अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 28

This post is in continuation with earlier series.

आशिषला सर्वांसमोर रडता येत नसलं तरी आतून तो पुर्ण कोलमडला होता.. झाल्या संपुर्ण प्रकाराने त्याच डोकं सुन्न झालं होतं.. संध्या निघून गेली तरी कितीतरी वेळ तो तसाच ती गेल्याच्या दिशेने पाहत पुतळ्यासारखा निश्चल उभा होता..कोणाचं तरी आयुष्य सावरता सावरता त्याच्या स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी झाली होती.. 
                        --------------------------
अरविंदरावांनी गाडीत बसल्या बसल्याच परत एकदा संध्याला धमकावले होते.. 
'तुझा आशिष साटम आता आयुष्यातुन उठेल बघ.. माझ्याशी दुश्मनी महागात पडेल त्याला... अन तुला पण आता तेच करायचं आहे जे मी तुला सांगेन.. गपगुमान रवीबरोबर संसार थाटायचा... काही शहाणपण करायला जाशील तर त्याची शिक्षा तुझ्या आशिषला भोगावी लागेल.. मी काय करू शकतो याचा अंदाज तर तुला आलाच असेल ना??'- अरविंदराव सुडाने पुर्ण पेटले होते..

इकडे संध्या जबरदस्त मानसिक धक्क्यात होती..वडिलांची धमकी तिच्या कानावर पडत तर होती पण मेंदूच्या संवेदनाच बधिर झाल्यामुळे तिचं मन काहीही समजण्याच्या पलीकडे गेलं होतं..वडिलांची गुंडगिरी अनं मित्राचा विश्वासघात तिच्या मनावर खोल आघात करून गेला होता..

इकडे आशिषची अवस्थापण काही वेगळी नव्हती..ज्या रवी पाटीलसाठी आपण कधी काळी इतका मोठा त्याग केला, आपलं पाहिलंवहिलं प्रेम पणाला लावलं; त्यानेच  स्वार्थापोटी केसाने आपला गळा कापावा.. अरे एकदा बोलून तरी बघायचं; मी स्वतः संध्याला मनवल असतं.. पण..पण खरंच मी तस करू शकलो असतो? संध्या तर माझा जीव की प्राण आहे; मग तिला असं स्वतःपासून तोडणं मला जमलं असतं? कधीच नाही.. कधीच नाही.. सध्या काय अवस्था असेल बिचारीची.. बापाचं निगेटिव्ह रूप बघायला मिळालं आणि त्यात रवीची ही खेळी; तिचा नक्कीच नात्यांवरचा विश्वास उडवेल... देव तिला हे सर्व सहन करण्याचं बळ देवो.. - घरी आल्यापासून आशिष असाच शून्यात पाहत विचार करत बसला होता..

आशापण नेमकी त्याच दिवशी काही दिवसांसाठी माहेरी झाली होती.. तिला पाहताच आशिषला स्वतःला आवरणं कठीण गेलं; इतका वेळ रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला होता... बहिणीच्या मिठीत आशिष हसमसून रडत होता.. झाला प्रकार आशाला कळला तसा तिलासुद्धा धक्का बसला होता.. कसंबसं तिने आशिषला शांत केलं होतं..

आशिष शांत झाला असला तरी त्याच्या मनातली वेदना आशाला समजत होती... वारंवार गोंजारण्यापेक्षा त्यालाच स्वतःला सावरायला वेळ दिला तर तो लवकर सावरेल, आपण अधूनमधून लक्ष ठेवूच या विचाराने त्याला एकटं सोडलं होतं.. आई-बाबांना थातूरमातूर कारण देऊन तिने काही दिवस आशिषला कोणतेही प्रश्न विचारायला मनाई केली होती...

अरविंदराव संध्याला घरी घेऊन पोहचले होते.. घर आलं तरी संध्या गाडीतून उतरण्याच्या मनस्थितीत नव्हती तस त्यांनी तिला जवळपास गाडीतून ओढत बाहेर काढलं होतं..

घरात प्रवेश करताच हंसाबाई तिला सामोऱ्या आल्या होत्या..

' काय केलं ना शेवटी त्या पोराने त्याच्या मनासारखं... खंडणी दिली नाही म्हणून फसवलं ना तुझ्या बापाला खोट्या केसमध्ये? आता काय इज्जत राहीली त्यांची? किती मुर्ख आहेस तू संध्या? अशी कशी तु त्या फालतू पोराच्या जाळ्याला अडकलीस? मी सोडणार नाही त्या भिकाऱ्याला, लक्षात ठेव.. नाही त्याला धडा शिकवला तर याद राख...'- हंसाबाई क्रोधाने बेजार होत बोलत होत्या.. 

' तरी बर झालं अरविंद; आपल्याला रवीने काल आधीच सावध केलं.. त्याने त्या पोराची धमकी ऐकवली म्हणून आपली मानसिक तयारी तरी झाली.. आणि अभिमान आहे मला तुमचा; अशा सडकछाप लोकांना तुम्ही भीक घातली नाही; त्याला खंडणी दिली नाहीत..ठीक आहे, एक डाव तो जिंकला पण आता त्याची गाठ माझ्याशी आहे.. हंसा शिर्के त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही..'

संध्यावर आता दुहेरी आघात होत होता.. तिला अपेक्षा होती की ती मॉमला सत्य सांगेन मग ती तरी आपल्याला सपोर्ट करेन पण इकडेसुद्धा अरविंदरावांनी आधीच खेळी खेळत रवीमार्फत त्यांच्या डोक्यात आशिषबद्दल खोटं भरवलं होतं..

संध्याला आता स्वतःच्या वडिलांची आणि रवीची जास्तच घृणा वाटत होती..

'मॉम, डॅड.. तुम्हांला असं वाटत ना की मी आशिषला विसरून जावं.. डन.. तुमची इच्छा आहे ना की मी रवीशी लग्न करावं...ते पण डन.. बट तुम्हांला पण एक प्रॉमिस करावं लागेल..तुम्ही आशिषला काहीच थ्रेट करणार नाहीत..'- एका निर्जिव पुतळ्याने अचानक बोलावं तसे संध्याच्या तोंडून शब्द फुटत होते..

'ऍग्री.. नो प्रॉब्लेम... तु आमचं ऐक.. आम्ही तुझं ऐकू.. तु काहीही ड्रामा न करता रवीशी लग्न कर आम्ही आशिषला काहीही करणार नाही..'- अरविंदरावांनी हंसाबाईना डोळा मारत संध्याला खोटं आश्वस्त केलं..

सर्व ऐकून संध्या तशीच बेडरूममध्ये पोहचली होती.. आत पोहचताच बेडवर तशीच आडवी होत, खाली मान घालून ती रडत होती.... 

'आशु सॉरी रे... मला नाही माहीत होतं रे की माझा बाप एवढा पाताळयंत्री असेल.. बाप? मला तर आता बाप म्हणायला पण लाज वाटतेय अरविंद शिर्के तुम्हांला...स्वतःच्या इगोसाठी पोटच्या पोरीच्या भावनांशी खेळलात तुम्ही..माझं प्रेम हिरावून घेतलंय तुम्ही.. माझी सारी स्वप्न डिस्ट्रॉय केलीत तुम्ही..उभ आयुष्य मी तुम्हांला कधी माफ करणार नाही डॅड.. कधीच नाही..'- संध्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबता थांबत नव्हती..

अशीच रडता रडता मध्यरात्र उलटून गेल्यावर, संध्याच्या डोक्यात काहीतरी चमकल तस तिच्या चेहऱ्यावर खुनशी हासू उमटलं.. 

' आशु डार्लिंग सॉरी रे.. तु मला बदलस.. मला माणसांत आणलस.. बट या लोकांना धडा शिकवण्यासाठी मला माझ्या व्हॅपं रुपात यावच लागेल.. मला जुनी संध्या बनून यांना वठणीवर आणावं लागेल..रवी पाटील, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना... करूया रे आपण सोन्या... मी तुझीच बायको होईन परंतु आयुष्यभर तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप करायला नाही लावला तर नावाची संध्या नाही.. क्वीन इज बॅक..'- संध्याचा निर्णय झाला होता.. तिच प्लॅनिंग ठरलं होतं.. 

तिच्या योजनेनुसार, प्रकृति अस्वस्थेचं कारण देत; पुढच्या एक आठवड्यासाठीची तिची सारी सेशन्स तिने रद्द केली होती.. हे ऐकून अरविंदराव मनातून खुश झाले होते...तरीसुद्धा सावधगिरी म्हणून त्यांनी, हंसाबाईचें कान भरून संध्याचा मोबाईल नंबर जॅम करायला लावला होता..


संध्याला आता काहीच फरक पडणार नव्हता.. तिच्यात पण अरविंद शिर्केचंच रक्त होत; ती पण सुडाने पेटली होती.. रवी पाटील तिची पहिली शिकार होती.. त्याला आयुष्यभराचा धडा शिकवण्याची तिची योजना तयार होती..

इकडे जसजसा रविवार जवळ येत होता तसतसा आशिष जास्त विचलित होत होता.. घरी असल्यामुळे त्याला दुःख चेहऱ्यावर आणता येत नव्हतं पण आतल्याआत दाबून ठेवणंसुद्धा कठीण जात होतं; परिणामी त्याची मानसिक तळमळ प्रचंड वाढली होती.. आशा आताशी त्याच्या सोबतच असायची.. साटम काका- काकींना पण आता टेंशन येत होतं.. आशाने काहीही चौकशीसाठी मनाई केल्यामुळे त्यांचापण नाईलाज होत होता.. काहीतरी जास्तीच बिनसलं आहे एवढाच त्यांचा अंदाज होता आणि जे काही आहे ते लवकर दूर व्हावं हीच त्यांची प्रार्थना होती..

अखेरीस रविवार आला होता.. सकाळी सकाळी हंसाबाई डिझायनर साडी आणि मॅचिंग ज्वेलरी घेऊन संध्याच्या रूममध्ये गेल्या होत्या.. संध्या शांतपणे आत पुस्तक वाचत बसली होती.. ते पाहून हंसाबाईना काहीसं विचित्र वाटलं होतं.. पण आशिषच्या सेफ्टीसाठी हिने स्वतःला रवीसोबत संसार करण्यास तयार केलं असावं अशी त्यांची धारणा बनली होती..

'संध्या, ही साडी आणि ज्वेलरी इथे बेडवर ठेवतेय.. दुपारी डॉट तिनला आपल्याला निघायचं आहे.. सो बी रेडी ऑन टाईम... क्लीअर??'- हंसाबाईनीं तिला करड्या आवाजात सूचित केलं होतं..

'ओके मिसेस. शिर्के... तुमच्या मनाप्रमाणेच होईल..मी अडीच वाजता रेडी असेल..'- संध्याने पुस्तकातून नजर बाहेर न काढताच हंसाबाईना उत्तर दिलं होतं..

'गुड गर्ल.. एक मिनिट.. तु काय म्हणालीस मला? मिसेस शिर्के? जन्मदाती आई आहे मी तुझी.. '

'ओह सॉरी.. मला तस म्हणायचं नव्हतं.. ते बोलतात ना की लग्नानंतर मुलगी सासरची होती.. आई- वडील फक्त नावाला असतात.. म्हणून बाकी असं विशेष काही नाही..'- संध्याने अजूनही हंसाबाईकडे पाहिलं नव्हतं..

तिची सारवासावर ऐकून हंसाबाईना खटकल्यासारखं वाटलं होतं.. 

'बट तुझं लग्न आज थोडीच आहे? आज तर तुझी फक्त एंगेजमेंटच आहे..'

'ओह रियली.. मला वाटलं की एंगेजमेंट झाली की लगेच सात वाजता माझं अन रवीचं लग्न तुम्ही प्लॅन केलं आहे'- या वेळेस संध्याने हंसाबाईनच्या थेट डोळयांत डोळे घालून उत्तर दिलं होतं..

'तु.. तुला..तुला को...कोण बोललं?'- हंसाबाई आता चाचपडत बोलत होत्या..

'नाही आहे का?? मला वाटलं की तुमचं तस काही प्लॅन असावं'- संध्याने परत नजर त्यांच्यापासून दूर फिरवत त्यांना उत्तर केलं..

या वेळेस हंसाबाई काही ऐकण्यासाठी तिथे थांबल्या नव्हत्या.. अरविंदरावांनी एवढा गुप्त प्लॅन केला तर तो संध्याला कुठून कळाला? हा प्लॅन तर फक्त आम्ही, रवी अन त्याची फॅमिली एवढ्यातच होता मग तो बाहेर कसा लिक झाला?..हंसाबाईनच डोकं आता भिनभिनत होतं.. त्यांनी अरविंदरावांकडे भीती व्यक्त केली तसे त्यांनासुद्धा धक्का बसला होता..

साऱ्या टेन्शनमध्ये तीन वाजले तस हंसबाई संध्याला बोलावण्यासाठी तिच्या रूमकडे वळल्या.. त्या दरवाजा ठोकवणार तितक्यात संध्या पुर्ण तयार होऊन बाहेर आली होती..


एखाद्या गोंडस बाहुलीला सवडीने सजवावं तशी ती सूंदर दिसत होती.. ती बाहेर येताच अरविंदराव आणि हंसाबाई तिच्याकडे पाहतच राहिले होते.. हंसाबाई तिला काजळाचा तीट लावण्यासाठी पुढे सरसावल्या तस त्यांना झिडकारून संध्या बाहेर गाडीत जाऊन बसली होती..

तिच्या या कृतीने शिर्के दाम्पत्यांना धक्का बसला होता.. हंसाबाईना तर ही एखाद्या वादळाची पूर्वसूचना वाटत होती..

बरोबर चारच्या आसपास शिर्के कुटुंबिय हॉलवर पोहचले होते.. पाटील परिवार आधी पासूनच हजर होते.. औपचारिकता झाल्यावर प्रथम साखरपुड्याच्या विधीला सुरुवात झाली होती..
संध्या समोर येताच रवी स्वतःच भान हरपून गेला होता.. 


"शेवटी तु माझ्याच नशिबात होतीस संध्या.. काय काय दिव्य केलंय मी तुला मिळवण्यासाठी; काय सांगू तुला.. आता तू माझी आहेस संध्या.. फक्त आणि फक्त माझीच.."- रवी स्वप्नरंजनात गुंतला होता इतक्यात त्याला भटजींची हाक ऐकू आली..

'वराने वधूच्या हातात अंगठी घालावी'

वाक्य ऐकताच रवीच्या अंगात रोमांच फुलल होत.. त्याला हवा असलेला क्षण आलाच होता.. संध्याचा चेहरा निर्विकार असला तरी आतून ती आशिषच्या आठवणीत रडत होती.. ज्या मोमेंट्सचा खरा हक्कदार आशिष होता; तो मोमेंट रवीने धोक्याने मिळवला होता..

ठरल्याप्रमाणे साऱ्या समारंभाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते.. साखरपुडा संपन्न होताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता..

अचानकपणे अरविंदरावांनी माईक हातात घेऊन पाहुण्यांना काही काळ अजून थांबण्याची विनंती केली होती.. रवी पुढे काही महिने जास्त बिझी होणार असून कदाचित लग्नासाठी खूप जास्त कालावधी जाईल; त्यामुळे संध्या आणि रवीचा विवाह आजच संपन्न होईल, अस घोषित करण्यात आलं होतं..

घोषणा होताच; संध्याने हंसाबाईकडे पाहत हलकं स्मित केलं होतं.. तिच्या चेहऱ्यावरच अनपेक्षित हसू पाहून त्या आतून चरकल्या होत्या.. त्यांचा गुप्तहेर मेंदूमध्ये विचारांची उलटसुलट चक्र फिरू लागली होती.. 

यथावकाश रवी अनं संध्याच लग्न पार पडलं होतं.. एक मोठी अशक्यप्राय लढाई जिंकल्याच्या अविर्भावात रवी खूप खुश होता तर आपल्या सुडाग्नीमध्ये रवीच्या सुखाच्या समिधा जाळण्यासाठी संध्या आतुर होती..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all