सत्यनारायण पूजेसाठी रितेशच्या आईवडिलांनी जवळपासच्या नातेवाईकांना बोलवले, नातेवाईकही माघारी काचकूच करत होते.
" दुसर्या धर्माची मुलगी आणि सून म्हणून एकमेकांना म्हणत होते,एक नातेवाईक वाईट म्हणाला, नाही जर परवानगी दिली रितेशचे हाल तर अनूप सारखे होईल. नावाला डॉक्टर आणि रात्री तर बेवडा." असं म्हणून हसत होते. मागेच रितेशचे वडील होते. नातेवाईकांचे हे बोलणं त्यांच्या जिव्हारी खूप लागले. "त्यांनी ठरवलं सर्व नातेवाईक घरी गेल्यानंतर अनुपला या बदलं बोलायच.
रितेशच्या आईची लगबग सुरु होती. थोडी घाबरलेल्या होती. रितेशच्या बाबांचा बोलावल. नि म्हणाली, अहो शोभा आत्त्या येणार 5 वाजता. त्यामुळे मला तर बाई भीती वाटते. आजचे मुले आई-वडलांच ऐकत नाही. आता या शोभा ताई किती बोलतील.
रितेशचे बाबा म्हणाले, लोक काय म्हणतील, ते ऐकायच. सोडून द्यावे. मुले त्यांचे आयुष्य जस जगतात तसेच जगू देऊ. ते जिथे चुकतात, तिथे बोलू.
: रितेशची आई," तुमच्या अश्याच बोलण्याने अनूप वाया जातोय. तो पूर्णपणे आपल्या ऐकण्या बाहेर गेला. तुम्ही त्याला सांगलत ना आत्त्या सोबत वाद घालायचा नाही".
रितेशचे बाबा म्हणाले, हो मी समजावले त्याला, तू नको काळजी करू!
शोभा आत्त्या वडीलधार्या होत्या आणि त्यांना घरात सर्वजण घाबरायचे कारण त्यांचा स्वभाव होता, ठसठशीत कडक.
संध्याकाळचे पाच वाजले आणि जी भीती होती तीच झाली. दारात शोभा आत्त्या प्रकटले होत्या.
" अग सुमन परक्या धर्माची पोरगी आणायला काय तुझ्या धर्मातल्या पोरी काय मेल्या?" दारात आल्या आल्या शोभात्याचं हे बोलणं सर्वांच्याच जिव्हारी लागलं.
आई रितेशकडे रागात पाहत होती आणि म्हणत होती यासाठीच मी तुमच्यावर चिडले होते,
शोभात्या, राजेंद्र (रितेशचे बाबा) " तुला जर पोरगी मिळाली नव्हती तर पोराला विहिरीत ढकलायचा असता. कशाला परक्या जातीच्या पोरी आणता काय माहिती? रितेश तुझे काय डोळे फाटले होते? स प्रेम बघताना तुम्हाला धर्म जात दिसत नाहीत?
या सिद्धांतने पण मोठ्या घरची पोरगी सून म्हणून आणली. तिने सगळं घर काबीज करून, डोक्यावर मेरे वाटत बसली. आता ही, आणली परक्या जातीची पोरगी. आता घरात मांडणार अल्लाहू अकबर च्या गोष्टी!
शोभात्याचे हे बोलणे ऐकून कशिश चा डोळ्यातून पाणीच येत होतं.
शोभात्याचं बोलणं चालू झालं. कशिश मनस्वी आणि रितेश च्या आईच्या डोळ्यांना धारा लागल्या, तेवढ्यात तिथे अनुप आला, त्याने पाहिलं की घरातल्या सर्व स्त्रियाचे डोळे पाण्याने भरलेले आहे.
अरे वा! आल्याआल्या सर्वांना रडवायला सुरुवात केली म्हणजे आली वाटत बुवा शोभात्या, अनुपने खोचकपणे शोभा त्यांच्यासमोर बोलला.
शोभात्या अनुपवर भडकली, हे बघ तू मध्ये पडू नकोस! ही तुझीच लफडे आहे, "तुझं प्रेम विवाह नाही झाला म्हणून भावाला पण तूच मार्ग दाखवला." बरा आहेस रे बाबा! सगळी खानदानाची इज्जत मातीत मिसळून टाकली."
त्यावर अनुप बोलला, तुला या विवाहाला मान्यता द्यायची नव्हती तर आलीस तरी कशाला? फोन वरून तुला जे काय बोलायचे ते बोलायचे असते!
तुझा पोरगा कसं बोलतोय,शोभात्या अनुपच्या वडिलांकडे पहात बोलत होती.
अनुप चे वडील अनुपला समजणार इतक्यात अनुप बोलला , बाबा तुम्ही आमच्या दोघात बोलू नका.
मी शोभात्याला बोलतो, ती मला बोलतीये.
" तर काय म्हणत होती शोभाआत्या तू, कशीश कोणत्या धर्माची आहे? अगं ती मुस्लिम धर्माची तुला माहीत नाही का? तुला काय कळालं नाही, तुझा दुसरा प्रॉब्लेम काय आहे?
सिद्धांतनी श्रीमंताची पोर केली आहे, तोच ना?
ती मनस्वी आमच्या डोक्यावर मिरे वाटते असं तुला म्हणायचे ना पण सांगतो आत्या मनस्वी आणि कशीश या आता आमच्या घरातल्या सदस्य आहे, इथून पुढे त्यांच्या विषयी काही बोलू नकोस."