अपवित्र नातं ( भाग तिसरा )

वासने पुढं माणसाला काहीच सूचत नाही का हा चिरंतन प्रश्न तिच्या समोर होता.


अपवित्र नाते ( भाग तिसरा )

विषय:  नातीगोती 

तसं नाकारण्यासारखं या स्थळात काहीही नव्हतं. मुलगा एकुलता एक होता. दिसायला रुबाबदार आणि देखणा होता.त्याच्या वडिलांची खूप मोठी शेती होती. तो खूप शिकलेला होता. तरी पण शेतीच करत असे.

लग्नासारखा कठीण व्यवहार देखील तिच्या बाबतीत अगदी सहज घडून आला होता. तिच्या देखणेपणाबद्दल , तिच्या हुशारीबद्दल, तिच्या कामसू वृत्तीबद्दल आणि तिच्या मनमिळावू स्वभावाबद्दल तिच्या आईला खूप अभिमान वाटत असे.

त्यामुळे पुढील गोष्टी देखील पटापट घडून आल्या. मुला मुलींची पसंती झाली आणि दोघांच्या पत्रिका देखील जमल्या. देण्या घेण्याच्या किरकोळ गोष्टी जमवून घेतल्या गेल्या. मानपान काय करायचा. कार्यालय कोणतं घ्यायचं , हे सगळं मुलांच्या वडिलांनी तिच्या वडिलांच्या परिस्थितीशी जुळवून ठरवून घेतलं. कोणत्याही व्यवहारात त्यांची अडवणूक केली नाही.

नंतरच्या आठवड्यात दोघांच्या सोयीने तारीख पक्की केली गेली. त्यानुसार लगेच कार्यालय ठरवलं गेलं. पत्रिका छापायला टाकल्या गेल्या. गुरुजी, घोडा, वाजंत्री, आचारी सगळं पक्क केलं गेल. जेवणाचा मेनू ठरवला गेला. नवरदेव नवरीचे कपडे घेतले गेले. विहिणी विहिणीच्या मानापानाच्या साड्या घेतल्या गेल्या. दोन्ही घरी लग्नाची उत्साहात तयारी सुरू झाली.

दारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधले गेले.

मुहूर्ताचे पापड सांडगे केले गेले.

मूर्तमेढ रोवली गेली.

त्या गावाच एक वैशिष्ट होतं. त्या छोट्याशा गावात कोणा कडेही काही मंगल कार्य असलं, की सगळे लोक एकत्र येत. आणि आपल्याच घरचं कार्य आहे .असं समजून सगळ्या प्रकारची मदत करत. त्यामुळे कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी कोणताही अडथळा न येता सहजपणे पार पडून जात. तिच्या घरचे  कार्य देखील असंच सगळ्या घरात म्हणून पार पडायला लागलं.

मग सुरु झाला केळवणाचा कार्यक्रम. अगदी गावच्या प्रमुखापासून अगदी छोट्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाला त्या कुटुंबाने आपल्या घरी जेवायला यावं अशी इच्छा असायची.  मग रोज सकाळ संध्याकाळ गावभर जेवण चालायची. लग्नाच्या दिवसापर्यंत असं एक घर राहिलेलं नसायचं की जिथे त्यांचे जेवण झाले नाही.

अशी अगदी प्रत्येक गोष्ट निर्विघ्नपणं  पार पडत होती. सगळं जण आनंदात होते.

या सगळ्या गोंधळात त्याच्या आईच्या एक गोष्ट लक्षात आली होती की, या सगळ्या वातावरणात ती स्वतः नवरी असून कुठेतरी हरवलेली आहे. सगळ्यांमध्ये मिसळून देखील ती अलिप्तच आहे. स्थळ पसंत   नव्हतं का  तिला.  तिच्यावर हे लग्न करण्यासाठी कोणी काही बळजबरी तर केली नव्हती .मग ती नाराज का आहे. नाराज नाही असं दाखवते .पण सगळ्या गोष्टी यांत्रिक पणे पार पाडते.

शेवटी न राहून तिने मुलीला पोटाशी धरलं. तिच्या तोंडावरून हात फीरवून तिनं तिला विचारलं,

" बाळ तुला हे लग्न पसंत नाही का  ? "

यावर ती काहीच बोलली नाही. फक्त  तिच्या डोळ्यातून मूकपणाने अश्रू  वाहत होते. आईला घट्ट मिठी मारून ती म्हणाली,

" काही नाही ग आई  ? तुला आता सोडून राहावं लागेल ना त्यामूळे वाईट वाटतं ईतकचं."

आईला तिची माया पाहून खूप भडभडून आलं. तिने तिला मायेने अधिकच जवळ घेतलं. दोघीही रडू लागल्या.

"लक्षात ठेव. उद्या तुझं लग्न आहे. आज रात्री न विसरता माझ्या खोलीत यायचं. समजलं ना. नाहीतर ही गोष्ट तूझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगीतल्या शिवाय मी राहणार नाही." हे शेजारच्या काकाचे बोलणं आठवून तिला अजूनच रडू येत होतं.

( रसिकहो, ही कथा आहे एका वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या वासनेला बळी पडलेल्या एका अजाण मुलीची. जो तिचं लैंगिक शोषण करत होता. शेवटी त्याला कंटाळून तिने शिक्षण सोडून लग्न करायचा निश्चय केला. की जेणे करुन त्याच्या पासून दूर जाता येईल. पण त्याने जातांनाही तिला सोडलं नाही. म्हणून सावधान. )



( समाप्त )
लेखक : दत्ता जोशी




🎭 Series Post

View all