अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 13

This post is in continuation with series

बाथरूममधून बाहेर येताच संध्याचा मोबाईल वाजला, पाहिलं तर साटम काकींचा फोन होता तसा तिने तो रिसिव्ह केला..

'हा, काकी बोला..'

'बाळा, आज माझी तब्येत थोडी नरम वाटतेय ग...तर आज मला तुझ्याकडे सकाळी यायला जमणार नाही.. तुझा डब्बा मी डायरेक्ट कॉलेजच्या गेटवर पाठवेन.. आणि संध्याकाळी मात्र मी नक्की येईन.. माफ कर बेटा;आज माझ्यामुळे तुझी जरा आबाळ होईल, प्लीज सांभाळून घे आजचा दिवस..'

' अहो काकू, एकिकडे बाळ,बेटा पण बोलताय आणि सॉरीपण बोलताय.. काय काकू तुम्हीपण..ऐका काकू, आज तुम्ही आराम करा, अशी पण मी पुर्ण दिवस बाहेरच आहे सो मीच तुम्हांला सांगणार होते की संध्याकाळी येऊ नका म्हणून.. उगाच कॉलेजला डब्बा पाठवायचे कष्ट घेऊ नका.. एक दिवस मी कॅन्टीनमध्ये खाईल त्यात काय एवढं, तुम्ही आराम करा, आणि डॉक्टर कडे जा पहिलं.. काही म्हणजे काहीही लागलच तर हक्काने फोन करा..चला काकू मी फोन ठेवते, थोडा उशिर झालाय आज.. मी संध्याकाळी तुम्हांला परत फोन करेन चौकशीसाठी.. चला बाय..'

'बाय बेटा, थँक यू बाळ'- संध्यामधला हा बदल पाहून साटम काकूंना पण हायस वाटलं होतं.. 

साटमकाकींशी बोलणं संपताच संध्याच लक्ष घड्याळाकडे गेलं, ९.३० वाजायला आले होते, १० च कॉलेज.. म्हणजे आशा कडे जाऊन कॉलेज ला जायचं म्हणजे तिला ४-५ मिनिटांत घराबाहेर निघावं लागणार होतं..

तिने पटकन एक सलवार कमीज घातला आणि आरशात आपला चेहरा व्यवस्थित केला.. आधीच सुंदर असल्याने तिला मेकअपची फारशी गरज नव्हतीच, त्यात आज घाई झाल्यामुळे तिने नेहमीप्रमाणे लिपस्टिक पण लावली नव्हती, केस अजून ओलीच होती; कॉलेजला पोहचेपर्यंत ती सुकतील मग आपण ती नीट करू या विचाराने आपली बॅग घेऊन आशाच्या घरी पोहचली..

' हॅलो आशा, मी दोन मिनिटांत तुझ्या घरासमोर पोहचतेय, त्याच ऑटोने जाऊ आपण कॉलेजला.. हॅलो ऐकतेस ना तू?, बघ मी आलेच एक मिनिटांत'- संध्याने ऑटोमधूनच आशाला फोन लावून बाहेर यायला सांगितलं पण आशाने तिला नकार दिला आणि ऑटो सोडून तिच्या घराबाहेर थांबायला सांगितलं..

' चल, जाऊ आता आपण.. आपण ऑटोने नाही तर चालत जाऊ.. न फॉर युअर कायिन्ड इन्फॉर्मेशन, आज आपला पाहिलं  लेक्चर १०.३० च आहे.. चल आता भराभर पाऊल उचल'- आशाने हसत संध्याला आजच्या टाईमटेबलची आठवण करून दिली..

' ओके ना यार, बट म्हणून चालत का जायचं? ऑटो ने गेलो असतो ना ग.. आता एवढं चालायचं म्हणजे.. ओह गॉड.. बचाले मुझे..'

" ओये, ओव्हर ऍकटिंग की दुकान, १५ मिनिटं चालू शकत नाही का?, चल गप्प.. तो दादा, जेवल्यानंतर अर्धा तास चालतो, उद्या लग्न झाल्यावर तुला राऊंडला सोबत नेलं की काय म्हणणारेय तू त्याला, ऑटोने राऊंड मारू म्हणून?'- संध्याला कोपराने ढोमसत आशा तिला चिडवत होती..

"अच्छा, ऐसा हैं क्या... चल ना मग फास्ट, अशी काय रेंगाळत चालली आहेस.."- संध्याने काही पावलं फास्ट चालायची एकटिंग केली तस आशाला हसू आलं..

पुढे काही अंतरावर आशा थांबली.. आपल्या बॅगेतून तिने एक पिशवी काढली आणि तिकडे फुटपाथवर बसलेल्या एका आजोबांना दिली.. नेहमीप्रमाणे आजोबांनी तिला आशीर्वाद दिला आणि त्यांचा निरोप घेऊन आशा पुढे निघाली.. संध्या हे सर्व पाहतच होती..

' कोण ग ते? एन काय दिलं तू त्यांना?'- संध्याने कुतूहलाने तिला विचारलं..

"अग असच ग.. तिकडे फुटपथच्या पलीकडे त्यांची झोपडी आहे तिकडे राहतात, एकटेच आहेत बिचारे.. भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.. दादा, इकडे  होता तेव्हा तो न चुकता त्यांना खायला द्यायचा.. तो मुंबईला गेला आणि आता मी ते करतेय..बघ आपण सर्वांचं पोट भरू शकत नाही पण येता-जाता वाटेत येणाऱ्या किमान एका गरिबाला तरी आपण मदत केली तर आपण खरे माणूस.. आमच्या आई- बाबांनी आमच्यावर हेच संस्कार केलेत...यासाठीच मी तुला चालत आणलं, कळलं..."

"यार, तुम्ही लोक खरंच ऑसम आहात रे.. मानलं तुम्हांला.. आमच्याकडे असून पण आम्हांला असं काही सुचत नाही."- संध्याला आशिष आणि आशा दोघांची विचारसरणी भावली होती.. धन्य  यांचे आई- वडील आणि धन्य ते आशा न आशिष.. खरंच आपण योग्य व्यक्तीवर प्रेम करतोय..

थोड्या वेळातच आशा आणि संध्या एकत्र कॉलेजमध्ये पोहचल्या तसे सर्वांच्या विस्मयचकित नजरा दोघींवर फिरत होत्या.. त्या दोघीं मात्र कशाचं सोयरसुतक नसल्याप्रमाणे संपुर्ण दिवस एकमेकांसोबत होत्या.. संध्याने डब्बा आणला नसल्यामुळे आशाने तिचा डब्बा संध्याबरोबर शेअर केला होता.. विशेष म्हणजे संध्याच्या आग्रहाखातर चक्क ब्रँडेड ग्रुपवालेपण सोबत जेवायला बसले होते.. 

कॉलेज आटपल्यावर दोघीजणी एकत्रच घरी यायला निघाल्या होत्या कारण चॅलेंजनुसार संध्याला आशासोबत राहणं होतं.

कॉलेजवरून सुटल्यावर आशाने संध्याला एका घरी नेलं होतं, तिथे आशा त्या घरातल्या २ मुलांची शिकवणी घेत असे...

तिकडून निघेपर्यंत संध्याकाळचे ७.३० वाजले होते.. संध्याला कडाडून भूक लागली होती त्यामुळे तिने जबरदस्तीने स्वतः सोबत आशाला नास्ता खायला लावला होता..घरी पोहचेपर्यंत त्यांना ८.१५ वाजले होते, आशिषपण दोघींची वाट पहातच होता.. संध्याला पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं आणि ते संध्याने बरोबर ताडल होत..

"आहे हो मी टिकून आशिषराव; तुम्ही फक्त उद्याची तयारी ठेवा.."- संध्याने आशिषला डोळे मिचकवत चिडवलं होतं..

आपली नजर पकडली गेली हे समजून आशिषचा चेहरा पडला तशा संध्या आणि आशाला जोरात हसू आलं..

'बरं बरं, हसू नका जास्त, पुढची काम घ्या करायला.. आशा, आज माहितेय ना, जेवण आपल्याला करायचं आहे ते.'- आशिषने आशाला आठवण करून दिली..

'अरे हो, पण आता आईची तब्येत कशी आहे? डॉक्टर कडे घेऊन गेला होतास ना? कुठेय आई?'

' झाली तुझी मशीनगन सुरू?? आता व्यवस्थित आहे ती.. डॉक्टरकडे जाऊन आलोय आम्ही.. गोळ्या दिल्या आहेत त्यांनी.. आता आराम करतेय ती माळ्यावर... त्यामुळे जरा शांतपणे रहा दोघी..'

दोघांच्या बोलण्यावरून संध्याला कळलं होतं की त्यांच्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तिने पण जास्त चौकशी करणं टाळलं होतं..

आशा अन आशिषने स्वयंपाकाची तयारी चालू केली होती.. आशाने परत एकदा आशिषची खोडी काढण्यासाठी संध्याला आशिषजवळ कणिक मळण शिकण्यासाठी पिटाळले होते..

उभ्या आयुष्यात किचनमध्ये पाऊल न टाकलेल्या संध्याचे सतराशे साठ प्रश्न ऐकून आशिष तेवढा हैराण झाला होता आणि अधूनमधून आशाकडे रागाने बघत होता.. त्याची अवस्था बघून  आशाला मात्र हसू आवरत नव्हतं , त्यामुळे त्याची अजून चिडचिड होत होती..

एवढया चिडचिडीत अचानक त्याच लक्ष गेलं तर संध्याने कणिक एकदम छान मळल होतं..
" वा.. जमलं ग तुला"- आशिषने संध्याला कौतुकाने म्हटलं तस तिने हसून त्याला थँक्स म्हटलं..

" आशा, खूप हसलीस आशिषला, आता मी तुझ्या राशीला आलीये.. चल आता मला चपात्या शिकव"
तिने असं म्हणताच तिघांनाही हसू फुटलं होतं..

सरतेशेवटी ९.१५ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता, संध्यासारखी नवखी ट्रेनी असल्यामुळे अंमळ उशीरच झाला होता पण संध्याच्या जिद्दीच दोघांनीपण कौतुक केलं होतं..

साटम काका येईपर्यंत तिघेजण उद्याच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी करत बसले होते...उद्या उपमा, इडली आणि मिसळ असा मेनू असल्याने त्यानुसार त्यांची तयारी चालू होती.. संध्यापण कडीपत्ता निवडणे, तांदूळ बारीक करणे अशी बारीकसारीक काम करत होती..

एवढ्यात साटम काका आले तसे तिघेजण उभे राहिले..

आशा, ही कोण तुझी मैत्रीण का?- दरवाज्यातून आत येत काकांनी आशाला प्रश्न केला..

' हो बाबा, ही संध्या.. माझी मैत्रीण.. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र आहोत'..

'बरं..बाळ, रात्रीचे १० वाजत आलेत, तुझे घरचे तुला ओरडणार नाहीत का?'- काकांनी संध्याला काळजीने विचारलं..

' नाही काका, मी आज इथेच राहणार आहे.. माझे आई- वडील मुबंईला असतात, मी शिक्षणानिमित्त इथे राहते'- एवढं बोलून संपूर्ण घटनाक्रम साटम काकांना सांगून टाकला, स्वतःच्या सर्व चुका तिने बिनदिक्कतपणे सांगून टाकल्या होत्या पण आशिषने तिच्यावर हात उगरल्याचा उल्लेख तिने टाळला होता. संध्याची कबुली ऐकून आशा व आशिषपण चाट पडले होते..

" मानलं बाई तुला, एका झटक्यात तू सार कबूल करून टाकलस.. आपल्या चुकांचा पश्चात्ताप तुला होतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे.. पण बाळ ऐक; रात्रीचे १०.३० होत आलेत तू आता घरी जा.. तू चॅलेंज पुर्ण केलंस अस समज"- एवढ बोलून साटम काकांनी आशा आणि आशिषकडे पाहिलं तसं त्या दोघांनीपण होकारार्थी मान डोलवली..

'आशिष, आपली रिक्षा घेऊन जा आणि तिला अगदी दारापर्यंत सोडून ये आणि आसावरी कशी आहे? तिला माहीत आहे का हे सर्व?'- साटम काकांनी हे सर्व विचारलं तस आशाने नकारार्थी मान हलवली..

आसावरी नाव ऐकताच इकडे संध्या चमकली..सकाळच्या नाश्त्याची सेम टेस्ट, आजारपण, सेम नाव.. म्हणजे?? 

काकी कुठे आहेत आशा? कधी उठणार त्या? आता जेवायला तर उठतील ना त्या? मला भेटायचं आहे त्यांना..- संध्याचे प्रश्न ऐकून घरातले सर्व शॉक झाले होते.. हिला अचानक काय झालं असं विचारायला..

' संध्या , बाळा तू काय करतेस इकडे? '-आशा काही बोलणार तितक्यात काकी बाहेर आल्या होत्या, संध्याला घरी बघून त्यांना आश्चर्य वाटत होतं..

काकूंना पाहून संध्याने पटकन जाऊन त्यांना मिठी मारली तस साटम काका, आशिष , आशा सर्वजण चाट पडले होते..

' आय कान्ट बिलिव्ह काकू.. कशा आहात तुम्ही?'

'अजून थोडी कणकण आहे अंगात पण उद्यापर्यंत होईन बरी.. पण तु इथे?'

या वेळेस पण संध्याने मघाप्रमाणे संपुर्ण घटनाक्रम रिपीट केला तसा साटम काकींनी मायेने संध्याच्या केसांवरून हात फिरवला..
-मला खात्री होती बाळा की एक दिवस तू नक्की बदलशील.. 


आशा आणि आशिष तर आ वासून उभे होते, आता हे काय नवीन? म्हणजे आई ज्या मुलीकडे घरकाम करायला जाते ती मुलगी संध्या आहे की काय?


कोणी काही बोलणार तितक्यात साटम काकूंनी सर्वांना त्यांची आणि संध्याची ओळख सांगून दिली.. आशा आणि आशिषचा अंदाज बरोबर लागला होता.. 

" अहो ,एवढया रात्री कुठे जाईल पोरगी.. आज राहू दे तिला आपल्याकडेच, अस पण जेवण होईपर्यंत ११.३० होतील, मग फारच उशीर होईल.. संध्या बाळा राहशील ना आजची रात्र इकडे?"- साटम काकींनी एकाचवेळी काकांना विनंती आणि संध्याला प्रश्न केला होता..


दोघांनीही काकूंना संमती दिली होती..

इकडे सारी काम आवरून सर्वांना झोपायला रात्रीचे १२.१५ च्या आसपास वाजले होते पण संध्याला बिल्कुल थकवा जाणवत नव्हता कारण तिला आस लागली होती ती आशिषसोबतच्या उद्याच्या डेटची..

     


क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all