अनुभवी फुलपाखरं

"संध्या तुझी सून आली कां ग माहेरहून ?छाया ने विचारले"??नाही ग एक दोन दिवसात येईलच "मग काय सध्या तुझच राज्य? जो जी मे आए करो" काय?? . नंदाने हसत हसत टोला दिला.' कसलं राज्य ? वेळ काढते झालं! फार काही आवरत नाही ग! उगाचच ढवळाढवळ केलेली तिला आवडणार नाही-----------------------------------------

*अनुभवी फुलपाखरं*


अगं "आजी-आजोबांची गरज नातवंडांना लहान असेपर्यंतच असते ग".
मागून आलेल्या संवाद कानावर येतात हेमा ने गर्रकन मागे वळून पाहिलं .
चार-पाच समवयस्क स्त्रियांच्या ग्रुप बागेतल्या बेंचवर विसावला होता .त्यातलीच एक आपले मत मांडत होती.
हेमा आपल्या नातीला पियू ला घेऊन बागेत आली होती पियू तिच्या मुलीची वर्षा चीमुलगी ,तिचा वाढदिवस म्हणून हेमा इकडे आली होती.
"आई आता रहा महिना-दोन महिने, वर्षा ने आग्रह करून ठेवून घेतले. हेमा ला ही पियू चा सहवास हवा होता म्हणून ती राहायला तयार झाली.
तशी ती एकटीच होती एकच मुलगी तिचे लग्न झाले यजमानांना जाऊन बरीच वर्ष झाली होती.
एक-दोन वर्षात हेमा ही सेवानिवृत्त होणार होती.
पियू ला संध्याकाळी ती बागेत घेऊन येत असे.
तिथे बरीच लहान मुले खेळत ते पाहायला पियू ला मजा येत असे.


एक-दोन दिवसात चेहरे परिचित व्हायला लागले. त्या ग्रुप मधल्या एकी ने विचारले "नवीन आहात कुठे राहता"?
\"त्या समोरच्या मल्टी मध्ये कुलकर्णी आहेत ना, त्यांच्याकडे आले आले आहे\"
"कोणाच्या आई ?मिस्टर की मिसेस च्या" ?
मी मिसेस हेमलता सप्रे, माझी मुलगी वर्षा कुलकर्णी, ही माझी नात,
\"अच्छा--- म्हणजे प्रवासी पक्षी आहे !त्या ग्रुप मधली एक बोलली.
मंजे?? हेमा ने न समजून विचारले!
म्हणजे , आहो थोड्या दिवसा करता आला आहात.
मी आमच्या गृप ची ओळख करून देते.
ही नंदा, हिच्या मुली कडे राहते कायमची,मी छाया-- मी व मिस्टर इथेच राहतो, मुलगा ,मुलगी बाहेर असतात ,आणि --ही संध्या, मुला कडे आली आहे कायमची राहायला. आणि ही शोभा एकटीच असते.आम्ही परमनेंट मेंबर.अजुनही काही आहेत त्या कधी कधी येतात.
आम्ही सर्व या बागेत फिरायला यायचो, हळूहळू ओळख झाली. एकमेकींचे सुख दुःख वाटून घेऊ लागलो, व जमेल तसा त्यातून मार्ग काढण्यात मदत करू लागलो.

हेमा ने विचार केला,जर रिटायर्ड झाल्या वर मुली कडे राहायचे असेल तर बर्याच गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
पुढे पियू मोठी झाली की मग तिला आजी पेक्षा बरोबरचे मित्र मैत्रिणींची सोबत आवडेल मग आपल्या ला समवयस्क मैत्रीणींअसल्या तर आयुष्यसहज होईल. तेव्हा बागेतल्या या मैत्रीचा आधार होईल.

अगं ती मिसेस वर्मा परत आली कां ?? शोभाने छाया ला विचारले .
हो ssआली आहे, एक-दोन दिवसांत येईल फिरायला. इतके दिवस घर बंद होतं ना ते स्वच्छ करून घेती आहे.
आमच्या बाईला कामाचे विचारत होती.
इतके दिवस सुने कडे राहून आरामाची सवय लागली ना! आता कठीण वाटतय. त्यांच्यामध्ये सुन आली की सासू स्वयंपाक घरात शिरत च नाही असं वाटतं.
,"पण मग वेळ कसा जातो या बायकांचा?"
मी विचारले तर म्हणाली" बहुत दिन कर लिया अब पूजा पाठ मे मन लगाने के दिन है."
पण दिवसभर काय देव- देव च करायचं ??
कोsण जाणे त्यांच्याकडे तशीच पद्धत. इतकी जाड झालीये चालताना सुद्धा पाय दुखतात, म्हणून वजन कमी करायला फिरायला यायचे म्हणते..
प्रत्येक घरची वेगळी च पद्धत!

"संध्या तुझी सून आली कां ग माहेरहून ?छाया ने विचारले"??
नाही ग एक दोन दिवसात येईलच "मग काय सध्या तुझच राज्य? जो जी मे आए करो" काय?? . नंदाने हसत हसत टोला दिला.
\" कसलं राज्य ? वेळ काढते झालं! फार काही आवरत नाही ग! उगाचच ढवळाढवळ केलेली तिला आवडणार नाही\".
काय सांगतेस??
\"अग हो मागच्या वेळी मी खूप उत्साहाने डब्बे घासून पुसून भरून ठेवले,\" पण्
पणकाय ??
\"खूप कौतुक झाले असेल\"?
कसलं नि काय! कोणत्या डब्यात काय ठेवलं होतं तेच आठवायच नाही,मग तिला परत सर्व करावे लागले.
तेही खरंच आता हे घर ति च आहे
,हं ठीकच आहे ग फार गुंतु नाहीच आपण .जेवढे सांगतील तेवढं करावं आणि बाजूला व्हाव
.
अगं ती रोहिणी बरेच दिवस झाले दिसली नाही.छाया ने विचारले.
अगं पाय घसरून पडली हाड मोडले आहे त्या मुळे सध्या फिरणे बंद आहे.मी गेले होते परवा तिला पहायला
खूप कंटाळवाणे होते असे म्हणत होती.घरात कोणी नसते सुन,मुलगा कामाला जातात .
आपण जाऊ या भेटायला कां?नंदा ने प्रस्ताव मांडला.
सर्व एकत्र नाही आपण एक एक दिवस ठरवून जाऊया दुपारी बसायला म्हणजे तिलाही कंटाळा वाणे नाही होणार.
हो हे ठीक राहील.चौघींच एकमत झाले.

बर्‍याच गप्पा आणि फिरणं झालं आज शोभा कुठे राहिली??
तीकाय त्या नव्या हेमामालिनी बरोबर येत आहे.
छान दिसते ना ही हेमा, लहान आहे,अजून एकच मुलगी आणि नात .
मुलीकडे राहणार आहे ना म्हणून शोभा शी छान जमेल तिचे शोभा चा अनुभव ,जावयाशी कसं वागायचं किती बोलायचं व काय नाही याचं ट्रेनिंग मिळेल.
हो शोभा खूप एडजस्ट करुन रहाते.
सांगितले होते एकदा, यावेळी जावई घरी येतात म्हणून फिरायला निघून येते.
अगं किती , आणि कसं वागायचं हे प्रत्येकाला आपलं आपलंच ठरवावं लागतं ,तरी एकमेकिंचे अनुभव ऐकून कांहीं साॅलुशन दिले तर काय हरकत??
बरंय ग उद्या भेटू आपली भीशी आहे न? आता रोहिणी पण बरी आहे ती पण येणार आहे शोभा उत्साहात म्हणाली .
कुठे जायचे त्याच काॅफी हाऊस मधे? छाया सर्वांना वाट्स एप करून देशिल?
हो बरेच दिवस झाले उत्तपम खायची इच्छा होती.
मी आले तर चालेल कां हेमा ने विचारले??
होss आवडेल ,
एकसुरात म्हणत ,अनुभवाचा मकरंद लुटत ,एकामेकिंना वाटत सर्व अनुभवी फुलपाखर आपापल्या घराकडे निघाली
-----------------------------------------