अपॉइंटमेंट 4( अंतिम भाग)
"ऑफिस आणि कोर्टा व्यतिरिक्त घरीच असतो ना मी नमु..." त्याच्या असिस्टंट ने हळूच चहा आणून ठेवला. तिला ही ऑकवर्ड वाटले होते.. नवीनच असल्यामुळे तीला माहीतच नव्हतं की ही आपल्या सरांची मिसेस आहे म्हणून..
" हो पण तेंव्हा ही तुम्ही एकतर मोबाईल वर बोलत असता नाहीतर लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसता... मुले ही बिचारी तुम्ही कधी त्यांच्या सोबत गप्पा मारणार...खेळणार म्हणून वाट पाहून थकून जातात... पण तुमचे काम आटोपतच नाही.. कधीपासून साधा एक कप चहा प्यायला नाही आहात, तुम्ही निवांत बसून माझ्यासोबत..." तीने एक कटाक्ष त्या चहाच्या कप कडे टाकत नाक मुरडत म्हटले.. आणि हसू आले त्याला.. कित्ती काय साठले होते तिच्या मनात...
" सॉरी सॉरी.. आज... आत्ता घेणार माझ्या सोबत चहा..? " त्यानें अगदीं सॉफ्ट स्वरात विचारले.
" हो..! मग.. त्यासाठीच एव्हढा आटापिटा करून, प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन आलीय ना.. नाहीतर माझा नवरा माझ्या वाट्याला येतच नाहीं.."
" अग, तू फक्त सांगितलं असतंस तरी देखील आपण घरी निवांत बसलो असतो संध्याकाळी..."
" हो आणि त्या निवांतपणी किती वेळा तो डब्बा वाजला असता तुमचा..."
"बरं बरं... चिडू नकोस पुन्हा.. चल चहा घे तो थंड व्हायच्या आत..." त्यानें तिचा पुन्हा लागलेला चिडीचा स्वर पाहून कप तिच्या हातात दिला...
" हम्म... बोला मॅडम.. आज एव्हढा वेळ काढून आलात इथे.. काय सेवा करू आपली.." त्यानें थोडी मान झुकवत विचारले..
"काही नाही.. हा एक तास फक्त असे माझ्या समोर बसून राहायचे तुम्ही.. आणि फक्त माझ्याशी बोलायचे.. फोन, केस, कोर्ट सगळं काही बाजूला ठेवायचं..." तीची लाडिक मागणी...
" ओके ओके.. जसा तुमचा आदेश..! अजून काही??" तो नाटकीपणे म्हणाला.
"ओके.. आता तुम्ही म्हणतच आहात तर... माझी ही केस आताच घेऊन ठेवा.. भविष्यात कधी तरी अशी अपॉइंटमेंट घ्यावी लागली पुन्हा तर .."
"काही काय बोलतेस नमू... आता या पुढे कधीच तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही.. तू कधीही हक्काने इथे येऊ शकतेस... तुझ च ऑफिस आहे हे...आणि आता कदाचीत त्याची वेळ येणार नाही.. आज पासून संध्याकाळचा काही वेळ तुझ्यासाठी आणि मुलांसाठी फक्त.."
"आणि त्याच वेळेस तुमचा डब्बा वाजला तर..?"
"अंह... नाही वाजणार.. घरी आलो की माझा मोबाईल बंद ठेवणार मी तू म्हणशील तितका वेळ...." मग तर झालं! तो गालात हसत म्हणाला.. आणि तीने ओठ तिरपे केले... आज अगदी लग्ना च्या वेळ चे क्षण जगतायत असे वाटतं होते दोघांना..
" आज अजून एकदा ही तुमचा फोन वाजला नाही? आश्चर्य आहे.." तीने विचारले तसे त्याने कपाळावर अंगठा घासला..
" काय हो? मोबाईल कुठेय तुमचा...?" तिच्यातली पजेसिव बायको जागी झाली होती.
" तो.. तो साक्षी कडे असतो... साक्षी.. माझी असिस्टंट.. तुला भेटली नाही का मघाशी..! ते क्लायंट शी बोलतांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून तिच्या कडे असतो.. महत्वाचे कॉल असतील तर अटेंड करते ती.. "यावर तीची काय प्रतिक्रिया येईल याची थोडी भितीच वाटली त्याला..
" अच्छा..! म्हणूनच मी जेंव्हा ही कॉल करायचे तेंव्हा तीच असायची.. आणि कॉल बऱ्याचदा कट केले जायचे..". ती रोखून पाहत म्हणाली...
" अं... हो.. ते डिस्कशन चालू असायचे ना... सॉरी.. पण तू कधी कॉल केलेलास..?" विनय विचार करू लागला, पण साक्षी ने त्याला नमु चां कॉल आलेला सांगितल्याचे आठवत नव्हते.. नाहीतर प्रत्येक कॉल संबंधी ती अपडेट द्यायची त्याला..
" केला होता मागे एकदोनदा... आता ही कट होईल असे वाटले म्हणून तुमच्या ऑफिस च्या फोन वर केला होता , अपॉइंटमेंट साठी.."
" अरे बापरे.. बायको हुशार झाली माझी.. " त्यानें तीचे गाल ओढले..
"मी आधी पासूनच हुशार आहे..फक्त तुम्ही समजत नाहीं..चला निघते मी.. एक तास संपला माझा..." ती उठत म्हणाली. तसे त्याने तिचा हात पकडला.. तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"सॉरी नमू... मला कळलेच नाही, की मी आपले हे अनमोल क्षण जगतच नाहीये.. गृहीत धरतो तुला नेहमीच.. पण बरे झाले तू आलीस... आवडले मला... आता आपण मुलांसोबत नेहमी वेळ घालवत जाऊ.. सिनेमा, हॉटेलिंग, पार्क मध्ये जाणे सगळ्यांसाठी मी वेळ देईल.. तुला तक्रार करण्याची संधी देणार नाहीं मी आता.."
"प्रॉमिस..." तिने त्याच्या समोर हात करत म्हटले..
"पक्का प्रॉमिस... ". त्यानें ही तिच्या हातावर हात ठेवत म्हटले...
" प्रॉमिस तोडणार नाहीत ना..? मला फक्त थोडा वेळ हवाय तुमचा, आमच्या सोबत.. ज्या वेळेस तुम्ही फक्त माझे असाल, मुलांचे बाबा असाल... प्रसिध्द वकील श्री विनय जाधव नाहीं.."
" हो बाबा... प्रॉमिस... संध्याकाळचा वेळ आपला... बास... आता पुन्हा तुला अशी अपॉइंटमेंट घायची वेळ येणार नाहीं..."
"आणि आली तरी मी घेणार नाहीं.." नमू ठासून म्हणाली..
" म्हणजे??" त्यानें गोंधळून विचारले..
" म्हणजे.. या नंतर जर अशी वेळ आली तर अपॉइंटमेंट मला नाहीं.. तुम्हाला घ्यावी लागेल.. तीही अडवांस मध्ये... कारण मिस्टर विनय.. बायको आहे मी तुमची , लॅपटॉप नाहीं जो तुम्ही म्हणाल तेंव्हा ऑन ऑफ होईल.. कळले..." तिने एक बोट नाचवले त्याच्या समोर.
"ओके ओके... सॉरी वन्स अगेन... आणि प्लीज आजच माझी अपॉइंटमेंट बुक करून ठेवा मॅडम.. लाईफ टाईम साठी..." त्याने अगदीं कान पकडून म्हटले.... आणि गोड हसू खुलले तिच्या गालात...
समाप्त
कथा कशी वाटली नक्की सांगा..