अपेक्षांचं ओझं

अपेक्षांचं ओझं


जगासमोर हसावं लागतं
मनाविरुद्ध वागावं लागतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

ओळख असून सुद्धा
अनोळखी बनावं लागतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

परिस्थितीपुढेसुद्धा
नतमस्तक व्हावं लागतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

मोकळं आभाळ असून ही
पिंजऱ्यातच राहावं लागतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

आयुष्य जरी असलं अवघड
खूप काही शिकवत असतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

उतरत्या चंद्रकले प्रमाणे
जीवन आपलं सरत असत
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

नवी दोस्ती नवं नात
जोडणं जरी सोपं असत
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं

सरणावर देह विसावतो तेव्हा
जगणं आपलं संपत असतं
अपेक्षांचं ओझं कायम
डोक्यावरतीच असतं


- श्री
✍️✍️✍️

🎭 Series Post

View all