अपमान जगातील सर्वात मोठे मोटिवेशन

अपमान

                                                                                                  'अपमान’ जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन !!!

An Arrow can only be shot by pulling it backward. When life is dragging you back with difficulties, it means it’s going to launch you into something great. So just focus, and keep aiming.

आपल्या सगळ्यांना हे बाणाचे उदाहरण माहिती च आहे. बाण मारताना तो जेवढा मागच्या बाजूला खेचू तेवढा जास्त पुढे तो मारला जातो. तसेच आयुष्याचे ही आहे आपल्या . आयुष्यात जेवढ्या समस्या येतात , संकटे असतील किंवा छोटे मोठे प्रसंग असतील , किंवा अपमान असतील ..

ते आपल्या आयुष्यात खूप काही चांगले घडवून आणतात हेच लक्षात घ्या..जसे कठीण परीक्षा दिली आणि चांगला अभ्यास केला तर यश हे नक्कीच मिळते..तसेच आयुष्यातले हे कठीण प्रसंग आपल्याला मोठे होण्याकरिता , यशस्वी होण्याकरिता , आपल्यात प्रेरणा ( motivation ) जागी करण्याकरिता , निर्माण होण्याकरिता उपयोगी पडतात..
 
अतिशय साध्या कपड्यातले एक जोडपे हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रेसिडेंटना भेटायला गेले..त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर सेक्रेटरी कडे जाण्यास मिळाले.. सेक्रेटरीने या जोडप्याचे अतिशय साधे राहणीमान , साधे कपडे , त्यांचा appearance बघून दुर्लक्ष केले ..तरी थोड्या वेळाने परत हे जोडपे प्रेसिडेंट ना भेटायचे आहे अशी विनंतीच करत राहिले बराच वेळ या जोडप्याला वाट पाहत ताटकळत थांबावे लागले.

शेवटी एकदाचे प्रेसिडेंट यांना भेटले ..प्रेसिडेंट यांची ही तीच प्रतिक्रिया झाली जी सेक्रेटरी ची झाली..साध्या कपड्यातले हे सामान्य दिसणारे जोडपे ..त्यांच्या कडे थोडेसे नाराजी ने बघतच काम काय आहे विचारले ..तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा याच विद्यापीठात मध्ये शिक्षण घेत होता आणि ही त्याची आवडती युनिव्हर्सिटी होती .परंतु आपल्या मुलाचा अकाली टायफॉइड सारख्या तापाने १५ व्या वर्षीच निधन झाले आणि त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना काही तरी करण्याची इच्छा आहे.
 
तेव्हा प्रेसिडेंट फाडकन म्हणले की असे असेल तर या कॅम्पस मध्ये मला कित्येक  पुतळे उभे करावे लागतील ..तेव्हा हे जोडपे अतिशय नम्रपणे म्हणले की आम्हाला इमारत निधी द्यायचा आहे, नवीन इमारत बांधण्याकरीता मदत करायची आहे.

तेव्हा प्रेसिडेंट ला त्यांचे साधे कपडे , साधी राहणी बघून आणि त्यांना एवढा खर्च करायचा बघून त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले अपमान केला…तेव्हा ते जोडपे तिथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी च स्थापिली..जी एक नामांकित विद्यापीठ म्हणुन ओळखली जाते .प्रायव्हेट रिसर्च युनिव्हर्सिटी इन स्टॅनफोर्ड , कॅलिफॉर्निया ते जोडपे म्हणजेच मी अँड मिसेस लेलँड स्टॅनफोर्ड .

आपल्या मुलाच्या आठवणी किंवा स्मरणार्थ ते तो जिथे आवडीने शिकत होता त्या हॉवर्ड विद्यापीठ मध्येडोनेशन देण्या करिता गेले होते पण त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली ,त्यांच्या कडे दुर्लक्ष केले गेले आणि त्यांचा अपमानही केला आणि याच जिद्दिवर ..हीच प्रेरणा त्यांना मिळाली आणि जगातली एक प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना च त्यांनी केली..जी नामांकित आहे आणि जिथे प्रायव्हेट रिसर्च ही केले जातात..

म्हणजेच एखाद्या गोष्टीत अपमान झाला तर तोच अपमान आपल्याला चांगले काही तरी करायला प्रेरणा देतो…एकच इमारत नाही तर त्या प्रेरणे मधून … अख्खी युनिव्हर्सिटी स्थापन केली या सामान्य दिसणाऱ्या , साध्या रहणीच्या जोडप्याने पण मुळात पैसे आणि विचारांनी उच्च असणाऱ्या या जोडप्याने आपल्या झालेल्या अपमाना चे आपल्याला मिळालेली प्रेरणा किंवा संधी ओळखून त्याचे रूपांतर जगातल्या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये केले..

अपमान , द्वेष, हिंसा आपल्याला प्रेरणा देतात. याचे उदाहरण जोकोविच हा टेनिसपटू ही..अतिशय गरीब घरातला..वेटर चे काम करून आपली टेनिस खेळण्याची आवड पूर्ण करत असे..त्याच्या बाराव्या वाढदिवशी टेनिस कोर्ट वर सेलिब्रेशन सुरू असताना नाटाच्या फौजांनी युगोसलावियावर हवाई हल्ले सुरू केले ..त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन हवेतच विरले गेले.

सतत युद्धाचे वातावरण आणि त्यातून द्वेष बघणाऱ्या या जोकोविच ने सहा वेळा विम्बल्डन जिंकले आहे. ३४ व्यां वर्षी तो टेनिस चा जगज्जेता झाला आहे. त्याच्या यशाचे गमक विचारले तर तो सांगतो सतत युद्ध , द्वेष , हिंसा हेच बघत आलो होतो..
 
त्याच्या वाढदिवसाचा झालेला विरस, त्याच्या आई भावंडे यांचीझालेली बिकट अवस्था त्याने अनुभवली. माझ्यावर आभाळ कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन मी, अशी विजिगिषु वृत्ती मग अंगी येते. ही द्वेष आणि हिंसा एक प्रकरचा त्याचा टेनिस कोर्ट वर वाढदिवस साजरा न होवू दिल्याचा अपमान च जणू त्याला त्याचे सातत्य आणि कणखरता टीकविण्याकरिता उपयोगी पडली ..प्रेरणा देत गेली..
मन, मेंदू, मनगट अशा एकात्म भावनेनं झुंजता, तेव्हा जय-पराजयाच्या पल्याड जाता तुम्ही.

त्याला जे मिळाले नाही लहानपणी ..त्याकरिता अगदी वेटर चे काम करून मिळणारी टीप तो टेनिस कोर्ट वर खेळण्याकरिता वापरत होता .
याच कारणाने त्याने पैसे येताच सर्बिया मध्ये मोफत ३० टेनिस कोर्ट्सचं संकुल उभारलं आहे, जिथे कुणालाही पैसे न देता खेळता येतं!

अर्थात त्याची प्रचंड जिद्द ही त्याला या वयात ही या वर्षीचा टेनिस चा जगजेता बनवून गेली. आपल्या आयुष्यात ही अनेक वेळा कोणी ना कोणी आपल्याला अपमानित करीत असते..

सांगायचे च झाले तर प्रसिद्ध अभिनेते द ग्रेट अमिताभ बच्चन ..सुरुवातीला आकाशवाणी वर ऑडिशन करिता गेले पण त्यांचा आवाज आकाशवाणी करिता योग्य नाही असे म्हणले गेले हा त्यांच्या इगो चा अपमान म्हणा किंवा त्यातून आलेले अपयश म्हणावे पण यातून च प्रेरणा घेवून ते अभिनयाकडे वळले आणि अभिनय आणि आवाज या जोरावर आज ते किती यशस्वी झाले आहेत हे आपल्याला ही माहिती आहेच की..

आपल्याला मुंबई मधले अतिशय प्रसिद्ध आणि आलिशान हॉटेल ताज सगळ्यांनाच माहिती आहे.१९०३ मध्ये जमशेदजी टाटा यांनी हे अतिशय सुंदर असे हॉटेल बनविले याकरिता देश परदेशातून वस्तूंचा, मटेरियल चा , तंत्रज्ञान यांचा वापर केला..त्याकाळी तीन लाख युरो म्हणजे आताचे दीड हजार करोड रुपये खर्च करून सुंदर असे हे हॉटेल उभे केले..का केले ? माहिती आहे का? लुमिरार  ब्रदर आपल्या पहिल्या फिल्म चा शो हॉटेल वॉटसन मध्ये त्याकाळी ठेवला होता..जमशेदजी टाटा ही तिथे तो शो बघण्यास गेले तेव्हा हॉटेल बाहेरील द्वारपाल त्यांना अडवून अपमानित केले आणि बाहेर लावला असलेला बोर्ड दाखविला ज्यावर लिहिले होते ” Dogs and Indians are not allowed” .

जमशेदजी तो अपमान सहन करून नाराज होवून आले आणि त्यांनी त्या अपमानास्पद गोष्टीतून प्रेरणा घेतली आणि त्यातून च ताज सारख्या आलिशान हॉटेल ची निर्मिती झाली..ज्या हॉटेल मध्ये एकदा तरी जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते..जिथे राहण्याचे प्रत्येकाचे तरी स्वप्न असते..अशा या सुंदर आणि आलिशान हॉटेल मागे जमशेदजी भारतीय होते ही त्यांची चूक किंवा अपमान झाला असे वाटले कारण त्यांना हॉटेल मध्ये प्रवेश नाकारला ..

आणि तेव्हा म्हणून हॉटेल ताज बाहेर ही असा बोर्ड होता ” British and Cats are not allowed”. लहान असो किंवा मोठी असो व्यक्ती कधी ना कधी आयुष्यात अपमान होतच असतो आणि त्यातूनच सकारात्मक दृष्टी ने बघून ती आपल्याला आपण काही तरी चांगले किंवा मोठे करण्याकरिता किंवा मोठे होण्याकरिता ची प्रेरणा ( motivation ) मिळाले असेच समजावे..आणि तसे प्रयत्न ही करावे.

प्रत्येक यशस्वी व्यक्ती मध्ये मोटीवेशन त्यांना त्यांच्या इंच्छित स्थळी पोहचवत असते..सामान्य व्यक्ती ही यातूनच प्रेरणा घेवून असामान्य होत असतात.