सरतेशेवटी बहिणीच्या संसाराची होत असलेली दुरावस्था पाहून; न राहवून आशिषने मनाशीच एक निर्णय घेतला होता..
--------
'एक्स्क्यूज मी मॅडम..'- धडधडत्या मनाने आशिष अबक हॉस्पिटलच्या रिसेप्शनमधल्या बाईशी संवाद सुरू करत होता..
'येस सर.. हाऊ मे आय हेल्प यु?'- समोरच्या लेडीने सराईतपणे आशिषला विचारलं..
'ते.. ते.. मला.. मला..'- आशिषला ब्लॅंक झाल्यासारखं वाटत होतं..
'सर, प्लीज लवकर बोलाल का?? तुमच्या मागे आधीच माणसं रांग लावून आहेत'- रिसेप्शनिस्टने आशिषचं लक्ष मागे रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडे वळवत त्याला लवकर बोलण्यासाठी विनंती केली..
'मला.. मला.. डॉक्टर संध्या शिर्केनां भेटायचं आहे.. आय मीन मला त्यांची अपॉइंटमेंट हवी आहे.. आजची..'- आशिषने कसेबसे शब्द जुळवत सांगून टाकलं..
'सर लेट मी क्लिअर यु फ्यु थिंग्स फर्स्ट.. आमच्याकडे डॉ. संध्या शिर्के नाही तर डॉ. संध्या पाटील आहेत.. सेकंड थिंग म्हणजे त्यांची आजची अपॉइंटमेंट मिळणे म्हणजे नेक्स्ट टू इमपॉसीबील आहे.. तुमच्या मागची लोक नेक्स्ट वीक साठी नंबर लावण्यासाठी उभी आहेत.. सो.. आणि तसे ही आज त्यांच्या मिस्टरांचा बर्थडे आहे; म्हणून त्या आज शॉर्ट टाईम साठीच आल्या आहेत.. जर हे सर्व तुम्हांला समजत असेल तर मी तुम्हांला नेक्स्ट वीकची अपॉइंटमेंट देऊ शकते..लवकर बोला??'- समोरच्या बाईने निर्विकारपणे आशिषला विचारलं..
'मॅम, पेशंट खूपच क्रिटिकल आहे.. मी.. मी रिक्वेस्ट करतो.. मी आज त्यांना डिस्टर्ब नाही करत.. छान वाटलं ऐकून की त्या त्यांच्या फॅमिलीमध्ये रमल्या आहेत.. बट प्लीज मला ऍट लिस्ट उद्याची अपॉइंटमेंट द्याल का?? प्लीज.. पेशंट खूप सिरिअस आहे मॅम..'- आशिषने त्या बाईसमोर अक्षरशः हात जोडले होते..
'आशु?? आय मिन आशिष?? तु.. तु? अन कोण सिरिअस आहे?'- घरी निघालेली संध्या आशिषला रिसेप्शन काऊंटरवर पाहून आश्चर्यचकित झाली होती..
क्षणासाठी दोघांची नजरानजर झाली आणि दोघांचेही डोळे पाण्याने भरलेले झाले होते.. आशिष निमूटपणे रांगेतून बाजूला झाला होता..
'लिली... आय होप आजच्या अपॉइंटमेंट संपल्या असतील.. मी काही वेळ अजून केबिन मध्ये थांबेन.. प्लीज डोन्ट डिस्टर्ब अस.. मि. आशिष; या आपण केबिन मध्ये बसून बोलू...'- संध्याने आशिषशी नजर चोरत रिसेप्शनिस्टला विचारलं..
'येस मॅम.. आजच्या अपॉइंटमेंट संपल्या आहेत...'- लिलीने तिला सांगितलं.. एरव्ही आपल्या फॅमिलीला प्राधान्य देणारी डॉक्टर संध्या आज एका अनोळखी माणसासाठी थांबावी या गोष्टीचे तिला वाटत असलेले आश्चर्य तिच्या तोंडावर साफ झळकत होते..
'नाही डॉ. पाटील.. आज नको.. आज तुमच्या नवऱ्याचा बर्थडे आहे.. आणि..आणि त्या मोमेंट्सवर हक्क आहे त्याचा.. तु.. तुम्ही आज घरी जा बट आय रिक्वेस्ट; उद्या प्लीज मला तुमचा वेळ द्या.. माझ्या मेव्हण्यासाठी तुमची हेल्प हवी आहे मला..'- आशिषने खाली मान घालून संध्याला सांगितलं तस तिच मन आतून खट्टू झालं..
'मि. आशिष, प्लीज फॉलो मी.. आपण केबिन मध्ये बोलू.. प्लीज..'- संध्याने आशिषला प्रत्युत्तर देत ती तिच्या केबिनकडे परत वळली होती.. नाईलाजाने आशिष तिच्या मागोमाग तिच्या केबिनमध्ये पोहचला होता..
तिची केबिन पाहताच तो हरखून गेला होता.. टापटीपपणे ठेवलेल्या वस्तू, डोळ्यात भरणारी स्वच्छता, भिंतीवरच्या शेल्फवर ठेवलेले अवॉर्डस, सर्टिफिकेटस कोणाचेही लक्ष वेधून घेणाऱ्यातले होते..
'किती बदलली ही? एकेकाळी वस्तू अस्तव्यस्त ठेवणारी संध्या कुठे आणि आता साऱ्या गोष्टी पद्धतशीर मांडून ठेवणारी संध्या.. छान झालं..'- आशिष मनोमन तिचं कौतुक करतच होता की त्याच लक्ष तिच्या टेबलावर असलेल्या छोट्या मुलाच्या फोटोवर खिळलं..
'आशिष.. आशिष रवी पाटील.. माझा आणि रवीचा मुलगा..'- संध्याने उत्तर दिलं तस आशिष हसला..
'तेवढं नाव सोडलं तर बाकी सर्व रॉयल दिसतो तुमचा लेक.. हे अस कमनशिबी नाव कशाला द्यायचं?'- आशिषच्या डोळयातून पाणी खाली ओघळले.. त्याने अजूनही संध्याच्या नजरेला नजर मिळवली नव्हती..
'कारण आशिष हे नाव माझ्या हृदयातून कोणीच फुसू शकत नाही आशु.. कोणीच नाही आणि कधीच नाही.. आणि तु मघाशी बोललास ना की आजच्या मोमेंट्सवर रवीचा हक्क आहे बट आजही ऍट लिस्ट माझ्यासाठी तरी माझ्या आशिषपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही.. माझ्यासाठी आशिष साटम हाच कायम हाय प्रायोरिटीवर असेल..'- संध्याने कातर स्वरात आपल्या मनाची वेदना उघड केली तस आशिषने तिच्याकडे पाहिलं..
संध्याच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या.. आपलं प्रेम समोर असतानासुद्धा केवळ काही नाईलाजास्तव आपण त्याच्या जवळ न जाऊ शकण्याची व्यथा तिच्या मुखचर्येवर स्पष्ट दिसत होती.. आशिषची मनस्थितीदेखिल तिच्यापेक्षा वेगळी नव्हती.. मनातून त्यालासुद्धा धावत जाऊन तिला मिठीत घ्यावस वाटत होतं, तिचे डोळे फुसून तिला शांत करावंसं वाटत होतं.. पण एका अनामिक बंधनामुळे दोघांनाही एकमेकांच्या जवळ जात येत नव्हते..
'शरयू कशी आहे आशु? सॉरी आशिष.. आणि तुला पण मुलगी आहे ना रे? फोटो दाखव ना रे तिचा.. ती पण तुझ्यासारखीच क्युट असेल ना रे??'- संध्याने भानावर येत विषय बदलण्याचा प्रयत्न केला..
'तु आशुच बोल ना मला.. आशिष नको.. कमीतकमी मला..'- आशिषचे नेत्र पाण्याने डबडबले होते.. भावनिक झाल्याने त्याला बोलणं कठीण झालं तसा तो थांबला..मान खाली घालून तो बाजूच्याच चेअरवर हताश बसला..
त्याला तसं तुटलेलं पाहून संध्या काळजीने त्याच्याकडे धावली होती.. तिने त्याच्या खांद्याला स्पर्श केला तशी आशिषने पटकन तिला मिठी मारली होती..
तब्बल साडे तीन वर्षांनंतर दोघेजण भेटत होते; त्यामुळे तशाही दोघांना भावना अनावर झाल्याच होत्या.. वचनाचे बंध तुटण्यासाठी फक्त कोणी एकाने पुढाकार घेण्याचा अवकाश होता आणि आशिषने ती सुरुवात केली होती..आशिषच्या अशी अचानक मिठी मारण्याने संध्या जागीच स्तब्ध झाली होती.. शेवटी तिच्या मनाचादेखिल बांध सुटला आणि तिनेही अश्रूद्वारें आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या.. कित्येक मिनिटे दोघेजण असेच एकमेकांच्या मिठीत निःशब्दपणे रडत होते.. आज कोणालाही कोणाला अडवायचे नव्हते की कोणालाही दुसऱ्याला सावरायची घाई नव्हती.. इतक्या दिवसांचा दुरावा त्यांना आज असहय्य झाला होता..
अचानक संध्याचा मोबाईल वाजला तसे दोघे भानावर आले होते..मोबाईलवर रवीचा फोन होता.. तसा आशिष बाजूला झाला..
'आय एम सॉरी संध्या.. मला.. मला स्वतःला रोखता नाही आलं..'- आशिषने पुन्हा एकदा खाली मान घातली..
'आशु..प्लीज..'- त्याला बोलता बोलता तिने फोन उचलून कानाला लावला होता..
'हॅलो..संध्या कुठे आहेस ग?? अग सर्व घरी पोहचले आहेत.. वैदही माझं डोकं खातेय.. नवऱ्याचा बर्थडे आणि बायको अबसेन्ट.. तुझा लेक माझे कान चावतोय ते वेगळंच.. हॅलो.. हॅलो.. अग कुठे हरवलीस?'- पलिकडून रवीच्या बोलण्यासोबतच इतरांचा गोंधळ संध्याला ऐकू येत होता..
'मी..मी पोहचतेय रवी.. उशीर होईल थोडा.. वैदिला लेट होणार असेल तर केक कापून घ्या तुम्ही..मला उशीर होईल.. किती ते माहीत नाही..'- संध्याने जडवलेल्या स्वराने उत्तर दिलं..
'हे.. आर यु ओके?? आज अस काय बोलतेस?? तूच प्लॅन केलंस ना हे सर्व, सर्वांना तूच इन्व्हाईट केलंस आणि ऐनवेळी तूच कल्टी? दॅट्स नॉट फेअर संध्या.. नॉट फेअर..'- रवीने चिडून पलिकडून फोन कट केला तस संध्याला मनातून वाईट वाटलं होतं..
'संध्या, ऐक माझं.. आज तु घरी जा.. माझ्यामुळे आधीच उशीर झालाय.. विनाकारण माझ्यासाठी तुझा सुखाचा संसार बिघडवू नकोस.. मला फक्त उद्याची तुझी अपॉइंटमेंट दे.. राहुलला गरज आहे तुझ्या हेल्पची..'- आशिषने भरल्या नेत्राने संध्याला म्हटलं तस तिच्या डोळ्यांतदेखील पाणी तरळले..
'संसार.. कसला संसार.. एका व्यक्तीसाठी सुरू केलेला ड्रामा आता कम्पलसरी झाला आहे माझ्यासाठी.. संसार.. सुखाचा संसार.. '- संध्याच्या चेहऱ्यावर खिन्न हसू आलं होतं..
'म्हणजे?'- आशिषने चमकून तिला विचारलं..
'तुला फक्त राहुलसाठी माझी वेळ हवी आहे ना? उद्याची? मिळेल.. डोन्ट वरी..मी आताच रिसेप्शनला सांगून ठेवते'- संध्या एवढं बोलून स्वतःच्या चेहऱ्यावरचे अश्रू फुसत आपली बॅग उचलून बाहेर पडू लागली होती...
'संध्या.. चुकीचं नको ग समजू मला.. माझ्यापण आयुष्यातली तुझी जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत ग.. बट आज राहुल आणि आशा साठी आपलं दुःख, आपला विरह काही काळ बाजूला ठेवावाच लागेल.. प्लीज मला समजून घे.. ऍट लिस्ट तु तरी माझ्यासोबत अस नको करूस..'- आशिष काकुळतीला येऊन बोलत होता तशी संध्या मागे फिरली..
'आय एम सॉरी आशु.. छान वाटलं ऐकून की आजही मी तुझ्या मनात आहे..उद्या भेटू आपण.. राहुल आणि आशा, दोघांनाही घेऊन ये..आपण सॉर्ट आऊट करू त्यांचे प्रॉब्लेम्स.. आय विल ट्राय माय बेस्ट..'- संध्याने आशिषच्या गालावरून हात फिरवत त्याला धीर दिला...
संध्या अन आशिष दोघेही एकत्रच बाहेर पडले होते.. परंतु दोघांनाही घाई असल्याने दोघे लगेच आपापल्या वाटेला रवाना झाले होते..
---##---
'दादा, वहिनी कधी येणार आहे रे? ऑल रेडी दोन तास होऊन गेलेत.. मला आजच घरी जायचं आहे'- वैदिही घड्याळाकडे बघत अस्वस्थ होत होती..
'तिला लेट होईल बोलली होती.. वेळ होत असेल तर केक कापून घ्या अस बोलल्या आहेत मॅम.. चल आपण केक कापून घेऊ.. उगाच मुलांना कशाला अडवून धरायचे..'- शेजारीच खेळणाऱ्या आशिष आणि प्राजक्ताकडे पाहत रवी उत्तरला.. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली उदासी वैदेहीच्या नजरेतून सुटली नव्हती..
'भैय्या?? एवरीथिंग ऑलराईट? तुझ्यात आणि वहिनीत काही भांडण नाही ना परत?? '- वैदीहीने काळजीने विचारलं तसा रवी हताशपणे खुर्चीवर बसला..
'एव्हरीथिंग ऑलराईट? आमच्यात ऑलराईट झालंच कधी होतं वैदी?? यु नो ना एव्हरीथिंग..'- रवी निराश हसत म्हटला तसे तिला वाईट वाटलं.. ती त्याला धीर देण्यासाठी पुढे सरसावली तोच बेल वाजवून; आपल्याकडच्या चावीने दरवाजा उघडून संध्या घरात आली होती..
तिला पाहताच आशिष तिच्याकडे झेपावला होता..
'आले माझं पिल्लू.. सॉरी ममाला उशीर झाला.. तु प्राजु बरोबर खेल.. ममा लगेच फ्रेश होऊन येते आणि मग आपण केक कापू.. ओके बेटा..'- आशिषला कडेवर घेत संध्याने त्याला समजावलं तशी त्याने पण मान डोलवत तिला होकार दिला..
'गुड बॉय..माझा बच्चा..'- संध्याने त्याला खाली सोडलं तसा तो धावत प्राजक्ताकडे जाऊन तिच्यासोबत खेळू लागला..
'आय एम रियली सॉरी गाईज.. गिव्ह मी फाइव्ह मिनिट्स.. मी लगेच फ्रेश होते.. सॉरी..'- वैदी आणि रवीकडे बघत संध्याने त्यांची क्षमा मागत बेडरूममध्ये शिरली होती..
ती आल्यावर सर्वांनी मिळून रवीच्या वाढदिवसाचा केक कापला होता.. वैदीहीने त्याला ब्रँडेड परफ्यूम, शर्टस गिफ्ट केले होते तर संध्याने त्याला लिमिटेड एडिशन घड्याळ गिफ्ट केलं होतं..
'व्वा वहिनी, एवढं एक्सपेन्सीव्ह गिफ्ट? क्या बात.. क्या बात.. क्या बात..'- वैदिने संध्याला डोळा मारला तसे तिघेही हसू लागले होते..
साऱ्यांच्या धम्माल मस्तीमध्ये आणि जेवण आटपता रात्रीचे साडे दहा वाजले होते.. वैदीही प्राजक्ताला घेऊन घाईने घरी निघून गेली होती.. आशिषला ही झोप येत असल्याने संध्याने त्याला बेडरूममध्ये नेऊन झोपवलं होतं.. आता हॉल मध्ये फक्त ती आणि रवी बसले होते..
'आज खूप काम होतं? उशीर झाला म्हणून म्हटलं.. अदरवाईज तुझी टाईमची कमिटमेंट कधी चुकत नाही ना..'- रवीने विचारलं तसं संध्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या..
'हे, ऍनी प्रॉब्लेम?? काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी?'- रवीला तिची काळजी वाटू लागली होती..
'मी वेळेवरच निघाली होती रवी.. बट..'- संध्या..
'बट??'- रवी..
'आशु..सॉरी आशिष भेटला होता.. राहुल डिप्रेशनमध्ये गेलाय; त्यासाठी मला शोधत आला होता..तुझा कॉल आला तेव्हा मी त्याच्यासोबतच होती..'- संध्याने दिर्घ श्वास घेत सत्य सांगितलं तसा रवीचा चेहरा पडला..
'ओह, राहुलसाठी आला होता की स्वतः साठी??'- रवीने विचारलं..
'जेलस वाटतंय तुला?? आज तरी राहुलसाठीच आला होता.. बट ही स्टील लव्ह मी..'- संध्याने रवीकडे पाहत म्हटलं..
'मी कशाला जेलस? जे काही आहे ते त्याचच तर आहे.. मी तर फक्त केअरटेकर आहे ना.. ही स्टील लव्ह यु.. कळलं.. अँड यु??'- रवीने विचारलं..
'रवी.. हॅव यु गॉन मॅड??हा काय प्रश्न झाला? याच उत्तर तुलाही माहीत आहे.. आशिष साटम शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणतंही प्रेम नाही.. नो वन कॅन रिप्लेस हिम फ्रॉम माय लाईफ.. नो वन मिन्स नो वन..'- संध्याने उत्तर दिलं तसा रवी वरमला.. मनातुन त्याला खूप वाईट वाटलं होतं..
मागचे साडेतीन वर्षे त्याने संध्याच मन जिंकण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले होते... पण संध्याच्या मनातला आशिष साटम त्याला काही फुसता आला नव्हता..
---##---
आज आशिष घरी पोहचला तेव्हा काहीसा शांत वाटत होता.. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा ताण दिसत नव्हता..
'आशु?? आज रीलॅक्स दिसतोय? राहुलच्या तब्येतीत काही पॉसिटिव्ह चेंजेस?'- शरयूने आल्या आल्याच त्याला प्रश्न विचारला तशा त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या..
'आशिष.. आशिष म्हण मला.. तुझा हक्क नाहीये मला आशु म्हणायचा.. कळलं?? आशिष म्हण..'- आशिषने काहीश्या रागात तिला उत्तर दिलं तशी तीपण चिडली..
'नवरा आहेस तू माझा.. मी तुला काहीही हाक मारेन.. आता तुझ्यावर मी सोडली तर कोणाचाही हक्क नाहीये.. इज दॅट क्लिअर आशु??'- शरयूनेसुद्धा चढ्या आवाजात उत्तर दिलं तशा साटम काकू बाहेर आल्या..
'अरे असे भांडायला काय झालं तुम्हांला? आशिष? राहुलसाठी कोणी चांगला डॉक्टर बघायला गेला होतास ना? भेटला? वेळ दिली का त्यांनी?'- साटम काकींनी प्रश्नांचा भडिमार केला तशी आशिषने होकारार्थी मान हलवत खिश्यातून मोबाईल बाहेर काढला..
'हॅलो आशा?? ऐक, उद्या संध्याकाळी सहाला आपल्याला अबक हॉस्पिटलमध्ये राहुलला घेऊन जायचं आहे.. वेळ लक्षात ठेव.. संध्याकाळी सहाला.. शार्प सहा.. त्याचे सर्व केसपेपर सोबत घेशील आठवणीने.. चल, उद्या भेटू.. बाय..'- आशिषने आशाला सूचना करून फोन ठेवला होता..
'डॉक्टरच नाव काय रे??'- शरयुला शंका आली तसं तिने विचारलं..
'तेच जे तुला वाटतेय तेच.. डॉक्टर संध्या पाटील..'- आशिषने शरयूच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं तशी ती रागाने लालबुंद झाली..
'हाऊ डेअर यु आशिष? तुझी हिम्मतच कशी झाली तिला जाऊन पुन्हा भेटायची?? तु माझ्यातली व्हॅम्प परत जागी करू नकोस.. आई समजवून ठेवा तुमच्या मुलाला..'- शरयू रागाने थरथरत होती..
'तुला जे करायचं ते तु कर.. माझ्या बहिणीच्या संसार वाचवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते ते मी करणारच..'- आशिषने तिचा इशारा झिडकारला होता..
'याचे खूप वाईट परिणाम होतील आशिष.. खूप वाईट परिणाम..'- शरयू तणतणत आत बेडरूममध्ये निघून गेली होती..
क्रमशः
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा