अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 38

This part is in continuation with earlier series

काहीवेळ, हंसाबाईनशी गप्पा मारून दोघींनीं त्यांचा निरोप घेतला होता.. घरी परतताना संध्याने पाटिलबाईना ती उद्या वैदीहीला घेऊन; आशिषला शेवटच भेटण्यासाठी जाणार असल्याची कल्पना दिली होती.. 

पाटीलबाईनी परवानगी दिली तरी त्यांच्या मनात धाकधूक वाढत होती.. शेवटी संध्याच्या नकळत त्यांनी एक मेसेज टाईप करून सेंड केला होता.

                               --------------
शरूच्या सून म्हणून येण्याने साटम कुटुंबात वेगळंच चैतन्य आले होते... तीनेसुद्धा अजून पर्यंत तिचे खरे रंग न उघडल्याने सारेजण अंधारातच होते.. नाही म्हटलं तरी आशिषला तिचा पूर्वानुभव असल्याने तो तिच्याशी फटकूनच वागत होता.. शरू पण त्याला संध्यावरून डीचवायची एक संधी सोडत नव्हती...

'काय मग आशुची संध्या काय म्हणतेय?? आली नाही एकदासुद्धा तिच्या आशुला बघायला..'- शरूने बेडरूमचा दरवाजा बंद करत पुनःश्च आशिषच्या  दुःखावरची खपली काढली होती...

'का अस करतेस शरयू?? काय मिळतं तुला हे सर्व करून?'- आशिषने त्रासिकपणे तिला विचारलं..

'आनंद.. खूप आनंद.. खूप खूप आनंद.. तुला मी आधीपण  सांगितलं होतं; माझी दुष्मनी संध्यासोबत आहे... तरी तू तिच्यावरच प्रेम केलंस?? आता भोग आपल्या कर्माची फळं.. तुला लागलं तर तिला वेदना होणार ना?? तेच...तेच तर हवं मला... '

'अरविंद शिर्केच्या अख्या खानदानाला नरकयातना दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही..कोणालाच सोडणार नाही मी..कोणालाच नाही...खूप छळ केला तिचा मामाने.. किती सोसलं तिने... स्वतःच मरणपण तिला कळलं नाही...तिने जे जे भोगल त्याचा सुड घ्यायचा आहे मला.. मी नाही सोडणार कोणाला..'- शरयूचा स्वर जड झाला होता..रागाने तिच्या नाकपुड्या फडफडत होत्या.. क्षणात तिच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या...

'ये बाई, हे तुझे मगरीचे अश्रू बाहेर आई-बाबांसमोर जाऊन काढ.. माझ्यावर त्याचा काहीही परीणाम होणार नाही आहे..'- आशिष पाठ फिरवून झोपी गेला होता..

'मला नाही कसली गरज...'- शरयूसुद्धा उलट्या दिशेला तोंड करून झोपली होती..नेहमीप्रमाणे दोघांच्या मध्ये उशांचीं एक रांग लक्ष्मणरेषा म्हणून ठेवलेली होतीच..

मध्यरात्री आशिषला कसल्याशा आवाजाने जाग आली; घड्याळात पाहिले तर रात्रीचे दीड  वाजत आले होते.. बाजूलाच शरयू अजूनही स्फुंदत रडत होती.. त्याने बाजूच्याच नाईट लॅम्पच्या प्रकाशात पाहिलं तर ; तिचे डोळे मिटले असले तरी तिच रडणं चालूच होत.. रडून रडून तिच्या डोळ्यांना आलेली सूज त्याला तेवढया अंधुक प्रकाशात सुद्धा स्पष्ट दिसत होती.. 

'अरे यार, ही तर खरंच रडतेय.. एवढं काय मनात साचवून ठेवलंय हिने??' - आशिष मनातल्या मनात बोलत होता..

'शरयू? शरयू? अग काय झालंय नेमकं?? एवढी का रडतेस?'- आशिषने मधल्या उश्या बाजूला करत तिला विचारलं..

'तुला..तुला काय करायचं आहे.. तु..तु..जा झोप.. माझं मी बघून घेईन... मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही..'- शरयू फणकाऱ्याने उत्तरली तरी तिच्या डोळ्यातले पाणी काही थांबायचे नाव घेत नव्हते..

आशिषने सरतेशेवटी उठून लाईट लावली होती.. त्याची सहज नजर गेली तर तिची उशी संपूर्ण भिजली होती.. त्याने लाईट लावताच तीपण उठून बसली होती.. तिला अस पाहून आशिषला वाईट वाटलं होतं..

'एम सॉरी.. मला वाटलं तु नाटकं करत असशील.. मला माहित नव्हतं की तू खरंच आतून हर्ट झाली आहेस..सॉरी..'- आशिषने तिच्याकडे पाहत म्हटलं तसे तिने पटकन चेहऱ्यावरचे सारे थेंब आपल्या हाताने फुसले...

'माझी काहीच कंपलेंट नाहीये आशु त्याबाबतीत.. मी आतपर्यंत नाटकीच तर वागत आली आहे तुमच्यासोबत.. पण एक सांगू का रे?? नाही रे मी एवढी पण वाईट... मला..मलापण आतून माझं मन खात.. जेव्हापण मी तुमच्या पैकी कोणाशी वाईट वागते तेव्हा.. तेव्हा खूप त्रास होतो रे.. खूप त्रास होतो.. मला खरच तुम्हांला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता आणि पुढेही नाही...'- शरूच्या तोंडून सगळी वाक्य ऐकून आशिष हैराण झाला होता...

'अग, मघाशी म्हणालीस ना?? मला त्रास झाला तर संध्याला त्रास..ते..ते काय मग..नेमका कशावर विश्वास ठेवू मी??'- आशिष वैतागला होता..

'दोन्हींवर.. दोन्हीं गोष्टी खऱ्या आहेत.. तुला मी त्रास फक्त आणि फक्त संध्याला मानसिक त्रास व्हावा म्हणूनच देते.. बाकी..बाकी...'- बोलता बोलता शरयू आवंढा गिळत थांबली होती...

'बाकी काय?'- आशिष..

'तुझा भरोसा नाही बसणार.. सोड..'- शरयू..

'तु बोलशील तर कळेल ना?? बोलून तर बघ.. '- आशिष...

'मम्मा शप्पथ आशु.. आय..आय लव्ह यु.. आय लव्ह फ्रॉम डे वन आय सॉ यू इन अवर कॉलेज...'- शरूने कबुली देताच आशिषची झोप खाडकन उडाली होती..

'काय?? काहीही नको बोलूस..'- आशिषला विश्वास बसत नव्हता..

'सत्य सांगतेय.. माझ्या मम्माची शपथ घेतलीय मी आशु.. यू वॉज माय लव्ह ऍट फर्स्ट साईट.. तु जेव्हा आशाचा प्रॉब्लेम कळण्यासाठी कॉलेजबाहेर थांबला होतास; तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तुला.. तेव्हा पासून प्रेमात आहे तुझ्या... आणि आजही... आय स्टील लव्ह यू..'- शरयूच्या प्रत्येक वाक्यागणिक आशिष चकीत होत होता..

'तु? आणि प्रेम?? तुला कधी अर्थच नाही कळाला ग प्रेमाचा.. कळला असता तर माझ्यासोबत अशी वागली नसतीस..'- संध्याच्या आठवणीत नकळतपणे आशिषच्या डोळयाच्या कडा पाणावल्या होत्या..

'एकतर लाईफमध्ये इतक्या साऱ्या टेंस मोमेंट्स मध्ये पहिल्यांदा कोणी तरी आवडलं आणि त्याने प्रेम करावं तर ते पण कोणावर? माझ्या सर्वात मोठया शत्रूच्या मुलीवर?? कस..कस सहन करेन मी?? शक्यच नाही.. गळा घोटलाय मी माझ्या प्रेमाचा; माझ्या बदल्यासाठी... तु..तुला सांगितलं होतं मी.. संध्याचा नाद सोड.. ती माझी शिकार आहे; तु ऐकला नाहीस माझं..मी तिला सोडणार नाहीच...भले तिला मरणयातना देण्यासाठी मला तुला कितीही त्रास द्यावा लागला तरी.. तरी तो..तो मी देणार.. आणि.. आणि भले त्यासाठी माझ्या ह्रदयाने मला धिक्कारलं तरी चालेल मला...'- शरूने बोलता बोलता गादीवर हात आपटला त्याचक्षणी तिचा अंदाज चुकून तिचा हात बेडच्या बाजूच्या लोखंडी भागावर आदळला..

'आई ग....मम्मा..'- कळवळून तिने हात पोटाशी धरला.. 

आशिषने तात्काळ उठून तिचा हात हातात घेत, हाताने चोळला होता..नंतर बाजूच्याच ड्रॉवरमधून तेल काढून त्याने तिच्या हातावर हलकं मॉलिश केलं तसं तिला बरे वाटले...

'थँक्स...थँक्स आशु... तु खरच खूप छान आहेस रे स्वभावाने..रिअल जेंटलमन..'- शरयूने त्याचा हात हातात पकडून ठेवत त्याला म्हटलं..

'पण तुला संध्या आणि तिच्या घरच्यांचा एवढा राग का??'- न राहवून आशिषने तिला विचारलं..

'नक्की सांगेन..एक दिवस स्वतःहुन सांगेन..ऐकशील तर कदाचित मला माफपण करशील.. बट आता उशीर झाला आहे नवरोबा.. आता गप्पा मारण्यासाठी मला जाग राहायचं नाही आहे.. हा..तु आपला राहिलेला हनिमून आज कंपलिट करणार असशील तर मी जागेन...'- शरयूने अचानकपणे आशिषच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले होते..

शेवटी वासनेने प्रेमावर विजय मिळवला होता.. आशिषला स्वतःच नियंत्रण ठेवता आलं नव्हतं... रात्रीचे पुढचे काही प्रहर दोघेही कामक्रीडेचा उपभोग घेऊन, एकमेकांच्या मिठीत झोपून गेले होते...

सकाळी शरयुला अंमळ उशिरा जाग आली, तिने आजूबाजूला उठून पाहिलं तर आशिष बेडवर नव्हता.. आपले कपडे सावरत तिने आजूबाजूला पाहिलं तर तिला बेडरूमच्या बाल्कनीमधून काहीसा आवाज येत होता.. तिने आवाजाच्या दिशेने जात पाहिलं तशी ती चक्रावली होती..बाल्कनीच्या भिंतीवर हाताने पंच मारुन मारून; त्याने त्याचे दोन्ही हात रक्तबंबाळ करून घेतले होते...त्याच्या चेहऱ्यावर राग तर डोळ्यामधून अश्रुंचे थेंब बाहेर पडत होते..शरयुला समोर पाहून तो खाली मान घालून थांबला होता..ती काय समजायचे  ते समजून गेली होती...

'आय एम सॉरी आशु...मी तुला अस अडकवायला नाही पाहिजे होतं... आय एम रियली सॉरी...'- शरयूने धावत जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला होता...रडवलेल्या चेहऱ्याने तिने त्याच्या जखमा फुसत त्यावर मलमपट्टी केली होती... त्याची पुन्हा एकदा क्षमा मागून ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती...

आशिषचा त्रागा पाहून तिच्या मनाला भयंकर वेदना जाणवत होत्या.. शरीरावर पडणारे थेंब नक्की शॉवरचे की आपल्या अश्रुंचे हेच तिला कळत नव्हते.. कसंबसं तिने स्वतःला सावरलं होतं.. 


पण असंही एक वादळ तिच्या दिशेने जोरात घोंघावत येत होतेच..

क्रमशः

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all