अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 33

This part is in continuation with earlier series

'गुड बॉय.. वेलडन डार्लिंग.. आय एम प्रावूड ऑफ यु रवी.. आता ऍटलिस्ट साटम फॅमिली तरी संध्याचा हेट करेल.. मग आशिषला तर तेच करायचंय जे त्याचे आई-बाबा बोलतील म्हणजे जे मी बोलेन...चल बाय.. जीत मुबारक..'- शरू..

'हो, जीत मुबारक..'- रवी...

                            -------------------------
"भैय्या, कसली जीत मुबारक रे?"-  वैदेहीने मागून अचानक येत रवीला विचारलं...

'अम्म्म.. तु.. तु काय करतेस इकडे? अजून झोपली नाहीस? तु .. तु पण जास्त शेफारली आहेस.. जा.. जा.. झो..झोप जा...'- रवीने तिला धुडकावून लावलं होतं.. वैदेही स्वतः एक प्रायव्हेट डिटेक्टिव्हच ट्रेनिंग घेत होती त्यामुळे रवीला शक्य तितकं तिला या सर्वांपासून दूर ठेवायचं होतं..

'चिल ब्रो.. मी तर तुला फक्त तुझ्या खुशीच कारण विचारलं.. नाही सांगायचं तर नको सांगूस ना बट उगाच ऍटीट्युड कशाला दाखवतोस??..'- वैदीही तोंड वाकड करून तिच्या रूममध्ये शिरली होती..

इकडे संध्या वेड्यासारखी दरवाजावर थापा ठोकत होती, आतून दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करत होती.. तिचा आवाज आता टिपेला पोहचला होता पण कोणालाच तिची दया येत नव्हती.. 

रवीने आधीच घरच्यांच्या मनात संध्याबद्दल खोटंनाट भरून, तिच्याबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण करून ठेवला होता.. संध्याने तिचं लग्नाआधीच प्रेम आपल्यापासून लपवून ठेवलं आणि आज मी तिला तिच्या भूतकाळासकट स्वीकारलं तरी ती तिच्या प्रियकराला विसरायला तयार नाही.. ती माझा सतत अपमान करते असं बरच काही सांगून त्याने संध्याला घरच्यापासून मनातून दूर केलं होतं.. रवीच्या वडिलांनी तर अरविंदरावांना फोन करून त्यांची कानउघाडणी केली होती.. अरविंदरावांनी सुद्धा भोळेपणाचा आव आणून त्यांची क्षमा मागून संध्याला समजवण्यासाठी वेळ मागून घेतला होता..

इथे संध्याच्या किंकाळ्या रात्रभर चालू होत्या... घरातल्या सर्वांची नाव घेऊन ती त्यांना नाना तऱ्हेने विनंती करत होती पण कोणाच्याच मनाला पाझर फुटला  नव्हता.. 

नाही म्हटलं तरी वैदीहीला आता राहवत नव्हतं... एकतर तिची आणि रवीची रूम बाजूबाजूला असल्याने ; संध्याच्या आक्रोशामुळे तिला झोप लागत नव्हती अन तिचा न थांबणार रडणं, रवीचं मगाशी आपल्याला विनाकारण पळवून लावणं यावरून तिला वेगळीच शंका येत होती.. वहिनी एवढी का डीसपरेट आहे? काहीतरी नक्कीच आहे की जे भैय्यानें आमच्यापासून लपवल आहे.. जावं का वाहिनीकडे?.. शेवटी वैदेही मनाशी ठरवून संध्याकडे निघाली तितक्यातच तिचा आवाज शांत झाला होता..

' थँक गॉड.. शांत झाली वाटतं.. चला ती परत जागी होण्याच्या आधी झोपून घेऊ'- मागे फिरून वैदेही झोपून गेली होती..

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजले तरी संध्याचा आवाज आला नव्हता तशी वैदेहीला शंका आली.. रवी आधीच बाहेर गेला होता..आई नाही नाही बोलत असताना वैदीहीने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली ..

'मॉम, डॅड.. लवकर या.. ओह गॉड.. मॉम भैय्याला कॉल कर अर्जेंटली..डॅड अंबुलन्स बोलवा..इट्स मेडिकल इमर्जन्सी डॅड.. '- वैदीहीची धावपळ पाहून सर्वजण संध्याकडे धावले; समोरचं चित्र पाहून सर्वच जण हादरले होते.. 

संध्या रक्ताच्या थारोळ्यात, निपचित पडली होती.. रात्रभर दरवाजावर हात आपटून आपटून   तिच्या हातातल्या बांगड्या फुटून त्याच्या काचा तिच्या मनगटाच्या आजूबाजूला घुसल्या होत्या.. बहुधा त्याही अवस्थेत तिने दरवाज्यावर थापा मारणे चालूच ठेवल्यामुळे रक्तस्राव मोठया प्रमाणात झाला होता.. संध्या बेशुद्धच होती..

अंबुलन्स येताच संध्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलं होतं.. रवीला घटनेची खबर लागताच त्यानेपण हॉस्पिटलकडे धाव घेतली होती..

रक्त खुप जास्त वाहून गेल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.. डॉक्टरांनी पुढचे चोवीस तास तिच्यावर लक्ष ठेवावे लागेल; असे पाटील कुटुंबियांना सांगितले होते.. 

तिची अशी भीषण अवस्था पाहून रवीवरची एकतर्फी प्रेमाची नशा हळूहळू उतरू लागली होती.. आपल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत होता.. कोणाचेच लक्ष नाही असं बघून तो एका कोपऱ्यात एकटाच अश्रू ढाळत उभा होता.. रागारागात आपली मूठ बाजूच्या भिंतीवर आपटत होता..

'एम सॉरी संध्या.. मी खरंच अस नाही करायला पाहिजे होतं तुझ्यासोबत.. आयुष्यात कधीच असे छक्के पंजे खेळलो नाही पण आज तुला मिळवण्यासाठी किती खाली उतरलोय हेसुद्धा माहीत नाही ग.. माफ कर संध्या.. माफ कर.. पण लवकर बरी हो.. मला तुझे पाय पकडून तुला सॉरी बोलायचं आहे संध्या.. प्लीज गेट वेल सून..'- रवी रडता रडता स्वतःला मनाशी दोष देत होता..

सारा प्रकार वैदीही दुरून पाहत होती.. तिचं डिटेक्टिव्ह डोकं आता वेगवेगळ्या दिशेने विचार करू लागलं होतं.. संध्याला शुद्ध आली की तिलाच विश्वासात घेऊन सर्व काही विचारावं अस ठरवून तीने त्यावेळेस शांत राहण्याचं ठरवलं होतं..

                  --#--

दुसऱ्या दिवशी शरू सकाळी सातच्या आधीच ज्युस, ताजी फळे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचली होती.. जेन्ट्स वॉर्ड असल्याने आशिषला सोबत म्हणून साटम काका रात्रभर तिथेच थांबले होते.. त्यांना आग्रहाने चहा-नाष्टा देऊन तिने त्यांना विश्रांतीसाठी घरी पाठवले होते.. साटम काकांच्या मनात शरूची जागा आता प्रबळ होत चालली होती.. देव करो शरूच्या मनासारखं होवोत; हीच आमच्या घरी सून म्हणून येवो..-साटमकाका मनातल्या मनात प्रार्थना करत घरी निघाले होते..

एक अर्ध्या तासातच आशा हॉस्पिटलमध्ये पोहचली; शरूला आशिषच्या बेड शेजारी उभी पाहून तिला आश्चर्य वाटलं..तिने पाहिलं तर शरू एकटक आशिषकडे पाहत उभी होती..

'ही खरंच दादावर एवढं प्रेम करते? असेलच म्हणूनतर इतक्या लवकर इथे पोहचली ना.. आणि तिची नजरच तिच्या प्रेमाची साक्ष देतेय.. देवा, निदान हे प्रेमतरी दादाला लाभू दे रे..पण संध्या? संध्याला निरोप तर दिला असेलच राहुलने.. मग ती कशी नाही आली अजून? शरू म्हणते तस दादाला टिश्यू पेपर नाही ना केलं तिने?'- आशा आपल्याच विचारात गर्क झाली होती..

'आशा, कधी आलीस? ये ये डिअर.. झोपला आहे अजून तो.. चल आपण बाहेर बसू.. उगाच त्याला डिस्टर्ब नको..'- शरूने आशाला बळेच वॉर्डबाहेर नेलं..
 
दुपारी बाराच्या आसपास साटम काका काकूंना घेऊन आले होते.. काकूंनी येताना सर्वांसाठी जेवण आणलं होतं.. शरूने त्या दोघांना आशिषजवळ जाऊ दिलं आणि स्वतः आशाला घेऊन कॅन्टीनमध्ये गेली होती..

'अग, इथे का आणलस? तिथेच दादासोबत जेवलो असतो ना आपण सर्व? ओहके.. तुला गेलं नसतं ना जेवण त्याला समोर पाहून?'- आशाने डोळे मिचकावत शरूला छेडलं..

'अग तस नाही.. काका-काकी किती टेन्शनमध्ये होते .. आता त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेन्ड करतील तर त्यांनापण बरं वाटेल ना.. त्यांच्या मनावरचा स्ट्रेस कमी होईल ग..'- उगाचच जेवणातून बोट फिरवत शरूने उत्तर दिलं..

'खरं का? नक्की हेच कारण आहे का?'-आशाने तिचा पिच्छा सोडला नव्हता..

'तु पण ना आशा.. ओके बाबा.. आय ऍसेप्ट.. मला आता लगेच त्याच्यासमोर नाही यायच आहे.. आधी काका-काकुंच मन जिंकायचं आहे अन मग विचारेन मी त्याला..'- शरू..

'मग तर तू बाजी मारलीस आहेस अस समज.. काल आमच्या घरात रात्रभर शरू-पुराणच चालू होतं बरे..'- आशाने हसत तिला सांगितलं तशी शरू मनातून खुश झाली.. सध्यातरी सार काही तिच्या मनाप्रमाणेच घडत होतं..

'पण एकच अडचण आहे शरू.. दादाच्या मनातली संध्याची जागा..ती तुला सहजपणे मिळेल अस वाटत नाही.. बघ अजून सांगते शरू.. नीट विचार कर.. संध्याबद्दल त्याच्या मनातलं प्रेम मी स्वतः अनुभवतेय..म्हणून म्हणतेय तुला..'- आशाला शरूची काळजी वाटत होती...

'ठीक आहे ग.. त्यात काय एवढं?  एक आठवडा? एक महिना? एक वर्ष? एक डिकेड? अख्ख आयुष्य थांबावं लागलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही बट मला ऍटलिस्ट त्याची बायको म्हणून तरी ओळख द्यावी त्याने..मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे.. एक दिवस नक्कीच त्याच मन जिंकेन मी...ए बट तु मला मदत करायची हा..'- शरू..

'नक्की.. डन..दादाच्या मनातली संध्या आता पुसावी लागेल.. ती येईल असं आता मला तरी वाटतं नाही.. तु बोललीस तेच खरं झालं बघ.. रवी सोबत सेट झाली ती.. आता दादाच काही पडलं नाही तिला..'- नकळत आशाच्या चेहऱ्यावर संध्याबद्दल राग तयार झाला होता.. 
                  --#--

'पेशंट मिसेस. संध्या पाटील सोबत कोण आहे??'- नर्स धावत बाहेर येऊन विचारणा करत होती... रवी नेमका तेव्हा आई-बाबांना घरी सोडायला गेला होता त्यामुळे वैदीही एकटीच तिथे थांबली होती..

'मी आहे सिस्टर.. एनी प्रॉब्लेम?'

'हो.. प्लीज लवकर चला.. पेशंट खूप हायपर झाली आहे.. त्या आमच्या कंट्रोलबाहेर होत चालल्या आहेत.. सारखं मला जाऊ द्या.. माझ्या आशुकडे जाऊ द्या म्हणून ओरडत आहेत.. अजून त्यांच्या बॉडीत सफीशिअंट ब्लड नाही आहे आणि त्यात त्यानीं अस बिहेव्ह केलं तर आम्हांला त्यांची ट्रीटमेंट कशी करता येईल?'- सिस्टर वैदीहीला आत नेता नेता संध्याच्या आक्रस्ताळेपणाची कल्पना देत होती..

'वहिनी? अग शांत हो.. अजून बरी नाही झालीस तु..का एवढा त्रास करून घेतेस स्वतःला??'- वैदीहीने संध्याजवळ पोहचताच तिच्या डोक्यावरन हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला..

'वैदी, प्लीज वैदी.. मला.. मला माझ्या आशुकडे घेऊन चल ग एकदा.. प्लीज एकदा घेऊन चल..त्या लोकांनी त्याला मरणाच्या दारात ढकलय ग.. मला फक्त एकदा बघू दे ग त्याला.. एकदा बघू दे माझ्या आशुला..'- संध्या हात जोडून वैदीहीला विनंती करत होती..

तिला अस केविलवाण, असहाय्य रडणं पाहून बाजूला उभ्या असलेल्या सिस्टरच्या डोळयांतपण पाणी येत होतं..

'वहिनी.. शांत हो.. मी नेईन तुला तुझ्या आशु कडे? पण कोण आशु? मला सांग वहिनी.. सांग वहिनी..'- सिस्टरला डोळयांनी बाहेर जाण्याचा इशारा करत वैदेहीने संध्याला विचारलं..

'आशु.. आशु.. माझी लाईफ.. माझा श्वास.. छळ केला त्या लोकांनी त्याचा.. साध्या सरळ मुलावर नको तो आळ टाकला.. त्याची जिंदगी बरबाद केली त्यांनी.. मी कोणालाच सोडणार नाही..'- संध्या रडता रडता रागाने तडफडत होती..

'कोण लोक वहिनी.. मला सांग.. सगळं सांग.. वहिनी आय प्रॉमिस.. त्या लोकांना दंड देण्यासाठी मी तुला मदत करेन.. प्रॉमिस.. पण मला सर्व सांग..'

'ती.. ती लोक.. माझे आई-बाबा आणि.. आणि.. तु.. तुझा दादा.. सर्वच्या सर्व नीच...'- संध्याने वैदिला आतापर्यंतचं तिच्या आणि आशिषसोबत घडलेलं सर्व सांगितलं.. आणि इतक्या वेळच्या ताणाने तिची शुद्ध हरपली..

वैदिने सिस्टरला बोलवत परत एकदा तिला रक्त चढवायला घेतलं होतं..

संध्यावर झालेला अन्याय ऐकून वैदेहीला खूप वाईट वाटत होतं; त्याहीपेक्षा तिच्यावर अन्याय करणाऱ्यात आपला भैय्यापण शामिल असल्याचं समजल्याने ती अधिक व्यथित झाली होती.. बाकी कोणाचं काही करता नाही आलं तरी किमान स्वतःच्या भावाला चांगलाच धडा शिकवण्याचा तिने निश्चय केला होता..

                                   --#--


माधवरावांनी आपला अनुभव पणाला लावून आशिष साठी जामीन मिळवला होता.. त्याची खबर देण्यासाठी ते संध्याला फोन ट्राय करत होते पण तिचा फोन स्वीच ऑफ येत होता..

तितक्यात त्यांच्या मोबाईलवर शरूचा फोन आला होता.. तिच्याबरोबर बोलणं झाल्यावर माधवरावांच्या कपाळावर आठयांचे जाळे पसरले होते.. शरूचा निर्णय ऐकून आणि त्यासाठी तिने सांगितलेला मार्ग ऐकून ते हताश झाले होते..


क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all