Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 42

This part is in continuation with earlier series..

'मलाच सुचत नाहीये अग.. माझ्याच भूतकाळातील चुकांमुळे आज स्वतःच्या आईची इच्छा पुर्ण करू शकत नाहीये... यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीच नसेल..'- रवीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

'एक उपाय आहे माझ्याकडे..'- संध्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला आश्वस्त केलं..

                                  ----------

'म्हणजे?'- रवीने चमकून संध्याकडे पाहिलं..

'सांगते.. बस शांतपणे.. सांगते तुला सविस्तरपणे..'- संध्याने रवीला इशारा करून त्याला बाल्कनीमधल्या कोचवर बसायला सांगितलं..

'हे बघ रवी, आशिषशी मी कोणत्याही प्रकारे प्रतारणा करणे शक्य नाहीच.. बट जेव्हा माझ्यासोबत माझं कोणी उभं नव्हतं तेव्हा मला सावरणारी तुझी फॅमिली होती; हेही मी विसरणं शक्य नाही.. त्यामुळेच मी एक निर्णय घेतला आहे.. मी तुझ्या मुलाची आई बनायला तयार आहे पण त्यासाठी आपल्यात शारीरिक सबंध होणार नाहीत... आपण आय.व्ही. एफ साठी प्रयत्न करूयात.. आणि अजून एक..'- संध्याने बोलता बोलता दिर्घ श्वास घेतला; त्याचवेळी तिच्या डोळयातून पाण्याचे काही थेंब खाली उतरले..

' आणि काय?'- रवी..

'मी काल डॉक्टर कुलकर्णीसोबत आईंच्या कॅन्सरविषयी चर्चा केली होती.. त्यांच्यामते कॅन्सर लास्ट स्टेजच्या थोड्या अलीकडेच आहे.. आईना आधीच असलेले इतर आजार लक्षात घेता त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटला फारसा प्रतिसाद देणे मुश्किल आहेत.. डॉक्टरांच्या मते आईंकडे जास्तीतजास्त तीन वर्षेच आहेत.. सो तुला लवकर डिसीजन घ्यावा लागेल..'- संध्याने रवीकडे पाहत म्हटलं...

'देव खरंच माझ्या कर्माची शिक्षा तिला देत नसेल ना ग?? का अस अचानक ?? तिचा काय दोष यांत? तस बघायला गेलं तर मला..मला कॅन्सर झाला हवा ना ग?? मला नाही सुचत ग काहीच.. तु.. तु तुला जे योग्य वाटतं ते कर.. यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही..'- रवी अगतिकपणे रडू लागला होता तस संध्याने त्याच्या जवळ जात त्याला थोपटत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला होता..

'टेक युअर ओन टाईम रवी.. अस इमोशनल होऊन कसं चालेल.. आपल्याला आईचं स्पिरिट वाढवायचं आहे.. तूच असा कोसळलास तर बाबांनी कोणाकडे पाहायचं रे..जस्ट काल्म डाऊन बडी...'- संध्या..

'ठीक आहे संध्या.. मला तू सुचवलेला ऑप्शन मान्य आहे.. इन फॅक्त दुसरा काही ऑप्शन नाहीच आहे आपल्याकडे.. एक रिक्वेस्ट आहे संध्या.. ऍटलिस्ट आपण एकमेकांना स्वीकारण्याचा नाटक करू शकतो का ग?? म्हणजे मम्मी आपल्यात असेपर्यंत?'- रवीने भावुक होऊन संध्याकडे पाहिलं..

'येस ऑफकोर्स.. ते करावंच लागेल आपल्याला.. बट लेट मी वॉर्न यु; तु एका लिमिटच्या बाहेर जास्त काही ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा नाहीस..ऑर इल्स.. तु समजून जा..'- संध्याने त्याला आपल्या होकारासोबतच मर्यादेचा इशारादेखिल दिला होता..

'मंजूर..तुझ्या मर्जीशिवाय काहीच नाही.. कधीच नाही.. मी शेवटपर्यंत तुझी वाट पाहेन..वाट तुझ्या येसची.. '- रवी..

'डन मग.. मी उद्याच क्लीनिकची अपॉइंटमेंट मिळते का ते बघते.. मोस्टली वेटिंग असेल बट तरी पण आपण ट्राय करूयात..'- संध्या..

पुढच्या दिवसांत संध्या आणि रवी; दोघांनी त्यांच्यात सर्व आलबेल असल्याचं दाखवायला सुरू केलं होतं.. दोघ अधूनमधून सकाळी ऑफिसला जाताना एकमेकांच्या हातात हात घालूनच बाहेर पडत.. येताना पण कधी कधी दोघे एकत्रच घरी येत.. कधी संध्या हट्टाने रवीला बाहेर डिनरला नेण्यासाठी गळ घालायची तर कधी रवी मुद्दाम घरी येताना गुलाबांचा बुके घेऊन संध्याला गिफ्ट करे आणि संध्या खूप खुश असल्याचं नाटक करे.. 

दोघांचं नाटक बेमालूम चालत होत.. रवीच्या आई-वडिलांना लेकाचा सुरळीत चालू झालेला संसार पाहून आनंदी वाटत होतं.. संध्याच्या अपेक्षेनुसार; दोघांनीही आता घरात नातवाचं तोंड बघण्याचा धोशा लावून धरला होता.. 

संध्या आणि रवीची आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट चालूच होती.. आणि एका दिवशी संध्याला मातृत्वाची चाहूल लागली होती.. आयुष्यात खूप मोठया कालावधीनंतर तिला मनापासून आनंद होत होता.. 

रवीने खुशीची बातमी घरी कळवल्यानंतर पाटील कुटुंबियांना आनंद अनावर झाला होता.. रवीच्या आईने अंगात त्राण नसताना देखील जिद्दीने गाजर हलवा करत संध्याचं तोंड गोड केलं होतं.. उरलेला दिवसभर आईच्या मायेने त्या संध्याला सारी पथ्य समजावत बसल्या होत्या.. त्यांच्या मुखचर्येवर वेगळाच उत्साह दिसत होता.. त्यांना असं खुश पाहून रवीच्या वडिलांना आणि रवीला हायस वाटतं होत.. हंसबाईनांदेखिल लेकीच्या गर्भारपणाची बातमी कळताच भरून आलं होतं.. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी हट्टाने संध्याला माहेरी आणून तिचे लाड केले होते.. 

रवीच्या आईसाठी; सर्वानुमते संध्याचं बाळंतपण पाटलांच्या घरीच करण्याचं ठरलं होतं.. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत रवीची आई आपलं सारं आजारपण विसरून संध्याची पुरेपूर काळजी घेत होत्या.. त्यांचं आपल्यात अस गुंतलेलं पाहून संध्याला मनोमन वाईट वाटत होते पण दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे ती स्वतःच मन सावरत असायची..

काही दिवसांत संध्याची नॉर्मल डिलिव्हरी होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं.. सर्व पाटील कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता..  नातवाच्या दोन्ही आजी तर हर्षोउल्हासने नाचायाच्या तेवढ्या बाकी होत्या.. यथावकाश मुलाचे नामकरण करण्यात आले होते.. संध्याच्या आग्रहाने त्याच नाव 'आशिष' ठेवण्यात आलं होतं.. आपल्या लेकाला पहिल्यांदा दूध पाजतानाच संध्याला तिच्या नव्या जबाबदारीची जाणिव झाली होती.. त्याचवेळी तिने मनोमन ठरवलं होतं; आशिष साटमच्या वाटेचं प्रेम आशिष पाटील ला द्यायचं.. त्याची सावली बनून राहण्याचं प्रॉमिस तिने स्वतः शीच केलं होतं..

                                ----------


तिकडे आशिष आणि शरयुला दोन महिन्याआधी कन्यारत्न प्राप्त झाले होते.. डिलिव्हरीवेळी काही गुंतागुंत झाल्यामुळे; घरी आल्यानंतर काही महिन्यांत शरयूची प्रकृती खालावली होती.. संपुर्ण दोन महिने शरयू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती.. माधवराव, साटम कुटुंबिय; साऱ्यांसाठीच तो कसोटीचा क्षण होता.. सगळेच चिंताक्रांत होते.. या साऱ्या दिवसांत आशिषची प्रचंड ओढाताण होत होती.. सारेच जण मनाने ढासळले होते.. एकटा आशिषच मनापासून शरयूशी जुडला नसल्यामुळे स्थिर होता.. त्यामुळे सर्वांना धीर देणे, लेकीची काळजी आणि शरयूची ट्रिटमेंट अशा सर्व चक्रव्यूहात तो पुरता अडकला होता.. 

शरयूला त्याची धावपळ सुखावत होती.. त्याने आपली आणि आपल्या माणसांची काळजी घेणे तिला भावत होतं.. तिचं वचन विसरून ती पुनःश्च आशिषमध्ये गुंतत चालली होती.. आशिषबद्दलचा तिचा पजेसिव्हनेस वाढू लागला होता.. अखेरीस तब्बल अडीच महिन्यांनी शरयू रिकव्हर होत घरी परतली होती.. आशिषने तिच्यासाठी संपुर्ण घर फुलांनी आणि फुग्यांनी सजवलं होतं.. यामागे त्याचा तिच्या उदास मनाला उभारी देण्याचा उद्देश असला तरी शरयूने नेमका उलटा अर्थ घेतला होता.. ती मनातून सुखावली होती.. आशिषचं प्रेम आपल्या हक्काचं झाल्याची धारणा तिच्या मनाशी बसू लागली होती..

                                    --------

हा हा म्हणता तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला होता.. रवीच्या आईच निधन झालं होतं..खचलेल्या वडिलांना सावरण्यासाठी; रवी आणि संध्याने त्यांचं नाटक पुढे तसच चालू ठेवायच ठरवलं होतं.. छोट्या आशिषवर मात्र दोघांचाही जीव होता.. त्याच्याशी खेळताना रवीचे वाडीलसुद्धा खुश असायचे.. काही महिन्यांनी छोट्या आशिष बरोबर खेळायला वैदीहीची प्राजक्ता जॉईन झाली होती..

पाटलांना भरून पावलं होतं.. सर्व काही सुरळीत झालेलं पाहून त्यांनी परत एकदा जोमाने राजकारण क्षेत्रात आपले प्रयत्न सुरू केले होते.. आपल्या वागण्याने आणि पुर्वप्रतिष्ठेने त्यांनी आपली पद परत मिळवली होती.. मात्र पाटिल कुटुंबात सुखाची उमललेली पालवी नियतीला बघवली नव्हती.. एका रस्ता अपघातात रवीच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले होते..नशिबाचा असा एकामागोमागचा दुहेरी आघात पचवणं रवीला अवघड झालं होतं.. काहीकाळ तो आपसूक निराशेच्या गर्तेत हरवला होता.. या काळात संध्याने आपलं सारं वैद्यकीय ज्ञान वापरून त्याला सावरलं होतं.. दोघांनी आपापसातील मर्यादांचे पालन करत छोट्या आशिषसाठी नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले होते.. दोघेही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून काही वेळ खास आपल्या लेकासाठी राखून ठेवत.. इतर वेळी आशिष त्याच्या हंसाआजीकडे राहत असे..

                                   ---------


आशिष दिवसेंदिवस आपल्या लेकिमध्ये गुंतत चालला होता.. कामावरून घरी आल्यावर तो एकक्षणही तिला आपल्या नजरेआड करत नसे.. इथे शरयू आशिषमध्ये गुंतत चाललीच होती.. दोन- तीनदा तिने आशिषला; शारीरिक संबंधांसाठी  जबरदस्ती करण्याचा प्रयत्नदेखील केला होता परंतु आशिषने तिला साफ नकार दिला होता... त्याच्या नकारामुळे तिचा अहंकार डीचवला गेला तशी तिने घरात पुनः धुसफूस  चालू केली होती.. आशिषने तिला स्पष्टपणे तिच्या शब्दांची आठवण करून देताच ती शांत झाली होती.. तरीही मनातून तिचा आशिषला मिळविण्याचा आटापिटा सुरूच होता..

                                  ------

मागचे साडेतीन वर्षे, आशिष आणि संध्या एकमेकांना भेटले नसले किंवा एकमेकांशी बोलले नसले तरी दोघांची एकमेकांच्या हृदयातली जागा अबाधित होती.. एखाद प्रसंगी त्यांना एकमेकांची आठवण येई मग पुढचे काही क्षण त्यांचे अश्रू ढाळण्यातच जाई.. 

दोघांची लाईफ एकमेकांना न छेदता समांतरपणे चालू होती..

                                     ----

राहुल आणि आशा; दोघांना जुळी अपत्यप्राप्ती झाली होती.. मुलांच्या जन्मानंतर राहुलने आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा ठरवला होता.. आशानेही त्याला पाठिंबा देत; जोडीने मेहनत करण्याचे प्रॉमिस दिलं होतं..

दोघांच्या प्रयत्नांना यश कुठे येतच होते तितक्यातच राहुलच्या कंपनीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बातमी लागून; त्यांनी त्याची कंपनी काही काळ सील केली होती.. राहुल आणि आशाची बँक खाती चौकशीदरम्यान गोठवली गेली होती..

पडत्या काळात आशिष आणि शरयूने दोघांना धीर देत त्यांची मानसिक आणि आर्थिक बाजू चांगलीच सावरली होती.. शरयूच्या विनंतीवरून माधवरावांनी आपलं सारे कसब पणाला लावून राहुलला सर्व आरोपांतून सुखरूप बाहेर काढले होते..

मात्र झाल्या प्रकरणामुळे राहुलच्या कंपनीची विश्वासहर्तातता धुळीला मिळाली होती.. कंपनीचा सेल कोसळला होता.. अपेक्षाभंगामुळे आणि झाल्या बदनामीमुळे राहुल डिप्रेशनमध्ये गेला होता.. कित्येक डॉक्टरी उपचारांनातर देखिल त्याच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती.. त्याची अवस्था पाहून; आशा हवालदिल झाली होती.. ताणामुळे तिचा दम्याचा त्रास उफाळून येत होता..  


बहिणीची अवस्था पाहून आशिषला वाईट वाटत होतं.. राहुल आणि आशाच्या खचण्यामुळे त्यांच्या मुलांचे होणारे हाल त्याला आणि साटम कुटुंबियांना पाहत नव्हते.. राहुलच्या घरचे त्यांच्यापरीने पुरेपुर प्रयत्न करत असले तरी त्यांची धाव तोकडी पडत होती.. राहुल आपलं मानसिक आरोग्य झपाट्याने गमावत चालला होता.. राहुलच्या कुटुंबाने आणि साटम परिवाराने शहरातल्या सर्व नामांकित तज्ज्ञांकडे राहुलला दाखवलं तरी काहीच सकारात्मक घडत नव्हते..

सरतेशेवटी बहिणीच्या संसाराची होत असलेली दुरावस्था पाहून; न राहवून आशिषने मनाशीच एक निर्णय घेतला होता..


क्रमशः

हा शेवटचा भाग की जो तुम्हांला उशिरा वाचायला मिळाला.. इथून पुढे आपण दरदिवशी भेटू.. अगदी पक्का...

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all