अनुराधा पुष्कर : दर्जेदार व चतुरस्र लेखिका

ईरा : शब्दांचे महान पर्व


अनुराधा पुष्कर : दर्जेदार  व चतुरस्र लेखिका

लेखनक्षेत्र अनेक चांगल्या लेखकांनी बहरले आहे.आपल्या सहज सुंदर लेखणीने लेखकांनी वाचकांना संतुष्ट केले आहे.प्राचिन मंदिरातील शिल्पचित्रे पाहिली असता त्यांच्या अद्भूत कलाविष्काराचे दर्शन होते.अत्यंत तन्मयतेने केलेले कोरीव काम मनाचा ठाव घेते.त्यासाठी प्रचंड मेहनत , कलेचा ध्यास , जीव ओतून केलेले काम आणि कलेवर अपार निष्ठा यामुळे अशा महान कलाकृती जन्मास येतात. हे काम सातत्याने सुरु असते , कधीही यामध्ये खंड पडत नाही हे कार्य निष्ठावान कलाकारच करु शकतो.नेमके अशाप्रकारेच लेखक समाजाचे बदल आपल्या लेखणीत टिपत असतो.दैनंदिन जीवन चालू असते पण लेखकांची न दिसणारी धडपड सुरु असते त्यांच्या प्रतिभेचा कवडसा कुठे शोधत जाईल व त्यातून अजरामर शब्दशिल्प निर्माण होऊन वाचकांच्या भेटीस दिल्यावरच लेखाकाला खरे समाधान मिळते.असेच लेखनकार्य करणाऱ्या शांत सुस्वभावी लेखिका आदरणीय अनुराधा पुष्कर या आहेत.

सर्वत्र नावलौकिक मिळविलेल्या ईरा व्यासपीठाने अनेक उदयोन्मुख लेखकांना लिहण्याची सोनेरी संधी दिली.अल्पावधीतच सर्व लेखक ईरांशी एकरुप झाले.ईराने आयोजित केलेल्या स्पर्धा हे लेखकांचे खास आकर्षण आहे.यातूनच भरविलेली नाविन्यपूर्ण चॕम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा लेखकांच्या लेखणीचा उत्सव होता.यातूनच अनुराधाजी यांच्या लेखणीने ईरावर लिहण्यास सुरवात केली.अत्यंत सकस लेखन , सडेतोड विचार , प्रभावी मांडणी , विषयाचे सखोल विस्तारीकरण , साधे व लोभस भाषासौंदर्य यामुळे त्यांनी ईरावरील वाचकांना कथेंचा खजाना दिला आहे.सध्याही त्यांचे लेखन चालू आहे.प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या अनुराधाजी यांनी लेखनाचा छंंद छान जपला आहे.प्रेम हे अबोल अंतरीचे , आई तुझ चुकलच , अनिका , उत्सव नात्यांचा , तू तिथे मी , शक्ती , समर्पण , सलाम यासारख्या अप्रतिम कथांनी ईरा व्यासपिठ गाजवले.त्यांच्या अनिका कथेने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला.एक दर्जेदार व सयंमी लेखिका म्हणून त्यांची ख्याती आहे.अत्यंत गहण लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.नविन विषय व नवा दृष्टीकोन यामुळे भविष्यात ईरावर त्यांचे लेखन आणखी गतिमान होईल.

अशा या सदाबहार लेखिकेचे लेखन असेच बहरावे.उत्तम आरोग्य व सुख लाभावे हीच मनापासून सदिच्छा ..!!


                 ©नामदेवपाटील