अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 19

This part is in continuation with earlier series..

रश्मीने आशिषला आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं... त्याने आपले डोळे मिटले अन काही वेळासाठी तो विचारमग्न राहिला आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण  एकप्रकारचा निश्चय होता..

'संध्या, मला तुझं प्रेम मंजूर आहे.. मी स्वतः तुला माझ्या प्रेमाची कबुली देतो.. आय लव्ह यु संध्या.. पण...'

'पण काय? तु आता तिला नवीन काही कंडिशन टाकणार नाहीस.. कळलं?? प्लीज आशिष..'- रवीच्या मनात अजूनही आशिषच्या विचारांची भीती होती..

"पण काय आशु? सांग मनमोकळं  सर्व.. सध्यातरी तुझं प्रेम व्यक्त करणं हेच मला सुखावून गेलं आहे.. बाकी तु बोलशील तसं.. मला पण पटलं तर बघू पुढे.."- संध्याच्या मनात पण सेम रवीसारखी भीती होती तरीपण रवीला शांत राहण्यास सांगून तिने आशिषला त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यास मोकळीक दिली होती..

सर्वांच्या नजरा आता आशिषवर खिळल्या होत्या. प्रत्येकाला त्याच्या उत्तराची उत्सुकता  होती..

"संध्या, मला आवडेल तुझ्यासोबत लग्न करायला आणि मी ते करेन सुद्धा.. पण त्याआधी तुला आमच्या आणि तुझ्या घरच्या आर्थिक परिस्थितीमधील फरकाची कल्पना तर आहेच; त्या अनुषंगाने तु अजून व्यवस्थित विचार करावास असं माझं सजेशन असेल.. कारण सर्व समजून पण आपण आपलं नातं सुरू करणे ही आपल्या जीवनातली एक प्रकारची रिस्क असेल; त्यात देव ना करो पण एका टप्प्यावर तुला मी किंवा घरचे यांपैकी एक निवडावे लागू शकते..आणि नाही म्हटलं तर तो क्षण आपल्या दोघांसाठी खूप वेदनादायी असेल..

तु थंड डोक्याने विचार कर आणि मला उद्या संध्याकाळपर्यंत सांग.. मी उद्या संध्याकाळी सारसबागेत तुझी वाट पाहीन; तु जर रिस्क घेण्यासाठी तयार असशील तर मी नक्कीच तुझी साथ देईन.."- आशिषने आपलं बोलणं संपवून संध्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिलं..

त्याच बोलणं ऐकून संध्यापण काही काळ विचारात पडली होती कारण आशिषने जे मांडले ते त्यांच्या जीवनाचं खर वास्तव होतं..

प्रेमात पडताना तर आपण कायमच आभासी दुनियेत वावरतो.. या दुनियेत सगळं काही सकारत्मकच असतं; गरीब- श्रीमंती मधली दुरी कमी होऊन आपलं मीलन होईल याच अविर्भावात आपण आपलं नात सुरू करतो; पुढे वाढवतो आणि आयुष्यात अशी एक वेळ येते की काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही ; मग आपल्याला आपल्या मनात नसताना सुद्धा नको असलेला ऑपशन सिलेक्ट करावा लागतो आणि मग आयुष्यभर आठवणी आपल्याला छळत राहतात..

काही वेळ विचार केल्यानंतर संध्याला आशिषच बोलणं पटलं  होत तस तिने त्याला उद्यापर्यंत विचार करून सांगते म्हणून सांगितलं.. 

संध्याच्या या निर्णयाने रवी अन रश्मी दोघांना पण आश्चर्य वाटलं होतं.. आशिषच्या प्रेमात ठार वेडी असलेली संध्या विचार करण्यासाठी वेळ घेईल ही  गोष्टच त्यांना अनपेक्षित होती परंतु त्या दोघांनी पण मौन बाळगणं पसंत केलं..

'ठीक आहे आशा, मी वाट पाहीन तुझी उद्या सारसबागेत..निघतो मी आता, आशाला थोडी मदत करेल घरी जाऊन'- आशिषने संध्याकडे पाहत; हलकं स्मित करून तिचा निरोप घेतला..

रवी आणि रश्मीला बाय बोलून आशिष घराबाहेर पडला.. यावेळेस मात्र दोघांनी हेतुपूर्वक त्याच्याकडून त्याचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता घेऊन ठेवला..

आशिष घराबाहेर पडताच रश्मी संध्याच्या बाजूला जाऊन बसली; तिच्या खांद्यावर हात ठेवून तिने नजरेनेच तिच्या वेळ घेण्यामागच कारण विचारलं तस संध्याच्या चेहऱ्यावर खिन्न हसू पसरलं..

' रश्मी, तो बोलला त्यात काही चुकीचं नव्हतं .. फिल्मी जग आणि वास्तविकता यांत जमीन-अस्मानाचा फरक असतो.. त्याने पण नेमकी तीच शंका अधोरेखित केली आहे.. मॉमच ठीक आहे ग; बट पप्पानां माझं आशिषसोबतच रिलेशन डायजेस्ट होणार नाही.. त्यांना माझ्या सुखापेक्षा स्वतःच रेप्युटेशन जास्त इम्पोर्टअंट आहे.. मला माझी चिंता नाहीये ग.. पण काल आशासोबत एक दिवस घालवताना; माझ्याबद्दल त्याच्या मनात असलेली काळजी मला क्लिअरली जाणवली आहे.. त्यांच्या स्ट्रगलशी ओळख करून घेताना; त्यांच्या कामात हेल्प करताना मला होणारा त्रास पाहून; त्याला होणाऱ्या वेदना त्याने बोलून दाखवल्या नसल्या तरी त्याच्या देहबोलीतून व्यक्त केल्या आहेत.. म्हणूनच मला भीती आहे की तो म्हणतो तशी वेळ आलीच तर त्याला खुप मोठा धक्का बसेल.. मला माहितेय माझी काळजी विनाकारण आहे पण मला त्याला पूर्ण आयुष्यात कधीच दुखवायच नाहीये; भले त्यासाठी मला माझी स्वप्न कुर्बान करावी लागली तरी...- संध्या शून्यात हरवून बोलत होती...

'मी एक बोलू संध्या?'- तिचं अस दुःखी होणं सहन न होऊन रवीने तिच बोलणं मध्येच तोडलं होत..

' तु नको फार विचार करूस.. आशिषला आपण काही आज ओळखत नाहीये.. त्याचे गोल वेल प्लॅनड आहेत, आणि बिलिव्ह मी संध्या; वन डे ही विल मॅच युअर फादर.. तु बिनदास्त उद्या भेट त्याला आणि तुमचं नात लवकरात लवकर सुरू करा..तुला असं बघणं जास्त क्लेशदायक आहे आम्हांला'- रवीने भले संध्याला धीर दिला असला तरी आपलं प्रेम आपण स्वतः दूर करत असल्याची जाणीव त्याचा स्वर जड करत होती..

' रवी, ठीक बोल रहा हैं डिअर.. तु खाली-पिली टेन्शन ले रही हैं.. मत सोच इतना..'- रश्मीने पण रवीच्या बोलण्याला पाठिंबा दर्शवला होता..

' थँक्स गाईज.. तूम्ही खरंच ट्रू फ्रेंड आहात.. आजकल खूप रेअर आहे असं कोणी कोणाची काळजी करणं.. थँक्स फॉर युअर  सपोर्ट...'- संध्याने दोघांचे आभार मानले..

' ओह ओ, रवी देखा, लोग अभी कितने फॉर्मल हो गये हैं.. दोस्त बोलते हैं और उपरसे थँक्स भी बोलेंगे.. क्या यार संध्या?'- रश्मीने बोलता बोलता मस्करीत संध्याला हलकी चापट मारली..

'रश्मी, मोटी लगता हैं तेरा हात'..

'ये मोटी किसको बोली तू; रवी पकड इसको.. आज ये पिटने वाली हैं मुझसे'..

"हे देवीयों, कृपया अपने आपसी झगडेसे मुझ गरीब को दूर रखें"..

'अच्छा, असं आहे का मग आम्ही दोघी मिळून तुलाच धुतो'.- एवढं बोलून सर्वजण हसून आपापसांत  लटकी मारामारी करू लागली होते..

सारेजण मागच्या काही वेळचा त्राण विसरून मजाक-मस्ती मध्ये हरवून गेले होते.. शेवटी संध्याकाळी हॉटेलमध्ये एकत्र डिनर करून रवी आणि रश्मीने संध्याचा निरोप घेतला होता; त्यातही आशिषला तिने सकारात्मक प्रतिसाद द्यावा म्हणून बजवायला ते विसरले नव्हते..

रात्रभर विचार केल्यानंतर संध्यालासुध्दा रवीच बोलणं पटलं होत त्यामुळे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रवीला सारसबागेत गणपती मंदिराबाहेर भेटून विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने आपल्या नात्याची सुरुवात करावी अस मनोमन ठरवून ती निद्राधीन झाली होती..

इकडे आशिष रात्रभर तळमळत होता.. संध्याने विचार करण्यासाठी वेळ घेतला ही गोष्ट त्याच्यासाठी पण अनाकलीय ठरली होती.. ती थेट उद्या भेटायला तयार होईल आणि मग आपण उद्या आयुष्याची नवीन सुरुवात करू या अपेक्षेने त्याने तिचा होकार गृहीत धरला होता.. पण तिच्या निर्णयाने त्याच्या मनात धाकधूक सुरू झाली होती.. नाही म्हटलं तरी संध्या त्याच पहिलवहिलं प्रेम होतं.. शेवटी जे होईल ते होईल; बघू काय ते असा विचार करता करता त्याचा डोळा लागला होता..

दुसऱ्या दिवशी सकाळपासून आशिष अन संध्या दोघांना पण संध्याकाळचे वेध लागले होते.. कधी एकदा आपण आपले प्रेम पुनःश्च व्यक्त करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करतोय असं त्यांना वाटत होतं..

संध्याकाळी तयार होताना आशिषची स्वारी खुश होती.. तयारी करता करता गाणं गुणगुणने, उगाचंच सारखं आरशात पाहणं, केसांवरून हात फिरवत राहणं; यांसारखे त्याचे चाळे पाहून आशा मागून हसत होती..

'अम्मम्म्म, कोणतरी आज जाम खुश दिसतय.. आज आम्हांला आमची वहिनी मिळणार वाटतं..ओ मेरे भैय्या, क्या लग रहे हो.. हाय..'- आशाने मुद्दामच बोटे मोडल्याची ऍक्टिग केली तस आशिषला लाजल्यासारखं झालं.. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली पाहून आशा अजून जोरात हसू लागली.. ते पाहून आशिष तिला पकडायला धावला तशी ती जाऊन आईच्या मागे लपली ; त्यामुळे नाईलाजाने आशिष मागे फिरून बाहेर पडला.. जाता जाता त्याने खुणेनेच आशाला नंतर बघून घेईन म्हणून धमकावले होते; प्रत्युत्तर म्हणून आशाने त्याला अजून चिडवून; सरतेशेवटी अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक दिले होते..

आशिष ठरल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे आधी सारसबागेत पोहचला होता... सवयीप्रमाणे तो  श्री गणेश मंदिरात दर्शनासाठी गेला.. बाप्पाचे दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाजूलाच संध्याची वाट बघत; तिच्याशी बोलताना कसं बोलावं, तिने होकार दिला तर मग पुढे काय बोलावं असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात धुमाकूळ घालत होते.. याच विचारांत हरवलेला असताना काही क्षणात त्याला खूप वेळ निघून गेल्याच जाणवलं.. घड्याळ पाहिलं तर भेटीच्या ठरल्या वेळेपेक्षा एक तास उलटला तरी संध्याचा काही पत्ता नव्हता.. त्याने फोन लावून पाहिला तर तो कायम व्यस्त येत होता.. एक.. दोन.. चार.. सहा-सात वेळा फोन लावून पण तेच.. आशिषच्या डोळ्यात नकळतपणे पाणी तरळले होते.

 संध्याने अनपेक्षित निर्णय घेतला की काय? शेवटी आपली भीती खरी ठरली वाटतं.. तिने आपल्या  क्षमतेवर का नाही विश्वास ठेवला असेल? अशा अनेक शंका-कुशंकांनी त्याच्या काळजात धस्स झाले होते..

अजून एक तास वाट पाहून पण संध्या आली नाही तसा आशिष घरी निघाला.. आपल्या नशिबात प्रेम नाहीच या भावनेतून त्याच मन रडवलेलं झालं होतं.. नकळत त्याला काल पुजारी बाबांनी आशीर्वाद देतांना संध्याला वगळलेल आठवलं तस तो अजून चिंताक्रांत झाला.. खरंच संध्या माझ्या नशिबी नाही? नसेलच.. म्हणून ती आली नाही.. पण ती गेली कुठे??

  
क्रमशः

सर्व वाचकांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 
हा भाग टाकण्यास खूपच उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी..

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all