अपॉइंमेंट 3
मुले लहान होती तो पर्यंत तिला काही वाटले नाही, पण आता मुले दिवसभर शाळेत राहू लागली तसे तिला घर आणि तिचा रिकामे पणा खायला लागला.. आपल्या नवऱ्याचा वेळ मौल्यवान आहे.. आणि तो माझ्यासाठी नाही.. ही भावना मनात रुतू लागली.. रोजची कामे, त्या संबंधित च बोलणे, त्याचे सकाळी लवकर निघून जाणे. रात्री उशिरा पर्यंत स्टडी रूम मध्ये राहणे.. यामुळे तिचा चिडचिडे पणा वाढू लागला होता.. त्या दोघांनी कधी एकत्र मूव्ही पाहिला किंवा हॉटेलिंग साठी, फिरायला गेले, एवढेच काय? कधी एकत्र निवांत बसून कॉफी प्यायली हे ही तिला आठवत नव्हते.. आपण सोडून सगळेच व्यस्त आहेत.. आणि आपण मात्र रिकामे, बिनकामाचे आहोत.. ही भावना जास्त उचल खात होती...
" हॅलो मॅम... अपॉइंटमेंट आहे का तुमची आता?" दरवाज्या जवळ उभ्या असलेल्या तिला समोरच्या मुलीने विचारले तशी भानावर आली ती.. घड्याळात पाहिलं तर बरोबर चार वाजले होते.. परफेक्ट टाईम.. मनातच हसली ती..
" अं.. हो.. मीच घेतली होती..."
" प्लीज कम..."
" एस्क्यूज मी.. मला.. मला सरांना एकट्यात भेटायचं होत.."
"सॉरी मॅडम पण तुमच्या केस ची डिस्कशन कुठेच लीक होणार नाही माझ्या मुळे... मी फक्त पॉइंट्स नोट करते.. " ती मुलगी म्हणाली तसे फिसकन हसू आल नम्रताला... नवीन च जॉईन झाली होती वाटतं ती..
"सॉरी मॅडम पण तुमच्या केस ची डिस्कशन कुठेच लीक होणार नाही माझ्या मुळे... मी फक्त पॉइंट्स नोट करते.. " ती मुलगी म्हणाली तसे फिसकन हसू आल नम्रताला... नवीन च जॉईन झाली होती वाटतं ती..
" हम्म.. माहिती आहे मला.. तरी देखील मला एकट्याने च भेटायचं आहे.. परमिशन असेल तर ठीके. नाहीतर जाते मी.."
" नो नो मॅडम... वेट.. मी.. मी सरांना सांगून येते.." ती पटकन आत गेली विचारायला...
"या मॅडम आत.. पण फक्त एक तास आहे तुमच्याकडे..."
"ओके.. ऑलरेडी माझी पाच मिनिटे तू वाया घालवली आहेस त्यातली..." नम्रता तिला हसून म्हणाली आणि त्यावर तीला ही हसू आले..
"तू?? तू इथे??" विनय ने दरवाज्यातून आत येऊन तिथे उभी असलेल्या तिला पाहिले. तसे आश्चर्याने विचारले.
" हो.. सर.. माझी च अपॉइंटमेंट आहे आताची.."
"नमू... सर काय??" त्याने तिला समोरच्या खुर्चीवर बसायचा इशारा करत विचारले..
" हो.. मी आज प्रसिध्द वकील श्री विनय जाधव यांना भेटायला आलेय.." नम्रता खुर्चीवर बसत म्हणाली..
" अग्गग अशी काय बोलतेय तू? एखाद्या क्लायंट सारखी.." विनय आधीच तीला आपल्या केबिन मध्ये पाहून शॉक झाला होता.. त्यात तिच्या बोलण्यातील उपरोधिक पणा ही जाणवत होता..
" क्लायंट च आहे ना मी तुमची.. रीतसर अपॉइंटमेंट घेऊन आलीय.. तुमची पूर्ण एका तासाची फी पण भरणार आहे... सो, तुम्हाला हा एक तास माझ्यासाठीच राखून ठेवायचा आहे.. कारण मी तो ॲडवान्स मध्ये आधीच बुक करून ठेवला आहे.."
"अग राणी! अशी काय बोलते आहेस तू?? काय झालेय तुला?? अरे.. हे काय आणि? तू.. तुझ्या डोळ्यात पाणी??" तो पटकन जागेवरून उठला. आणि तिच्या जवळ च्या खुर्चीवर येऊन बसला.. अंगठ्याने तिच्या गालांवर ओघळलेले अश्रू पुसले..
" काय झालेय? तू अचानक आज इथे अशी? काम होते तर कॉल केला असता मला.. बोलवून घेतले असते घरी..."
" आला असता तूम्ही घरी? मी नसते तर दुसरे कोणी असते क्लायंट म्हणून.." ती एकदम उसळून म्हणाली..
" नमू.. राणी.. शांत हो...आज काय झालय? हां.. सांग मला? " त्यानें तीचे हात हातात घेतले... तीने एक दीर्घ श्वास घेतला, आणि डोळे बंद केले.. बंद डोळ्या आडून पाणी झरत च होते..
विनय अगतिकतेने बघत होता तिच्याकडे.. तीचे येणे जसे अनपेक्षित होते, तसे तीचे अशा पद्धतीने त्याच्याशी बोलणे सुध्दा एक धक्का च होते त्याच्या साठी.. आज पर्यंत त्याच्याशी अत्यंत शांत, प्रेमाने बोलणारी, त्याला हवं नको ते हातात देणारी, नेहमी हसतमुख असणारी नमू च पाहिली होती त्याने...
" काही हवे आहे का तुला? काही घ्यायचे आहे का? पैसे.. पैसे हवेत का?"
"वेळ.. वेळ हवा आहे तुमचा... आज कित्येक महिन्यांनी तुमच्या तोंडून माझ्या साठी राणी हा शब्द ऐकला आहे मी.... काळजी पाहिली आहे तुमच्या नजरेत.. प्रेम पाहिले आहे...हे हवे आहे मला.. तुम्ही.. तुम्ही हवे आहात मला..."
"मी तुझाच आहे राणी..! हां.. बिझी झालो आहे मी या काही वर्षात.. पण.. पण हे सर्व कोणासाठी करतोय मी.. तुझ्यासाठीच ना..? आपल्या मुलांसाठी च ना? लग्नाआधी तू जेवढ्या सुखात होतीस, ऐश्वर्यात होतीस... त्या पेक्षा जास्त सुखात ठेवायचे आहे तुला.. माझ्या मुळे तू आणि तुझे बाबा दुरावलेत...तुझ्या बाबांना पटले पाहिजे की तू माझ्या सोबत लग्न करून सुखात आहेस.." त्यानें अलगद एक हात तिच्या गालावर ठेवला आणि डोळ्यात आरपार पाहत म्हटले... भरून तर त्यालाही आले होते.. ती दुखावली गेली आहे, हे जाणवत होते...
"आणि तुम्हाला कोणी सांगितले की माझे सुख पैशात आहे.. नाही हो! मला तुमचा वेळ हवा आहे.. सकाळी सोबत नाश्ता, संध्याकाळी घरी आल्यावर चहा सोबत दिवसभर काय घडले याच्या गप्पा, मुलांसोबत मस्ती, कधीतरी बाहेर जेवायला जाणे, सिनेमा बघणे.. नुसते पार्क मध्ये जाऊन बसणे ही चालेल मला.. मला फक्त तुमचा वेळ हवा आहे...."
"ऑफिस आणि कोर्टा व्यतिरिक्त घरीच असतो ना मी नमु..." त्याच्या असिस्टंट ने हळूच चहा आणून ठेवला. तिला ही ऑकवर्ड वाटले होते.. नवीनच असल्यामुळे तीला माहीतच नव्हतं की ही आपल्या सरांची मिसेस आहे म्हणून..
" हो पण तेंव्हा ही तुम्ही एकतर मोबाईल वर बोलत असता नाहीतर लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसता... मुले ही बिचारी तुम्ही कधी त्यांच्या सोबत गप्पा मारणार...खेळणार म्हणून वाट पाहून थकून जातात... पण तुमचे काम आटोपतच नाही.. कधीपासून साधा एक कप चहा प्यायला नाही आहात, तुम्ही निवांत बसून माझ्यासोबत..." तीने एक कटाक्ष त्या चहाच्या कप कडे टाकत नाक मुरडत म्हटले.. आणि हसू आले त्याला.. कित्ती काय साठले होते तिच्या मनात...
" सॉरी सॉरी.. आज... आत्ता घेणार माझ्या सोबत चहा..? "
क्रमशः
कथा आवडत असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा..