अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 41

This part is in continuation with earlier series.

संध्या आणि रवी निघून गेल्यावर घरात एकप्रकारे सन्नाटा पसरला होता... शेवटी शरयूनेच पुढाकार घेत स्वतःला सावरले होते.. माधवरावांसमोर जात तिने त्यांच्या चेहऱ्यावर ओघळणारे अश्रुंचे थेंब फुसले होते..

'डॅड, जस्ट वेट.. मी तुम्हां सर्वांसाठी चहा घेऊन येते.. एवढी फिल्म झाली.. ब्रेक तो बनता हैं ना...'- शरू उठली आणि तितक्यातच जागीच कोसळली होती.. 

                                  ------------- 
शरयुला जागीच बेशुद्ध झाल्याचं पाहून सर्वांचीच धावपळ उडाली होती.. माधवरावांचा जीव तर बैचेन झाला होता..आशाने प्रसंगावधान दाखवत डॉक्टरांना फोन करून बोलवलं होतं..
आशिषने तिला उचलून बेडरूमच्या बेडवर नेऊन ठेवलं होतं..साटम काकांनी गडबडीने पाणी आणून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला होता.. त्यांची मात्रा लागू पडली होती.. शरयू किलकिले डोळे उघडून शुद्धीवर आली होती.. पण अजूनही तिला डोकं जड वाटत होतं, अशक्तपणा जाणवल्यामुळे तिने बेडवर पडून राहणेच पसंत केले होते..डॉक्टर येईपर्यंत सारेजण काळजीत होते..

माधवराव तिच्या उशाशी बसून, तिच्या डोक्यावरून हात फिरवत रडत बसले होते.. आशिषने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.. डॉक्टर येताच सर्वांना हलका धीर आला होता.. डॉक्टरांनी शरूची नाडी तपासली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली होती..

'काही विशेष घाबरण्याचे कारण नाही साटम.. सुनेचं ब्लडप्रेशर कमी झाल्यामुळे चक्कर आली होती.. मी काही औषधे लिहून देतो, ती द्या म्हणजे तिला बरे वाटेल.. आणि अजून एक महत्वाचं'- डॉक्टरांनी साटम काकांशी बोलता बोलता पॉज घेतला तसे सारेजण चिंतीत झाले..

'अजून काय डॉक्टर?? काही प्रॉब्लेम?'- न राहवून माधवरावांनी विचारलं..

'आपण?'- डॉक्टर..

'डॉक्टर, हे आमचे व्याही.. आमच्या सुनेचे वडील..श्री. माधव देशपांडे.. खूप मोठे वकील आहेत हे..'- साटम काकांनी ओळख करून दिली..

'ओह.. माफ करा.. ओळखलं नाही.. नाव खूप ऐकलं आहे तुमचं वकिलीक्षेत्रात.. प्रॉब्लेम तर आहे.. पण तो तुम्हांला आहे, साटम साहेब तुम्हांला आणि वहिनींनापण आहे.. आता तुमची धावपळ वाढणार बरे..'- डॉक्टरांनी माधवराव , साटम काका-काकूंकडे पाहत म्हटले तसे माधवराव अधिक चिंतीत झाले..

'डॉक्टर, प्लीज असे कोड्यात बोलू नका ना.. सांगा ना काही प्रॉब्लेम असेल तर..'- माधवरावांनी अक्षरशः हात जोडले होते..

'अय्या, डॉक्टर खरंच की काय??'- अचानक साटम काकींनी खुश होत डॉक्टरांना प्रश्न केला तसे सर्वजण चकीत झाले होते..

'हो वहिनी, खरंच.. बघा साटम शेवटी वहिनींनाच कळलं..आता विचारा त्यांनाच.. अहो देशपांडे.. आजोबा बनणार आहात तुम्ही.. तुमची लेक आई बनणार आहे.. मग वाढणार की नाही धावपळ.. वहिनी आत्ता फक्कड शिरा झाल्याशिवाय जाणार नाही हा मी..'- डॉक्टरांनी कारण स्पष्ट करताच सर्व जण मनापासून खुश झाले होते.. फक्त अपवाद आशिषचा.. डॉक्टरांचे निदान ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती..

त्याच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून शरयूला त्याच्या नेमक्या भावना कळल्या होत्या... सर्वजण शरयू आणि आशिषचे अभिनंदन करत होते.. माधवराव, डॉक्टर आणि साटम काकू एकमेकांसोबत गप्पा मारण्यात रंगले होते तसा आशिष निमूटपणे खोलीबाहेर पडला होता... आशाही मागोमाग शिरा बनवण्याच्या बहाण्याने बाहेर आली होती; न राहवून राहुलही हॉलमध्ये येऊन आशिषला शोधत होता... त्या तिघांना अस बाहेर पडताना पाहून शरयूच्या मनातला आनंद काळवंडला होता.. साऱ्यांच्या बोलण्याला ती कृत्रिम हास्य ठेवून उत्तर देत होती..

'दादा..'- बाल्कनीत उभा राहून आपल्याच विचारांत हरवलेला आशिष; आशाचा आवाज ऐकून भानावर आला होता.. त्याने मागे वळून पाहिलं तर आशा आणि राहुल त्याच्याकडे काळजीने पाहत उभे होते..

'मी ठीक आहे रे.. आता काय सगळंच संपलंय... आय मिन शरयूने संपवलं सर्व.. ठीक आहे.. मान्य आहे मला सर्वांचे निर्णय.. म्हणजे दोघींनीही तेच गृहीत धरलं ना?.. कोणीच माझ्या मनाचा , माझ्या फिलिंगचा विचार नाही केला.. बास.. त्याचच जास्त वाईट वाटतंय.. बाकी मी एकदम ऑल-राईट.. परफेक्टली फाईन.. डोन्ट वरी..'- आशिषने हसून उत्तर दिलं..

'दादा.. अरे पण..'- आशाने त्याला पुढे काही विचारण्याचा प्रयत्न केला तस राहुलने तिला थांबवलं..

'आशिष, अरे तु जितका दुःखी आहेस तितकीच संध्यापण असेल ना रे?? बट ती पण आता तिच्या वचनाला बांधिल आहे... आय नो हर व्हेरी वेल.. फारतर तुझ्याशी मैत्री ठेवेल किंवा तिला काही वाटलं तर तेही नाही करणार ती.. कारण ती स्वतःच्या प्रत्येक प्रॉमिसची पक्की आहे.. आणि..आणि आता तू बाप होणार आहेस.. तुझ्या मनात नसलं तरी शरयू आता तुझी जबाबदारी आहे आणि असेल.. तु माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस; त्यामुळे तुला माझा पॉइंट नक्कीच कळेल..'- राहुलने त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला..

'येस.. यू आर राईट.. मी आताची सिच्युएशन डीनाय नाही करत.. जे झालं त्यात माझा दोष आहेच..त्यामुळे मी कोणत्याच परिणामापासून पळ काढणार नाहीये.. तु जसा म्हणालास तशी शरयू आणि आमचं होणार बाळ ही माझी जबाबदारी आहे आणि असेल.. पण..पण...'- बोलता बोलता आशिषला भरून आलं होतं..

'पण मी तुझ्या लाईफमधली संध्याची जागा कधीच घेऊ शकत नाही एवढंच ना??'- शरयूने अचानक बाहेर येऊन सर्वांनाच धक्का दिला होता.. तिच्या प्रश्नाला प्रत्युत्तर म्हणून आशिषने मान हलवत होकार दिला होता..

'आय कॅन अंडरस्टॅन्ड युवर इमोशन्स आशिष.. माझ्यामुळे तुझं प्रेम तुझ्यापासून दूर गेलं.. अँड आय एम सॉरी अबाऊट ऑल दॅट..पण एक सांगू का रे? मला त्या गोष्टीचं वाईट वाटेल बट मी जे केलं त्याचा मला कधी पश्चाताप होईल असं मला वाटत नाही... अजून एक महत्वाचं.. जे मी तुला आधीही सांगितलं आहे... आय लव्ह यु.. तु माझी जान आहेस.. मी कितीही म्हटलं ना तरी माझ्या सुडासाठी मी तुला अस तडफडवू शकत नाही...सो इन फ्रंट ऑफ धिस पीपल, आय गिव्ह यु लिबर्टी.. आपल्या बाळाचा जन्म झाला की तू तुझ्या संध्याकडे परतू शकतोस.. मला काहीच प्रॉब्लेम नसेल.. वाटलं तर मी बाळाचा बाप म्हणून माझंच नाव लावेन.. आणि राहता राहिला प्रश्न संध्या अँड रवीचा... तर ते एकत्र येणे जवळपास अशक्यच आहे.. सो इन नेक्स्ट टेन मंथ, संध्या आणि यु विल बी टूगेदर फॉरेवर..'- शरयूने निर्विकार सुरात सांगितले तसे सर्वजण शॉक झाले.. कोणाचाच स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता.. सर्वांना कोड्यात टाकून शरयू तेवढी आत परतली होती..
                               -------------

'रवी, तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाऊल टाकायची??? तुला आधीच सांगितलं होतं की तू आमच्यासाठी मेलास म्हणून.. तरी तु ही हिम्मत केलीस? बऱ्या बोलाने माघारी वळ नाहीतर गाठ माझ्याशी आहे..'- रवीला दरवाज्यात पाहून त्याच्या वडिलांचं पित्त खवळलं होतं..

'बाबा.. मिच आणलं आहे त्याला.. मी माफ केलंय त्याला.. तुम्हीपण जमलं तर सर्वांनी त्याला माफ करा...'- मागून येऊन संध्याने त्यांना शांत केलं..

'आता, जर तूच माफ केलं असशील तर आम्ही अडवणारे कोण?? रवी, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची.. संध्या या घरची सून असेल ती बाहेरच्यांसाठी.. परंतु आमच्यासाठी ती आमची लेकच आहे..तुझ्यामुळे यापुढे तिच्या डोळयातून एक जरी पाण्याचा थेंब पडला तर याद राख..गाठ माझ्याशी आहे..'- वडिलांच्या इशाऱ्याला रवीने मान हलवून होकार दिला होता..

                               --##--

पाहता पाहता सहा- सात महिन्यांचा कालावधी लोटला होता.... आशिष आणि संध्या; दोघेही आपापल्या आयुष्यात बऱ्यापैकी सावरले होते...

 आशिष मान्य केल्याप्रमाणे शरयूची चांगली काळजी घेत होता.. शरयूच्या स्वभावातसुद्धा सकारात्मक बदल घडत होते.. तिचं दुःख ऐकल्यांनंतर; साटम काकींनी तिच्यावर आईसारखंच प्रेम करायला सुरू केलं होतं.. बदल्यात शरयूपण कौटुंबिक कामात स्वतःला झोकून देत होती.. एकदोनदा आशिषच्या अनुपस्थित तिने साटम काकांचीं आजारपण समर्थपणे सांभाळली होती.. विशेष म्हणजे या साऱ्या काळात तिने आशिषकडून कसल्याच परताव्याची अपेक्षा ठेवली नव्हती.. आशिष तिला बायकोसारखं प्रेम देत नसला तरी एक मैत्रीण म्हणून तो तिचा आदर करू लागला होता.. हळूहळू त्या दोघांमध्ये छान नात फुलू लागलं होतं.. परंतु मागच्या अनुभवावरून आशिष आपली मर्यादा कसोशीने पाळत होता..

संध्या आणि रवी देखिल पती- पत्नी म्हणून जवळ आले नसले तरी आशिष- शरयू प्रमाणेच त्यांच्यातील मैत्री छान वाढू लागली होती.. दोघेही एकमेकांची प्रायव्हसी व्यवस्थित जपत होते.. रश्मीकडून संध्याला शरयूच्या गरोदर असल्याची खबर  कळाली होती.. काही क्षणासाठी दुःखी झालेली संध्या वेळीच सावरली देखिल होती.. वैयक्तिक वेदनांपासून दूर जाण्यासाठी तिने स्वतःच्या मानपोसचार क्षेत्रातील कामात झोकून दिलं होतं.. तिच्या नावाचा दबदबा आता मेडिकल क्षेत्रात वाढला होता.. पाटील कुटुंबात सर्वांनाच तिचा अभिमान वाटत होता.. 

                                 --##--

हंसाबाईसुद्धा बऱ्यापैकी सावरल्या होत्या.. त्यांनी आपल्या सरकारी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेत; स्वतःला समाजकार्यात झोकून दिले होते..

दोन- तीन संवेदनशील केसेस जिंकलेला आशिष साटम आज नावाजलेला वकील बनला होता..     शरयूच्या ओटभरवणीच्या कार्यात त्याने स्वतःला तिचा नवरा म्हणून मनोसक्त मिरवून घेतलं होतं.. तिच्या गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यात तर तो तिची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेत होता.. त्याला अस वागताना पाहून सर्वजण मनोमन सुखावले होते.. शरयूच्या मनात देखिल प्रीतीची नवीन पालवी फुटली होती.. ती पण हक्काने त्याच्या कडून स्वतःचे लाड पुरवून घेत होती.. काही महिन्यात शरयूचं बाळंतपण पार पडलं होतं.. साटमांच्या घरी नाजूक परी जन्माला आली होती.. आशिष आणि शरयूच्या नावपासून; तिचं नाव अश्विनी ठेवलं होतं..

                                --##--

मधल्या काळात रवीच्या आईला कॅन्सर असल्याच निदान झालं होतं.. हा नवा आघात पाटील कुटुंबियांना हादरवून टाकणारा होता.. आपल्या जिवंतपणी वैदीहीच लग्न आणि रवी- संध्याचं खुललेलं प्रेम त्यांना पाहायचं होतं... मरण्याच्या आधी स्वतःच्या नातवाला पाहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती...

त्यांच्या इच्छा ऐकून संध्या आणि रवी काळजीत पडले होते.. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वैदेहीने लग्नासाठी होकार कळवला होता.. तिचं लग्न तिच्या इच्छेनुसार; तिच्या बॉयफ्रेंडसोबतच पार पडलं होतं... साऱ्या लग्नाची जबाबदारी संध्या आणि रवीने उत्तमरीत्या निभावली होती...

'रवी, आईची दुसरी इच्छा कशी पुर्ण करायची रे??'- वैदीहीच्या लग्नाची सारी कार्य आटपल्यानंतर संध्याने रवीसमोर विषय मांडला..

'मलाच सुचत नाहीये अग.. माझ्याच भूतकाळातील चुकांमुळे आज स्वतःच्या आईची इच्छा पुर्ण करू शकत नाहीये... यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीच नसेल..'- रवीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

'एक उपाय आहे माझ्याकडे..'- संध्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला आश्वस्त केलं..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all