अपॉइंमेंट. 2
आज कित्येक वर्षांनी ती इथे येत होती.. बरेचसे नवीन बदल झाले होते. नवीन व्यक्ती दिसत होत्या. सगळे सराईत पणे वावरत होते.तीला तीच तिथे नवखी असल्यासारखी वाटत होती...
काही जूनी मंडळी तिच्या कडे आश्चर्य चकित नजरेने बघत होते... नजरेत ओळख ठेवून स्मित हास्य करत होते.. ती मात्र बावरून इकडे तिकडे बघून चालत होती.. अनपेक्षित व्यक्ती अचानक समोर आली तर कसे सामोरे जायचे, याची भीती ही नजरेत होती..
ती त्याच्या केबिन समोर आली.. अजून पाच मिनिटे बाकी होती चार ला...
"अरे नमू तू?? तू इथे???" समोरच्या व्यक्तीने अचानक विचारले आणि ती दचकली..
"का.. काका.. तुम्ही??"
" हो! अग तुला पाहिलं येतांना.. आधी तर ओळखलच नाही.. केवढा बदल झालाय तुझ्यात... इकडे सहजच??"
समोर उभ्या ठाकलेल्या राणे काकांनी विचारले.
" हो! अग तुला पाहिलं येतांना.. आधी तर ओळखलच नाही.. केवढा बदल झालाय तुझ्यात... इकडे सहजच??"
समोर उभ्या ठाकलेल्या राणे काकांनी विचारले.
" अं.. हो.. जरा काम होत!! "
"ओके ओके... विनय ला भेटायला आलीस ना? जा भेट..."
नम्रता, एक सुंदर, सुशील प्रेमळ गृहिणी... कॉलेज मध्ये असतांनाच विनय च्या प्रेमात पडली.. दोघांचेही शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांचे भेटणे, बोलणे हे चोरून लपून च होते.. कारण दोघांचीही दोन टोकांची विचार सरणी असलेली कुटुंबे.
विनय एका मध्यम वर्गीय, कंपनीत कामगार असलेल्या सुरेश रावांचा मुलगा, ज्यांच्या लेखी वकिल आणि पोलीस म्हणजे घरापासून दूर च असावेत...यांच्याशी कधीही संपर्क येऊ नये, असे विचार असलेल्या सुरेश रावांचा सुपुत्र जेंव्हा त्यांना सांगतो की त्याला वकिल व्हायचेय. तेंव्हाच त्यांनी कडाडून विरोध केला होता. पण शेवटी त्यांना त्याच्या हट्टापुढे माघार घ्यावी लागली होती. त्यातही कोणाच्या खोट्या केसेस घ्यायच्या नाहीत. कोणाची हाय लागू द्यायची नाही.. हरलास तरी चालेल पण गुन्हेगाराला पाठीशी घालायचे नाही, अशा अनेक अटी ठेऊनच परवानगी आणि फी दिली गेली होती...
नम्रता आणि विनय एकाच कॉलेज मध्ये एल एल बी करत होते.. विनय तिला सीनिअर असला तरी तीचे बाबा श्री राजेश सुर्यवंशी, जे अत्यंत प्रसिद्ध वकिल होते. जे त्यांच्या कॉलेज वर प्रोफेसर म्हणून गेस्ट लेक्चर घ्यायचे, त्यांचा लाडका विद्यार्थी होता विनय. घरी असताना नेहमीच ते त्याच्या हुशारीने कौतुक करत.. एक प्रकारे त्याला प्रत्यक्ष न पाहताच नम्रता त्याच्या प्रेमात पडली होती..
हळू हळू तिच्या बाबांना भेटायला यायचा तेंव्हा आणि मग कॉलेज मध्ये भेटी व्हायला लागल्या.. आणि तो ही स्वतः ला तिच्यापासून दूर ठेवू शकला नव्हता... त्यात डिग्री पूर्ण झाल्यावर तिच्या बाबांचा असिस्टंट म्हणूनच लागला होता तो..
तीचे शिक्षण पूर्ण झाले तसे दोघांनी आपापले प्रेम आणि लग्न करण्याची इच्छा घरी सांगितली तेंव्हा दोन्ही कडून प्रचंड विरोध झाला होता.. तिच्या बाबांचा तो किती ही आवडता असला तरी दोघांमधील आर्थिक आणि सामाजिक दरी ते नजर अंदाज करू शकत नव्हते.. दोघेही सारखेच हट्टी.. त्यांनी तिला धमकावले, एमोशनली ब्लॅक मेल केले पण लग्न करीन तर त्याच्याशीच म्हणत ती अडून राहिली होती.. आणि एक दिवस संधी बघून पळून आली होती त्याच्या घरी.. त्याच दिवशी त्या दोघांनी मंदिरात लग्न केले होते..
विनय ला वाटले होते की आता किती ही विरोध असला तरी एकदा का लग्न झाले की त्याचे आई वडील तिचा स्वीकार करतील. पण त्यांनी त्या दोघांना दारात ही उभे केले नव्हते.. आपल्या मर्जी विरूध्द लग्न केले त्या पेक्षा जो वकिल गुन्हेगारांना सोडवतो, अशा वकिकाच्या मुलीशी लग्न केल्याचा राग जास्त होता त्यांना..
तिचे प्रिय अहो श्री विनय जाधव एक प्रसिद्ध आणि नावाजलेले वकील... बहुतांशी कौटुंबिक खटले त्यांच्याकडेच असायचे... एखाद्याचचा संसार तुटण्या ऐवजी सावरत असेल तर त्यासाठी अधिक प्रयत्न असायचा त्यांचा..
तिचे प्रिय अहो श्री विनय जाधव एक प्रसिद्ध आणि नावाजलेले वकील... बहुतांशी कौटुंबिक खटले त्यांच्याकडेच असायचे... एखाद्याचचा संसार तुटण्या ऐवजी सावरत असेल तर त्यासाठी अधिक प्रयत्न असायचा त्यांचा..
लग्न झाल्या नंतर दोन तीन वर्षे तशी हलाखीत च गेली त्यांची.. त्याला कोणतीही केस मिळू नये म्हणून तिच्या बाबांचा प्रयत्न आणि मिळालीच तर त्यात निर्माण केली जाणारी संकटे.. यामुळे त्याचा वकीलीत जम बसायला वेळ गेलाच.. सुरुवातीला तीने ही प्रयत्न केला वकिली करण्याचा..पण तिथेच तीचे बाबा ही काम करत असल्याने वारंवार त्यांच्या समोर आली की त्यांची रागीट नजर आणि घालून पाडून बोलणे, यामुळे त्याने तिला घरीच राहायला सांगितले..
त्यातच त्यांच्या संसार वेलीवर पूर्वी नावाचे सुंदर फुल फुलले आणि लेकीच्या पायगुणांनी तो यशस्वी होऊ लागला..
त्यानंतर दोनच वर्षात वेदांतचा जन्म झाला.. आणि ती मुलांमध्ये रमून गेली.. विनय ही मग जास्तच व्यस्त होऊन गेला.. तिच्या बाबांना,' मी पण तुमच्या पेक्षा जास्त यशस्वी आणि श्रीमंत होऊन दाखवेन.' या इर्षेपायी त्याचा अधिकाधिक वेळ केस आणि क्लायंट मध्ये जाऊ लागला..
मुले लहान होती तो पर्यंत तिला काही वाटले नाही, पण आता मुले दिवसभर शाळेत राहू लागली तसे तिला घर आणि तिचा रिकामे पणा खायला लागला.. आपल्या नवऱ्याचा वेळ मौल्यवान आहे.. आणि तो माझ्यासाठी नाही.. ही भावना मनात रुतू लागली.. रोजची कामे, त्या संबंधित च बोलणे, त्याचे सकाळी लवकर निघून जाणे. रात्री उशिरा पर्यंत स्टडी रूम मध्ये राहणे.. यामुळे तिचा चिडचिडे पणा वाढू लागला होता.. त्या दोघांनी कधी एकत्र मूव्ही पाहिला किंवा हॉटेलिंग साठी, फिरायला गेले, एवढेच काय? कधी एकत्र निवांत बसून कॉफी प्यायली हे ही तिला आठवत नव्हते.. आपण सोडून सगळेच व्यस्त आहेत.. आणि आपण मात्र रिकामे, बिनकामाचे आहोत.. ही भावना जास्त उचल खात होती...
क्रमशः
कथा कशी वाटतेय नक्की सांगा...