अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 11

This part is in continuation with series

थोड्या थोड्या अंतराने आशाकडे  ग्राहक खाण्यासाठी येतच होते, जाता जाता आशाला खुशाली विचारायचे, आशापन कितीही व्यस्त असली तरीही त्यांना हसत उत्तर देत होती.. काही ग्राहकांशी तिची थट्टामस्करी पण जमली होती.. एखादा ग्राहक अनोळखी असला तर तोच काय तो शांतपणे पैसे देऊन निघायचा बाकी सारे पैसे आणि कौतुक केल्याशिवाय तिकडून निघत नव्हते..

आशाचा व्यक्तीसंचय पाहून , येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाने केलेलं तिच कौतुक पाहून आशिष भारावून गेला होता.. आपल्या बहिणीचा त्याला अभिमान वाटत होता..

इकडे संध्याला तिच्या जुन्या चुकांचा अजूनही पश्चाताप होत होता.. एवढी चांगली मुलगी आणि आपण तिला किती त्रास दिला याच तिला वाईट वाटत होतं.. तिच्या नकळत तिच्या डोळयातून एक दोन अश्रु खाली ओघळले तसे तिने ते पटकन फुसले आणि तिने चेहरा व्यवस्थित केला. 

" आशा, ब्रावो.... तू चांगलीच फेमस आहेस बाई इकडे.. तुमचे पदार्थ तर चांगले आहेतच पण त्याहीपेक्षा तुमचे संस्कार भारी वाटले मला... काश माझ्या आई- बाबांनी माझे लाड कमी केले असते तर आपण खुप छान मैत्रिणी असतो ना ग?"- संध्याने आशाच्या पाठीवर कौतुकाने थोपटल..

' मैत्रिणी असतो म्हणजे? आपण मैत्रिणी नाही आहोत का आता?'- संध्याला प्रतिप्रश्न करताना आशा सर्व रिकामी डब्बे पिशवीत भरत होती..

' संध्या मॅडम, मी कितीदा म्हटलं तुला, जुनं सर्व सोड.. आमच्या आईच्या भाषेत चुलीत घाल जुनं सर्व.. आता नवीन सुरुवात कर की.. मी आहे ना तुझ्यासोबत.. आणि आता ते ड्रामा क्वीन बनणं सोड आणि मला मदत कर पटकन.. आज थोडा उशीर झालाय, ८.३० झालेत.. घरी आवरून आपल्याला कॉलेजला पण जायचंय माहीत आहे ना?'- एवढा तोंडाचा पट्टा चालू असला तरी आशाचे हात मात्र काही थांबले नव्हते..

तिची घाई बघून आशिष आणि संध्या दोघेपण पुढे आले आणि  दोघांनीपण योगायोगाने एकच डब्बा उचलला आणि त्यांना जस जाणवलं तस त्यांनी परत हात मागे घेतले आणि होयचं तेच झालं होतं; डब्बा खाली पडला आणि घरंगळत थोडा पुढे जाऊन थांबला.. 

' तुम्ही दोघ सकाळपासून कपल चॅलेंज खेळताय?? की माझ्यावर खुन्नस काढताय?, जा आता तो डब्बा घेऊन या आणि धुवून पण आणायचा तो, कोणी एकानेच जा नाहीतर तो डब्बा असाच पडून पडून फुटेल'-झालेला प्रकार आशाच्या लक्षात आला तसा तिने चेहऱ्यावर नकली राग आणत दोघांना झापयला चालू केलं..

तिला तस ओरडताना बघून संध्या आणि आशिष दोघेपण एकत्र डब्बा आणायला धावले आणि परत एकमेकांना बघत एकाच जागी थांबले.. सरतेशेवटी आशिषने माघार घेतली अनं तो आशाला मदत करायला मागे फिरला..

संध्याने पटकन जाऊन डब्बा उचलला खरा पण तितक्याच पटकन तिने तो परत खाली सोडून दिला..

' शीट, याला पुर्ण चिखल लागलाय यार..' संध्याने घाई- घाईतच डब्बा उचलण्याचा प्रयत्न केल्याने , तिच डब्याखालच्या चिखलाकडे लक्ष गेलं नव्हतं परिणामी तिच्या हाताला पुर्ण चिखल लागला होता...

डब्ब्याचा पुन्हा एकदा आवाज ऐकून आशा आणि आशिषच लक्ष संध्याकडे गेलं तशी ती एखाद्या लहान मुलासारख तोंड वाकड करत आपल्या हाताकडे बघत बसली होती.. 

' संध्या मॅडम, छान हा.. ही मेहंदी खुप शोभून दिसतेय बर तुम्हाला..आता किती वेळ ती तशीच हातावर ठेवणार?'- आशिषने संध्याला टोकल तस संध्याचा चेहरा पडला..

'अरे, घरी कधी इकडचा भांड तिकडे ठेवलं नाही, मग मला कामाची सवय कशी असेल.. थोडं सांभाळून घ्या ना यार मला.. आशा तू तरी सांग ना याला.. मी मुद्दाम नाही पाडल..'-  संध्याचा सूर आता रडवलेला झाला तसा आशा आणि आशिष हसायला लागले..

' आशा तू पण?? हसा हसा, काय करणार, पाप केली आहेत; भोगावी तर लागतीलच'-त्यांना हसताना पाहून संध्या थोढीशी चिडली..

" दादा, बघ तू खोड काढलीस तिची, आता तूच घेऊन जा तिला समोरच्या नळाजवळ आणि संध्याच्या हातासोबत डब्बा पण धुवून घे.. पण दोघे जाताय म्हणून पाडापाडी करू नका डब्ब्याची.."- आशाने आशिषला त्याच्या मनात नसताना सुद्धा मुद्दाम संध्यासोबत पिटाळले..

' मॅडम, मी फक्त तुम्हांला सोबत म्हणूनच येणार, तो डब्बा तुम्हालाच उचलून धुवायचा आहे..'- आशिषने संध्याकडे न बघताच तिला सांगून टाकलं..

या वेळेस मात्र संध्याने तोंड बिल्कुल वेडंवाकडं न करता निमूटपणे डब्बा उचलला आणि ती आशिषच्या मागून चालायला लागली..

पुढे एक सार्वजनिक नळ आला तसे ते दोघे थांबले..
' बघा, तो नळ उघडा म्हणजे त्या पाईप मधून पाणी येईल, त्याने तुमचे  हात आणि डब्बा दोन्ही धुवून घ्या'- आशिषने पाईप कडे बोट दाखवत संध्याला सांगितलं आणि स्वतः बाजूला उभा राहीला..

इकडे कोणत्याच कामाचा अनुभव नसलेल्या संध्याने घाईगडबडीत नळ  पूर्ण उघडला तस पाईप मधून फुल्ल प्रेशरने पाणी आलं.. त्यातपन संध्याने नळ खोलताना पाईप आपल्या हातात धरला असल्यामुळे फुल्ल प्रेशरने पाणी येताच तिला तो सावरता आला नाही.. पाईप सावरण्याचा नादात परत एकदा डब्बा तिच्या हातून खाली पडला आणि पाण्याचा फवारा चुकून तिच्या अंगाच्या दिशेने आल्याने ती अर्ध्याहून अधिक भिजून गेली.. झालेल्या फजितीमुळे ती रडकुंडीला आली; तिने मदतीच्या अपेक्षेने आशिष कडे बघितलं तस तिला आशिष कपाळावर हात मारत हसताना दिसला..

आशिषला हसताना पाहून संध्याला राग अनावर झाला.. तिने रागातच पाईप उचलला आणि सरळ आशिषच्या दिशेने पाणी सोडले.. 
' अहो, मॅडम.. काय डोक्यावर पडलात की काय? मला का भिजवलं तुम्ही? तुम्हांला काम जमत नाही ही माझी चूक थोडी आहे?, शीट.. काय फालतूगीरी आहे ही'- वैतागलेल्या आशिषने संध्याला बोल लावायला चालू केले..

' हे, लूक, आय नो की मला काम जमत नाहीत एन मी ते आधीच कन्फेस केलं आहे..आणि आपलं चॅलेंज मी आशा सोबत एक दिवस काढावा असं होतं ; मी काम करावं असं नव्हता ना.. मी असं पण म्हणत नाही रे की मला काम नाही करायचं पण तुम्ही माझ्यावर अस हसण्यापेक्षा मला गोष्टी शिकवल्यात तर बेटर ना रे..
न जर तुम्ही रिव्हेंज घेत असाल देन इट्स अल्सो फाईन फॉर मी...' - संध्या अगदी मेटाकुटीला येऊन आशिषशी बोलत होती..

तिला तस तुटलेल पाहून आशिषला पण वाईट वाटलं.. 

" सॉरी संध्या, मला तुम्हांला हर्ट करायचं नव्हतं.. आणि मला तुमच्याशी कधीच रिव्हेंज घाययचा नव्हता.. आशासोबत तुम्हाला दिवस घालवायला लावण्याचा माझा हेतू हाच होता की आमच्यासारखे गरीब शिकण्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव करून देणे हाच होता.. तुम्हांला लहानपणापासून सर्व मिळतं पण आम्हांला एक एक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो.. आशाच मेडिकल आणि माझं वकिलीच शिक्षण व्हावं म्हणून आई-बाबा अहोरात्र मेहनत करतात; आम्ही पण छोटी- मोठी काम करून त्यांच्यावरचा हातभार कमी करण्याचा प्रयत्न करतो.. जाऊ दे सोडा आमचं रडगाणं.. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या एक दिवसात तुम्हाला आमचा ५०% स्ट्रगल जरी दिसला तरी पुढे भविष्यात दुसऱ्या कोणत्या आशाच्या वाट्याला मानहानी येणार नाही. द्या तो पाईप इकडे, मी पकडतो डब्बा, तुम्ही तुमचे हात धुवून घ्या आणि बाजूला उन्हात थांबा तोपर्यंत मी डब्बा धुतो.."- आशिषने संध्याकडचा डब्बा घ्यायला हात पुढे केला तसा संध्याने डब्बा मागे घेतला..

' आशिष, मला कालच कळलंय रे  की मी चुकीची होती.. कोणाच्या वाईट परिस्थितीची थट्टा करण्याचा कोणाला अधिकार नाही.. आणि जे मी केलं त्यासाठी मी आयुष्यभर तुझी आणि आशाची माफी मागत राहीन.. सॉरी यार.. रियली व्हेरी व्हेरी सॉरी'- संध्याचा कंठ दाटला होता, आशिषने तिच्याकडे पाहिलं तर संध्या खाली मान घालून, हात जोडून उभी होती..

'आम्ही तुम्हांला कालच माफ केलं होतं संध्या.. आशा बोलली ना तुम्हांला, जुन सर्व विसरून जा.. नव्याने जगा आता.. गरीब- अमीर भेद सोडून सर्वांशी माणुसकीने वागा; बस बाकी काही नाही.. तसे पण मघाशीसुद्धा तुमच्या डोळ्यातले पाश्चातापाचे अश्रू पाहिले मी.. तुम्ही योग्य मार्गावर आहात.. बस माणुसकीचा हाच मार्ग पकडून ठेवा..चला उशीर झालाय आधीच; द्या तो डब्बा, मी धुतो पटकन..'

" नाही आशिष, डब्बा मीच धुणार, तू मला हेल्प कर फक्त.. "

' ठीक आहे, मी पाईप पकडतो, तुम्ही आधी तुमचे हात धुवून घ्या आणि मग डब्बा..'

"ओके बॉस, तुम्ही म्हणाल तसं.. आणि तू मला असं अहो जावो नको करूस रे.. प्लीज.."

'ठीक आहे बाई, आधी तुम्ही सॉरी तू डब्बा धुवून घे नाहीतर ती भवानी आली तर आपल्याला धुवेल'- एवढं बोलून आशिष हसू लागला तस संध्याही त्याच्यासोबत हसू लागली..

इकडे आशाच सर्व आटपून झालं तरी संध्या आणि आशिष परतले नाहीत तशी ती दोघांना बघायला नळावर आली, तिला संध्या डब्बा धुताना दिसली तर आशिष पाईपने डब्ब्यावर पाणी टाकत होता.. अधून मधून दोघांची एकमेकांसोबत थट्टामस्करीपण चालू होती..

आशाला ते पाहून आनंद झाला होता कारण पिकनिकवरून घरी येताना बसमध्ये तिने संध्याच्या डोळ्यात आशिषबद्दल जे प्रेम वाचले होते त्यानुसार तिच्यामते तिच्या दादासाठी संध्याच बेस्ट पार्टनर होती आणि त्यासाठी तिने आशिषच्या मनात संध्याबद्दल प्रेम फुलवायचा चंग बांधला होता..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all