Login

अनुप- कथा एका मुलाची

Anup
       अशीच एक-दोन वर्षे गेली, अनुपचे हे असेच चालू होते. दिवसभर प्रॅक्टिस आणि रात्री पूर्णपणे ड्रिंक हा त्याचा नित्यक्रम चालत होता, घरी खूप उशिरा जायचं आणि सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडायचं, महिन्याचे पाच-दहा हजार वडिलांच्या हातात द्यायचे, सिद्धांत फॅमिली वाढलेली होती. त्याला जुळी मुले झाली, सासऱ्याच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहू लागला त्याची प्रगती उत्तमरित्या  होती.
   सिद्धांतची बायको, मनस्वी ही चांगल्या स्वभावाची होती, तिला एकत्र राहणं खूप आवडायचं. तिने घरच्यांना त्या घराला पूर्णपणे आपल करून घेतलं.
      रितेश वकिलीचे शिक्षण पूर्ण होण्यास आले तो आता स्वतःच्या सेलप्रॅक्टिसची तयारी करू लागला,
अनुपने आयुष्य मशीन सारखे बनवले, तो घरात जास्त कोणाशी बोलत नव्हता. जेवढा वेळ राहिला तेव्हा ते  सिद्धांताच्या मुलांना खेळवणं, रितेश सोबत चर्चा करण येवढ्या पुरताच घरात.
      अनुपच्या आईला अनुपची काळजी वाटायची,
   अनुप आता चिडचिडा झाला, कुणाला जास्त बोलत  नव्हता.
    अनुप च्या आईने त्याच्या लग्नाबद्दल अनुप जवळ दोनदा तीनदा विषय काढला, पण अनुप लग्नाचा विषय टाळून द्यायचा.
    एकदा रितेश संकोच करत अनुपच्या रूम मध्ये आला तो बोलू लागला , "रितेश तुला काय बोलायचं आहे? ते स्पष्ट बोल. तुला जर माझी गरज असल्यास मी तुला नक्की मदत करेल"
    यावर रितेश खुश झाला तो म्हणाला, "थँक्यू दादा"  यावर आनुप म्हणाला, कोण आहे ती मुलगी? तीचं नाव काय?रितेश थोडा लाज तो म्हणतो,  दादा तू कसं ओळखलं,
अनूप : मला या सर्वांचा अनुभव आहे.  दोघेही जोरजोरात हसत होते
        रितेशचे बोलणे ऐकून अनूप पहिले रितेशला  चला म्हणाला, मी पहिले कशीश ला भेटेल. त्यावरून पुढचं ठरवेल रितेश म्हणाला ठीक आहे, दादा संध्याकाळी पाच वाजता हॉटेल कॅफे कॉफी मध्ये भेटूया अनुप स्वतःशीच विचार करु लागला फॅमिली आई आई बाबाला विचाराव ?
परंतु त्याने ठरवले की पहिले कशीशला भेटायचं, तिच्याबद्दल माहिती काढायची, नंतरच आई-बाबांना हा विषय काढायचा.     
            त्यावरून संध्याकाळी पाच वाजता कशिश अनुप आणि रितेश ची भेट झाली. कशिश च्या पेहरावावरून आणि बोलण्यावरून ती एक घरंदाज मुलगी वाटत होती!
     जेव्हा अनुप ने कशीशला विचारलं तुझे आई-वडील  लग्नाला मान्यता देतील का?
    कशिश ने स्पष्टपणे सांगितलं,"नाही ते मान्यता नाही देणार"!
     मी विचारलं मग त्यांना दुखवून लग्न करणार? तुला चांगला वाटेल का?
      त्यावर कशिश म्हणाली रितेशला नाकारून, दुसर्या मुलाशी लग्न करून, मी त्या मुलाला पण धोका देत आहे, आणि स्वतःला पण धोका देत आहे.
"आई-बाबांचं नक्कीच मला समजून घेतील" अनुपला वाटलं आपणही असा जर मनोमन विचार केला असता तर!
    पण आता वेळ निघून गेली अनुपने रितेश आणि कशिष ला सांगितलं.मी उद्या आई-बाबांच्या कानावर घालतो, त्यांनी जर लग्नाला परवानगी दिली तर ठीक आहे," नाहीतर तुम्ही कोट मॅरेज करून घ्या"
त्यावर रितेश म्हणाला, थँक्यू दादा, युवर ग्रेट!
अनुपच्या गळ्याला पडला, अनुप ही खुश होता, कारण ज्या मार्गावर तो गेला होता, त्या मार्गावर त्याचा लहान भाऊ जाणार नव्हता!
      दुसऱ्या दिवशी सकाळी अनुप त्याच्या आई-वडिलांना बोलत होता, अनुपने बाबा ला सांगितले,"बाबा रितेश चे कशिश नावाच्या एका मुस्लिम मुली वरती प्रेम आहे" तुम्ही त्या मुलीला स्वीकारू शकता का?
     अनुप ची आई म्हणाली," कदापि नाही! आपला धर्म कोणता तिचा धर्म कोणता"
     ती या घरात राहू शकेल का नाही हे शक्य नाही मी तर हे लग्न स्वीकारणार नाही!
आई  नाराज होऊन निघून गेली. अनुप वडिलांकडे पाहिला त्यानी नकारार्थी मान दर्शवून आत मध्ये निघून गेले!
      अनूप ला आपली अवस्था झाली ती रितेशची अवस्था होऊ द्यायची नव्हती.
    रात्री घरी आल्यावर आई रितेश वर खूप चिडली, रडू लागली, त्याला या लग्नापासून परावृत्त करणे यासाठी खूप शपथा घालू लागली. आणाभाका घेऊ लागली, रितेश इकडे अनुप कडे हतबल नजरेने पहात होता.
            पण यावेळेस अनुपने ठरवले आपलीही अवस्था रितेशच्या अवस्थेत सारखी करू द्यायची नाही.
अनुप दुसऱ्यादिवशी रितेश आणि कशीशला भेटण्यासाठी त्याच्या हॉस्पिटल मध्ये बोलवले, त्याने कशिश ला विचारलं  तुझ्या घरचे या लग्नासाठी तयार  आहेत का?
त्यावर कशीश म्हणाली, मी माझ्या भावाला विचारून पाहते, तो ठिक आहे म्हणाला.
      त्या दिवशी रात्री, रितेशने अनुपच्या रूममध्ये आला, आणि त्यान सांगितलं, कशिशने तिच्या घरी विषय काढला, पण तिच्या घरचे पण या लग्नाला विरोध करत आहे, दादा कशिश ने उद्या मला भेटायला बोलवले आहे!
  ठीक आहे तू उद्या तिला बोलून घे तेच म्हणणं काय तुझं म्हणणं काय?  पुढचा विचार करा आणि काय निर्णय घ्यायचे ते सांगा!

       रितेश येऊन भेटला, त्याने सांगितलं,"दादा कशिश च्या आई-वडिल,भाऊ या लग्नाला विरोध करत आहे.
     आपल्या घरी या लग्नाला विरोध आहे त्यावर अनुपने तुमच्या दोघांचं काय मत आहे, त्यावर रितेश म्हणाला,'दादा आम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाहीये" आम्हाला काहीच कळत नाहीये,
     यावर अनूप ने सांगितले," तुम्हाला हे रिलेशन पुढे न्यायचे आहे का इथेच संपवायचे आहे?"
   यावर  रितेश रडू लागला, दादा मी कशिश शिवाय नाही राहु शकत. माझा खरच तिच्यावर खूप प्रेम आहे".
     अनुपने रितेश ला समजावला, तु मुलगा आहेस पण कशीश एक मुलगी आहे, तिला पण तिच्या फॅमिली आहे तिचा डिसिजन काय आहे.
     यावर रितेश अनुपला म्हणाला, "दादा हवा तर तू कशिश  ला  विचारू घे.
  अनूप: "ठीक आहे संध्याकाळी पाच वाजता आपण भेटूया" त्यावर मी तुला बोलतो ठरल्याप्रमाणे अनुप रितेश आणि कशीश " हॉटेल कॅफे कॉफी डे", मध्ये  भेटले.
   कशीशला  विचारलं, तुला या रिलेशन संबंधी निर्णय काय घ्यायचा आहे? तुला जर हे रिलेशन तोडायचा असेल तसे सांग,  तुमच्या दोघांना जर लग्न करायचं असेल तर त्याप्रमाणे सांग!
       यावर कशीश म्हणाली मी रितेशला सोडून दुसऱ्या मुलासोबत नाही राहू शकत, असे केल्यास मी त्या मुलाला धोका देत राहील. स्वतःला ही धोका देत राहील आणि रितेश धोका देत राहील.
   राहिला आई बाबा चा प्रश्न तर मला खात्री आहे की ते मला नंतर समजूनच घेतील, रितेश म्हणाला, माझे पण आई-वडील सध्या या लग्नाला विरोध करत आहेत पण मला एक खात्री आहे की नंतर ते तुला स्वीकारतील, त्यामुळे मी या लग्नासाठी तयार आहे यावर अनुप म्हणाला," रितेश तू कोर्ट मॅरेज साठी रजिस्ट्रेशन कर".
     रितेश म्हणाला," हो दादा मी त्या साठी रजिस्ट्रेशन करेल, पण यासाठी एक महिना अवधी लागेल, साक्षीदार म्हणून तुला यावे लागेल. अनुप म्हणाला ठीक आहे. मी साक्षीदार म्हणून तिथे येईल