Login

अनुप-6

एका मुलाची कहाणी
    दोन महिन्याचा कालावधी उलटला कशिश आणि रितेश लग्नासाठी तयार झाले.
    कशिशचा रितेश ला फोन आला," माझी सर्व तयारी झाली. तुझी झाली आहे का?"
    रितेश, हो म्हणला त्याप्रमाणे, दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे कोर्टात दाखल झाले.
        साक्षीदार म्हणून अनुप, रितेशचे मित्र आणि कशिशच्या दोन मैत्रिणी तिथे होती.
     त्या दोघांचे लग्न झाले. आता प्रॉब्लेम होता फॅमिली समोर कसं जायचं?  त्यांनी ठरवलं, "पहिल्यांदा कशीश च्या घरी जायचं, त्या प्रमाणे ते कशिश च्या घरी गेले."
    तिच्या आई-वडिलांना धक्काच बसला, सर्वानी कशिश च्या आई-वडिलांना समजवायचा प्रयत्न केला. त्यांना स्वीकारायचा प्रयत्न करा, हे दोघे एकमेकांशिवाय राहू शकणार नाही, त्यांना आशीर्वाद द्या.
    यावर कशिशची आई अनुपला म्हणाली," आम्हाला समाजात राहायचे, हे समाज विरोधी कार्य तुमच्या सारखेच लोक करतात." आम्हाला आमचा धर्म महत्त्वाचा आहे.
   कशिषकडे पाहात त्या म्हणाल्या, "आम्हाला या पोरीचे तोंड देखील पहायची इच्छा नाहीये". निघून जा आमच्या दारातून."
     कशिश रितेश आणि अनुप तिथून निघाले,आता त्यांची खरी परीक्षा होती. रितेशच्या घरी जाण्याची,
    घरात आले, रितेश च्या आई-वडिलांना ही तसाच धक्का बसला, ज्याप्रमाणे कशिश च्या आई वडिलांना बसला.
   रितेश, अनुपला आई खूप बोलत होती, त्याची आई म्हणाली," अरे तुझ्या मोठा भाऊ लग्नाचा राहिला त्याचं लग्न करायचं. समाज काय म्हणेल, कोणत्याही धर्माचे उचलून आणली, तुला काही वाटतं नाही"
   यावर अनूप म्हणाला," आई याच्यात कसली लाज शरम दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं आणि दोघांनी लग्न केलं"
     आई तुला काय रितेश माझ्यासारखा झालेला पाहायचा आहे का?
   यावर मनस्वी सासू-सासरे कडे पाहत म्हणाली, त्याचा निर्णय चुकला पण तुम्ही चुकू नका, तुमचीच मुले म्हणून माफ करा. यांना स्वीकारा,"हे दोघे जाणार तरी कुठे सध्या समाज कसा झाला" ह्याना आपल्या सोबत राहू दे.
    आई एकदा कशीशचा धर्म बाजूला ठेवून, त्याच्या बाबतीत विचार करा.
     एक मुलगी म्हणून विचार करा, आई प्लीज नाही म्हणून नका.
   तुम्ही मला जीव लावता तसंच कशिशलाही जीव लावा. सिद्धांतही आई-वडिलांना समजू लागला. दोघ अजूनही लहान आहे. झालेली चूक माफ करा, यांना घरात घेऊ या.

     रितेश आणि कशीशच्या लग्नाचे दोन दिवस घरात अगदी गडबडीत गेले. घरात फक्त आई थोडी नाराज होती, बाकी सर्वजणनाणी रितेश आणि कशिशच्या लग्नाला हसत खेळत मान्यता दिलेली होती.
                सत्यनारायण पूजेसाठी रितेशच्या आईवडिलांनी जवळपासच्या नातेवाईकांना बोलवले, नातेवाईकही माघारी काचकूच करत होते.
     " दुसर्‍या धर्माची मुलगी आणि सून म्हणून एकमेकांना म्हणत होते,एक नातेवाईक वाईट म्हणाला, नाही जर परवानगी दिली रितेशचे हाल तर अनूप सारखे होईल. नावाला डॉक्टर आणि रात्री तर बेवडा." असं म्हणून हसत होते. मागेच रितेशचे वडील होते. नातेवाईकांचे हे बोलणं त्यांच्या जिव्हारी खूप लागले. "त्यांनी ठरवलं सर्व नातेवाईक घरी गेल्यानंतर अनुपला या बदलं बोलायच.
रितेशच्या आईची  लगबग सुरु होती. थोडी घाबरलेल्या होती. रितेशच्या बाबांचा बोलावल. नि म्हणाली, अहो शोभा आत्त्या  येणार 5 वाजता. त्यामुळे मला तर  बाई भीती वाटते. आजचे मुले आई-वडलांच ऐकत नाही. आता या शोभा ताई किती बोलतील.
रितेशचे बाबा म्हणाले, लोक काय म्हणतील, ते ऐकायच. सोडून द्यावे. मुले त्यांचे आयुष्य जस जगतात तसेच जगू देऊ. ते जिथे चुकतात, तिथे बोलू.
: रितेशची आई," तुमच्या अश्याच बोलण्याने अनूप वाया जातोय. तो  पूर्णपणे आपल्या ऐकण्या बाहेर गेला. तुम्ही त्याला सांगलत ना आत्त्या सोबत वाद घालायचा नाही".
रितेशचे बाबा म्हणाले, हो मी समजावले त्याला, तू नको काळजी करू!
       शोभा आत्त्या  वडीलधार्‍या होत्या आणि त्यांना घरात सर्वजण घाबरायचे कारण त्यांचा स्वभाव होता, ठसठशीत कडक.
      संध्याकाळचे पाच वाजले आणि जी भीती होती तीच झाली. दारात शोभा आत्त्या प्रकटले होत्या.
     " अग सुमन परक्या धर्माची पोरगी आणायला काय तुझ्या धर्मातल्या पोरी काय मेल्या?" दारात आल्या आल्या शोभात्याचं हे बोलणं सर्वांच्याच जिव्हारी लागलं.
आई   रितेशकडे रागात पाहत होती आणि म्हणत होती यासाठीच मी तुमच्यावर चिडले होते,
शोभात्या, राजेंद्र (रितेशचे बाबा) " तुला जर पोरगी मिळाली नव्हती तर पोराला विहिरीत ढकलायचा असता. कशाला परक्या जातीच्या पोरी आणता काय माहिती?  रितेश तुझे काय डोळे फाटले होते? स प्रेम बघताना तुम्हाला धर्म जात दिसत नाहीत?
या सिद्धांतने पण मोठ्या घरची पोरगी सून म्हणून आणली. तिने सगळं घर काबीज करून, डोक्यावर मेरे वाटत बसली. आता ही, आणली परक्या जातीची पोरगी. आता घरात मांडणार अल्लाहू अकबर च्या गोष्टी!
शोभात्याचे हे बोलणे ऐकून कशिश चा डोळ्यातून पाणीच येत होतं.


🎭 Series Post

View all