक-दोन वेळेस काही नव्या खटल्यांची माहिती त्याने संध्याआधी शरयुला दिली होती.. महिन्यातून एक-दोन दिवस ते दोघेच बाहेर जाऊन भटकून येत.. शरयुला आशिष भेटणार नसला तरी तिला त्याच्या सोबतचा प्रत्येक मोमेंट जगायचा होता..साठवून ठेवायचा होता.. आणि त्या मागचं कारण सध्या तरी फक्त आणि फक्त तिलाच माहीत होतं..

                              ---##---

'हे आशिष... कसा आहे माझा बच्चा?? मम्माची आठवण येते की नाही??'- संध्या आज खूप दिवसांनी रवीच्या घरी आली होती.. तिला पाहताच छोट्या आशिषने सरळ तिच्याकडे धाव घेतली होती.. पुढची काही मिनिटे दोघांची एकमेकांना लाडाने किस करण्यातच गेली होती.. हॉलमध्ये उभा राहून रवी मायलेकांची गळाभेट बघत बसला होता..

'हाय संध्या..वेलकम..'- न राहवून रवीने म्हटलं..

'हाय रवी, कसा आहेस रे?? खूप बारीक होत चालला आहेस तू?? जेवतोस की नाही??'- संध्याचा काळजीतला स्वर ऐकून रवी मनातून सुखावला होता..

'ताई, आपलं प्रेम आपल्यापासून खूप दूर असलं आणि त्यातही ते आपल्याला कधीच नशिबात नसल्याची जाणिव ज्या माणसाला असते; तो माणूस कधी सुखात राहू शकतो का ग??  आणि जर तो सुखात नसेल तर स्वतःकडे लक्ष देण्याचं भान त्याला राहील का ग??'- अचानक किचनमधून बाहेर आलेल्या वैदेहीला पाहून संध्या चमकली..

'वैदी.. व्हॉट अ सरप्राईज डिअर.. '- दोघींनीं एकमेकींना मिठी मारत  अभिवादन केले होते..

'रवी, यार सावर रे स्वतःला..  किती दिवस असा माझ्यात गुंतून राहणार आहेस..जर तु स्वतःची काळजी नाही घेऊ शकलास तर तू आशिषची काळजी घेऊ शकशील का?? आवर रे स्वतःला... नाहीतर मला आशिषची कस्टडी क्लेम करावी लागेल हा..'- संध्याने त्याला हळू आवाजातच ताकीद दिली होती..

'ताई..'- वैदिला राग आला तसा तिने संध्याला आवाज दिला.. 

'वैदी.. मला कळतंय मी काय बोलतेय.. तुझ्या एवढीच मलापण त्याची काळजी आहेच.. तो माझा नवरा नसला तरी एक मित्र म्हणून मला त्याच्याबद्दल आपुलकी आहे..'- संध्याच्या बोलण्याने रवी सुखावला होता तर वैदीही शांत झाली होती.

'सोड ना ग सगळं.. चालायचेच..होईन हळूहळू नॉर्मल.. बाकी तु कशी आहेस?? '- रवीने विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता..

'मी ठीक आहे आणि मम्मा पण चांगली आहे.. तु टॉपिक बदलू नकोस..का हेळसांड करतोयस स्वतःची?? माझ्या आठवणीत?? रवी? '- संध्या काही आपला मुद्दा सोडणार नव्हती..

'सोड ना.. तुला काय करायचंय.. मी माझं आणि माझ्या मुलाचं बघून घेईन.. तु.. तु सांभाळ स्वतःला.. तुझा तो आशिष शरयुसोबत..'- रवी रागाने बोलता बोलता अचानक शांत झाला होता..

'कीव येते रे रवी तुझी.. अजूनही बदलला नाही आहेस तू.. बिल्कुल नाही.. बघितलं वैदीही.. याला काहीही समजवायला गेलं की विषय आशिषवर नेणार म्हणजे नेणारच.. अरे आशिष आणि शरयू मित्र आहेत एकमेकांचे आता.. महिन्यातुन तीन-चार वेळा फिरायला जातात ते दोघेजण.. मलासुद्धा माहीत आहे ते.. तुला याच्यापेक्षा वेगळं काही माहीत असेल तर सांग..'- संध्यापण चांगलीच इरेला पेटली होती..

'आणि तुला एवढंच फिल होतं तर तू माझ्यासोबत चल.. आपणपण मित्र बनून फिरू.. आणि जर तुला एकट्याला जेवण जात नसेल तर रोज आमच्याकडे जेवायला येत जा...अगदी बिनधास्तपणे.. काय वैदी? तुला पटतंय की नाही ग..'- संध्याच्या प्रश्नावर तिने मान डोलवली होती..

'आय एम सॉरी..मला तुला असं दुखवायच नव्हतंच..'- रवी खाली मान घालून उभा राहीला होता..

'तु बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा; विचार करून बोलशील तर जास्त फायदा होईल असं वाटत नाही तुला?? म्हणजे तुला अस कोणाला सारख सॉरी म्हणावं लागणार नाही..'- संध्याने रवीचा गाल ओढत त्याला समजवलं..

'वैदी, या संडेला, आपण सर्वजण पिकनिकला जाऊत?? चालेल का??'- संध्याने प्रस्ताव मांडला तसे सगळ्यांनी खुश होत होकार दिला होता...

                              ---##---

पुढचे काही महिने दोन्ही घरांत काहीशी शांतता होती.. आशिष आणि संध्याच्या भेटीगाठी सुरूच होत्या.. पण शरयुप्रमाणेच रवीनेसुद्धा आता त्या दोघाचं नातं स्वीकारलं होतं.. एक-दोन वेळेस तर त्या चौघांनी एकत्र पिकनिक काढत मज्जा केली होती.. 

साऱ्या आनंदात वर्ष सरले होते..

                               ---##---


साटमांच्या घरी आज पुरणपोळीचा बेत होता.. शरयूने साटम काकींच्या विनंतीवरून माधवरावांनासुद्धा जेवायला बोलावलं होतं.. साटमकाकी मधल्या काळात परत सर्व विसरून शरयुवर मुलीसारखी माया करू लागल्या होत्या.. त्याच प्रेमाने आज त्या तिला पुरणपोळी करायला शिकवत होत्या..

सारं काही सुरळीत चालूच होत.. साटम काकी वाटलेलं पुरण काढायला भांड घेण्यासाठी वळल्याच होता की शरयू प्रचंड वेदनेने खाली कोसळली होती..

'शरयू.. अहो, आशिष धावा..'- वेदनेने जमिनीवरच लोळणाऱ्या शरयुला पाहून साटम काकीनीं दोघांना आवाज दिला होता..

अश्विनीला शेजारच्या जोशी कुटुंबाकडे सोपवत, सर्वजण शरयुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते.. माधवरावांनीपण थेट तिकडेच धाव घेतली होती..

शरयूची वेदनेने तळमळ पाहून; माधवराव आणि साटम परिवार मोठया चिंतेत पडले होते..

'तिला कळलं तर ती येणार म्हणजे येणारचं.. आणि एकदा का ती आली मग कोणाचेच काही खरे नाही..शरयू तिच्यासमोर काहीच नाही ; शर्वरीचा सामना कोणीच करू शकत नाही..कोणीच म्हणजे कोणीच नाही.. '- माधवराव बोलून गेले होते पण त्याचा अर्थ कोणालाच लागत नव्हता..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all