'तुला जे करायचं ते तु कर.. माझ्या बहिणीच्या संसार वाचवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते ते मी करणारच..'- आशिषने तिचा इशारा झिडकारला होता..
'याचे खूप वाईट परिणाम होतील आशिष.. खूप वाईट परिणाम..'- शरयू तणतणत आत बेडरूममध्ये निघून गेली होती..
-----------
साटमांच्या घरी; रात्रीची जेवणं आटपून सर्वजण आपआपल्या खोलीत परतले होते.. झोपायला जाण्याआधी आशिषने परत एकदा आशाला फोन करून राहुलच्या आजारासबंधी सर्व केसपेपर एकत्र करून सोबत घेण्यासाठी सांगितले होते..
आशाशी बोलून तो बेडरूममध्ये पोहचला तोपर्यंत छोटी अश्विनी गाढ झोपी गेली होती.. तिचा निरागस चेहरा पाहून आशिषला आज तिच्यासोबत खेळता न आल्याची खंत जाणवली तसा तो दुःखी झाला.. बेडजवळ पोहचून त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.. खाली वाकून त्याने हळुवार तिच्या माथ्याचे चुंबन घेतले..
'कधी तरी बायकोलापण अस जवळ घेत जा आशु?'- मागून शरयूचा आवाज आला तसा तो मागे वळला..
'आशिष.. आशिष म्हण.. मघाशी सांगितलं ना मी तुला'- आशिषच्या बोलण्यात चीड होती..
'मी पण तेव्हाच क्लिअर केलं होतं तुला.. मी तुझी लग्नाची बायको आहे आणि मी तुला आशुच बोलणार.. आशु.. आशु.. आशु..'- शरयूने आवाज वाढवला तसा आशिषने पुढे सरसावत तिच्या तोंडावर हात दाबून धरला..
इतक्या दिवसांनी त्याचा स्पर्श होताच शरयू मोहरली होती.. तिला गप्प करण्याच्या नादात तो तिच्या अगदी जवळ आला होता.. दोघांच्या शरीराचे एकमेकांना स्पर्श झाले होते, दोघांनाही दुसऱ्याचा श्वासोच्छ्वास जाणवत होता.. नकळतच्या जवळकीने शरयुला आनंद झाला होता.. तिने आवेगाने आशिषच्या कमरेभोवती दोन्ही हात गुंफत त्याला आपल्याजवळ ओढण्याचा प्रयत्न केला होता.. यावेळेस मात्र त्याचा नेमका उलटा परिणाम झाला होता.. आशिषने रागात तिला दूर ढकलून दिलं होतं..
'तु.. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची?? मी अश्विनीची झोप मोडू नये म्हणून तुझ्या भसाड्या तोंडावर हात ठेवला होता.. तु नको तो गैरसमज करून नको घेऊस.. कळलं?? चुकी एकदाच होते.. सारखी नाही..'- आशिषने शक्य तितक्या हळू आवाजात शरयुला सुनावलं..
'तु माझा हक्क डावलतो आहेस आशु.. कायद्यानुसार तु मला शरीरसुख देणं हा माझा हक्क आहे.. कळलं?? आणि जर तु ते नाकारत असशील तर मी माझा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तुझ्याविषयी तक्रार करू शकते.. त्यामुळे बऱ्या बोलाने माझ्या शरीराला लागलेली आग विझव.. नाहीतर..'- शरयूला काही करून आशिषला मिळवायचंच होतं.. मनाने नाहीतर शरीराने तरी..
'नाहीतर? नाहीतर काय? काय म्हणालीस तक्रार करशील? हा हा हा.. तुम्ही बायका पण विचित्र बरं हा.. तुमच्यातल्या काही जणी म्हणतात की आमचे नवरे आमच्यावर समाजमान्य बलात्कार करतात.. मग मी पण तुझ्यावर तशी तक्रार फाईल करू का?? की माझी बायको माझ्यावर शरीरसंबंधांसाठी जोरजबरदस्ती करते म्हणून? माझा मानसिक छळ करते म्हणून? करू का?? अरे जा ग.. तुझ्यासारख्या छप्पन बघितल्या.. जा झोप गप्प.. '- आशिष तिला झिडकारून बेडवर जाऊन पडला होता..
'तु माझ्यासारख्या छप्पन काय शंभर बघितल्या असशील आशु.. पण मला अजून पूर्ण कुठे बघितलं आहेस तु... तु फक्त आणि फक्त माझा आहेस आशु.. फक्त माझा.. '- शरयू रागाने लाल झाली होती..मनोमन तिने आशिषला धडा शिकवण्याचा चंग बांधला होता..
दुसऱ्या दिवशी दुपारी आशिष घरून निघेपर्यंत शरयूची घरात धुसफूस चालूच होती.. तिने घरात सर्वांना आशिषला संध्याला भेटण्यापासून रोखण्यासाठी विनवले होते, काही वेळा तर तिने साटम काका-काकूंना सरळसरळ धमकावले होते.. परंतु आशा आणि राहुलसाठी त्या सर्वांना संध्या एक आशेचा किरण वाटत होती; त्यामुळे कोणीच तिच्या बोलण्याला भीक घालत नव्हते तशी तिची चिडचिड जास्तच वाढत होती..
---##---
ठरल्या वेळेत आशिष राहुलच्या घरी स्वतः पोहचला होता.. राहुल आणि आशाला घेऊन तो तडक संध्याच्या हॉस्पिटलमध्ये पोहचला होता.. प्रवासात आशाने कित्येकदा विचारूनपण आशिषने डॉक्टरच्या नावाबद्दल चुप्पी साधली होती..
शेवटी एकदाचे तिघेही अबक हॉस्पिटलमध्ये पोहचले होते.. अपॉइंटमेंटच्या दहा मिनिटे आधीच पोहचल्यामुळे आशिष काहीसा निर्धास्त होता.. रिसेप्शनवर आपल्या नावाची नोंद दाखवून त्याने आपला नंबर आल्यास ते आवाज देण्यासाठी विनवले होते.. आपल्या नंबरची वाट पाहत तिघेही वेटिंग भागात बसले होते.. एक पाचच मिनिटात रिसेप्शनिस्टला कॉल आला होता आणि तिने आशिषला आवाज देत; त्याला डॉक्टरांनी आत बोलावले असल्याचा निरोप दिला होता..
डॉकटरबद्दल अनभिज्ञ असल्याने आशा; राहुलला घेऊन उठली होती आणि तिने रिसेप्शनिस्टने हात दाखवलेल्या दिशेने चालायला सुरुवातदेखील केली होती.. संध्यासोबत कालच भेट झाली असली तरी आशिषला आज परत हृदयात धडधडत होतं.. संध्याला पुन्हा पाहता येण्याच्या खुशीने त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या..
'दादा, अरे असा मागे का थांबला आहेस? इथून पुढे कुठे जायचं? डॉक्टरच नाव तर अजूनही सांगितलं नाहीस..'- आशाने काहीसं वैतागून म्हटलं तसा तो भानावर आला..
'ती.. ही केबिन सोडून पुढची केबिन..'- आशिषने हाताने तिला सांगितलं तशी ती त्या दिशेला वळली..
'दादा??'- केबिनवर असलेली डॉक्टरच्या नावाची पाटी पाहून आशा जागीच थबकली होती...
'नाही दादा.. अरे नाही.. माझ्यात नाही रे एवढी ताकद.. तिच्या नजरेला नजर मिळवण्याचा सोड; मला तिच्यासमोर उभंसुद्धा राहता येणार नाही रे.. किती चुकीचं समजलं होतो आम्ही तिला.. नाही दादा.. नाही...'- आशाला जुन्या आठवणींनी केबिन बाहेरच रडू कोसळलं होतं.. आशिष तिला धीर देण्यासाठी पुढे जाणार तितक्यात राहुल स्वतःहुन केबिनमध्ये शिरला होता.. त्याच्या मागोमाग नाईलाजाने आशाला जाणं भागच होत.. आशिषही आत पोहचला होता..
'हे संध्या.. हाऊ आर यु डिअर?? बघ तु मला भेटायला आली नाहीस ना म्हणून मीच तुला भेटायला आलो बघ.. पण मी पेशंट आहे बरं का तुझा?? चल मला त्या स्लीपिंग पिल्स देऊन टाक म्हणजे माझी कोणाला कटकट होणार नाही..'- राहुलने सुरुवात केली तस आशाला अजून रडू कोसळलं.. आत शिरल्यापासून तिने संध्याच्या नजरेला नजर मिळवली नव्हती..
'राहुल, तुला एक टास्क देते.. ही काही स्केचेस आहेत.. मला माझ्या घरी लावायची आहेत अरे.. बट मला थोडं कन्फ्युजन आहे.. तु ही सगळी स्केचेस बघून घे आणि मला सांग ना नंतर की तुला काय वाटतं यांना बघून..'- संध्याने बोलता बोलता पंचवीस-तीस छोटे स्केचेस राहुलसमोर ठेवली होती..
'आशा, आशु.. तुम्ही उभे का? बसा ना.. आशु, मला राहुलचे केसपेपर दे पटकन..'- आशिषने केसपेपर पुढे करताच संध्या ते वाचण्यात गर्क झाली होती तर आशिष तिला न्याहळण्यात..
'किती वर्कहोलिक आहे ही.. आज तर मस्तच दिसतेय.. डिझायनर साडी, मॅचिंग ब्लाऊज.. नेहमीसारखा लाईट मेकअप.. तसं बघायला गेलं तर तेवढी पण गरज नाही हिला.. आहेच सुंदर माझी संध्या.. हेअरस्टाईल तर एकदम लाजवाब.. व्वा.. संध्या आज किती भारी दिसतेस सांगू...'- आशिष आपल्याच विचारात हरवला होता..
'आशु, तु जर माझ्याकडे असा बघत बसलास तर मला कॉन्सनट्रेट नाही करता यायचं रे.. मग मला तुला बाहेर काढावं लागेल हा..'- संध्याने मध्येच त्याच्याकडे पाहत; हसून त्याला लाडाने दमटावलं तसा तो लाजला.. आणि हसून त्याने मान खाली घातली..
'आशा, बाकी तुझा भाऊ लाजतो छान ना?? हाऊ क्युट..'- संध्याने त्याला चिडवत म्हटलं तसा तो जास्तच वरमला..
'आशा, जस्ट रिलॅक्स.. पास्ट इज पास्ट.. जस्ट फरगेट इट.. तुझा तरी काय दोष होता त्यात.. रिलॅक्स.. तु स्वतःला जितकी लवकर सावरशील तितका लवकर राहुल स्वतःला रिकव्हर करू शकेल.. अदरवाईज याची कंडिशन तितकीशी चांगली नाही आहे.. लेट मी टेल यु क्लिअरली.. बट येस.. मी याला ट्रीट करू शकते.. या मंथ-एन्डपर्यंत तुझा राहुल तुला धडधाकट पाहता येईल.. ओके??'- संध्याने आशाच्या हातावर आपल्या हाताने थोपटत तिला धीर दिला..
संध्याला तस नॉर्मल वागताना पाहून आशाला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.. तिच्या डोळयातून पाण्याची धार लागली होती तस संध्याने लटकं रागवत तिला पुन्हा शांत केलं होतं..
'संध्या.. कान्ट बिलिव्ह यार.. तुझी चॉईस इतकी फालतू कधी पासून झाली?? किती निगेटिव्हीटी आहे या स्केचेसमध्ये?? फाडून टाक ही सगळी.. मी.. मी फाडु??'- राहुलने रागाने सर्व स्केचेस जमिनीवर फेकली तशी आशा आणि आशिषला संध्याच्या निदानातील सत्यता पटली होती..
'बरं बाबा, तु बोललास म्हणून.. माझंपण तसंच काहीतरी कन्फ्युजन होत होतं. जाऊ दे चल आपण यां दोघांना बाहेर पाठवून देऊ आणि आपण थोड्या गप्पा मारू.. चालेल ना?? सोड ती स्केचेस.. मी नंतर ती फेकून देईन..'- संध्याने आशा अन आशिषला डोळ्यांनी इशारा केला तसे ते बाहेर पडले..
साधारण एक पंधरा- वीस मिनीटांनी संध्याने दोघांना आत बोलावलं.. आशाने पाहिलं तर राहुलमध्ये एक प्रकारची हलकी शांतता दिसत होती.. त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.. बायकोला पाहताच त्याने तिला मिठी मारली होती.. आशा अन आशिष आश्चर्यचकीत झाले होते..
'तुम्हांला वाटत तस काही नाही आहे.. तो अजून ठीक झाला नाही आहे.. आता तर मी फक्त त्याला स्वतःला त्याच्या ट्रीटमेंटसाठी तयार केलं आहे.. काही स्पेशल अरोमाज वापरतो आम्ही सिटिंगमध्ये; त्यामुळे पेशंटला तात्पुरता रिलॅक्स वाटतं... बट ही विल लूज हिज टेम्पर सून.. आशिष; तु राहुलला घेऊन बाहेर थांब.. मला आशासोबत काही बोलायचं आहे..
आशिष आणि राहुल बाहेर गेल्यावर संध्याने आशाला राहुलच्या नाजूक मानसिक परिस्थितीची कल्पना दिली होती.. ती देतानाच तिने आपल्या बोलण्यातून आशाचा जुना आत्मविश्वास तिच्यात जागवला होता.. तिला तिचा जुना स्ट्रगल आठवणीत ठेवून आताच्या संकटाशी धीराने लढण्याची प्रेरणा तिने तिच्यात जागवली होती.. आशा आता बऱ्यापैकी शांत वाटू लागली होती.. तिच्या मुखावर नवऱ्याला ठणठणीत करण्याचा निश्चय तयार होत होता..
तिच्यातल्या सकारात्मक बदल टिपून संध्याने तिचं अभिनंदन केलं होतं तशी भावना अनावर होऊन आशाने संध्याला मिठी मारली होती.. तिच्या डोळयातून वाहणारे अश्रू , संध्याकडे क्षमायाचनेची भीक मागत होते.. तिच्या तोंडून शब्द फुटत नसले तरी तिच्या भावना संध्यापर्यंत अचूक पोहचल्या होत्या.. संध्याने तिला धीर देत तिचे डोळे आपल्या हाताने फुसत तिला सावरले होते..
'फ्रेंड?'- संध्याने हसत आशासमोर हात पुढे केला होता..
'येस.. फ्रेंड..'- तिचा हात हातात घेत आशाने तिला पुन्हा एकदा मिठी मारली होती..
संध्याने आशाला राहुलची काळजी घेण्यासबंधी योग्य त्या सूचना देत; काही औषधे लिहून दिली होती.. सारे सेशन आटपून तिघांनी संध्याचा निरोप घेतला होता..
नाही म्हटलं तरी आशिषचा पाय तिकडून निघत नव्हता.. त्याची नजर संध्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.. त्याला आपल्याकडे असे वेड्यासारखे पाहून संध्या लाजेने मान खाली घालून हसत होती.. दोघांच्या प्रेमाची जुगलबंदी पाहून आशाने मुद्दाम आशिषला दरवाज्यातून आत केबिनमध्ये ढकलून केबिनच दार बाहेरून बंद केले होते..
तिच्या या कृत्याने दोघांनाही शरमल्यासारखे झाले होते.. एकमेकांकडे चोरून पाहताना नकळतपणे दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.. दोघांची नजरानजर झाली तसे दोघेही एकमेकांत हरवून गेले होते.. कोणालाही काही जाणवण्याआधी; दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत शिरले होते.... काहीक्षण मिठीत घालवल्यावर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला होता.. जाता जाता संध्याने आशिषच्या गालावर किस करत हलकासा चावा घेतला होता; तसे प्रत्युत्तर म्हणून त्याने संध्याला आपल्या मिठीत ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते.. काहीकाळ प्रेमरसात वाहून गेल्यावर दोघांनी पुनः भेटीचे वादा करत एकमेकांचा निरोप घेतला होता..
'राहुल, अरे केबिनमध्ये केवढे मोठे डास होते ना रे?? बघ ना आपल्याला नाही चावले म्हणून बरं झालं.. दादा आमचा भलताच दुर्दैवी.. केवढा चावला बघ त्याच्या गालावर..'- आशिषच्या गालावरचे दाताचे व्रण पाहून आशा म्हटली तसा आशिष लाजून पुढे निघून गेला तर आशा आणि राहुल मागे खळखळून हसत राहिले होते..
क्रमशः
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा