Login

अनुप-9

Story Of Boy
     अनुपचे बोलणे शोभात्याला खुपच जिव्हारी लागले. अनुप ची आई अनुपला ओरडली, अनुप मोठ्यांशी असं बोलत असतात का? माफी मागा त्यांची!
   त्यावर अनूप म्हणाला, जेव्हा मोठे तोंड सांभाळून बोलायचं विसरतात तेव्हा लहानांनी त्यांची जागा दाखवावी लागते.     
        शोभा त्यांच्या मुलाला म्हणाली, चल रे बाबा! मला नाही राहायचं, अजून मला माझा अपमान नाही सहन करायचा. मला तुझ्या सोबत घेऊन चल, त्यावर राघवेंद्र आणि सुमन, त्याची माफी मागत होते.
   त्यांना म्हणत होते, "तुम्हाला अनूपचा स्वभाव माहित आहे ना!  तो कसा चिडचिड आणि रागीट आहे." आम्हाला क्षमा करा इथे रहा. असे आल्यापावली परत नका जाऊ!
   शोभात्याच्या मुलाला ही तेच पाहिजे होतं, कारण शोभा आत्या च्या किटकिटाने घरी नुसते वाद व्हायचे,
  त्यावर तो म्हणाला," आई नवीन नवरी आहे, पंधरा दिवस तिला घरातल्या रितीभाती समजाव. रहा येथे पंधरा दिवस.मी तुला न्यायला येईल."
    रात्री रूम मध्ये कशीश एकटीच बसली, तिथे रडायला लागली. कारणही तसेच होते घरच्यांचा विरोध स्वीकारून त्यांनी लग्न केलं, समाज सर्वात जास्त मुलींना दोष देतो.

       तेवढ्यात रूममध्ये रितेश आला, कशिश त्याला पाहून आपले डोळे पुसले, रितेश कशीश जवळ बसला. हात हातात धरून म्हणाला, "हे बघ,आपल्याला या विरोधाची आणि असल्या बोलण्याची अपेक्षा होती ना! आता असले  बोलणे मनावर घेऊ नको! आपण एकमेकांवर प्रेम असल्यामुळे लग्न केलं. आपल्याला कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नको.    
        माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट तू आहेस.
कशिश म्हणाली, अरे बोलण्याचा काही वाटलं नाही, तुझ्या आई-वडिलांनी ऍटलिस्ट  स्वीकार तरी केलं.
   माझ्या आईवडिलांनी तर माझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही असं सांगितलं." त्याचं वाईट वाटतं.
आपल्या जवळ घेतला आणि तो तिला समजावून सांगू लागला, तेवढ्यात दारावर टकटक झाली. रितेश नि कशीशला दूर केले. दार उघडलं तर समोर दारात अनूप होता. म्हणाला, "दादा काय झालं,काय प्रॉब्लेम आहे का? रितेशच्या हातात दोन तिकीट ठेवले.मनाला, हे तर तुम्हाला आता आयुष्यभर ऐकावं लागणार आहे", पण नवीन लग्न एन्जॉय करा. हे घ्या हे मनालीचे तिकीट, एन्जॉय युअर सेल्फ. असे म्हणून तो आपल्या रुममध्ये निघून गेला.

    रितेश अनुपच्या या गिफ्टने खूप खुश झाला.
तो कशीश जवळ आला, तिला मनालीची तिकिटे दाखवले, कशिशपण खूप खुश झाली.
  पण ती म्हणाली," आपल्याला घरच्यांची परवानगी कशी मिळेल."
रितेश: "काळजी करू नकोस, दादा सर्व मॅनेज करणार आहे. तू फक्त आपल्या दोघांची पॅकिंग कर.
   रितेश ने तिला हलकेसे जवळ घेतलं तो म्हणाला आता तर माझी पॅकिंग कर. ती लाजली,रूमचे लाईट बंद झाले.

अनुप आपल्या रूममध्ये पहुडला होता. तो आपल्या निर्णयाचा विचार करत होता. मी जर रिचा सोबत लग्न केले असते तर माझा family ने तिला नक्कीच स्विकार केल असत.
रिचाला तरी काय माहीत, Mr.शर्माने मला तिच्या माघारी बोलावल होत. तिच्या आयुष्या मधुन निघून जायची किम्मत देत होते. त्यामुळे मला त्यांचा राग यायचा.
  माझं नाव मोठ करण्यासाठी मी धडपड करत होतो. परंतु हे सत्य न जनताच तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस.
   एकदा पण विचार नहीं केला, तू गेल्यावर माझे कसे होईल. नाव मोठ करण तर दूर राहिल, मी तर जगायचं विसरलो.
  मी ज्या दारूपासून दूर रहायचो, त्या दारूशिवाय जगू नाही शकत.
  अनूप विचारात होता तेवढ्यात दारावर टकटक झाली. अनूपची विचाराची तन्द्री तुटली,,
मनस्वि ने अनूप साठी गरमागरम चहा आणला,
मनस्वी: "सॉरी भाऊजी, तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण मला वाटलं तुम्हाला नक्की चहा ची तलफ आली असेल."

अनूप: "thnx, मनस्वी मी येणारच होतो, या साठी."

मनस्वी:" एक विचारू?."

अनूप: "हो विचरना". तू केव्हा पासून परवानगी घेतेस?
मनस्वी: "तुम्ही सर्वांच विचार करताना, स्वतःच विचार करणच सोडल. मला आठवत, तुम्ही जसे  रितेश-कशिशला support करता, तसेच सिधांत अणि मला ही support केलय. मला ह्या घरात adjust करण्यासाठी तुम्ही खूप support केलय."
अनूप: "एवढी तारीफ, तुला पण काय मानलीच टिकट हव?"
मनस्वी: " नाही, रिचाला विसरून जा,दूसरा विचार करा, आम्हाला गरज आहे तुमची"