Login

अनुप-10

Story Depend On A Boylife
                   कशिश आणि रितेश मनाली साठी निघाले.
ते दोघे गेल्यावरती शोभात्या राघवेंद्र आणि सुमनला बोलत होत्या, "मी अनूप साठी एक मुलगी पाहिली, लवकरात लवकर त्याचे लग्न करून टाका, नाहीतर तो कोणत्याही जाती धर्माची मुलगी आनेल."
बाबा:" हो, मी पण त्याच विचारात आहे, एकदा अनुपला बोलतो."
शोभात्या:"अरे, काय बोलायचं, खडसावून त्याला सांग. तुझं लग्न ठरवणार आहे आणि  नाही करायचं असेल तर चालता हो माझ्या घरातून ".
   राघवेंद्र ला शोभात्या शिकवत होत्या तिची.                आई: "लग्न जबरदस्तीने करायला काही नाही पण बळजबरी लग्न केलं तेही इच्छेविरुद्ध तर ते लग्न टिकेल कसे". आपण शांततेत त्याला समजावून सांगू या.
       अनुप रूमच्या बाहेर निघाला. तो आता हॉस्पिटलला जाणार इतक्यात राघवेंद्र ने त्याला बोलावले,
बाबा: "अनुप थांब."
अनुप: "बाबा तुम्हाला जर लग्नाविषयी बोलायचं असेल तर माझी मुळीच इच्छा नाही."
आई:"अरे, बाबा काय बोलतात ते ऐकून तरी घे."       अनुप: "आई तीन वर्ष झाली, कोणाचे लग्न झाले की तुम्ही दोघे याच विषयावर माझ्याशी बोलतात.मला ठाऊक आहे" बाबा:" अनुप एकदा मुलगी तर पाहून घे, आवडली नाही, आपण हा विषय इथेच रद्द करू."
अनुप: " बाबा प्लीज मला लग्नाविषयी काहीच बोलायचं नाही,
      तो सरळ प्रॅक्टिस साठी निघून गेला,
आई ,बाबाला म्हणाली कसं होईल या पोराचं मला तर कधीकधी झोपच येत नाही. याची काळजी करत आयुष्य जाईल,
मला माहिती आहे सिद्धांत साठी मनस्वी चांगली आहे, कशीश वर जरी मी नाराज असेल, तरी ती घरासाठी खूप चांगली मुलगी आहे."
   शोभात्या तिला एवढे बोलली, परंतु पोरीने उलट शब्द तिला बोलला नाही, अशीच एखादी मुलगी अनुपला भेटावं.कायमचे मोकळी होऊन जाईल"
बाबा: अग, जोपर्यंत आपण संसारात आहे तोपर्यंत आपण कधी मोकळे होतो का?
जाऊदे वेळे सर्वां गोष्टीचा इलाज आहे. देव नक्कीच अनुपला चांगला मार्ग सुचवल.
          सकाळी, सकाळी मनस्वीची कामाची गडबड चालू होती. श्वेता तिच्या चार वर्षाच्या मुलीला वरण-भात खाऊ घालायचा होता. ती सिद्धांतला म्हणाली,"अरे सिद्धांत श्वेताला वरण-भात खाऊ घाल".
सिद्धांत:" मला वेळ नाही, नाहीतर मी नक्कीच खाऊ घातल असतं."
अनूप: बसलेला होता," तो म्हणाला मनस्वी ते खाऊ घातल मी श्वेताला.
सिद्धांत: अरे दादा ने खाऊ घातलं.
अनुप: "सिद्धांत थोडं मनस्वी ची कामात मदत करत जा! तिच्या एकटी वरती किती ताण पडतो."
सिद्धांत:" अरे दादा आता कशिश आली, त्या दोघी मिळून करतील घरची कामे."
अनुप:" अरे बायका काय घरातल्या कामांसाठीच असतात का? त्यांचं त्यांना पण करियर आहे."
सिद्धांत: " दादा मग तू एक काम कर ना तू पण लग्न कर. तिघी आपसात वाटून घेतली कामे
अनुप" ती तुझ्यासारखे आळशी निघाली तर तिच्या ऐवजी मला मनस्वी आणि कशिशची कामे करावी लागतील."

         घरात हसत-खेळत वातावरण चालू होता तेवढ्यात शोभात्या आल्या.
शोभात्या अगंबाई! सुमन त्या मुस्लीम मुलीला काही किचन मध्ये प्रवेश करू देऊ नको ग."
अनुप:" कशिष किचनमध्ये जाणार नाही तर मनस्वी ही जाणार नाही आणि आई पण जाणार नाही समजलं का शोभा आत्या तुला."
     खरच कसं काही वाटत नाही दुसऱ्यांना सतत दुखवून तुला मिळतं काय देव जाणे!
शोभात्या:" बघितला तुझा हा पोरगा किती उद्धटपणे बोलतो असाच तो रिचा ला बोलला असेल त्यामुळे तर ही त्याला सोडून गेली."
          अनुप रागाने उठून निघून गेला

सिद्धांत: "शोभाआत्या तुला अनुप दादा चा भूतकाळ काढायची काय गरज आहे. राहिला प्रश्न कशिशचा आई आणि बाबा पाहून घेतली. तिला कसा हँडल करायचं."
   "तुमच्या सारख्या लोकांच्या टोमणे यामुळेच अनुप दादा दारू कडे  वळला!
             शोभात्याला बोलून सिद्धांत टेरेस वर आला तेथे त्याने पाहिले अनुप कोपर्‍यात बसला, सिद्धांतने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला,
अनुप: "सिद्धांत मला खरंच सहानुभूतीची गरज नाहीये,
सिद्धांत:" दादा पण तुझी गरज आम्हाला आहे."
अनुप:" अरे मला आता लोकांच्या असल्या बोलण्याची सवय झाली आहे."
सिद्धांत: "दादा तू अजूनही भूतकाळात राहत आहेस त्या मुळे तुला लोक बोलतात.
        दादा तू खरच आता आमच्यासाठी तुझा भविष्यकाळ पहा. रिचा च्या आठवणीत आता आयुष्य काढणे आता बास कर."
अनुप:" सिद्धांत मी तोच प्रयत्न करत आहे, पण मला अजून थोडा वेळ द्या."
सिद्धांत: "हो दादा नक्कीच वेळ देऊ तुला पण प्लीज ड्रिंक पासून लांब रहा...."
          अनुपशी बोलून सिद्धांत खाली निघून गेला अनुप स्वतःशी बोलत होता खरंच किती वेड्यासारखी प्रेम करत आहेत ते माझ्यावर,
        रिचा माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि तिच्या दुःखात मी दारू पिऊन यांना किती त्रास देत होतो. तरीही हे माझ्या चांगल्यासाठी झटत राहतात.