जलद कथालेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे…
आज मनभरून सीडी बघायची हे अशोक ने ठरवलं असल्याने आनंदात शीळ घालत तो
खाण्यासाठी काहीतरी शोधत होता.शोधता-शोधता त्याच्या मनात आलं ,
खाण्यासाठी काहीतरी शोधत होता.शोधता-शोधता त्याच्या मनात आलं ,
"आई सुन्दर आत्याकडे गेलीय म्हणजे चार तास तर सहज येणार नाही आज तिचा मूडही वेगळाच दिसला म्हणजे आणखी जास्त उशीरही लागू शकतो .सत्तू, मन्या, देवेशला फोन करतो ,आणलेली नवी कोरी फिल्म बघू ...यस्स .......’
स्वत:वरच खुष होत अशोकने तिघांनाही फोन केला.तो त्यांना कशासाठी बोलावतोय हे सांगताना त्याच्या चेह-यावर जे हावभाव होते,जे हसू होतं त्यावरून तो कोणतीही धार्मिक फिल्म बघणार नव्हता हे नक्की कळत होतं. त्याचं दुर्दैव त्याच्या एकाही मित्राला वेळ नव्हता,त्यामुळे तो थोडा खट्टू झाला पण शेवटी ती फिल्म त्याने एकटयानच बघायचं ठरवलं.तो खाण्याचं सामान घेऊन समोरच्या खोलीत आला. T.V.ला V.C R जोडला आणि त्यात ती सीडी टाकून मजेत बघत बसला.
***
थोड्या वेळाने दारावरची बेल वाजल्यानी तो भानावर आला. आई आली कि काय असं वाटून क्षणभर तो दचकला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आई इतक्या लवकर येणं शक्य नाही. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली तसा तो धावत दार उघडायला गेला.
थोड्या वेळाने दारावरची बेल वाजल्यानी तो भानावर आला. आई आली कि काय असं वाटून क्षणभर तो दचकला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आई इतक्या लवकर येणं शक्य नाही. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली तसा तो धावत दार उघडायला गेला.
अशोकने दार उघडलं तसा त्याच्या खांद्या वर पोलीसांचा हात पडला. पोलीस बघून तो घाबरला
“साहेब मी काही केलं नाही मला कशाला पकडता?”
घाबरत, रडत त्यांनी विचारलं. त्याला आणखी बोलू न देता इन्स्पेक्टर सावंतांनी त्याच्या एक थोबाडीत मारली आणि म्हणाले,
”काही केलं नाही तू. पण आम्ही काही न करणा-यांनाच पकडतो.......शिंदे बसावा याला गाडीत.” शिंदेंनी त्याची कॉलर पकडून त्याला गाडीत कोंबलं.
पोलिसांनी त्याला धु......धु धुतलं.तेव्हा अशोक रडण विसरला,आणि घाबरतच त्यांनी केलेला सगळा प्रकार सावंतांना सांगीतला. ते ऐकल्यावर इन्स्पेक्टर सावंत यांनी विचारलं
“तुझे बाकी मित्र कुठे आहेत? फोन कर त्यांना.”
“साहेब मी मघाशी त्यांना फोन केला होता…
”तो पुढे बोलायच्या आधीच सावंत म्हणाले,
”का केला होतास फोन?......बोल लवकर. दुसरं कांड करायचा विचार होता का?”
“नाही...नाही साहेब....असं काही करायचं नव्हतं.”
“मग का फोन केला होतास?"
एक लाठी शिंदेंनी त्याच्या पायावर हाणली. तसा अशोक जोरात किंचाळला.
”साहेब मी एक अश्लील सीडी आणली होती ती बघायला त्यांना फोन करून बोलावलं होतं.” अशोक म्हणाला.
“मग आले का ते?” सावंतांनी विचारलं.
“नाही साहेब त्यांना वेळ नव्हता.”अशोक घाबरत कसातरी बोलला.
”हे बघ तू तुझ्या मित्रांना तुमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी बोलाव. कुठे भेटता नेहमी?”त्यांनी ओरडूनच विचारलं.
”राठी कॉफी हाऊसमध्ये.”अशोक घाबरतच बोलला.
“बोलव उद्या आणि बोलतांना तू पोलिसांसमोर बसलाय हे त्यांना कळायला नको नाहीतर......”
”नाही साहेब नाही कळणार.”
"शिंदे याचा फोन द्या." शिंदें हवालदार नी अशोकला त्याला फोन दिला.
" हं कर फोन.आणि सांगीतलेलं लक्षात ठेव.फोन स्पीकर वर ठेव.चल लवकर." सावंतनी जरबेच्या सुरात म्हटलं.
अशोकनी मित्रांना फोन केला आणि नेहमीच्या ठिकाणी बोलावलं.
“कॉफी हाउस मध्ये तुझ्या आजुबाजुला साध्या वेषात पोलीस असतील. तू डोळ्यांनी जरी त्यांना सावध केलस आणि ते पळाले तर मग तुझं काही खरं नाही.कळल का?”
अशोकने मान डोलावली आणि म्हणाला,
" असं नाही करणार."
" करायचच नाही.केलस तर तू आहे आणि माझ्या हातातील ही काठी आहे. कळलं?"
शिंदे जरबेच्या स्वरात बोलले.
" असं नाही करणार."
" करायचच नाही.केलस तर तू आहे आणि माझ्या हातातील ही काठी आहे. कळलं?"
शिंदे जरबेच्या स्वरात बोलले.
“ शिंदे याचा फोन घ्या” अशोकचा फोन लगेच घेतल्या गेला.
त्याला कळत नव्हतं आपण जे केलं ते कितीतरी दिवस कळणार नाही याची त्याला खात्री होती कारण ज्या मुलीवर आपण बलात्कार केला ती मुकी बहिरी होती. कुठून कळलं असेल पोलीसांना. उत्तर शोधून शोधून तो निराश झाला त्याचं सगळं अंग ठणकत होतं.
" चांगलाच हाणला या शिंदेंनी." अशोक रागाने पण मनातच बोलला.
__________________________
क्रमशः अपमान
कुठून कळलं असेल पोलीसांना अशोकचं कृत्य.
बघू पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा