अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग २

“किती दिवस असा झोपुन रहाणार आहेस?” सरला रडतच त्याच्याशी बोलत होत्या. “तुझे बाबा ही असेच सोडुन गेले आणि आता तु ही….” सरलांना पुढे बोलल गेल नव्हतं. तशा विमल त्यांच्याजवळ गेल्या.
मागील भागात.

“नाही. ती एकटी आली नाहीये.” अनामिका थोडी मोठ्याने बोलली. “ती आली म्हणजे बाकी सगळेच येणार आणि ते सगळे कोणत्याही क्रिमिनल्सपेक्षा कमी नाहीयेत.”

आता शशांकला ही जरा टेन्शन आल होत. “असु दे. पण सगळे पुरावे आपल्या बाजुने आहेत.”

“नाही. ते काहीही असु दे.” अनामिका कागदांवर सह्या करत बोलली. “ह्या केसमध्ये आता आपण पडायचं नाही. समजलं.” अनामिका जणु काही शशांकला दम देत होती.

शशांक अनामिकेला धक्का बसल्यासारखा बघत राहीला होता. साडेचार फुटाची ती चषमीश मुलगी आली काय? आणि आत्तापर्यंत खंबीर असलेली अनामिका लगेच घाबरली काय? हे समीकरणचं त्याला समजलं नव्हतं.

आता पुढे.

(काही दिवसांपुर्वी.)

मुंबई जिल्ह्य़ाला लागूनच असलेला तो छोटासा जिल्हा. पण गेले दोन ते तिन दिवस सतत बातम्यांच्या हेड लाईन वर झळकत होता.

“नवीनच शोध लावलेल्या विद्युत उपकरणाच्या सादरीकरणादरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भरपुर प्रमाणित वित्तहानी झाली. तर वीसहून अधीक माणसं गंभीररीत्या भाजली गेली.”

“सावंत साहेबांच्या हत्येमध्ये त्याचा हात. स्वतःच दिली कबुली. पोलीसांकडून त्या दृष्टीने तपास सुरु.”

“दुसऱ्याचा शोध स्वतःच्या नावावर दाखवुन सरकारी योजनेचे तब्बल पस्तीस लाख लाटण्याचा प्रयत्न.”

“तोतया कंपनी दाखवुन सरकारी योजना लाटण्याचा प्रयत्न.”

“पोलीस स्टेशनला नेत असताना तो जमा झालेल्या संतप्त जमावाच्या तावडीत सापडल्याने त्याला जमावाची जबर मारहाण. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.”

“अशा भामट्या लोकांना फासावर लटकवा..” बातम्यामधील संतप्त प्रतिक्रिया.

“त्याने जगूच नये. वाचला तरी कसा तो?”…. बातम्यामधील दुसरी संतप्त प्रतिक्रिया.

“पहीले सगळी माहीती बाहेर येउद्या. मग खरं काय ते कळेल.” तिसरी प्रतिक्रिया.

“एवढ्या लोकांचा जीवाशी खेळणाऱ्या माणसावर उपचार करायची गजरचं काय आहे?.” चौथी प्रतिक्रिया

अशा बऱ्याच बातम्या, त्यावरच्या प्रतिक्रिया टिव्हीवर सतत चालुच होत्या. त्या जिल्ह्य़ातील वातावरण खुपच ढवळून निघालेलं होत.

या सर्व गोष्टींपासून दुर असलेला तो, तो मात्र सरकारी हॉस्पिटलच्या त्या बेडवर निपचीत पडलेला होता. त्याच्या घरातले आणि शेजारच्या मावशी सोडल्या तर बाकी सगळीच मंडळी त्याच्या मरण्याचीच आशा धरुन बसलेली होती.

त्या हॉस्पिटलला ही पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला होता. बरीच बघ्यांची, पत्रकारांची गर्दी त्या हॉस्पीटलच्या आवारात जमा झालेली होती. कोणाला त्याच्यावर राग काढायचा होता, तर कोणाला त्याची मुलाखत घ्यायची होती. तर पोलीस ही त्याची शुध्दीत यायची वाट बघत होते. त्याच स्टेटमेंट घेऊन त्याच्या विरुध्द न्यायालयात चार्जशीट फाईल करता येईल. जेणेकरुन त्यांच्यावर आलेल प्रेशर थोड्याफार प्रमाणात का होईना? थोडफार हलकं होणार होत.

इनस्पेक्टर साटम सकाळीच परत त्या हॉस्पीटलला पोहोचले होते. हॉस्पिटलला पोहोचल्यावर पहीले त्यांना तिथल्या डॉक्टरांशी भेट घ्यायची होती. त्याला कधीपर्यंत शुध्द येईल याची माहीती इनस्पेक्टरांना डॉक्टरांकडून घ्यायची होती. तस तर डॉक्टरांनी आधीच सांगीतलेल होत की त्याला कधी शुध्द येईल हे त्यांनाही सांगता येणार नाही म्हणुन. पण पोलिसांवर असलेल्या वरिष्ठ अधिकारी, राजकारणी, लोकांमध्ये असलेल्या असंतोषाच्या प्रेशरने त्यांना खुपच घाई झालेली होती. पण ते डॉकाटरचं दुसऱ्या ऑपरेशनमध्ये व्यस्त असल्यांने त्या डॉक्टरांना यायला जरा उशीर होणार होता. म्हणुन साटम पहीले त्याच्या बेडजवळ पोहोचले होते.

तिथे त्याची आई सरला, त्याची लहान बहीण सोनिया, त्याचे मामा राजन, शेजारच्या मावशी विमला आणि विमलांची मुलगी ऋतुजा एवढे सगळेच उपस्थित होते. जी दुपारच जेवण बनवण्यासाठी सध्या घरी गेली होती.

“एवढ्या लोकांच्या जीवाला घोर लावुन हा बघा कसा मस्त पसरुन पडला आहे.” इन्स्पेक्टर साटम खोचक आवाजात बोलले. त्याच्यामुळेच त्यांच्यावर कामाचा इतका लोड आलेला होता. मग तो ही रागही साटम त्याच्यावर काढत होते.

“तो काय मजा म्हणुन झोपला आहे का?” सरला ही चिडुन बोलल्या.

“सगळे पुरावे त्याच्याविरुध्दच आहे.” साटम “आम्ही त्या माणसांच्या तावडीतून सोडवलं म्हणुन वाचला तरी. कर्माचे भोग आहेत ते. चुका केल्या त्या भोगाव्या लागतीलच.”

“तोंड सांभाळून बोला.” सरला अजुनच चिडुन बोलल्या.

“हे त्याने गुन्हा करण्याचा आधी विचार करायला हवा होता.” साटमनेही आवाज चढवला होता.

“त्याच्यावरचे आरोप अजुन सिध्द व्हायचे आहेत.” राजन ही कडक आवाजात बोलले.

“होतील, ते पण होतील.” मिस्टर परमार तिथे येत बोलले. त्यांच्या आवाजातही कुत्सितपणा होता. “तेवढे पुरावे त्याच्याविरुध्द आहेतच की. काय ओ इन्स्पेक्टर साहेब.” परमार साटमकडे बघत बोलला.

“माहीती आहे मला. हे सगळ तुच केल आहेस.” सरला चांगल्याच चिडुन बोलल्या.

तसा परमार अजुनच कुत्सितपणे हसला. “त्याच्यामुळे माझ्या कंपनीच नुकसान झाल. वरुन तुम्ही माझ्यावरच आवाज चढवता? एवढचं आहे. तर करा सिध्द कोर्टामध्ये.” आता परमारनेही आवाज चढवला.

सरला पुढे काही बोलणार तोच साटम बोलले. “बास झाल आता. एकदा का याला शुद्ध आली की सगळच काय ते स्पष्ट होईल.” साटम कडक आवाजात बोलले. नंतर सरलाकडे वळाले. “जर याने खरचं काही गुन्हा केला नसेल तर त्याला काहीही होणार नाही. याची जबाबदारी माझी.”

सरला सोबतच सगळ्यांनाच जरा धीर आला. तेवढ्यातच त्या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टरही येऊन पोहोचले होते. त्यांनी बेडवर निपचीत पडलेल्या त्याला तपासुन पाहीले.

“काही प्रगती डॉक्टर?” साटम

“अजुन तरी दिसत नाही.” डॉक्टर “मेंदूला बराच शॉक बसलेला आहे. त्यामुळे तो प्रतिक्रियाच देत नाहीये.”

“ओके.” साटम “जेव्हा कधी याला शुध्द येईल. तेव्हा सर्वात आधी आम्हाला कळवा. आमच्या अगोदर दुसरा कोणीही त्याला भेटता कामा नये.” साटम कडक आवाजात बोलले आणि आल्या पावली निघुन गेले.

“तुम्ही पण निघालात तरी चालेल.” सरला परमारांकडे बघत चिडुन बोलल्या. तसा परमारही त्याच्याकडे तुच्छतेने नजर टाकत तिथुन निघुन गेला.

सरला परत त्याच्या उशाशी जाऊन बसल्या होत्या. जसजसा वेळ चालला होता. तसतसा त्यांचा धीर सुटत चालला होता.

“किती दिवस असा झोपुन रहाणार आहेस?” सरला रडतच त्याच्याशी बोलत होत्या. “तुझे बाबा ही असेच सोडुन गेले आणि आता तु ही….” सरलांना पुढे बोलल गेल नव्हतं. तशा विमल त्यांच्याजवळ गेल्या.

“आपला मुलगा वाचला हे काही कमी आहे का?” विमल सरलांना समजावुन सांगत होती. “एवढा वेळ धीर धरला आहेस. तर थोडा अजुन धर. उठेल तो. त्याला उठावचं लागेल. मला विश्वास आहे बाप्पावर.” विमल खुपच निश्चयाने बोलत होत्या.

“मला बोलण्याचा तर आता काही अधीकार नाही.” राजन जरा चाचरतच बोलला.

“अस का बोलत आहेस दादा?” सरलाला भरुन आल होत. “माणसाच्या चेहऱ्यावर तर तो कसा आहे ते लिहीलेलंच नसतं ना. त्यात तुझा तरी काय दोष?”

“पण माझे संस्कारच कमी पडले. जे माझीच मुल….” राजनलाही बोलताना श्वास जड झाले होते. “पण एक सांगतो आक्के. आपला बाळ्या नक्की उठणार.”

सगळेच त्याच्याकडे बघायला लागले होते. सोनियाला स्वतःवर नियंत्रण ठेवण मुश्किल झाल होत. कधीही तिच्या अश्रूंनी तिच्यासोबत दगा करण्याची शक्यता आता दाटून आलेली होती. तिने तिच्या भावावर एक नजर टाकली आणि तिथुन पटकन बाहेर निघुन गेली होती.

तो प्रसाद परांजपे. शिक्षणाने इलेक्ट्रिक इंजीनिअर. त्याला येणाऱ्या लाखोंचे पॅकेजला त्याने लाथ मारुन मित्राच्या सोबतीने स्वतःची एक छोटीशी कंपनी सुरू केली होती. जिथे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे विद्युत उपकरणांचा शोध, संशोधन आणि त्याची निर्मिती तो करत होता.

असेच एकदा त्याच्या मित्राच्या सोबतीने संशोधन करता करता त्याला शेतकऱ्यांना उपयुक्त आणि स्वस्त असा एका विद्युत उपकरणाचा शोध लागलेला होता. ज्याद्वारे शेणखताच्या माध्यामातून इंधनाची निर्मीती होत होती आणी त्याचा उपयोग प्रसादने तयार केलेली शेतीला लागणारी यंत्रे चालवण्यासाठी होणार होता. या उपकरणाने शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचणार होते.

याच दरम्यान सरकारनेही अशा नवीन संशोधन करणाऱ्यांना सपोर्ट करायला सुरवात केलेली होती. प्रसादनेही त्याने लावलेल्या या शोधाला सरकार दरबारी नेण्याच ठरवलेलं होत. यासाठी त्याने त्याचा ह्या शोधाचे पेटंट सुध्दा रजिस्टर करायला घेतलेले होते.

प्रसादच्या या शोधाची माहीती इतर मोठ्या कंपनींना लागलेली होती. त्या कंपन्यांनी प्रसादला लाखो रुपयाचे पॅकेज देऊन ते पेटंट कंपनीला विकण्यासाठी विनंती करत होते. पण पेटंट त्याला त्याच्याच नावावर ठेवायचे होते. कंपनी मात्र ते विकत घेऊन स्वतःच्या नावावर करणार होत. तेच प्रसादला नको होत. म्हणून त्याने त्या सर्व कंपन्यांना विनम्रपणे नकार दिला होता.

पण म्हणतात ना, चांगल्या कामाला अडथळे फार. बाकी सर्व कंपन्यांनी माघार तर घेतली होती. पण एक कंपनी मात्र हात धुवुनच प्रसादच्या मागे लागली होती. प्रसादने अजुन पेटंट रजिस्टर केल नव्हतं. याची माहीती देखील त्यांना होती. पण प्रसाद सुरुवातीला ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी वाकड्यात शिरायचं ठरवलेल होत. याची कुणकुण प्रसादला लागताच, त्याने त्याच पेटंट पटकन रजिस्टर करुन घेतलेल होत. प्रसादला वाटलं होत की आता सगळेच काही निट होईल आणि झाल ही तसचं.

सरकार दरबारी प्रसादच खुपच कौतुक झालेल होत. सरकारनेही ते उपकरण कस काम करतं म्हणून प्रसादला एक दिवसासाठी त्या उपकरणाच सादरीकरण करण्यासाठी सांगीतलेल होत. प्रसाद आणि त्याच्या घरचे खुपच आनंदात होते. त्या सादरीकरणाच्या दिवशी पहीले प्रसादचा जाहीर सत्कार करण्यात आलेला होता. खुप सारी गर्दी जमलेली होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all